Marathi Bible Reading | Saturday 27th January 2024 | 3rd Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील तिसरा  सप्ताह

शनिवार  दि २७ जानेवारी  २०२४

  ✝️ 

  पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. Therefore pray earnestly to the Lord of the harvest to send out labourers into his harvest.
✝️



संत तिमथी व संत तीत यांचा सण

✝️
  ख्रिस्तसभा आज संत तिमथी व संत तीत यांचा सण साजरा करीत आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या देणग्यांचा वापर करून ह्या संतांनी सुवार्तेची साक्ष इतरांना दिली आपल्या सर्वांना त्यांचे अनुकरण करता यावे म्हणून प्रयत्नशील बनू या. 
✝️   

पहिले वाचन २ तीमथ्य १:१-८
वाचक :२ तीमथ्य  पुस्तकातून घेतलेले वाचन

प्रिय मुलगा तीमथ्य ह्याला, रिव्रस्त येशू मधील जीवनविषयक वचनानुसार देवाच्या इच्छेने रिव्रस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून देवपिता व रिव्रस्त येशू आपला प्रभु ह्यांच्या पासून कृपा, दया व शांति असो.
 मी आपल्या प्रार्थनांत रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करितों आणि तुझे अश्रु मनांत आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगितों, तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची • माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावानें करितों, त्याचे मी आभार  मानितों.  तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठायी होता, तुझी आई यूनीके हिच्या ठायी होता; आणि तोच तुझ्याहि •ठायी आहे असा मला भरवसा आहे. 
ह्या कारणास्तव मी तुला आठवण देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेविल्यामुळे तुझ्या ठायी आहे. ते प्रज्वलित कर  कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे म्हणून आपल्या प्रभू विषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान् त्या माझी तूं लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दुःख सोसावें
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :2 Timothy 1:1-8 (Or: Titus 1:1-5)

Paul, an apostle of Christ Jesus by the will of God according to the promise of the life that is in Christ Jesus, to Timothy, my beloved child: Grace, mercy, and peace from God the Father and Christ Jesus our Lord. I thank God whom I serve, as did my ancestors with a clear conscience, as 1 remember you constantly in my prayers night and day. As I remember your tears, I long to see you, that I may be filled with joy. I am reminded of your sincere faith, a faith that dwelt first in your grandmother Lois and your mother Eunice and now, I am sure, dwells in you as well. For this reason I remind you to fan into flame the gift of God, which is in you through the laying on of my hands, for God gave us a spirit not of fear but of power and love and self-control. Therefore do not be ashamed of the testimony about our Lord, nor of me his prisoner, but share in suffering for the gospel by the power of God.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र ६:१-३,७-१०
प्रतिसाद :   सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुतकृत्यें जाहीर करा.

१) परमेश्वराचे  गुणगान नवे गीत गाऊन करा.
हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचें गुणगान कर. 
परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नांवाचा धन्यवाद करा ; 
त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रति दिवशी करा.

२) राष्ट्रामध्ये त्याचें गौरव, सर्व लोकांमध्ये 
त्याची अद्भुतकृत्यें जाहीर करा.
अहो मानवकुलांनो, परमेश्वराचें गौरव करा :
परमेश्वराचें गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा.

३)परमेश्वराच्या नांवाची थोरवी गा; 
अर्पण घेऊन त्याच्या अंगणांत या;
 पवित्रतेच्या शोभेनें परमेश्वराची उपासना करा ;
 हे सर्व पृथ्वी त्याच्यापुढें कंपायमान हो.

४) राष्ट्रांमधील लोकांना विदित करा की, 
परमेश्वर राज्य करितो. जग स्थिर स्थापिलेले आहे,
तें डळमळणार नाहीं.
तो सरळपणें लोकांचा न्याय करील.


Psalm 96:1-2a, 2b-3, 7-8a, 10

Tell among all the peoples the wonders of the Lord.

O sing a new song to the Lord; 
sing to the Lord, all the earth. 
O sing to the Lord; bless his name. 
Proclaim his salvation day day. 
Tell among the nations his glory, 
and his wonders among all the peoples. R

Give the Lord, you families of peoples,
 give the Lord glory and power; 
give the Lord the glory of his name. R 

Say to the nations, "The Lord is king." 
The world he made firm in its place; 
he will judge the peoples in fairness.

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
 प्रभू म्हणतो,
मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे, ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.

 The Lord has anointed me to proclaim good news to the poor, to proclaim liberty to the captives.

Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक  १० : १-९

वाचक :  लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊं नका, वाटेनें कोणाला मुजरा करूं नका.

         ह्यानंतर प्रभूनें आणखी बहात्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्या ठिकाणीं तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठविलें.  तेव्हां त्यानें त्यांना म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा.  जा; लांडग्यांमध्ये कोंकरें तसें तुम्हांस मी पाठवीत आहे, पाहा.पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊं नका, वाटेनें कोणाला मुजरा करूं नका. ज्या कोणत्या घरांत जाल तेथें, ह्या घरास शांति असो, असें प्रथम म्हणा.  तेथें कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांति त्याच्यावर राहील; नसला तर तुम्हांकडे ती परत येईल.  त्याच घरांत वस्ती करून ते जें देतील तें खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरें बदलू नका.  कोणत्याहि नगरांत तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचें स्वागत केलें तर ते जें तुम्हांस वाढतील तें खा.  त्यांत जे दुखणाईत असतील त्यांना बरें करा व त्यांना सांगा की, देवाचें राज्य तुमच्याजवळ आले आहे.

प्रभूचे हे शुभवर्तमान 

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:Luke 10:1-9

At that time: The Lord appointed seventy-two others and sent them on ahead of him, two by two, into every town and place where he himself was about to go. And he said to them, "The harvest is plentiful, but the labourers are few. Therefore pray earnestly to the Lord of the harvest to send out labourers into his harvest. Go your way; behold, I am sending you out as lambs in the midst of wolves. Carry no money bag, no knapsack, no sandals, and greet no one on the road. Whatever house you enter, first say, 'Peace be to this house!" And if a son of peace is there, your peace will rest upon him. But if not, it will return to you. And remain in the same house, eating and drinking what they provide, for the labourer deserves his wages. Do not go from house to house. Whenever you enter a town and they receive you, eat what is set before you. Heal the sick in it and say to them, The kingdom of God has come near to you!

  This is the Gospel of the Lord 

Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआज आपण संत तिमथ्य व संत टायटस ह्यांचा सण साजरा करीत आहोत. दोन्ही प्रेषित प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाचे एक महान उदाहरण आपणासमोर ठेवतात. दोघेजण संत पौलचे सहकारी होते आणि दोघे जण बिशप होते. संत पौल त्यांच्या विश्वासाची प्रशंसा करताना त्यांना त्यांच्या स्वाधीन केलेल्या कळपाची काळजी घेण्यासाठी सांगतो. संत तिमथ्य आणि संत टायटस ह्यांनी विश्वासाने आपला मिशन कार्यभार सांभाळला. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने आपल्या शिष्यांना मिशन विषयी दिलेली आज्ञा संत तिमथ्य आणि संत टायटस ह्यांनी तंतोतत पाळली. मिशनवर जाणे म्हणजे ऐहिक गोष्टींपेक्षा मिशनला विशेष प्राधान्य देणे होईल. ऐहिक गोष्टींमुळे,खाण्यापिण्याच्या चिंतेमुळे आपले लक्ष विचलीत होऊ शकते, म्हणून प्रभू येशू मिशनची तातडीची गरज ओळखून शुभवर्तमान प्रचाराला जास्त महत्त्व देण्यासाठी सांगतो. प्रभू ख्रिस्ताची सुवार्ता सांगणे हे तिमथ्य आणि टायटस ह्यांच्या जीवनाचे पहिले मिशन बनले होते, कारण संत पौलने त्यांना तसे शिकवले होते. ख्रिस्तसभा आज आपणांस प्रभू ख्रिस्ताच्या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी बोलावत आहे. चर्चचे मिशन पुढे नेण्यासाठी माझी तयारी आहे का?

प्रार्थना : हे प्रभू येश, आम्ही सर्वस्वी तुझ्या सत्यात आम्हाला समर्पित करतो,  आम्हाला बंधमुक्त कर, आमेन.

✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या