Marathi Bible Reading | Fourth Sunday In Ordinary Time | 28th January 2024

 सामान्यकाळातील चौथा रविवार  

 दि. २८ जानेवारी  २०२४

  ✝️ 

 काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण! हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात.”
"What is this? A new teaching with authority! He commands even the unclean spirits, and they obey him." 




शुभवर्तमानातील प्रभू येशूची शिकवण लोकांना थक्क करणारी होती.  शुभवर्तमानात घडलेला चमत्कार प्रभू येशूच्या सामर्थ्याचे प्रकटिकरण होते.  अशुद्ध आत्म्याने म्हटले, 'आमचा नाश करावयास आलास काय?' खरोखरच प्रभू येशू सर्व दुष्ट आणि अशुद्ध आत्म्यांचा नाश करावयास आला. आपल्या सर्वांना शारिरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य देण्यास प्रभू येशू ह्या जगात आला. आपल्या जीवनावर केवळ देवाचा म्हणजेच प्रभू येशूचा अधिकार आहे,  मात्र प्रभूला आपला स्वामी आणि प्रभू म्हणून आपण उघडपणे स्वीकार  करायला हवे. सर्वस्वी प्रभूला शरण जाऊन त्याची कृपा अनुभवण्यास आपण  आज प्रेरणा मागू या.आपण आज चिंतन करुया की त्याच्या सामर्थ्यावर आपली श्रद्धा आहे का ? त्याची अधिकारयुक्त शिकवण आपण आचरणात आणतो का ?
आपल्या जीवनावर केवळ देवाचा म्हणजेच प्रभू येशूचा अधिकार आहे, मात्र प्रभूला आपला स्वामी आणि प्रभू म्हणून आपण उघडपणे स्वीकार करायला हवे. सर्वस्वी प्रभूला शरण जाऊन त्याची कृपा अनुभवण्यास आपण आज प्रेरणा मागू या.
                                                  ✝️ 

पहिले वाचन :अनुवाद - १८:१५-२०
वाचक :  अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन 

        मी आपली वचने घालीन." मोशे लोकांना म्हणाला, "तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंदांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरिता उभा करील, त्याचे तुम्ही ऐका. होरेब डोंगरापाशी मंडळी जमली होती त्या दिवशी आपला देव परमेश्वर ह्याच्यापाशी तू विनंती केली होती. त्याचप्रमाणे होईल; 'माझा देव परमेश्वर ह्याची वाणी पुन्हा माझ्या कानी न पडो, मोठा अग्नी पुन्हा दृष्टीस न पडो, पडला तर मी मरेन.' तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, 'हे लोक म्हणतात ते ठीक आहे. मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंदातून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन, त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील. तो माझ्या नावाने बोलेल, ती वचने जो कोणी ऐकावयाचा नाही त्याला मी जाब विचारीन. पण जो संदेष्टा उन्मत्त होऊन जे बोलावयाची आज्ञा मी त्याला दिली नाही ते वचन माझ्या नावाने बोलेल अथवा जो अन्य देवाच्या नावाने बोलेल तो संदेष्टा प्राणास मुकेल."

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Deuteronomy 18:15-20

Moses spoke to the people saying, "The LORD your God will raise up for you a prophet like me from among you, from your brothers-it is to him you shall listen- just as you desired of the LORD your God at Horeb on the day of the assembly, when you said, 'Let me not hear again the voice of the LORD my God or see this great fire any more, lest I die.' And the LORD said to me, They are right in what they have spoken. I will raise up for them a prophet like you from among their brothers. And I will put my words in his mouth, and he shall speak to them all that I command him. And whoever will not listen to my words that he shall speak in my name, I myself will require it of him. But the prophet who presumes to speak a word in my name that I have not commanded him speak, or who speaks to in the name of other gods, that same prophet shall die.'
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र  ९५:१-२,६-९

प्रतिसाद : आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल!

१ याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करून या; आपण तारणदुर्गाचा जयजयकार करू, उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.

२ चला, आपण त्याला नमन करू आणि त्याच्यापुढे लोटांगण घालू, आपल्या निर्माणकत्त्या परमेश्वरापुढे आपण गुडघे टेकूया. कारण तो आपला देव आहे. आणि आपण त्याच्या कुरणातली प्रजा, त्याच्या हातचा कळप आहो.

३ आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल! मरिबाप्रमाणे, रानातील मस्सा या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा केली आणि मला पारखले.

Psalm 95:1-2, 6-7abc, 7d-9 (7)

O that today you would listen to his erret Harden not your hearts.

Come, let us ring out our joy to the thes hail the rock who saves us. Let us come into his presence, giving herkes let us hail him with a song of praise.

O come; let us bow and bend low. Let us kneel before the God who made us, for he is our God and we the people who belong to his pasture, the flock that is led by his hand. R

O that today you would listen to his voice! "Harden not your hearts as at Meribah, as on that day at Massah in the desert when your forebears put me to the test; when they tried me, though they saw my work."

दुसरे वाचन :१ करिंथकरास  ७:३२-३५

वाचकपौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

तुम्ही निश्चित असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष प्रभूला कसे संतोषवावे अशी प्रभूच्या गोष्टींविषयीची चिंता करतो, परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयींची चिंता करतो; त्यामुळे त्याचे मन द्विधा झालेले असते. जी अविवाहित स्त्री किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने आणि आत्म्यानेही पवित्र व्हावे अशी प्रभूच्या गोष्टींविषयींची चिंता करते, परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयींची चिंता करते. हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो. तुम्हांला अडचणीत गुंतवावे म्हणून नव्हे तर तुमच्या हातून उत्तम आचरण आणि प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading: 

1 Corinthians 7:32-35

Brethren: I want you to be free from anxieties. The unmarried man is anxious about the things of the Lord, how to please the Lord. But the married man is anxious about worldly things, how to please his wife, and his interests are divided. And the unmarried or virgin woman is anxious about the things of the Lord, how to be holy in body and spirit. But the married woman is anxious about worldly things, how to please her husband. I say this for your own benefit, not to lay any restraint upon you, but to promote good order and to secure your undivided devotion to the Lord.

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया!

शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली.जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचाअधिकार दिला.

  आलेलुया!

Acclamation: 

R. Alleluia, alleluia.

 The people dwelling in darkness have seen a great light, and for those dwelling in the region and shadow of death, on them a light has dawned.

R. Alleluia, alleluia.


शुभवर्तमान  मार्क  :२१-२८

वाचक :  मार्क लिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

  येशू शिष्यांसह कफर्णहूमला गेला आणि लगेच शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन त्याने शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार वाणीने शिकवीत होता. त्याच वेळी त्याच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो मोठ्याने म्हणाला, "हे येशू नाझरेथकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास तू आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच." तेव्हा येशूने त्याला धमकावून म्हटले, "गप्प राहा आणि ह्याच्यातून नीघ.” तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला आणि त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की, ते एकमेकांना विचारू लागले, "हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण! हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात.” ही त्याची कीर्ती लगेच गालील प्रांताच्या चहूकडल्या सर्व भागात पसरली.   

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:Mark 1:21b-28

[In the City of Capernaum] on the sabbath, Jesus entered the synagogue and was teaching. And they were astonished at his teaching, for he taught them as one who had authority, and not as the scribes. And immediately there was in their synagogue a man with an unclean spirit. And he cried out,What have you to do with us, Jesus of Nazareth? Have you come to destroy us? I know who you are the Holy One of God." But Jesus rebuked him, saying, "Be silent, and come out of him!" And the unclean spirit, convulsing him and crying out with a loud voice, came out of him. And they were all amazed, so that they questioned among themselves, saying, "What is this? A new teaching with authority! He commands even the unclean spirits, and they obey him." And at once his fame spread everywhere throughout all the surrounding region of Galilee.

 This is the Gospel of the Lord 

Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 'तुमच्याने होईल तेवढे उत्कृष्टपणे करा, उरलेले सर्वकाही परमेश्वरावर सोपवा असे उद्गार सलेसिअन संस्थेचे संस्थापक संत जॉन बॉस्को ह्यांनी काढलेले आहेत. आजची तिन्ही वाचने परमेश्वरावर मनापासून भरवसा ठेवण्यासाठी आपल्याला साद घालीत आहेत. मोशेचे उद्या जरकाही बरं वाईट झाले तर आपले काय होईल अशी चिंता इस्राएल लोकांना भेडसावित होती. आजच्या पहिल्या वाचनात खुद्द मोशे त्यांना देवावर भरवसा ठेवायला व तो नक्कीच योग्य तो नेता देईल असा विश्वास बाळगायला सांगतो, तर दुसऱ्या वाचनात विवाहित पुरुष जसा आपल्या पत्नीला संतोषविण्यास धडपडतो, त्याप्रमाणे अविवाहित पुरुष परमेश्वराला प्रसन्न करण्यास धडपडत असतो असे सांगून आपण या पुरुषाप्रमाणे परमेश्वराला आपल्या जीवनात अढळ स्थान द्यावे असा सल्ला संत पॉल आपल्याला देतो. शुभवर्तमानामध्ये तीन गोष्टी ठळकपणे आपल्या दृष्टीस पडतातः दिवस आहे शब्बाथाचा. ठिकाण आहे सभास्थान आणि घटना आहे येशू शिकवण देत असल्याची. खरे पाहता ह्या तिन्ही गोष्टी पवित्र आहेत. परंतु यहुदी लोकांच्या जीवनात ह्या गोष्टी मनापासून केल्या जात नव्हत्या हे इतर तपशिलावरून दिसून येते. सभास्थानात अशुद्ध आत्मा असलेला माणूस आहे म्हणजे यहुदी लोक खऱ्या अर्थाने शब्बाथ पवित्र पाळीत नव्हते. सभास्थान अशुद्ध झालेले होते (पहा, प्रकटी २:९, ३:९). त्यांची शिकवण व त्यांचे आचरण यांमध्ये सुसंगती नव्हती. (पहा, मार्क ७:६-७). देवाविषयी बरेचसे प्रकटीकरण होऊनसुद्धा देवावर ते खऱ्या मनाने प्रेम करीत नव्हते. अशा पार्श्वभूमीवर येशू अधिकार वाणीने शिकवितो, सामर्थ्याने त्या माणसाला मुक्त करतो आणि आपण स्वतः शब्बाथाचा, सभास्थानाचा व नियमशास्त्राचा प्रभू आहोत हे सिद्ध करतो. 
आत्मपरीक्षण : परमेश्वरावर संपूर्ण मनाने भरवसा ठेवण्यात कोणकोणत्या अडचणी आहेत ? आपल्या धार्मिक जीवनात कोणकोणते दोष वा अशुद्धता आहे? रविवारची मिस्सा, चर्चमध्ये जाणे व शा्त्रनिरूपण ह्यांचा आपल्या जीवनात कोणता फायदा दिसून येतो ?

प्रार्थना : हे प्रभू येशू. सर्वस्वी तुजवर अवलंबून राहण्यास व तुझी कृपा अनुभवण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या