Marathi Bible Reading | Wednesday 28th January 2026 | 3rd Week in ordinary Time

सामान्यकाळातील  तिसरा सप्ताह

बुधवार दि. २८जानेवारी   २०२

 "देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हांलाच दिले आहे, 
 To you it is given to know the mystery of the kingdom of God:

संत थॉमस अक्वायनसचा सण 
(वर्तन साक्षी व धर्मपंडित (१२२५-१२०४)
✝️

इटलीमधील अत्यंत खानदानी घराण्यातील राजा फ्रेडरिक दुसरा ह्याच्या कुटुंबियांमध्ये थॉमसचा जन्म झाला. वयाच्या अगदी ५ व्या वर्षी मॉन्टे कॅसिनो येथे असलेल्या बेनेडिक्टाईन संघात त्याला दाखल करण्यात आले. वयाच्या ११ व्या वर्षी नेपल्सच्या महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला आणि वयाच्या १८ व्या वर्षी तो डॉमिनिकन बनला.
परंतु त्या भिक्षुकांच्या संस्थेत दाखल होण्याबाबत त्याचे कुटुंबीय खूप नाराज होते. एका खानदानी घराण्यातील सळसळत्या रक्ताचा युवक एका भिक्षुकांच्या संस्थेत दाखल होतो हे पाहून त्याच्या कुटुंबियांत इतकी कडवट प्रतिक्रिया उत्पन्न झाली की त्यांनी दोन वर्षे थॉमसला एका टॉवरमध्ये डांबून ठेवले.
प्रेषितांच्या कृत्यांमध्ये संत पौल दमास्कसमध्ये प्रभूची सुवार्ता पसरवित होते, त्यावेळी काही ख्रिस्ती धर्मविरोधी यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला असताना त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी एका पाटीतून, गावकुसावरून खाली सोडले (प्रे. कृ. ९:२५). तशीच घटना थॉमसच्या बाबतीत घडली. डॉमनिकन सहकाऱ्यांनी त्याला एका टोपलीतून खाली उतरविले. तो अशा बंदिवासात असताना त्याच्या बहिणीने त्याला पवित्र शास्त्र आणि धार्मिक पुस्तके पुरविली. त्यात तत्त्वज्ञानाचीसुद्धा काही पुस्तके होती. लाखाच्या घरात गेली. “कॅथलिक इशज्ञानांचा राजकुमार” आणि “पवित्र धर्मपंडित" अशा पदव्या संपादन केलेल्या थॉमस ह्याने ॲरिस्टल ह्याचे तत्वज्ञान ख्रिस्ती धर्माच्या प्रकाशात विद्यार्थ्यांना शिकविले. अशा प्रकारे बौद्धिक तत्वज्ञान ह्या क्षेत्रातील तो पारंगत प्राध्यापक म्हणून जगभर मान्यता पावला.

फा. थॉमस केवळ ४९ वर्षे जगले, परंतु ह्या अल्पायुष्यात त्याने ६० पुस्तके लिहिली. "सुम्मा थिऑलॉजिए” किंवा “ख्रिस्ती तत्वज्ञान व ईशज्ञान ह्यांचे सार” ह्या त्याच्या लिखाणाचे अनेक खंड असंख्य भाषांमध्ये प्रसिद्ध झाले. ह्या ग्रंथामध्ये त्याने ख्रिस्ती तत्वज्ञान व ईशज्ञान पुढील शब्दात वर्णन केलेले आहे : ईशज्ञान व तत्वज्ञानाचा अंतिम उद्देश देवाविषयी ज्ञान प्रसारित करणे हाच होय. तो जसा आहे तसा समजून घेणे, तो सर्व गोष्टींचा विशेषतः मानवी जीवनाचा आदि व अंत आहे. त्यामुळे आपण प्रथम देवाविषयी देवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि शेवटी आपणासाठी मानव झालेला ख्रिस्त देवाकडे जाणारा मार्ग कसा आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही प्रकारचा अभ्यास व शिक्षण सुरू करण्याआधी संत थॉमस बराच वेळ प्रार्थना आणि मनन-चिंतनामध्ये घालवित असे आणि देवाचे सहाय्य मागत असे. तो त्याच कामामध्ये इतका गुंग होत असे की त्याने वेळेवर जेवण व झोप घ्यावी म्हणून त्याच्यावर एखादया धर्मबंधूची नेमणूक करावी लागे. बायबलमधील एखाद्या उताऱ्याचा अर्थ त्याला बऱ्याच अभ्यासानंतर जर समजलाच नाही तर तो उपवास करीत असे. त्याचा त्याला निश्चितच फायदा होई. ह्याच त्याच्या जीवनपद्धतीमुळे त्याच्यामध्ये पराकोटीचे पावित्र्य आणि उत्तुंग विचारवंत अशा दोहोंचा सुंदर मिलाफ घडवून आला.

ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताच्या सोहळ्यानिमित्ते करावयाची प्रार्थना, मिस्सामधील प्रार्थना, उपासना आणि “तांतुम एर्गो” “ओ सालतारिस होस्तीया” ही गाणी पोपमहाशयांच्या आज्ञेवरून त्यांनी रचली.

लिओन्स येथील परिषदेसाठी जात असतानाच संत थॉमस ह्यांना अचानक मृत्यू आला. त्याला कॅथलिक विद्यापीठे, महाविद्यालये व शाळा ह्यांचा आश्रयदाता संत म्हणून गौरविण्यात आले आहे.

 बीज म्हणजेच देवाचे वचन ज्या जमिनीत (माणसाच्या हृदयात) अंकुरले त्याला, त्यानुसार पीक येते. तीसपट, साठपट, शंभरपट, आपली  जमिन कशी आहे? देवाच्या वचनात सामर्थ्य, ऐश्वर्य संपन्नता, जीवनाची परिपूर्तता आणि सार्वकालिक स्वर्गीय जीवनाची फलप्राप्ति आहे. आपल्या  अंत:करणाचे कान उघडे करु या. पेरणाऱ्याने आपल्या सर्वांसाठी पवित्र शास्त्रात वचनांचा महान खजिना ठेवलेला आहे. ही वचने अंकुरित करून त्यानुसार फलद्रूप होणे आपल्यावर अवलंबून आहे.


पहिले वाचन २ शमुवेल ७:४-१७
वाचक :शमुवेलच्या दुसऱ्या  पुस्तकातून घेतलेले वाचन

"तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्यापुढे अढळ राहील."

परमेश्वराचे वचन नाथानला प्राप्त झाले ते असे: “जा माझा सेवक दावीद ह्यास सांग, 'परमेश्वर म्हणतो, तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय ? मी इस्राएल लोकांना इजिप्त देशातून बाहेर काढले त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही. डेऱ्यातून आणि मंडपातून मी भ्रमण करीत आहे. मी इस्राएल लोकांसह जिकडेतिकडे ज्या कोणा इस्राएल वंशाला इस्स्राएल लोकांची जोपासना करण्याविषयी मी आज्ञा करीत असे त्यांना, 'तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे मंदिर का बांधले नाही' असा एक शब्द तरी मी कधी बोललो आहे काय ?" तर आता माझा सेवक दावीद यास सांग, 'सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्राएलचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे फिरत असता आणले, जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन. मी आपल्या इस्राएल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन, मी तेथे त्यांना रुजवीन म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील आणि ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत. इस्राएल लोकांवर मी शास्ते नेमले होते त्याच्या काळापासून जसे दुर्जन त्यांना त्रस्त करीत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत. तुला मी शत्रूपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की, मी तुझे घराणे कायमचे स्थापीन. तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास म्हणजे तुझ्या पोटच्या पुत्राला तुझ्यामागून मी राजासनावर बसवीन आणि त्याचे राज्य बळकट करीन. तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन. मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. त्याने अधर्म केल्यास, मनुष्य जशी दंडाने आणि मानवपुत्र जशी फटक्यांनी शिक्षा करतात तशी मी त्याला शिक्षा करीन; पण तुझ्यापुढून घालवून दिलेल्या शौलवरची कृपादृष्टी मी दूर केली तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी दूर होणार नाही. तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्यापुढे अढळ राहील, तुझी गादी कायमची स्थापित होईल." ही सर्व वचने आणि दर्शने यथार्थपणे नाथानने दावीदला कळवली.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :

Second Samuel 7: 4-17

4 But it came to pass that night, that the word of the Lord came to Nathan, saying:5 Go, and say to my servant David: Thus saith the Lord: Shalt thou build me a house to dwell in?6 Whereas I have not dwelt in a house from the day that I brought the children of Israel out of the land of Egypt even to this day: but have walked in a tabernacle, and in a tent.7 In all the places that I have gone through with all the children of Israel, did ever I speak a word to any one of the tribes of Israel, whom I commanded to feed my people Israel, saying: Why have you not built me a house of cedar?8 And now thus shalt thou speak to my servant David: Thus saith the Lord of hosts: a I took thee out of the pastures from following the sheep to be ruler over my people Israel:9 And I have been with thee wheresoever thou hast walked, and have slain all thy enemies from before thy face: and I have made thee a great man, like unto the name of the great ones that are on the earth.10 And I will appoint a place for my people Israel, and I will plant them, and they shall dwell therein, and shall be disturbed no more: neither shall the children of iniquity afflict them any more as they did before,11 From the day that I appointed judges over my people Israel: and I will give thee rest from all thy enemies. And the Lord foretelleth to thee, that the Lord will make thee a house.12 And when thy days shall be fulfilled, and thou shalt sleep with thy fathers, I will raise up thy seed after thee, which shall proceed out of thy bowels, and I will establish his kingdom.13 He shall build a house to my name, and I will establish the throne of his kingdom for ever.14 I will be to him a father, and he shall be to me a son: and if he commit any iniquity, I will correct him with the rod of men, and with the stripes of the children of men.15 But my mercy I will not take away from him, as I took it from Saul, whom I removed from before my face.16 And thy house shall be faithful, and thy kingdom for ever before thy face, and thy throne shall be firm for ever.17 According to all these words and according to all this vision, so did Nathan speak to David.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र ८८:४-५,२७-२८.२९-३०
प्रतिसाद :   मी आपली दया त्याच्यावर सर्वकाळ कायम राखीन.

१ "मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे.
मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे.मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन, तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी प्रस्थापित करीन.

२तो मला म्हणेल, 'तू माझा पिता, माझा देव, माझा तारणारा दुर्ग आहेस.' मी तर त्याला माझा ज्येष्ठ पुत्र करीन, पृथ्वीवरील राजांत त्याला सर्वश्रेष्ठ करीन.

३मी आपली दया त्याच्यावर सर्वकाळ कायम राखीन, त्याच्याशी केलेला माझा करार अढळ राहील. त्याचे राजघराणे सर्वकाळ राहील, त्याचे राजासन स्वर्गाप्रमाणे अक्षय ठेवीन.

Psalms 89: 4-5, 27-28, 29-30

R. (29a) For ever I will maintain my love for my servant.

4 I have made a covenant with my elect: I have sworn to David my servant:5 Thy seed will I settle for ever. And I will build up thy throne unto generation and generation.

R. For ever I will maintain my love for my servant.

27 He shall cry out to me: Thou art my father: my God, and the support of my salvation.28 And I will make him my firstborn, high above the kings of the earth.

R. For ever I will maintain my love for my servant.

29 I will keep my mercy for him for ever: and my covenant faithful to him.30 And I will make his seed to endure for evermore: and his throne as the days of heaven.

R. For ever I will maintain my love for my servant.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
 तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.

The seed is the word of God, Christ is the sower; all who come to him will live for ever.

Alleluia, alleluia.


शुभवर्तमान  मार्क  ४:१-२०

वाचक :   मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "एक पेरणारा पेरणी करावयास निघाला."

येशू समुद्रकिनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला. तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला. सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते. नंतर तो त्यांस दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला : "ऐका! एक पेरणारा पेरणी करावयास निघाला आणि तो पेरीत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती; माती खोल नसल्यामुळे ते लागलेच उगवले आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले आणि मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले आणि काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले आणि त्याला पीक आले आणित्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले." मग तो म्हणाला, "ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको."तो एकान्ती असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, "देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हांलाच दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते ह्यासाठी की, त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये आणि त्यांना क्षमा मिळू नये." तो त्यांना म्हणाला, "हा दाखला तुम्हांला समजला नाही काय ?" तर मग सर्व दाखले कसे समजतील ? पेरणारा वचन पेरतो. वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोकांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले बी म्हणजे वचन ऐकताच लोक ते आनंदाने ग्रहण करतात, तथापि त्यांच्याकडे मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले बी म्हणजे लोक ते वचन ऐकून घेतात आणि नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह आणि इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनांची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले बी म्हणजे वचन ऐकून लोक ते स्वीकारतात; मग कोणी ते तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात."

प्रभूचे हे शुभवर्तमान 

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:

Mark 4: 1-20

1 And again he began to teach by the sea side; and a great multitude was gathered together unto him, so that he went up into a ship, and sat in the sea; and all the multitude was upon the land by the sea side.2 And he taught them many things in parables, and said unto them in his doctrine:3 Hear ye: Behold, the sower went out to sow.4 And whilst he sowed, some fell by the way side, and the birds of the air came and ate it up.5 And other some fell upon stony ground, where it had not much earth; and it shot up immediately, because it had no depth of earth.6 And when the sun was risen, it was scorched; and because it had no root, it withered away.7 And some fell among thorns; and the thorns grew up, and choked it, and it yielded no fruit.8 And some fell upon good ground; and brought forth fruit that grew up, and increased and yielded, one thirty, another sixty, and another a hundred.9 And he said: He that hath ears to hear, let him hear.10 And when he was alone, the twelve that were with him asked him the parable.11 And he said to them: To you it is given to know the mystery of the kingdom of God: but to them that are without, all things are done in parables:12 That seeing they may see, and not perceive; and hearing they may hear, and not understand: lest at any time they should be converted, and their sins should be forgiven them.13 And he saith to them: Are you ignorant of this parable? and how shall you know all parables?14 He that soweth, soweth the word.15 And these are they by the way side, where the word is sown, and as soon as they have heard, immediately Satan cometh and taketh away the word that was sown in their hearts.16 And these likewise are they that are sown on the stony ground: who when they have heard the word, immediately receive it with joy.17 And they have no root in themselves, but are only for a time: and then when tribulation and persecution ariseth for the word they are presently scandalized.18 And others there are who are sown among thorns: these are they that hear the word,19 And the cares of the world, and the deceitfulness of riches, and the lusts after other things entering in choke the word, and it is made fruitless.20 And these are they who are sown upon the good ground, who hear the word, and receive it, and yield fruit, the one thirty, another sixty, and another a hundred.

This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनदेवाचे वचन ऐकणारे चार प्रकारचे असतातः पहिले म्हणजे पूर्वग्रहदूषितपणे ऐकणारे. ते त्यांचे मन बंद करतात. ते कदाचित दुर्लक्ष करत असतील आणि खरोखर ऐकत नसतील. दुसरे म्हणजे उथळ ऐकणारे. ते गोष्टींचा विचार करण्यास अयशस्वी होतात; त्यांच्यात खोलपणाचा अभाव असतो. ते कदाचित असे म्हणत असतीलः "हो, बरोबर, ठीक आहे." ते सुरुवातीला भावनिक प्रतिक्रियेने प्रतिसाद देऊ शकतात; परंतु ते थकतात तेव्हा त्यांचे मन दुसरीकडे कशाकडे वळते. तिसरे म्हणजेनिवडक ऐकणारे. ते असे असतात कारण त्यांना अनेक आवडी किंवा काळजी असते, परंतु त्यांच्यात खरोखर महत्त्वाचे काय आहे ते ऐकण्याची किंवा समजून घेण्याची क्षमता नसते. चौथे म्हणजे मोकळ्या मनाने ऐकणारे. ते नेहमीच ऐकण्यास आणि शिकण्यास तयार असतात. ते कधीही गर्विष्ठ किंवा शिकण्यासाठी व्यस्त नसतात. ते समजून घेण्यासाठी ऐकतात. ते लक्षपूर्वक ऐकण्याचा, लक्ष देण्याचा आणि बोलल्या जाणाऱ्या शब्दांवर लक्ष केंद्रित करण्याचा सराव करतात. परंतु अर्थातच, आपण परिणामकारक ऐकण्याचा सराव करू या. जो ऐकण्याचा सर्वात प्रभावी प्रकार आहे, स्टीफन कोवी म्हणतात. स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवण्याची आणि त्याच्या/तिच्या दृष्टिकोनातून पाहण्याची, ऐकण्याची आणि अनुभवण्याची क्षमता राखणे. केवळ कानांनीच नव्हे; तर हृदयाने ऐकण्याची क्षमता ही आहे. ही सर्वोच्च श्रवणशक्ती आहे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, पवित्र वचने ऐकण्यास, अंत:करणात साठविण्यास व त्यानुसार फलद्रुप होण्यास आम्हाला कृपा दे , आमेन.

✝️                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या