सामान्य काळातील २७ वा सप्ताह
सोमवार ५ ऑक्टोबर २०२६
“येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.”
And Jesus said to him: Go, and do thou in like manner.
जन्म दि. २५ ऑगस्ट १९०५--- मृत्यू दि. ५ ऑक्टोबर १९३८
✝️
दैवी दयेच्या प्रेषिता व देवाच्या सेविका, संत फॉस्टिना कोवाल्स्का या “द सिस्टर्स ऑफ अवर मर्सी या संघाच्या सिस्टर” होत्या. त्यांचा जन्म दि. २५ ऑगस्ट १९०५ रोजी झाला. दि. ५ ऑक्टोबर १९३८ रोजी त्या ख्रिस्तवासी झाल्या. त्या अत्यंत धार्मिक व भक्तिमान होत्या. प्रत्यक्ष ख्रिस्ताने त्यांना सन १९३१ ते १९३८ या काळापर्यंत वारंवार दर्शन देऊन पापक्षमेसाठी दैवी दयेचे महत्त्व, सामर्थ्य आणि दैवी दयेच्या आवश्यकतेविषयी सांगितले. “पाप्यांना व महापाप्यांना देवाच्या दयेसाठी आग्रहाने याचना करण्यास अजूनही संधी आहे म्हणून त्यांना देवाच्या दयेकडे वळविण्याचे आदेश ख्रिस्ताने सिस्टर फॉस्टिानांना दिले.
सिस्टर फॉस्टिनांना पवित्रतेबद्दल व धर्म कार्याबद्दल 'आदरणीय' म्हणून ७ मार्च १९९२ साली घोषित केले गेले. रोममध्ये पोप जॉन पॉल यांनी १८ एप्रिल १९९३ साली त्यांना 'धन्य म्हणून मान्यता दिली '. सन २००० च्या पास्कासणानंतरच्या रविवारी त्यांना ‘संत' म्हणून घोषित करण्यात आले. ख्रिस्ताने दिलेला आदेश सिस्टर फॉस्टिनांनी आपल्या डायरीत नमूद केलेला आहे. या आदेशाच्या आणि संदेशाच्या त्या जिवंत साक्षीदार झालेल्या आहेत.परमगुरूस्वामींनी दि. १५ एप्रिल १९७८ रोजी दैवी दयेच्या या भक्तिला मान्यता दिली आहे.
येशूने दैवी दयेविषयक दिलेले विशेष संदेश.
१. अत्यंत निष्ठेने माझ्या दयेकडे वळल्याशिवाय मानवजातीला शांती मिळणार नाही.
२. माझ्या दयाळू हृदयापाशी आल्याशिवाय मानव जातीला शांती व समाधान मिळणार नाही.
३. तसेच जो आत्मा माझ्या दयेची याचना करील तो मला अपार आनंद देईल. माझ्याकडे दयेची व सहानुभूतिची याचना करणाऱ्या आत्म्यावर, तो कितीही महापापी असला तरी मी त्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक कृपा करीन. त्याला शिक्षा करणार नाही.
येशू म्हणाला, अखिल जगाला माझ्या दयेची जाणीव व्हावी अशी माझी फार इच्छा आहे. माझ्या दयेवर अवलंबून राहणाऱ्यांवर मी अपार दया करतो. मी साक्षात दया व प्रेम आहे. माझी ही दया अक्षय सागर आहे.. कोणत्याही पाप्याने माझ्यापाशी यावयास भिऊ नये. पापी माणसाचा माझ्यावरील अविश्वास माझे हृदय घायाळ करतो.” जे धर्मगुरू माझ्या दयेचा प्रसार करून तिची स्तुती करतील; त्यांचे शब्द, अभिषिक्त करीन व ते सांगतील त्या हृदयांना स्पर्श करीन.
खरा ख्रिस्ती माणूस चांगल्या शोमरोन्याचा आदर्श आपल्या जीवनात आचरणात आणित असतो. आजच्या दाखल्यामधील लेवी आणि याजक ह्यांना नियमशास्त्र आणि देवाच्या आज्ञांचे ज्ञान होते मात्र ते प्रत्यक्ष कृतित आणण्यास असमर्थ ठरले. आपल्याला सुध्दा देवप्रीति आणि परस्परप्रीतिचे ज्ञान आहे मात्र प्रत्यक्ष जीवनात त्याचे अनुकरण करणे कठीण जाते. सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी आपण कृतीशील बनले पाहिजे. शोमरोनी माणसाने संकटात सापडलेल्या त्या जखमी माणसाची गरज ओळखली आणि वेळीच त्याला साहाय्य करुन त्याची गरज भागविली. खरा ख्रिस्ती माणूस गरजवंतांची गरज ओळखतो आणि त्यांच्या सहाय्याला धावून जात असतो. म्हणूनच जो |अडचणीत व संकटात सापडलेला आहे त्याची गरज ओळखतो तो चांगला शोमरोनी बनतो. देवप्रीतिची आज्ञा परस्परप्रीतिच्या आज्ञेत पूर्णत्वास येते. म्हणूनच आपण आपले वैयक्तिक जीवन जगत असताना कितीही धार्मिक व भक्तीमान असलो तरी त्या धार्मिकतेला व भक्तीला शेजारप्रीतिच्या कृतीची जोड असायला हवी.
पहिले वाचन : गलतीकरांस पत्र १:६-१२
वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नव्हे तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. "
मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हांला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहा, ती दुसरी नाही, पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताच्या सुवार्तेचा विपर्यास करू पाहणारे असे कित्येक आहेत. जी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की, जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हांला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. मी आता मनुष्यांची मनधरणी करायला पाहत आहे की देवाची मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे का ? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
बंधूनो, मी तुम्हांला हे कळवतो की, मी सांगितलेली सुवार्ता मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकवलीही नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Galatians 1: 6-12
I wonder that you are so soon removed from him that called you into the grace of Christ, unto another gospel. Which is not another, only there are some that trouble you, and would pervert the gospel of Christ. But though we, or an angel from heaven, preach a gospel to you besides that which we have preached to you, let him be anathema. As we said before, so now I say again: If any one preach to you a gospel, besides that which you have received, let him be anathema. For do I now persuade men, or God? Or do I seek to please men? If I yet pleased men, I should not be the servant of Christ. For I give you to understand, brethren, that the gospel which was preached by me is not according to man. For neither did I receive it of man, nor did I learn it; but by the revelation of Jesus Christ.
This is the word of God
प्रतिसाद स्तोत्र : १११:१-२, ७- १०क
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या कराराची सदैव आठवण ठेवतो.
१ )परमेश्वराचे स्तवन करा,
सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत
मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन.
परमेश्वराची कृत्ये थोर आहेत,
ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात.
२)त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य आणि न्याय्य आहेत
त्याचे सर्व आदेश विश्वसनीय आहेत,
ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
ते सत्याने आणि सरळपणाने नेमलेले आहेत.
३ )त्याने आपल्या लोकांना उद्धारदान पाठवून दिले आहे,
त्याने आपला करार सर्वकाळासाठी नेमला आहे.
त्याचे नाव पवित्र आणि भययोग्य आहे,
त्याचे स्तवन सर्वकाळ चालते.
Psalms 111: 1b-2, 7-8, 9 and 10c
R. (5) The Lord will remember his covenant for ever.
1 I will praise thee, O Lord, with my whole heart; in the council of the just: and in the congregation.
2 Great are the works of the Lord: sought out according to all his wills.
R. The Lord will remember his covenant for ever.
7 That he may give them the inheritance of the Gentiles: the works of his hands are truth and judgment.
8 All his commandments are faithful: confirmed for ever and ever, made in truth and equity.
R. The Lord will remember his covenant for ever.
9 He hath sent redemption to his people: he hath commanded his covenant for ever. Holy and terrible is his name:
10c His praise continueth for ever and ever.
R. The Lord will remember his covenant for ever.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड,
म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia: John 13: 34
R. Alleluia, alleluia.
34 I give you a new commandment: love one another as I have loved you.
R. Alleluia, alleluia.
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझा शेजारी कोण ?"
कोणीएक शास्त्री उभा राहिला आणि येशूची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, “गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल ? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे ? तुझ्या वाचनात काय आले आहे ?" त्याने उत्तर दिले, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर." त्याने त्याला म्हटले, "ठीक उत्तर दिलेस, हे कर म्हणजे जगशील.”
परंतु स्वतःला नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण ?" येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य येरुशलेमहून खाली यरीहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला, त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. थोड्या वेळाने एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता, तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, पडलेला माणूस होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला, त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल आणि द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून
उतारशाळेत आणले आणि त्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हांला देईन. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला ?” तो म्हणाला, "त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.”
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Luke 10: 25-37
And behold a certain lawyer stood up, tempting him, and saying, Master, what must I do to possess eternal life? But he said to him: What is written in the law? how readest thou? He answering, said: Thou shalt love the Lord thy God with thy whole heart, and with thy whole soul, and with all thy strength, and with all thy mind: and thy neighbour as thyself. And he said to him: Thou hast answered right: this do, and thou shalt live. But he willing to justify himself, said to Jesus: And who is my neighbour?
And Jesus answering, said: A certain man went down from Jerusalem to Jericho, and fell among robbers, who also stripped him, and having wounded him went away, leaving him half dead. And it chanced, that a certain priest went down the same way: and seeing him, passed by. In like manner also a Levite, when he was near the place and saw him, passed by. But a certain Samaritan being on his journey, came near him; and seeing him, was moved with compassion. And going up to him, bound up his wounds, pouring in oil and wine: and setting him upon his own beast, brought him to an inn, and took care of him. And the next day he took out two pence, and gave to the host, and said: Take care of him; and whatsoever thou shalt spend over and above, I, at my return, will repay thee. Which of these three, in thy opinion, was neighbour to him that fell among the robbers? But he said: He that shewed mercy to him. And Jesus said to him: Go, and do thou in like manner.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन :
रक्तसाक्षी संत प्लासिड ह्यांची आपण विशेष आठवण करत आहोत. ह्याचा जन्म ५१५ साली रोम शहरात झाला. तो ७ वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला सुबियाको येथील एका मठामध्ये घेऊन गेले. त्या वातावरणाचा त्याच्या जीवनावर विलक्षण परिणाम झाला. त्यांनी मॉन्टेकॅसिनो येथे संत बेनेडिक्ट या संस्थेत प्रवेश घेतला. शाश्वत जीवनप्राप्तीसाठी प्रभूला स्विकरणे अगत्याचे आहे. आजच्या शुभवर्तमानात शाश्वत जीवन प्राप्ती कशी करून घ्यावी यासाठी येशू मार्गदर्शन करताना म्हणतो की, खरे धर्माचरण हे कृतीतून दिसले पाहिजे. त्यासाठी शेजाऱ्यावर प्रेम ही खरी भक्ती आहे. त्याचप्रमाणे देवाची कृपा त्याच्या दयाळूपणात आहे. आपण आपल्या जीवनात केवळ उपदेश किंवा ज्ञान नाही तर दयाळू वृत्तीने वागावे, व आपल्या कृतीतून श्रद्धेची खरी ओळख व्हावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुला ओळखण्यास व शेजाऱ्यावर प्रीति करण्यास मला प्रेरणा व बळ दे, आमेन.