सामान्यकाळातील ३४ वा रविवार
२२ नोव्हेंबर २०२६
ज्याअर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्याअर्थी ते मला केले नाही.
Truly, I say to you, as you did not do it to one of the least of these, you did not do it to me.
CHRIST THE KING -
ख्रिस्तसभा आज प्रभू येशू विश्वाचा राजा हा सण साजरा करीत आहे.
अराजकता, अशांतता व लढाया ह्यामुळे सामान्य जनांचे जीवन राज्यकर्ते उधस्त करीत आहेत. हे राजे व राज्यकर्ते जागतिक आनंदात रममाण होत आहेत हे राज्य क्षणभंगूर आणि विनाशी आहे.
प्रभू येशू ज्या राज्याची स्थापना करण्यास ह्या जगात आला ते सार्वकालिक अविनाशी आणि सर्वकाळ टिकणारे आहे. ख्रिस्तसभा आज प्रभू येशू विश्वाचा राजा हा सण साजरा करीत आहे. सर्वांसाठी न्यायाचा दिवस प्रभू येशू वैभवाने पुन्हा येणार आहे आणि वैभवशाली राजासनावर बसून तो सर्वांचा न्याय करणार आहे.
प्रभू येशू स्पष्ट करीत आहे की, आपण भुकेल्यांस अन्न द्यावे, तान्हेल्यास पाणी द्यावे, परकियांस आसरा द्यावा, उघड्यास वस्त्र द्यावे, आजाऱ्यांच्या भेटीस जावे व कैदेत असलेल्यांना धीर द्यावा, असे केल्यानेच आपण प्रभू येशूच्या राज्याचे वारसदार बनणार आहोत. |
पहिले वाचन : यहेज्केल ३४:११-१२.१५-१७
वाचक :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
"माझ्या कळपा, तुमचे असे होईल, मी मेंढरामेंढरांमध्ये निवाडा करीन."
"प्रभू परमेश्वर म्हणतोः पाहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्याला मी हुडकीन. जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यांना हुडकतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अभ्राच्छादित व अंध:काराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणांतून त्यांना वाचवून आणीन. मी स्वतः माझा कळप चारीन आणि त्यांची निजण्या-बसण्याची सोय करीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
मी हरवलेल्यांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन, पण लठ्ठ आणि बलिष्ठ यांचा मी नाश करीन, त्यांना मी यथान्याय चारीन.
“प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या कळपा, तुमचे असे होईल, मी मेंढरामेंढरांमध्ये, एडक्याबोकडांमध्ये निवाडा करीन."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Ezekiel 34:11-12, 15-17
"Thus says the Lord God: Behold, I myself will search for my sheep and will seek them out. As a shepherd seeks out his flock when he is among his sheep that have been scattered, so will I seek out my sheep, and I will rescue them from all places where they have been scattered on a day of clouds and thick darkness. I myself will be the shepherd of my sheep, and I myself will make them lie down, declares the Lord God. I will seek the lost, and I will bring back the strayed, and I will bind up the injured, and I will strengthen the weak, and the fat and the strong I will destroy. I will feed them in justice. "As for you, my flock, thus says the Lord God: Behold, I judge between sheep and sheep, between rams and male goats."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र २२:१-२अ, २ब-३,५-६
प्रतिसाद : परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.
१ परमेश्वर माझा मेंढपाळ आहे,
मला काही उणे पडणार नाही.
तो मला हिरव्यागार कुरणात
२ तो मला संथ पाण्यावर नेतो,
तो माझा जीव ताजातवाना करतो,
तो आपल्या नामासाठी मला नीतीमार्गाने चालवतो.
३ तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस.
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस,
माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.
४ खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस
मला कल्याण आणि दया ही लाभतील
आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.
Psalm 23:1-2a, 2b-3, 5, 6
The Lord is my shepherd; there is nothing I shall want.
The Lord is my shepherd;
there is nothing I shall want.
Fresh and green are the pastures
where he gives me repose.
Near restful waters he leads me;
he revives my soul.
He guides me along the right path,
for the sake of his name.
You have prepared a table before me
hing I shall want.
in the sight of my foes.
My head you have anointed with oil;
my cup is overflowing. R
Surely goodness and mercy shall follow me
all the days of my life.
In the Lord's own house shall I dwell
for length of days unending.
दुसरे वाचन करिंथकरांस पहिले पत्र १५:२०-२६.२८
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"देव सर्वांना सर्वकाही व्हावा अशा हेतूने तो देवपित्याला राज्य सोपवून देईल."
ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यांतले प्रथमफळ असा आहे. मनुष्याच्याद्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्याद्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे, कारण जसे आदाममध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. प्रथम ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी, नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार आणि सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याकडे राज्य सोपवून देईल. कारण आपल्या पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. त्याच्या अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद
Second Reading 1 Corinthians 15:20-26, 28
Brethren: In fact Christ has been raised from the dead, the first fruits of those who have fallen asleep. For as by a man came death, by a man has come also the resurrection of the dead. For as in Adam all die, so also in Christ shall all be made alive. But each in his own order: Christ the first fruits, then at his coming those who belong to Christ. Then comes the end, when he delivers the kingdom to God the Father after destroying every rule and every authority and power. For he must reign until he has put all his enemies under his feet. The last enemy to be destroyed is death. When all things are subjected to him, then the Son himself will also be subjected to him who put all things in subjection under him, that God may be all in all.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभूच्या नामाने येत आहे तो धन्य! आमचा पूर्वज दावीद ह्याचे राज्य सुवंदित असो.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia:
R. Alleluia, alleluia.
Blessed is he who comes in the name of the Lord! Blessed is the coming kingdom of our father David!
R. Alleluia, alleluia.
