Marathi Bible Reading | Tuesday of the Holy Week | 31st March 2026

  उपवासकाळातील (पवित्र आठवडा)

मंगळवार  दि. ३१ मार्च  २०२६

"मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्यामागे येता येणार नाही, तू नंतर येशील." 

"Where I am going you cannot follow me now, but you will follow afterward." 

 मुरानोचे संत डॅनियल
साधू (१४११)

✝️ 

संत डॅनियल हे एक जर्मन व्यापारी होते. व्यापारानिमित्ते ते अधूनमधून व्हेनिस शहराचा दौरा करीत असत. तिथेच ते मुरानो येथल्या भिक्षुकांच्या संपर्कात आले. त्या भिक्षुकांच्या जीवनपद्धतीमुळे आणि विचासरणीने ते इतके प्रभावित झाले की त्यांच्या सहवासात ते अधिक वेळ कसा घालविता येईल त्यासाठी धडपडू लागले आणि शेवटी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचीच वैराग्याची वस्त्रे धारण करून ते एका साधूप्रमाणे आपल्या घरात राहू लागले.
संत डॅनियल हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. बराच वेळ ते प्रार्थनेमध्ये गढून गेलेले दिसत. साधुवृत्तीचा अंगिकार केल्यानंतर त्याने आपली सर्व धनदौलत विकून टाकली आणि व्हेनिस शहरातील कंगाल-गरीब लोकांची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी त्याने आ पली रक्कम दान करून टाकली; परंतु त्याची ही दानशूरता पाहून १४१ झाली काही दरोडेखोरानी त्यांच्या राहत्या घरावर हल्ला केला व त्यांची निर्घृण हत्या केली.
 जॉन क्लिमॅकूस ह्यांनी लिहिलेल्या साहित्यकृतीत “द लँडर टू पॅराडाईस” (पारादिसकडे जाणारा महामार्ग) हे पुस्तक अजरामर ठरलेले आहे. संत जॉन क्लिमॅकूस ह्यांच्या आडनावावरून ह्या पुस्तकाला आध्यात्मिकतेचा उच्चांक (क्लायमॅक्स) असे संबोधिले जाते. ही त्यांची साहित्यनिर्मिती अनेक भाषांमधून भाषांतरीत करण्यात आलेली आहे. संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेत प्रसिद्ध असलेला हा आध्यात्मिक वास्तूपाठ प्रभू येशूख्रिस्ताच्या जीवनावर आधारित ३० प्रकरणे भाविकांपुढे सादर करतो. दुर्गुणांचा परित्याग कसा करावा व सद्गुणांचा अंगिकार कसा करावा ह्याविषयी तो मार्गदर्शक ठरलेला आहे. हे सद्गुण - दुर्गुण समजून सांगताना दैनंदिन जीवनातील व ख्रिस्तसभेच्या इतिहासातील प्रेरणादायी प्रसंग व दाखले लेखकाने रंगवून वर्णन केलेले आहेत.
जॉन क्लिमॅकूस हे ३० मार्च ६०५ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी मरण पावले. 

चिंतन : आपल्या प्रार्थनेसाठी मोठमोठ्या शब्दांची जंत्री जमविण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्या बालकाचे बोबडे बोलही परमेश्वर पित्याला स्पष्टपणे समजू शकतात. संत जॉन क्लिमिकूस
✝️

पहिले वाचन : यशया ४९:१-६
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
यशया म्हणतो, द्विपांनो, माझे ऐका; दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले, मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. त्याने माझे मुख तीक्ष्ण तरवारीसारखे केले, त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले; त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवले. तो मला म्हणाला, "तू माझा सेवक आहेस; मला शोभा आणणारा तू इस्राएल आहेस." मी तर म्हणालो होतो. "मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच आणि निरर्थक वेचले; तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे. माझे प्रतिफळ  माझ्या देवाच्या हाती आहे."
मी याकोबला त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्राएल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडवले ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला आणि जो माझा देव माझे सामर्थ्य झाला तो परमेश्वर म्हणतो, "याकोबच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलच्या रक्षिलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे यात काही मोठेसे नाही; तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्राचा प्रकाश असा नेमतो."
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Isaiah 49:1-6

Listen to me, O coastlands, and give attention, you peoples from afar. The Lord called me from the womb, from the body of my mother he named my name. He made my mouth like a sharp sword; in the shadow of his hand he hid me; he made me a polished arrow; in his quiver he hid me away. And he said to me, "You are my servant, Israel, in whom I will be glorified." But I said, "I have labored in vain; I have spent my strength for nothing and vanity, yet surely my right is with the Lord, and my recompense with my God." And now the Lord says, he who formed me from the womb to be his servant, to bring Jacob back to him, and that Israel might be gathered to him for I am honored in the eyes of the Lord, and my God has become my strength-he says: "It is too light a thing that you should be my servant to raise up the tribes of Jacob and to bring back the preserved of Israel; I will make you as a light for the nations, that my salvation may reach to the end of the earth."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र ७१:१-६,१५.१७
प्रतिसाद माझे मुख तुझ्या तारणाचे वर्णन करील.

१) हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे. 
मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. 
तू आपल्या न्यायानुसार माझा उद्धार कर 
आणि मला मुक्त कर. माझ्याकडे आपला कान लाव 
आणि माझे तारण कर..

२) मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी 
संरक्षण निवासाचा खडक हो, 
माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहे, 
कारण तू माझा गड आणि दुर्ग आहेस, 
हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर.

३) हे प्रभू परमेश्वरा, तू माझे आशास्थान आहेस, 
माझ्या तरुणपणापासून तू माझे श्रद्धास्थान आहेस. 
जन्मापासून तू माझा आधार आहेस, 
मातेच्या उदरातून निघाल्यापासून तू माझा कल्याणकर्ता आहेस.

४) माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे 
आणि तू सिद्ध केलेल्या तारणाचे दिवसभर वर्णन करील, 
हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस 
आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत.

Psalm 71:1-2, 3-4a, 5-6ab, 15ab and 17 (R 15ab)
My mouth will tell of your salvation, Lord.

In you, O Lord, I take refuge; 
let me never be put to shame. 
In your justice, rescue me, free me; 
incline your ear to me and save me. R 

Be my rock, my constant refuge, 
a mighty stronghold to save me, 
for you are my rock, my stronghold.
My God, free me from the hand of the wicked. R

It is you, O Lord, who are my hope, my trust, 
O Lord, from my youth.
On you I have leaned from my birth; 
from my mother's womb, you have been my help. R

My mouth will tell of your justice, 
and all the day long of your salvation. 
O God, you have taught me from my youth, 
and I proclaim your wonders still. R

जयघोष  
आपल्या राजाचा जयजयकार असो, पित्याचा तो आज्ञाधारक आहे, ज्याप्रमाणे दीन कोकरू कत्तल करण्यासाठी नेतात, तसेच आपणांला क्रुसावर देण्यासाठी चालवले आहे.

Acclamation: 
   Hail to you, our King, obedient to the Father; you were led to your crucifixion like a gentle lamb to the slaughter,

शुभवर्तमान योहान १३:२१-३३,३६-३८
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
आपल्या शिष्यांबरोबर भोजन घेत असता येशू आत्म्यात व्याकूळ झाला आणि निश्चितार्थनि म्हणाला, "मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्हांपैकी एक जण मला धरून देईल." तो कोणाविषयी बोलतो ह्या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील एकजण येशूच्या उराशी टेकलेला होता, ह्यास्तव "ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हांला सांग" असे पेत्रने त्याला खुणावून म्हटले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता मागे लवून त्याला म्हणाला, "प्रभो, तो कोण आहे?" येशूने उत्तर दिले, "मी ज्याला घास ताटात बुचकळून देईन तोच तो आहे." मग त्याने घास ताटात बुचकळून शिमोनाचा मुलगा यहुदा इस्कय्योत ह्याला दिला आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले "तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक." पण त्याने त्याला असे कशासाठी सांगितले हे भोजनाला बसलेल्यांतील कोणाला समजले नाही. कारण, यहुदाजवळ पैशांची थैली होती म्हणून "सणासाठी आपल्याला ज्या पदार्थांची गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबांना काहीतरी द्यावे म्हणून येशू सांगतो आहे," असे कित्येकांना वाटले. मग घास घेतल्यावर तो लागलीच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती.तो बाहेर गेल्यावर येशूने म्हटले, "आता मनुष्याच्या पुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्या ठायी देवाचा गौरव झाला आहे. देव आपल्या ठायी त्याचा गौरव करील, तो त्याचा लवकर गौरव करील. मी अजून थोडा वेळ तुम्हांबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहुद्यांना सांगितले की, जेथे मी जातो तेथे तुम्हांला येता येणार नाही, तसे तुम्हांलाही आता सांगतो." शिमोन पेत्र त्याला म्हणाला, "प्रभो, आपण कोठे जाता ?" येशूने उत्तर दिले, "मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्यामागे येता येणार नाही, तू नंतर येशील." पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, पण मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही ?" आपल्यासाठी मी माझा प्राण देईन. येशूने त्याला उत्तर दिले, "माझ्यासाठी तू आपला प्राण देशील का? मी तुला नक्की सांगतो, तू तीन वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.'
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 13:21-33, 36-38
At that time: [Jesus reclining with his disciples,] was troubled in his spirit, and testified,"Truly, truly, I say to you, one of you will betray me." The disciples looked at one another,uncertain of whom he spoke. One of his disciples, whom Jesus loved, was reclining at table at Jesus' side, so Simon Peter motioned to him to ask Jesus of whom he was speaking. So that disciple, leaning back against Jesus, said to him, "Lord, who is it?" Jesus answered, "It is he to whom I will give this morsel of bread when I have dipped it." So when he had dipped the morsel, he gave it to Judas, the son of Simon Iscariot. Then after he had taken the morsel, Satan entered into him. Jesus said to him, "What you are going to do, do quickly." Now no one at the table knew why he said this to him. Some thought  that, because Judas had the moneybag, Jesus was telling him, "Buy what we need for the feast, or that he should give something to the poor. So, after receiving the morsel of bread, he immediately went out. And it was night. When he had gone out, Jesus said, "Now is the Son of Man glorified, and God is glorified in him. If God is glorified in him, God will also glorify him in himself, and glorify him at once. Little children, yet a little while I am with you. You will seek me, and just as I said to the Jews, so now I also say to you, 'Where I am going you cannot come.' Simon Peter said to him, "Lord, where are you going?" Jesus answered him, "Where I am going you cannot follow me now, but you will follow afterward." Peter said to him, "Lord, why can I not follow you now? I will lay down my life for you." Jesus answered, "Will you lay down your life for me? Truly, truly,I say to you, the cock will not crow till you have denied me three times."
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआगपेटी जोपर्यत आपल्या हातात आहे तोपर्यंत तिचा काहीच उपयोग होणार नाही. एखादी त्यातली काडी आगपेटी रगडल्या शिवाय प्रकाश प्राप्त होणार नाही. परमेश्वर यिर्मया संदेष्टयाला एक मोठी जबादारी देतो ती ही की, माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्राचा प्रकाश असे नेमतो. त्यासाठी परमेश्वराने यिर्मयाचे तोंड तीक्ष्ण तरवारीसाखे केले. तर यहुदा इस्कार्योत ह्याने हातचे सोडून पळत्याच्या पाठ धरली, प्रकाश धिक्कारून अंधाराची कास धरली. सोन्याचा घास भाकर पवित्र शरीर व रक्ताचा घास घेतल्यावर तो लागलीच बाहेर गेला त्यावेळी रात्र होती. सत्कर्मे करणे योग्य असूनही कुमार्ग निवडणे म्हणजे स्वतःचा मूर्खपणा जगासमोर प्रकट करणे असे होता कामा नये.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्यातील सर्व प्रकारचा दुष्टपणा दूर करुन आम्हाला तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या