सामान्यकाळातील नववा सप्ताह
बुधवार दि. ३ जुन २०२६
मेलेल्यातून उठल्यानंतर कोणी लग्न करून घेत नाहीत किंवा लग्न करून देतही नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात.
For when they rise from the dead, men and women do not marry; no, they are like the angels in heaven.
युगांडाचे रक्तसाक्षी
चार्ल्स ल्वांगा, जोसेफ कासा आणि त्यांचे सहकारी
(१८८६-१८८७)
अप्पर नीलच्या प्रदेशातील जमातींमध्ये १८८७ सालापासून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आपले मिशनकार्य सुरू केलेले होते. त्यानंतरच्या पुढच्या वर्षातील इस्टर जागरणविधीच्या वेळी पहिले काही स्नानसंस्कार पार पडले. ह्या नवसंस्कारितांमध्ये पूर्वी इस्लाम धर्मातून प्रॉस्टेस्टंट पंथामध्ये आलेले काही स्त्री पुरुष होते. ह्या वाढत्या कॅथलिक धर्मप्रसाराला रोखून धरण्यासाठी १८८६ साली अरब व प्रॉटेस्टंट पंथातील काहींनी राजा म्वांगा ह्याला चिथावले. त्याने जोसेफ कासा आणि मारूंबा ह्या प्रमुख मिशनऱ्यांची हत्या घडवून आणली.
आजच्या दिवशी ख्रिस्तसभा युगांडातील प्रारंभीच्या ख्रिस्ती लोकांमध्ये श्रद्धेची जोपासना करणाऱ्या व त्यासाठी क्रूर अशा छळवादाला मिठी मारणाऱ्या १३ ते ३० वर्षे वयातील २२ निग्रो मुले व युवक ह्यांचा सन्मान करते. या २२ जणांपैकी १३ जणांना जिवंत जाळण्यात आले. काहींना ३ जून १८८६ मध्ये ठार करण्यात आले.
हे २२ आफ्रिकन निग्रो इ. स. १९२० साली प्रथम धन्यवादित म्हणून घोषित करण्यात आले. ह्या २२ जणांव्यतिरिक्त ८० इतर जण ह्या छळामध्ये केले गेले. ह्या सर्व युगांडाच्या रक्तसाक्षींना २२ जून १९६४ साली पोप पॉल सहावे ह्यांनी संतपद बहाल केले.
चिंतन : “रक्तसाक्ष्यांना साखळदड बांधण्यात आले. तुरुंगात टाकण्यात आले, त्यांना फटके मारण्यात आले, जाळण्यात आले, त्यांना अक्षरशः कांपण्यात आले तरी त्यांची संख्या वाढतच राहिली.” - संत अगस्तीन
पहिले वाचन २ तीमथीला १:१-३.६-१२
वाचक : पौलचे तीमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठायी देवाचे जे कृपादान आले आहे, ते प्रज्वलित कर."
प्रिय चिरंजीव तीमथी ह्याला, ख्रिस्त येशूमधील जीवनविषयक वचनानुसार देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल, ह्याच्याकडून देवपिता आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया आणि शांती असो.मी आपल्या प्रार्थनेत रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो. मी तुला आठवण देतो की, माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठायी देवाचे कृपादान आले आहे, ते प्रज्वलित कर. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे.
आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिणामाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे. त्याने आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे आणि कृपेप्रमाणे आम्हाला तारले आणि पवित्र पाचारणाने बोलावले आहे. ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती; ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन आणि अविनाशीपणा ही प्रकाशित केली आहेत. मला त्या सुवार्तेचा घोषणकर्ता, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते. मी ही दुःखे सोशीत आहे, तरी मी लाज धरत नाही. कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखायला शक्तिमान आहे अशी माझी खात्री आहे.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
2 Tim1:1-3,6-12
Paul, apostle of Christ Jesus through the will of God in
accordance with his promise of life in Christ Jesus, to Timothy, dear Son of mine. Grace, mercy and peace from God the Father and from christ Jesus our Lord. Night and day I thank God whom I serve with a pure conscience as my ancestors did. I remember you in my prayers Constantly night and day. That is why I am reminding you now to fan into a flame the gift of God that you possess through the laying on of my hands. God did not give us a spirit of timidity, but the Spirit of power and love and self-control. So you are never to be ashamed of witnessing to our Lord, or ashamed of me for being his prisoner; but share in my hardships for the sake of the gospel, relying on the power of God who has saved us and called us to be holy-not because of anything we ourselves had done but for his own purpose and by his own grace. This grace had already been granted to us, in Christ Jesus, before the beginning of time, but it has been revealed only by the appearing of our Saviour Christ Jesus. He has abolished death, and he has brought to light immortality and life through the gospel, in whose service I have been made herald, apostle and teacher. That is why I am experiencing my present sufferings; but I am not ashamed, because I know in whom I have put my trust, and I have no doubt at all that he is able to safeguard until that Day what I have entrusted to him.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद १२३:१-२
प्रतिसाद : प्रभो, मी माझी दृष्टी तुझ्याकडे लावतो.
१ हे स्वर्गात राजासनारूढ असणाऱ्या,
मी माझी दृष्टी तुझ्याकडे लावतो :
पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात,
तसे माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत.
२ जसे दासीचे डोळे आपल्या धनिणीच्या हाताकडे असतात,
तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा
करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले आहेत.
Psalm 123:1-2ab, 2cdef
To you, O Lord, I lift up my eyes.
I lift up my eyes to you,
to you who sit enthroned in heaven.
2 As the eyes of slaves look to the hand of their master,
as the eyes of a female slave look to the hand of her mistress,
so our eyes look to the Lord our God,
till he shows us his mercy.
to you who sit enthroned in heaven.
2 As the eyes of slaves look to the hand of their master,
as the eyes of a female slave look to the hand of her mistress,
so our eyes look to the Lord our God,
till he shows us his mercy.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.
आलेलुया!
Acclamation:
: Ephesians 1: 17-18
R. Alleluia, alleluia.
17-18 May the Father of our Lord Jesus Christ enlighten the eyes of our hearts, that we may know what is the hope that belongs to his call.
R. Alleluia, alleluia.
