सामान्यकाळातील २४वा रविवार
१३ सेप्टेंबर २०२६
"जर तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुमचे करील.”
So also my heavenly Father will do to every one of you, if you do not forgive your brother from your heart."
“मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन."
प्रभू येशूने त्याला उत्तर दिले, 'साताच्या सत्तर वेळा,' म्हणजेच क्षमा करण्याचे मोजमाप नाही.
कर्जदाराने आपल्या सोबतीच्या कर्जदारावर दया केली नाही. त्या लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला तुरुंगात टाकले गेले. क्षमादानाविषयी प्रभू स्पष्टपणे सांगत आहे की, 'तुम्ही प्रत्येजण आपल्या बंधुला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याला क्षमा करणार नाही.' परमेश्वर दयाळू, प्रेमळ व क्षमाशील आहे मात्र तो आपल्या 'पापांचा चोख हिशोब ठेवतो.' म्हणूनच आपण सुद्धा आपल्या स्वतःसाठी क्षमादानाची याचना करीत असताना इतरांच्या अपराधाची क्षमा करणे अत्यंत गरजेचे आहे.
क्षमादान दिल्यानेच आपल्याला क्षमा मिळणार आहे, हे आपण लक्षात आणू या.
क्षमेची याचना परमेश्वाकडे करीत असताना आपल्या सर्व बंधु भगिनींना प्रथम क्षमा करण्यासाठी प्रभूकडे कृपा मागू या.
पहिले वाचन :बेन सिरा २७: ३०-२८;७
वाचक :बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तुझ्या शेजाऱ्याने केलेल्या चुकीची क्षमा कर म्हणजे नंतर जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या पापांची क्षमा केली जाईल."
राग आणि क्रोध या वाईट आहेत आणि त्या पापी माणसाच्या अंगी असतात. जो सूड घेतो त्याचा सूड प्रभू घेईल, कारण तो त्याच्या पापांचा काटेकोर हिशेब ठेवतो. तुझ्या शेजाऱ्याने केलेल्या चुकीची क्षमा कर म्हणजे नंतर जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या पापांची क्षमा केली जाईल. जो माणूस मनात दुसऱ्याविरूद्ध राग बाळगतो, त्याने कोणत्या शब्दांत प्रभूकडून दयेची अपेक्षा करावी ? आपल्यासारख्याच माणसाला दया दाखवली नाही, तर स्वतःच्या पापांसाठी तो कशी काय प्रार्थना करू शकतो ? जड देही असून तो द्वेष करतो तर त्याच्या पापांची क्षमा कोण करू शकेल? तुझ्या जीवनाचा अंत आठव, वैर थांबव, विनाशाची आणि मरणाची आठवण कर व प्रामाणिकपणे आज्ञा पाळ. देवाची आज्ञा लक्षात ठेव आणि तुझ्या शेजाऱ्यांचे वाईट चिंतू नकोस. परात्पराचा करार जाणून घे आणि त्यांच्या अपराधांकडे दुर्लक्ष कर.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Sirach 27:30-28:7
Anger and wrath, these also are abominations, and the sinful man will hold them fast. The one who seeks vengeance will be paid vengeance from the Lord, and he who keeps a record will have his own sins recorded. Forgive your neighbour the wrong he has done, and then your sins will be pardoned when you pray. Does one person harbour anger against another and yet seek for healing from the Lord? Does he have no mercy towards someone like himself and yet pray concerning his own sins? If he himself, being flesh, maintains wrath, who will make atonement for his sins? Remember the end of your life and cease from enmity, remember destruction and death and be true to the commandments. Remember the commandments and do not be angry with your neighbour, remember the covenant of the Most High and overlook error.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १०२:१ - ४, ९- १२
प्रतिसाद :परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे,
१ हे माझ्या सर्व मना, परमेश्वराला धन्यवाद दे,
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दे.
हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे,
त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.
२ तो तुझ्या सर्व दुष्कमांची क्षमा करतो,
तो तुझे सर्व रोग बरे करतो,
तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धारतो,
तो तुला दया आणि करुणा ह्यांचा मुकुट घालतो.
३ तो सर्वदाच दोष देत राहणार नाही,
तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.
आमच्या अपराधांच्या मानाने त्याने आम्हांला शासन केले नाही.
त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही.
४ कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे,
तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल प्रमाणात आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे
तितकेच त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत
Psalm 103:1-2, 3-4, 9-10, 11-12
The Lord is compassionate and gracious,
slow to anger and rich in mercy.
Bless the Lord, O my soul,
and all within me, his holy name.
Bless the Lord, O my soul,
and never forget all his benefits. R
It is the Lord who forgives all your sins,
who heals every one of your ills,
who redeems your life from the grave,
who crowns you with mercy and compassion. R
He will not always find fault;
nor persist in his anger forever.
He does not treat us according to our sins,
nor repay us according to our faults. R
For as the heavens are high above the earth,
so strong his mercy for those who fear him.
As far as the east is from the west,
so far from us does he remove our transgressions. R
दुसरे वाचन रोम १४:७-९
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत.”
आपल्यातील कोणी स्वतः करिता जगत नाही आणि कोणी स्वतः करिता मरत नाही. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो, म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. कारण ख्रिस्त अशासाठी मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला की, त्याने मेलेल्यांचा आणि जिवंतांचाही प्रभू असावे.
.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद
Second Reading :
Romans 14:7-9
Brethren: None of us lives to himself, and none of us dies to himself. For if we live, we live to the Lord, and if we die, we die to the Lord. So then, whether we live or whether we die, we are the Lord's. For to this end Christ died and lived again, that he might be Lord both of the dead and of the living.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia:
R. Alleluia, alleluia.
A new commandment I give to you, says the Lord, that you love one another: just as I have loved you.
R. Alleluia, alleluia.
