Marathi Bible Reading | 26th week in ordinary Time | Wednesday 30th September 2026

 सामान्य काळातील  २६ वा  सप्ताह 

बुधवार ३० सप्टेंबर  २०२६

  "जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही."No man putting his hand to the plough, and looking back, is fit for the kingdom of God..


संत जेरोम 

-वर्तनसाक्षी, धर्मपंडित (३४१-४२०)

ख्रिस्तसभा आज ख्रिस्तसभेतील महान धर्मपंडित संत जेरोम ह्यांचा  सन्मान करीत आहे. संपूर्ण बायबलचे भाषांतर करून त्यावर स्पष्टीकरणात्मक  भाष्य करणारे संत जेरोम म्हणतात, “पवित्र शास्त्राविषयीचे अज्ञान म्हणजे ख्रिस्ताविषयी अज्ञान होय."

सोफ्रोनियस युजेबियस हैरोनिमस असे लांबलचक नाव असलेला जेरोम दल्मातिया (युगोस्लाव्हिया) प्रांतात जन्माला आला. त्याने रोम शहरात अभ्यास केल्यानंतर वृत्तीने ज्ञानपिपासू असलेला हा अभ्यासू बुद्धीमान माणूस ज्ञानाच्या शोधार्थ बरीच वर्षे दूरदूरचा प्रवास करीत राहिला.

पहिल्या प्रथम तो ईशज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ट्रेव्हेस येथे गेला. त्या ठिकाणी इजिप्तच्या वाळवंटात संत अथनेशियस ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ३० वर्षापूर्वी मठवासियांसाठी एक ख्रिस्ती प्रशिक्षण केंद्र उघडण्यात आले होते. त्याचे रूपांतर ख्रिस्ती संन्यासाश्रमात करण्यात आले होते. तेथून तो अंत्युखिया येथे गेला. तेथे त्याने ग्रीक आणि पवित्र शास्त्र ह्यांचा अभ्यास केला. मात्र तिथे राहून आपण ख्रिस्ती धर्माऐवजी परधर्माच्या विचारसरणीत हळूहळू वाहून जाण्याचा धोका त्याला जाणवल्यामुळे तो तेथून एक दाट जंगलात निघून गेला. तेथे ५ वर्षे त्याने विरक्तवृत्तीची साधना केली आणि दरम्यान हिब्रू भाषा आत्मसात केली.

इ. स. ३८० साली वयाच्या ३९ व्या वर्षी त्याला धर्मगुरुपदाची दीक्षा देण्यात आली. गुरुदीक्षेनंतरचे एक वर्ष त्यांनी कॉन्स्टॅन्टिनोपल येथे राहून संत ग्रेगरी नाझियान्झेन ह्यांची शिकवण समजून घेतली. त्यानंतर ते रोम येथे गेले.

पोप महाशयांनी त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून त्यांना ५ वर्षांसाठी आपले सेक्रेटरी म्हणून नेमले. तेथे असताना त्यांना वायबलच्या आवृत्तीमध्ये सुधारणा सुचविल्या. एक ग्रंथालय उघडले. साध्वी स्त्रियांना पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले. 
 बायबल अभ्यासासाठी  एक मठ व एक शाळा ह्यांचे प्रशासन सांभाळीत असतानाच फा. जेरोम ह्यांनी आपले बायबल भाषांतराचे कार्य जोरात सुरू ठेवले. जुन्या व नव्या करारातील बरीचशी पुस्तके हिब्रू व अरेमाईक भाषांतून त्यांनी लॅटीन भाषेत भाषांतरित केली.

फा. जेरोम ह्यांची अभ्यासूवृत्ती, विविध भाषांवरील प्रभुत्व बायबलचे ज्ञान आणि चिकाटी ह्यामुळे तब्बल १८ वर्षांनी इ.स. ४०४ साली हे बायबल भाषांतराचे कार्य त्यांनी तडीस नेले. त्या आवृत्तीला 'व्हल्गेट' (म्हणजे दैनंदिन वापरासाठी बायबलची आवृत्ती) असे नाव देण्यात आले. पुढे ११०० वर्षांनी ट्रेंट इथे भरलेल्या विश्वपरिषदेमध्ये 'जेरोमकृत भाषांतरीत बायबल हे ख्रिस्तसभेचे अधिकृत भाषांतर आहे' अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला.

नितांत श्रद्धा आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता ह्यांचा सुंदर मिलाफ त्यांच्याठायी
घडून आलेला होता. मोठ्या खंबीरपणे बायबलवर सडेतोडपणे बोलणारे संत
जेरोम रात्रीच्या रात्री प्रार्थनेमध्ये एकांतवासात घालवीत. पुष्कळ उपासतापास करीत.
शेवटपर्यंत त्यांनी आपल्या शरीराला अनंत आत्मक्लेश दिले.३० सप्टेंबर ४२० रोजी आपल्या परिश्रमाचे प्रतिफळ मिळविण्यासाठी स्वर्गीय निजधामी गेलेला हा महापुरुष ग्रंथपालांचा आश्रयदाता संत मानला जातो.
त्यांच्या मते 'पवित्र शास्त्र वाचल्यानंतर आपल्याला प्रार्थना कराविशी वाटली पाहिजे आणि प्रार्थना करीत असताना पवित्र शास्त्रातील वचनांचा आधार आपल्याला घ्यावासा वाटला पाहिजे.' 'पवित्र शास्त्राविषयीचे अज्ञान हे ख्रिस्ताविषयीचे अज्ञान होय. '

चिंतन : सतत काहीतरी करीत रहा, मग परमेश्वर येवो वा सैतान येवो, तुमचे हात पुष्कळशा चांगल्या गोष्टींनी भरलेले आहेत असे त्याला दिसले पाहिजे.-
संत जेरोम 

परमेश्वराच्या कसोटीस पूर्णपणे उतरलेले पवित्र शास्त्रतील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे इयोब. देवावरील पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा ह्यांचा सुंदर संगम इयोबच्या जीवनात पाहावयास मिळतो. देवाच्या आज्ञा पाळून त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणाऱ्या इयोबला सुद्धा कसोटीस उतरताना तावून सलाखून निघावे लागले. देवाने त्याचे सर्वस्व उध्वस्त केले तरी सुद्धा तो पूर्णतया देवाला शरण गेला. 
आपले शिष्य होऊ पाहणाऱ्यांची प्रभू येशू कसोटी घेत आहे. प्रभू येशू शिष्यांना तीन मुद्दे स्पष्ट करीत आहे. 
१. म्हणजेच राहण्याचे निश्चित ठिकाण नाही तर विश्वचि माझे घर समजायचे. २.  तू जाऊन देव राज्याची घोषणा कर, ” याचाच अर्थ नाते संबंध " सर्वकाळ टिकणारे नाहीत तर देवराज्य सर्वकाळासाठी आहे. 
शेवटी ३.  शिष्य बनल्यावर एकमात्र लक्ष्य म्हणजेच देवराज्याची सुवार्ता घोषविणे होय. तेथे जीवनातील इतर गोष्टींबरोबर तडजोड नाही. येशूवर पूर्णपणे विसंबून राहून स्वतःला झोकून द्यायचे.


पहिले वाचन : इयोब ९:१-१२,१४-१६

वाचन :इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन

"मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल ?”

इयोब आपल्या मित्रांना म्हणाला, खरोखर हे असेच आहे. हे मला ठाऊक आहे. पण मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल? मानव देवाशी वाद करू लागला तर हजार गोष्टीतल्या एकीचेही उत्तर त्याला देता येणार नाही. देव मनाने सुज्ञ आणि सामर्थ्याने प्रबल आहे, त्याच्याशी विरोध करून कोण टिकला आहे? तो पर्वतांना नकळत अचानक हटवतो, तो आपल्या क्रोधाने त्यांना उलथून टाकतो. तो पृथ्वीला कापून तिला स्थानभ्रष्ट करतो, तिचे आधारस्तंभ थरारतात. त्याची आज्ञा झाली असता सूर्य उगवत नाही, तो ताऱ्यांना मोहोरबंद करतो. तोच आकाशमंडळ विस्तारतो, तो समुद्राच्या पर्वतमय लहरीवरून चालतो. त्यानेच सप्तऋषी, मृगशीर्ष, कृत्तिका आणि दक्षिणेकडील नक्षत्रमंडळे उत्पन्न केली. तो अतर्क्स, अगणित अद्भुत कृत्ये करतो. पाहा, तो माझ्याजवळून जातो तरी मला दिसत नाही, तो निघून जातो तरी माझ्या दृष्टीस पडत नाही. पाहा, तो हिसकावून घेऊ लागला तर त्याचा हात कोण धरील? तू हे काय करतोस, असे त्याला कोण म्हणणार ?
“तर मी त्याला उत्तर दयावे आणि शब्दांची योग्य निवड करून त्याच्याशी वाद करावा, असा मी कोण आहे ? मी निर्दोष असलो तरी त्याला मी उत्तर देणार नाही. त्या माझ्या प्रतिवाद्यांची मी विनवणी करतो. मी धावा केला असता तर त्याने उत्तर दिले असते, तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली असती.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Job 9: 1-12, 14-16 And Job answered, and said: Indeed I know it is so, and that man cannot be justified compared with God. If he will contend with him, he cannot answer him one for a thousand. He is wise in heart, and mighty in strength: who hath resisted him, and hath had peace? Who hath removed mountains, and they whom he overthrew in his wrath, knew it not. Who shaketh the earth out of her place, and the pillars thereof tremble. Who commandeth tile sun and it riseth not: and shutteth up the stars as it were under a seal: Who alone spreadeth out the heavens, and walketh upon the waves of the sea. Who maketh Arcturus, and Orion, and Hyades, and the inner parts of the south. Who doth things great and incomprehensible, and wonderful, of which there is no number. If he come to me, I shall not see him: if he depart I shall not understand. If he examine on a sudden, who shall answer him? or who can say: Why dost thou so? What am I then, that I should answer him, and have words with him? I, who although I should have any just thing, would not answer, but would make supplication to my judge. And if he should hear me when I call, I should not believe that he had heard my voice.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : ८८: १० -१५
प्रतिसाद :  प्रभो, माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होवो.

१ )हे परमेश्वरा, मी दररोज तुझा धावा करतो, 
तुझ्यापुढे मी आपले हात पसरतो. 
मृतांकरिता तू अद्भुत कृत्ये करशील का ? 
प्रेते उठून तुझी स्तुती करतील का ?

२) तुझ्या कृपेचे वर्णन शवगर्तेत होईल का ?
 विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल का ? 
अंधारात तुझी अद्भुत कृत्ये प्रकट होतील का ? 
विस्मरणलोकी तुझे नीतिमत्त्व प्रकट होईल का ?

३) मी तर, हे परमेश्वरा, तुझा धावा करतो,
 प्रात:काळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते. 
हे परमेश्वरा, तू माझ्या जिवाचा त्याग का करतोस? 
तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस ?

 Psalms 88: 10bc-11, 12-13, 14-15 R. (3) Let my prayer come before you, Lord. 10bc All the day I cried to thee, O Lord: I stretched out my hands to thee. 11 Wilt thou shew wonders to the dead? or shall physicians raise to life, and give praise to thee? R. Let my prayer come before you, Lord. 12 Shall any one in the sepulchre declare thy mercy: and thy truth in destruction? 13 Shall thy wonders be known in the dark; and thy justice in the land of forgetfulness? R. Let my prayer come before you, Lord. 14 But I, O Lord, have cried to thee: and in the morning my prayer shall prevent thee. 15 Lord, why castest thou off my prayer: why turnest thou away thy face from me? R. Let my prayer come before you, Lord.

जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  

माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर, 
तू आपल्या सत्पथाने मला चालव.
आलेलुया!

Acclamation: 
  Philippians 3: 8-9
R. Alleluia, alleluia.
8-9 I consider all things so much rubbish that I may gain Christ and be found in him.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक ९:५७-६२
वाचक :   लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"प्रभो, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन."

येशू आणि त्याचे शिष्यं वाटेने चालत असता कोणाएकाने त्याला म्हटले, "आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन.” येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही.” त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये." परंतु तो म्हणाला, "प्रभो, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ दया.” तो त्याला म्हणाला, “मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.” मग आणखी एकाने म्हटले, "प्रभो, मी आपल्यामागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ दया.” येशूने त्याला म्हटले, "जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 9: 57-62 And it came to pass, as they walked in the way, that a certain man said to him: I will follow thee whithersoever thou goest. Jesus said to him: The foxes have holes, and the birds of the air nests; but the Son of man hath not where to lay his head. But he said to another: Follow me. And he said: Lord, suffer me first to go, and to bury my father. And Jesus said to him: Let the dead bury their dead: but go thou, and preach the kingdom of God. And another said: I will follow thee, Lord; but let me first take my leave of them that are at my house. Jesus said to him: No man putting his hand to the plough, and looking back, is fit for the kingdom of God..
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन : आज आपणांस ख्रिस्ती शिष्यत्वाची किंमत किती मोठी आहे ह्याची जाणीव करून देण्यात आली आहे. ख्रिस्ती शिष्यत्वासाठी पूर्ण मनाचा दृढ निश्चय, वचनबद्धता आणि सेवेसाठी त्याग करण्याची वृत्ती असायला लागते. ख्रिस्ती मिशन हे खडतर आणि आव्हानात्मक आहे आणि त्यासाठी सर्वकाही सोसण्याची आणि त्याग करण्याची आपली तयारी असली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी सर्व परिस्थितीमध्ये आनंदाने मिशन करणारा असावा ह्याची आगाऊ सूचना देतो : “खेकड्यांस बिळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास जागा नाही.” ख्रिस्ती शिष्य प्रभू येशूसाठी हे सर्व सहन करण्यास तयार असावाआणि एकदा का नांगराला हात घातला तर त्याने मागे वळून पाहू नये.
आज चर्चच्या मिशनला अनेक शिष्यांची गरज आहे आणि हे शिष्यत्व महाग आहे. त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची आपली तयारी असली पाहिजे.
प्रभू येशूच्या शुभवर्तमानाचा प्रचार करण्यासाठी त्याचा खरा शिष्य होण्यास मी तयार आहे का ?
प्रार्थना :   प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहून तुझी सुवार्ता घोषविण्यास मला ।
बळ दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या