सामान्यकाळातील ३३ वा रविवार
१५ नोव्हेंबर २०२६
ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल;
So take the talent from him and give it to him who has the ten talents.
देवाने दिलेल्या देणग्यांचा, कलेचा आणि कौशल्याचा योग्य तो वापर करुन सद्गुणी स्त्री आपले कुटुंब सांभळते. आपल्या शेजोळातील माणसांबरोबर तिचे संबंध सलोख्याचे असतात. सद्गुणी स्त्रीचे व्यक्तिमत्व सर्वांसमोर आदर्शवत आहे. परमेश्वराने प्रत्येक माणसाला योग्य त्या देणग्या देऊन त्यानुसार जबाबदारीने कार्यक्षम बनण्यासाठी ह्या जगात पाठविले आहे. देवाचे हे दान व्यर्थ घालविण्यासाठी, स्वार्थासाठी किंवा| लपवून ठेवण्यासाठी नाही तर ते उघडपणे स्वतःबरोबरच इतरांचे जीवन फुल विण्यासाठी आणि देवाच्या गौरवासाठी आहे. आपण आपल्या जीवनावर चिंतन करु या.
पहिले वाचन : नीतिसूत्रे ३१:१०- १३.१९-२०.३०-३१
वाचक :नीतिसूत्रे या पुस्तकातून घेतलेले वाचन
'सद्गुणी स्त्री आनंदाने आपल्या हातांनी काम करते."
सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते ? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे.
तिच्या पतीचे मन तिच्यावर विश्वास ठेवते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही.ती आमरण त्याचे हित करते, अहित करत नाही. ती लोकर व ताग खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते.ती आपल्या हाती चाती घेते, ती हातांनी चरखा धरते.ती गरिबांसाठी मूठ उघडते, गरजवंतास हात देते, सौंदर्य भुलवणारे आहे आणि लावण्य व्यर्थ आहे. परंतु परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. तिच्या हातचे श्रमफळ तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांमुळे भर वेशीत तिची प्रशंसा होवो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Proverbs 31:10-13, 19-20, 30-31
An excellent wife who can find? She is far more precious than jewels. The heart of her husband trusts in her, and he will have no lack of gain. She does him good, and not harm, all the days of her life. She seeks wool and flax, and works with willing hands. She puts her hands to the distaff, and her hands hold the spindle. She opens her hand to the poor and reaches out her hands to the needy. Charm is deceitful, and beauty is vain, but a woman who fears the Lord is to be praised. Give her of the fruit of her hands, and let her works praise her in the gates.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १२८:१-५
प्रतिसाद : जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य !
१ जे परमेश्वराचे भय धरतात,
जे प्रभूच्या मार्गानी चालतात ते धन्य !
तू आपल्या श्रमाचे फळ खाशील,
तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.
२ तुझ्या माजघरात तुझी पत्नी सफळ
द्राक्षवेलीसारखी होईल,
तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या
रोपासारखी होतील.
३ पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या मनुष्याला
असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनातून
तुला आशीर्वाद देवो आणि
तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस
येरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.
Responsorial Psalm: Psalms 128: 1-2, 3, 4-5
R. (1a) Blessed are those who fear the Lord.
1 Blessed are all they that fear the Lord: that walk in his ways.
2 For thou shalt eat the labours of thy hands: blessed art thou, and it shall be well with thee.
R. Blessed are those who fear the Lord.
3 Thy wife as a fruitful vine, on the sides of thy house.
R. Blessed are those who fear the Lord.
4 Behold, thus shall the man be blessed that feareth the Lord.
5 May the Lord bless thee out of Sion: and mayest thou see the good things of Jerusalem all the days of thy life.
R. Blessed are those who fear the Lord.
दुसरे वाचन थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ५:१-६
वाचक : पौलचे थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"प्रभूच्या दिवसाने तुम्हांला चोरासारखे गाठू नये."
बंधूनो, काळ आणि समय ह्यांविषयी तुम्हांला काही लिहिण्याची गरज नाही. कारण तुम्हांला स्वतःला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. “शांती आहे, निर्भय आहे" असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत. बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हांला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा आणि दिवसाची प्रजा आहा, आपण रात्रीचे आणि अंधाराचे नाही. ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे आणि सावध राहावे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद
Second Reading :
1 Thessalonians 5:1-6
Concerning the times and the seasons, brothers, you have no need to have anything written to you. For you yourselves are fully aware that the day of the Lord will come like a thief in the night. While people are saying, "There is peace and security", then sudden destruction will come upon them as labour pains come upon a pregnant woman, and they will not escape. But you are not in darkness, brothers, for that day to surprise you like a thief. For you are all children of light, children of the day. We are not of the night or of the darkness. So then let us not sleep, as others do, but let us keep awake and be sober.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाण्यास समर्थ
व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia:
R. Alleluia, alleluia.
Abide in me, and I in you, says the Lord; whoever abides in me bears much fruit.
R. Alleluia, alleluia.
