Marathi Bible Reading | 32nd week in ordinary Time | Wednesday 11th November 2026

 सामान्य काळातील ३२ वा  सप्ताह 

बुधवार ११ नोव्हेंबर २०२६

"दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊजण कोठे  आहेत?
nd Jesus answering, said, Were not ten made clean? and where are the nine?

टुअर्सचे संत मार्टिन  
महागुरू, वर्तनसाक्षी (३१६-३९७)
हंगेरीमधील पलोनिया नामक प्रांतात सुरक्षादलामध्ये मोठ्या हुद्यावर कार्य करीत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या घरी मार्टिनचा जन्म झाला. हा अधिकारी अख्रिस्ती होता. पुढे त्याची बदली बोम्बार्डीतील पेव्हीया ह्या ठिकाणी झाली. इथे मार्टिनला गॉल शहरातील एमियन्स ह्या ठिकाणी राजकीय दरबारात भरती करण्यात आले. त्यावेळी तो केवळ १५ वर्षांचा होता.
एकदा आपल्या घोड्यावरून प्रवास करीत असताना रस्त्याच्या कडेला त्याला एक भिकारी थंडीने कुडकुडत असताना दिसला. त्याच्या अंगावर लाज झाकण्यापुरती लक्तरे होती. ते पाहून मार्टिनला त्याची दया आली. दरम्यानच्या काळात ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेण्यासाठी आवश्यक असलेले धर्मशिक्षण तो घेत होता. त्याचा जबरदस्त पगडा त्याच्यावर बसला होता. मार्टिनने मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या अंगावरील अत्यंत उंची झगा आपल्या हातातील तरवारीने कापून टाकला व त्या भिकाऱ्याच्या अंगाभोवती लपेटला. त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मार्टिन सुखावला. एका आगळ्या वेगळ्या आनंदात समाधानाने तो घरी परतला. रस्त्यावर त्याला पाहणारे सर्व लोक मार्टिनला हसत होते. रात्री स्वप्नात त्याला प्रभू येशू त्या झग्यामध्ये दिसला. त्याच्या अंगावर उरलेल्या झग्याचा तुकडा होता. पुढे मार्टिनच्या अंगावरील फाटका झगा तो फ्रँकीश किंग्सच्या नावाने उभारलेल्या चॅपलमध्ये बरीच वर्षे जपुन ठेवण्यात आला.ह्या घटनेनंतर आपल्याला लवकरच ख्रिस्ती धर्मात बाप्तिस्मा मिळावा म्हणून मार्टिन धडपडू लागला. लवकरच त्याची ही इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर त्याने मिलिटरीमधून स्वत:ची सुटका करून घेतली आणि तो संत हिलरीच्या (सण १३ जाने.) संस्थेत दाखल झाला. पेव्हिया येथे कुटुंबांना भेटी देत असताना त्याला त्याची आई भेटली. तिचे मनपरिवर्तन करून त्याने तिला ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. मात्र त्याच्या वडिलांनी ख्रिस्ती धर्म नाकारला.
दरम्यानच्या काळात एरियस नावाचा एक पाखंडी धर्मगुरू ख्रिस्तसभेमध्ये उदयास आलेला होता. त्याच्या मते पवित्र त्रैक्यातील तीन व्यक्ती समस्वरुपाच्या नसून एक दुसऱ्यापेक्षा कनिष्ठ आहेत. हा विचार गॉल शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला की संत हिलरी ह्यांनाच गॉल शहरातून हद्दपार करण्यात आले. आता त्यांची जागा मार्टिनने घेतली आणि तो भूमध्य समुद्राच्या किनारी एक साधू व मठवासी बनून जीवन जगू लागला.
इ. स. ३६१ मध्ये पुन्हा एकदा संत हिलरी ह्यांना बोलावण्यात आले आणि मार्टिन पुन्हा पोईटिएर्स येथे परतला. तेथे बरेचसे अनुयायी त्याला मिळाले. त्यांच्या सहाय्याने त्याने गॉलमधील पहिला बेनेडिक्टाईन मठ स्थापन केला. जिथे जिथे मूर्तिपूजेला स्थान आहे तिथे तिथे खऱ्या देवाची पूजा सुरू व्हावी ही मार्टिनची तीव्र इच्छा होती. म्हणून अधूनमधून तो आपला मठ सोडून प्रेषित कार्यासाठी संपूर्ण गॉल शहरात हिंडत असे.
अशा प्रकारे दहा वर्षे गेली. त्यानंतर मार्टिनला फ्रान्समधील टुअर्स नावाच्या शहरातून बोलावणे आले आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या इच्छेविरुद्ध त्याला महागुरूपदाची दीक्षा देण्यात आली. महागुरू म्हणून तो अत्यंत साधे आणि क्लेशमय जीवन जगत असे. इतर साधूसंतांना आपला त्रास होऊ नये म्हणून त्याने स्वतःसाठी एक वेगळी खोली बांधून घेतली होती, परंतु तिथेही त्याच्या खोलीभोवती इतर मठवाशांनी आपापले मठ उभारले. आजपर्यंत हा मठांचा समूह मारमोटूर इथे अस्तित्वात आहे.
आपल्या धर्मप्रांताचे प्रशासन कार्य तो अत्यंत सचोटीने कणखरपणे आणि न्यायभावनेने करीत असे. पाखंडी मतवाद्यांच्या कचाट्यापासून ख्रिस्तसभेला दूर ठेवण्यासाठी तो सतत झटत असे. त्यासाठी त्याने बरेच प्रेषितीय दौरे काढले. त्या दौऱ्यात तो खरीखुरी ख्रिस्ती शिकवण लोकांना पटवून देण्यात वेळ घालवीत असे. ट्रेवस (ट्रायर) नावाच्या शहरात तर त्याला राजाश्रय मिळाला होता. त्याचा त्याने पुरेपूर फायदा उठविला.
रक्तसाक्षी नसूनही एक संत म्हणून गौरविला गेलेला मार्टिन हा पाश्चात्य देशातील एक पहिला संत मानला जातो. मध्ययुगात तर त्याची कीर्ती दिगंतापर्यंत जाऊन पोहोचली. त्याच्यामुळे पाश्चात्य देशातील वरीचशी ख्रिस्तमंदिरे त्याच्याच नावाने उभारली गेलेली आहेत. शिवाय काही शहरांनाही त्याचे नाव देण्यात आले आहे.
मार्टिन ११ नोव्हेंबर ३९७ साली मरण पावला.
चिंतन : हे प्रभो जर तुझ्या लोकांना माझी गरज असेल तर कष्ट करण्यात मी कधीही हयगय करणार नाही. तुझ्या पवित्र इच्छेप्रमाणे होवो.
- संत मार्टिन

पहिले वाचन : तितास पत्र ३:१-७
वाचक :  पौलचे तितास पत्र यातून घेतलेले वाचन 

सर्वांनी सत्ताधीश आणि अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे, कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य आणि सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे. अशी सर्वांना आठवण दे. कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे आणि विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा आणि हेवा ह्यात आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र आणि एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला तारणकर्ता देव ह्याची दया आणि मनुष्यांवरील प्रेम प्रकट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान आणि पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपल्यावर विपुल प्रमाणात ओतला आहे, ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे सार्वकालिक जीवनाचे वारस व्हावे.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :: Titus 3: 1-7
Admonish them to be subject to princes and powers, to obey at a word, to be ready to every good work. To speak evil of no man, not to be litigious, but gentle: shewing all mildness towards all men. For we ourselves also were some time unwise, incredulous, erring, slaves to divers desires and pleasures, living in malice and envy, hateful, and hating one another. But when the goodness and kindness of God our Saviour appeared: Not by the works of justice, which we have done, but according to his mercy, he saved us, by the laver of regeneration, and renovation of the Holy Ghost; Whom he hath poured forth upon us abundantly, through Jesus Christ our Saviour: That, being justified by his grace, we may be heirs, according to hope of life everlasting.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  :स्तोत्र २३:१-६
प्रतिसाद : परमेश्वर माझा मेंढपाळ आहे

१)परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, 
मला काही उणे पडणार नाही. 
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, 
तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो  माझा जीव ताजातवाना करतो.

२)तो आपल्या नामास्तव मला नीतिमार्गानी चालवतो. 
मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो 
तरी अरिष्टांस भिणार नाही. 
कारण तू माझ्याबरोबर आहेस, 
तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.

३)तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस, 
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, 
माझे पात्र काठोकाठ भरले आहे.

४) खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण 
आणि दया ही लाभतील आणि 
परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.

Psalms 23: 1b-3a, 3bc-4, 5, 6
R. (1) The Lord is my shepherd; there is nothing I shall want.
1 The Lord ruleth me: and I shall want nothing.
2 He hath set me in a place of pasture. 
He hath brought me up, on the water of refreshment:
3 He hath converted my soul.
R. The Lord is my shepherd; 
there is nothing I shall want.

3 He hath led me on the paths of justice, 
for his own name’s sake.
4 For though I should walk in the 
midst of the shadow of death, 
I will fear no evils, for thou art with me. 
Thy rod and thy staff, they have comforted me.
R. The Lord is my shepherd; 
there is nothing I shall want.

5 Thou hast prepared a table before 
me against them that afflict me. 
Thou hast anointed my head with oil; 
and my chalice which inebriateth me, how goodly is it!
R. The Lord is my shepherd; 
there is nothing I shall want.

6 And thy mercy will follow me all the days of my life. 
And that I may dwell in the 
house of the Lord unto length of days.
R. The Lord is my shepherd; 
there is nothing I shall want.

 जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर, तू आपल्या सत्पथाने मला चालव,
 आलेलुया!

Acclamation:  Alleluia, alleluia.
In all circumstances, give thanks, for this is the will of God for you in Christ Jesus.
Alleluia, alleluia.
शुभवर्तमान   लूक  १७:११-१९
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 येशू येरुशलेमकडे चालला असता शोमरोन आणि गालील ह्यामधील एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, "अहो येशू गुरुजी, आम्हांवर दया करा, " त्याने त्यांच्याकडे पाहून म्हटले, "तुम्ही जाऊन स्वत:ला याजकांना दाखवा." मग ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहो, असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णीत परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, "दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊजण कोठे  आहेत? ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? "आणि येशूने त्याला म्हटले," ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : 
Luke 17: 11-19
And it came to pass, as he was going to Jerusalem, he passed through the midst of Samaria and Galilee. And as he entered into a certain town, there met him ten men that were lepers, who stood afar off; And lifted up their voice, saying: Jesus, master, have mercy on us. Whom when he saw, he said: Go, show yourselves to the priests. And it came to pass, as they went, they were made clean. And one of them, when he saw that he was made clean, went back, with a loud voice glorifying God. And he fell on his face before his feet, giving thanks: and this was a Samaritan. And Jesus answering, said, Were not ten made clean? and where are the nine? There is no one found to return and give glory to God, but this stranger. And he said to him: Arise, go thy way; for thy faith hath made thee whole.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: जीवनामध्ये परमेश्वराने आपल्याला अनेक देणग्या दिल्या आहेत, आपल्यामध्ये अनेक गुण व कला कौशल्ये आहेत, चांगले लोक आपल्या आजूबाजूला आहेत; पण आपण या गोष्टी सहजतेने घेतो. विनामूल्य असल्याकारणाने आपण या ईश्वरी भेटी गृहीत धरतो, पण ह्या भेटी सर्वांना दिलेल्यानाहीत. कितीतरी लोक आपल्यापेक्षा चांगले असूनदेखील, आपण जे परमेश्वराचे आशीर्वाद भोगत आहोत त्यांच्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलेले आहे. सहसा आपण ताक्रार करत असतो व आभार मानण्यासाठी जीवनात आपल्याला कोणतेच कारण दिसत नाही. आपल्यामध्ये आभाराची भावना जाणीवपूर्वक जोपासणे व वाढवणे गरजेचे आहे. आपल्या जीवनामध्ये आभाराची भावना असल्यास आपल्याला मिळालेल्या देणग्यांची आपण योग्य दखल घेतो. माझ्यामध्ये आभाराची भावना किती आहे ?

प्रार्थना :- प्रभो परमेश्वरा, तुझ्या अनंत उपकार बद्दल धन्यवाद, आम्ही कृतज्ञतेने तुझ्यासमोर नतमस्तक झालो आहोत आमचा स्वीकार कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या