"आमचा स्वर्गवासी परमेश्वर पूर्वेकडे उगम पावलेल्या सूर्याबरोबर आम्हांला भेटण्यासाठी येत आहे."
✝️
पहिले वाचन : शमुवेल ७:१-५,८-११,१६
वाचक : शमुवेलाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
दावीद राजा आपल्या महालात राहू लागला आणि परमेश्वराने त्याला त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. तेव्हा राजा नाथान नामक संदेष्ट्याला म्हणाला, “पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे. पान देवाचा कोष कनाथीच्या आत राहत आहे." नाथानं राजाला म्हणाला, "तुझ्या मनात जे काही असेल ते कर. कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे." त्याच रात्री परमेश्वराचे वचन नाथानला प्राप्त झाले, “जा माझा सेवक दावीद याला सांग, परमेश्वर म्हणतो : तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय?"
तर आता माझा सेवक दावीद यास सांग, "सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्राएलचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे फिरत असता आणले. जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूचा तुझ्यापुढून उच्छेद केला. पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन. मी आपल्या इस्राएल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन. मी तेथे त्यांस रुजवीन म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करुन राहतील आणि ते तेथून पुढे कधी ढाळणार नाहीत. इस्राएल लोकांवर मी शास्ते नेमले होते त्याच्या काळापासून जसे दुर्जन त्यांस त्रस्त करत होते ते ह्यापुढे करणार नाहीत. तुला मी शत्रूंपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की, मी तुझे घराणे कायमचे स्थापीन,"तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ्यापुढे अढळ राहतील. तुझी गादी कायमची स्थापित होईल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८९:२-५,२७.२९
प्रतिसाद : प्रभूच्या प्रेमाचे मी गुणगान गाईन
१) प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन, माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना तुझ्या विशसनीयतेविषयी सांगेन. तुझे प्रेम अनंतकाळ टिकेल.तुझी विश्वसनीयता स्वर्गात स्थापलेली आहे.
२) "मी स्वत: निवडलेल्या व्यक्तीशी करार केला आहे. माझा दास दावीद याला अभिवचन दिले आहे : तुझा वंश मी अबाधित ठेवीन. तुझे सिंहासन पिढ्यान्पिढ्या राखीन'
३)तो मला म्हणेल, तूच माझा पिता, माझा देव माझा रक्षणकर्ता दुर्ग, मुक्तिदाता आहेस. त्याच्यावरले माझे प्रेम अढळ राहील. त्याच्याबरोबरचा माझा करार सदैव अबाधित राहील.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
हे इम्मानुएल, आमच्या राजा आणि न्यायाधीशा, हे प्रभो परमेश्वरा, ये आणि आमचे तारण कर.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १:६७-७९
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
योहनचा बाप जखऱ्या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण
होऊन भाकीत केले ते असे :
इस्राएलचा देव प्रभू धन्यवादित असो.
कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी भरून सुटका केली आहे आणि आपल्यासाठी त्याने आपला दास दावीद ह्यांच्या घराण्यात तारणाचे शिंग उभारले आहे. हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते.
म्हणजे आपल्या शत्रूच्या आणि आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी, आपल्या पूर्वजांवर त्याने दया करावी आणि त्याने आपला पवित्र करार, म्हणजे जी शपथ आपला पूर्वज आब्राहाम ह्याच्याशी त्याने वाहिली ती स्मरावी.
ती अशी, तुम्ही आपल्या शत्रूच्या हातून सुटून माझ्यासमोर पवित्रतेने आणि नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.
आणि हे बाळका, तुला परमेश्वराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्यासाठी तू त्याच्यापुढे बू त्याच्यापुढे चालशील, ह्यासाठी की, त्याच्या लोकांना त्याच्या पापांच्या क्षमेने तारणाचे ज्ञान द्यावे.
आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे. तिच्यायोगे उदयप्रकाशावरून आमच्याकडे येईल. ह्यासाठी की, त्याने अंधारात आणि मृत्युच्छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे."
प्रभूचे हे शुभवर्तमान...
✝️