Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Monday 7th October 2024 | 27th Week in Ordinary Time

सामान्य काळातील २७वा  सप्ताह 

सोमवार ७ ऑक्टोबर   २०२४

“पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. 

"The Holy Spirit will come upon you, and the power of the Most High will overshadow you; 


जपमाळेची पवित्र मरिया
 ✝️ 

संत अल्फान्सोस लिगरी ह्यांनी पवित्र जपमाळेचे महत्त्व पुढील शब्दांत व्यक्त केले आहे. “पवित्र जपमाळेच्या भक्तीने संपूर्ण जगात खूप विलक्षण बदल घडवून आणलेला आहे. अनेक आत्मे पापांपासून मुक्त झालेले आहेत, काहींनी पवित्र जीवनाला वाहून घेतले तर पुष्कळांना चांगले शांतीने मरण आले.” पवित्र जपमाळेची प्रार्थना खूप भक्तीभावाने म्हटली गेली पाहिजे. संत युलालिया हिला आपल्या देवमातेने एकदा सांगितले की, घाईघाईने १५ रहस्ये म्हणण्यापेक्षा ५ रहस्ये अगदी सावकाश आणि भक्तीभावाने प्रार्थिल्याने मला आनंद होईल.

१३ मे व १३ जून १९१७ साली फातिमा येथे मुलांना दिलेल्या (फ्रान्सिस्को, जसिंटा व लुसी) दर्शनाच्या वेळी पवित्र मरिया त्यांना म्हणाली, “पवित्र जपमाळेची प्रार्थना भक्तीभावाने म्हणा आणि संपूर्ण जगासाठी शांतीचे वरदान मागा. प्रत्येक रहस्यानंतर म्हणा, हे माझ्या येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे संरक्षण कर. सर्व लोकांना स्वर्गाकडे ने, विशेषकरून ज्यांना तुझ्या दयेची अधिक जरूरी आहे.”

पवित्र जपमाळेच्या प्रार्थनेचा सण इ. स. १५७१ पासून पोप पायस ५ वे ह्यांनी साजरा करण्यास सुरुवात केली. लिपान्टो येथील युद्धात तुर्कावर मिळविलेल्या विजयानिमित्ते देवाचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी त्यांनी हा सण साजरा केला.

पवित्र मरियेने रोझरी प्रार्थनेची भक्ती प्रथम संत डॉमणिक ह्यांना प्रकट केली असे किमान १३ वेगवेगळ्या पोपमहाशयांनी आपापल्या परिपत्रकामधून स्पष्ट केले आहे. पोप जॉन पॉल दुसरे ह्यांचे शिक्षक एक डॉमणिकन धर्मगुरू होते. त्यांचे नाव रेजिनाल्ड गारिरो लारांगे. तारणाऱ्याची माता ह्या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे: “संध्याकाळ झाली की संत डॉमणिक खेडेगावात जात, लोकांना श्रद्धेचे एक एक रहस्य शिकवीत. प्रत्येक रहस्यानंतर 'आमच्या स्वर्गीय बापा आणि नमो कृपापूर्ण मरिये' ह्या प्रार्थना म्हणत." अशा प्रकारे श्रद्धा, भक्ती आणि धर्मशिक्षण ह्यांची सुंदर गुंफण त्यांनी घातलेली होती.

पोप पॉल सहावे म्हणत, रोझरीच्या प्रत्येक रहस्यावर थोडावेळ चिंतन करावे. असे चिंतन न केलेली प्रार्थना पोपटपंची आणि यांत्रिक बनेल. चिंतनमननाविना रोझरी म्हणजे आत्म्याविना शरीर होय!

पोप पायस पाचवे ह्यांनी सुरू केलेला सण १७१६ पर्यंत संपूर्ण जागतिक ख्रिस्तसभेत पसरला. कारण ह्याच प्रार्थनेच्या बळावर युजीन या राजपुत्राने तुर्कांवर हंगेरी येथे आणखी एक विजय संपादन केला होता. पोप लिओ तेरावे ह्यांनी ऑक्टोबर हा महिना रोझरीचा महिना म्हणून जाहीर केला.

पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी आपल्या परमगुरुपदाच्या रौप्यमहोत्सवानिमित्ते१६ ऑक्टोबर २००२ रोजी रोझरीच्या प्रार्थनेमध्ये प्रकाशाची पाच रहस्ये समाविष्ट केली आणि ऑक्टोबर २००२ ते ऑक्टोबर २००३ हे रोझरी वर्ष म्हणून जाहीर केले. ते स्वत: नित्यनेमाने रोझरीची प्रार्थना करीतात.

चिंतन : दररोज जी व्यक्ती भक्तीभावाने जपमाळेची प्रार्थना करते ती देवापासून दूर जाऊ शकत नाही. हे विधान मी आनंदाने माझ्या स्वतःच्या रक्ताने लिहून देईन! -संत लुईस मोंटफॉर्ड



✝️
पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये १:१२-१४
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"ते सर्वजण येशूची आई मरिया हिच्यासह प्रार्थना करण्यात तत्पर असत."
येशूला स्वर्गात घेतल्यानंतर प्रेषित येरुशलेमजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून येरुशलेमला परत आले आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तेथे पेत्र, योहान, याकोब, आंद्रेया, फिलीप, थॉमस, बार्थोलोम्यू, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत आणि याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Acts 1:12-14
 After Jesus was taken up into heaven,] the Apostles returned to Jerusalem from the mount called Olivet, which is near Jerusalem, a Sabbath day's journey away. And when they had entered, they went up to the upper room, where they were staying, Peter and John and James and Andrew, Philip and Thomas, Bartholomew and Matthew, James the son of Alphaeus and Simon the Zealot and Judas the son of James. All these with one accord were devoting themselves to prayer, together with the women and Mary the mother of Jesus, and his brothers.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र लूक :१: ४६-५५ 
प्रतिसाद :जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरितां महत्कृत्यें केली आहेत; आणि 'त्याचें नांव पवित्र आहे,

१)'माझा जीव प्रभूला' थोर मानितो, 
आणि 'देव जो माझा तारणारा' त्याच्या मुळे 
माझा आत्मा 'उल्हासला आहे; '

२)कारण 'त्यानें' आपल्या 'दासीच्या 
दैन्यावस्थेचें अवलोकन केले आहे.' 
पाहा, आतांपासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील;
कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरितां 
महत्कृत्यें केली आहेत; 
आणि 'त्याचें नांव पवित्र आहे,

३) आणि जे 'त्याचें भय धरितात, 
त्यांच्यावरत्याची दया पिढ्यान्पिढया आहे.' 
त्याने आपल्या 'बाहूनें' पराक्रम केला आहे; 
जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेनें 
'गविष्ठ आहेत त्यांची त्यानें दाणादाण केली आहे.'

४) 'त्यानें अधिपतींस' राजासनांवरून 
'ओढून काढिले आहे' व 'दीनांस उंच केले आहे.',
 'त्यानें भुकेलेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे,'
 व 'धनवानांस रिकामें लावून दिले आहे.'

५) 'आपल्या पूर्वजांस' त्याने सांगितलें '
त्याप्रमाणे अब्राहाम' व त्याचें 
'संतान ह्यांच्यावरील दया' सर्वकाळ स्मरून , 
त्यानें आपला सेवक इस्राएल 
ह्याला साहाय्य केले आहे.'


Psalm Luke 1:46-55
He who is mighty has done great things for me, and holy is his name.

My soul magnifies the Lord. 
and my spirit rejoices in God my Saviour. R

For he has looked on the humble estate of his servant.
For behold, from now on all generations will call me blessed;
for he who is mighty has done great things for me, 
and holy is his name. R

And his mercy is for those who fear him 
from generation to generation.
He has shown strength with his arm;
he has scattered the proud in the thoughts of their hearts. R

He has brought down the mighty from their thrones
and exalted those of humble estate;
he has filled the hungry with good things, 
and the rich he has sent away empty. R

He has helped his servant Israel,
in remembrance of his mercy,
as he spoke to our fathers,
to Abraham and to his offspring for ever." R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठायी आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
 आलेलुया!

Acclamation: 
Hail, Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among 

शुभवर्तमान   लूक  १:२६-३८ 
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल."

देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल देवदूताला पाठवले. ती दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो.” ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.'
मरियेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल ? कारण मला पुरुष ठाऊक नाही.” देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.
पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही.” तेव्हा मरिया म्हणाली, "पाहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 1:26-38

At that time: The angel Gabriel was sent from God to a city of Galilee named Nazareth, to a virgin betrothed to a man whose name was Joseph, of the house of David. And the virgin's name was Mary. And he came to her and said, "Hail, full of grace, the Lord is with you!" But she was greatly troubled at the saying, and tried to discern what sort of greeting this might be. And the angel said to her, "Do not be afraid, Mary, for found favour with God. And behold, you will conceive in your womb and bear a son, you have and you shall call his name Jesus. He will be great and will be called the Son of the Most High. And the Lord God will give to him the throne of his father David, and he will reign over the house of Jacob for ever, and of his kingdom there will be no end." And Mary said to the angel, "How will this be, since I am a virgin?" And the angel answered her, "The Holy Spirit will come upon you, and the power of the Most High will overshadow you; therefore the child to be born will be called holy the Son of God. And behold, your relative Elizabeth in her old age has also conceived a son, and this is the sixth month with her who was called barren. For nothing will be impossible with God." And Mary said, "Behold, I am the servant of the Lord; let it be to me according to your word." And the angel departed from her.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
शतकानुशतके आपण मरियेचा होकार “Mary said yes” ह्या विषयी ऐकत आहोत. परंतु तो होकार एका १५-१६ वर्षीय तरुण कुमारीकेचा होता. अचानक समोर उभ्या असलेल्या देवदूताला पाहून त्या तरुण मुलीची काय अवस्था झाली असेल ? याचा विचार आपण कधी केला नाही, तर फक्त तिच्या होकारावर लक्ष केंद्रित केले. तिच्या होकारामुळे जगाला उद्धारकर्ता, तारणारा मिळाला हे जरी खरे असले तरी त्यावेळची मरीयेची मनःस्थिती लक्षात घेणे तितकेच गरजेचे असते. त्या देवदूताला पाहून ती घाबरली. त्याचा संदेश ऐकून ती गोंधळली, देवदूत तिला म्हणाला, मरिये, भिऊ नको. तीने स्वतःला सावरले. त्या गोंधळलेल्या मनःस्थितीला स्वतःवर कब्जा घेवू दिला नाही. तर मरिये, भिऊ नको, ह्या संदेशाचा तिने स्विकार केला व ती प्रभूला शरण गेली आणि होकार देताना देव हा थोर चमत्कार कसा घडवून आणणार हे जाणून घेण्याच्या इच्छेने देवदूताला प्रश्न केला, “हे कसे शक्य होणार ?” तेव्हा देवदूत तिला म्हणाला, “तुझ्याच बाबतीत नव्हे तर अलिशीबा सारख्या वांझ स्त्रिला सुद्धा तिच्या उतार वयात मुल देणे देवाला शक्य आहे. देवाला काहीच अशक्यनाही." तेव्हा मरिया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी आहे." असे म्हणून तिने तारणकर्त्यांची आई, जगाची माता ही जबाबदारी, आपल्या खांद्यावर घेतली. देवाच्या त्याच्या प्रत्येक लेकरांसाठी निरनिराळ्या योजना असतात ह्या योजना आपल्या रोजच्या जीवनात, युगाच्या समाप्ती पर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे, भिऊ नका. मत्तय २८- १२० (ब) ह्या शब्दात धीर देत प्रभू पूर्ण करत असतो. मी रोजच्या जीवनात प्रभूच्या योजना पूर्ण करण्यास तयार आहे का ?

प्रार्थना :हे पवित्र आणि निष्कलंक मरिया माते, आम्हासाठी प्रभू पाशी विनंती कर, आमेन.