Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Fifth Sunday of Lent | 17th March 2024

 उपवास काळातील पाचवा  रविवार  

 दि. १७ मार्च  २०२४

जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल;

 If anyone serves me, he must follow me, and where I am, there will my servant be also.

  ✝️ 

गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. 

✝️

परमेश्वराचे मानवावरील प्रेम हे निरपेक्ष आणि पवित्र प्रेम आहे. पश्चात्तापी माणसाला नवजीवन देण्याचे आभिवचन परमेश्वर देत असतो. प्रभू येशू ख्रिस्त द्वारे तारण मिळवावे  म्हणूनच ह्या उपवास काळात ख्रिस्तसभा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचे  दुःखसहन व क्रुसावरील बलीदानावर चिंतन करण्यासाठी आवाहन करीत  आहे. ह्या उपवास काळात आपण सर्वांनी ख्रिस्ताकडे आकर्षित होण्याची व पश्चात्तापीअंत:करणाने त्याच्याकडे वळण्याची गरज आहे.
दुःखसहन, क्रुसावरील मरण आणि वैभवी पुनरुत्थान ह्या सर्व घटनांवर  चिंतन करीत असताना  प्रभू येशूचा आत्म बलिदानाचा संदेश प्रीति, क्षमा व परस्पर सेवा करण्यास प्रेरणा देणारा आहे. आपण सर्वजण प्रभूकडे आकर्षित व्हावेत व त्याच्याठायी विसावा घ्यावा  म्हणून आत्मपरिक्षण करु या. 
✝️

पहिले वाचन : यिर्मया  ३१:३१-३४ 
वाचक यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
परमेश्वर म्हणतो "पाहा, त्यात इस्राएलचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन असे दिवस येत आहेत. परमेश्वर म्हणतो, मी त्याच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही; मी त्याच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला. परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा : मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्याच्या हृदयपटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यांना, कोणी आपल्या बंधूला, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्याच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Jeremiah 31:31-34

"Behold, the days are coming, declares the LORD, when will make a new covenant with the house of Israel and the house of Judah, not like the covenant that I made with their fathers on the day when I took them by the hand to bring them out of the land of Egypt, my covenant that they broke though I was their husband, declares the LORD. For this is the covenant that I will make with the house of Israel after those days, declares the LORD: I will put my law within them, and I will write it on their hearts. And I will be their God, and they shall be my people. And no longer shall each one teach his neighbor and each his brother, saying, 'Know the LORD, for they shall all know me, from the least of them to the greatest, declares the LORD. For I will forgive their iniquity, and I will remember their sin no more."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र ५०:३-४,१२-१३
प्रतिसाद :हे देवा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय उत्पन्न कर.
१) हे देवा, तू आपल्या निष्ठावंत प्रेमास अनुसरून माझ्यावर कृपा कर. 
तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध पुसून टाक. 
मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक; 
माझ्या पापापासून मला स्वच्छ कर.

२) हे देवा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय उत्पन्न कर, 
माझ्यामध्ये स्थिर आत्मा पुन्हा घाल. 
तू मला आपणापुढून घालवून देऊ नकोस 
आणि आपला पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नकोस.

३) तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. 
आणि तुझ्या उद्धारात उत्सुकतेने स्थिर राहण्यास मला प्रेरणा दे; 
म्हणजे मी अपराध्यांना तुझा मार्ग शिकवीन. 
आणि पापी लोक तुझ्याकडे वळतील.

Psalm 51:3-4, 12-13, 14-15 (R 12a)
R Create a pure heart for me, O God.

Have mercy on me, O God, 
according to your merciful love; 
according to your great compassion, 
blot out my transgressions. 
Wash me completely from my iniquity, 
and cleanse me from my sin. R

Create a pure heart for me, O God: 
renew a steadfast spirit within me. 
Do not cast me away from your presence;
take not your holy spirit from me. 
Restore in me the joy of your salvation; 
sustain in me a willing spirit. 
I will teach transgressors your ways, 
that sinners may return to you. R

दुसरे वाचन :इब्री ५:७-९
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 

    येशूला मरणातून तारायला जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत येशूने प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले, त्याद्वारे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा सार्वकालिक तारणाचा कर्ता झाला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.
Second Reading: 
Hebrews 5:7-9
In the days of his flesh, Jesus offered up prayers and supplications, with loud cries and tears, to him who was able to save him from death, and he was heard because of his reverence. Although he was a son, he learned obedience through what he suffered. And being made perfect, he became the source of eternal salvation to all who obey him.

जयघोष     
प्रभु म्हणतो, "माझी सेवा करू इच्छिणाऱ्याने मला अनुसरावे; म्हणजे मी जेथे आहे तेथे माझा सेवकही असेल."
  
Acclamation: .

 If any one serves me, he must follow me, says the Lord; and where I am, there will my servant be also.


शुभवर्तमान  योहान १२:२०-३३
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
   
सणात उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते. त्यांनी गालिलातील बेथर्सैदाकर फिलीप ह्यांच्याजवळ येऊन विनंती केली की, "महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे." फिलीपने येऊन आंद्रेयाला सांगितले आणि आंद्रेया व फिलीप ह्यांनी येऊन येशूला सांगितले, येशूने त्यांना म्हटले, "मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हांला खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील ."
आता माझा जीव व्याकूळ झाला आहे. मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर? मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे. हे बापा, तू आपल्या नावाला गौरवीत कर.” तेव्हा, अशी आकाशवाणी झाली की, "मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन." तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, "मेघगर्जना झाली." दुसरे म्हणाले, "त्याच्याबरोबर देवदूत बोलला," येशूने उत्तर दिले, "ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. आता ह्या जगाचा न्याय होतो, तेव्हा ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन." आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचविण्याकरता तो असे बोलला.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 12:20-33

At that time: Among those who went up to worship at the feast were some Greeks. So these came to Philip, who was from Bethsaida in Galilee, and asked him, "Sir, we wish to see Jesus." Philip went and told Andrew: Andrew and Philip went and told Jesus. And Jesus answered them. The hour has come for the Son of Man to be glorified. Truly, truly. I say to you, unless a grain of wheat falls into the earth and dies, it remains alone; but if it dies, it bears much fruit. Whoever loves his life loses it, and whoever hates his life in this world will keep it for eternal life. If anyone serves me, he must follow me, and where I am, there will my servant be also. If anyone serves me, the Father will honour him. "Now is my soul troubled. And what shall I say? "Father, save me from this hour? But for this purpose I have come to this hour. Father, glorify your name." Then a voice came from heaven: "I have glorified it, and I will glorify it again." The crowd that stood there and heard it said that it had thundered. Others said, "An angel has spoken to him." Jesus answered, "This voice has come for your sake, not mine. Now is the judgment of this world; now will the ruler of this world be cast out. And I, when I am lifted up from the earth, will draw all people to myself." He said this to show by what kind of death he was going to die.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:प्रायश्चित्त काळातील पाचव्या रविवारची उपासना वाचने आपल्यासमोर एक आव्हान ठेवतात. ज्याप्रमाणे प्रभू येशूने इतरांसाठी आपले जीवन अर्पण केले त्याप्रमाणेच आपणही स्वतःसाठीच न जगता स्वार्थ व मी पणाच्या परिघातून बाहेर पडून आत्मत्यागी जीवन जगण्यासाठी सदैव तत्पर असायला हवे. आजची वाचने प्रभू येशूच्या आगामी मृत्यूवर लक्ष केंद्रीत करतात. आजच्या पहिल्या वाचनात देव न्यायाच्या जुन्या कराराच्या जागी पापांची क्षमा करणारा नवीन करार अंमलात आणिल ह्याविषयी यिर्मया संदेष्टा स्पष्ट करतो. यिर्मयाने भाकीत केलेला हा नवीन किंवा नूतनीकरण केलेला करार प्रभू येशूचे जीवन, मृत्यू आणि पुनरूत्थान याद्वारे पूर्ण झाला. आजचे दुसरे वाचन प्रभू ख्रिस्ताच्या महान बलिदानाची आठवण करून देते. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला सांगतो, "आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे." आता दुःखात काय गौरव आहे? त्याला अटक, शिक्षा आणि ठार मारले जाणार आहे तरीही तो त्याच्या गौरवाबद्दल बोलत आहे. विजय व अनंतकाळचे जीवन पाहण्यासाठी प्रभू येशूने वेदना आणि अडचणींच्या ढगांच्या पलिकडे पाहिले. त्याचे दुःख आणि मृत्यू अनेकांना जीवन देईल हे त्याला माहीत होते, त्यामुळे दुःखाच्या तात्पुरत्या परिस्थितीमुळे निराश होण्याऐवजी त्याला सार्वकालिक जीवनाच्या प्रामाणिक प्रतिफळामुळे प्रोत्साहान आणि प्रेरणा मिळाली, म्हणून प्रभू येशूने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना अनंतकाळचे जीवन देण्यासाठी त्याचे दुःख व जीवन अर्पण केले. दुर्दैवाने आपल्यापैकी बरेचजण या मार्गाचे अनुसरण करणे पसंत करत नाहीत. प्रभू येशू मात्र आपल्याला जीवनाच्या मार्गावर बलवान होण्यासाठी आमंत्रित करतो. तो जिथे आहे तिथे आपण असावे अशी त्याची इच्छा आहे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहवासात राहून खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा लाभो, आमेन.

✝️