Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Tuesday 24th September 2024 | 25th Week in Ordinary Time

सामान्य काळातील पंचविसावा   सप्ताह 

मंगळवार २४ सप्टेंबर  २०२४

 “हे जे देवाचे वचन ऐकणारे आणि पाळणारे तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत.”My mother and my brethren are they who hear the word of God, and do it.


दया माता

संत पीटर नोलास्को, पेन्याफोर्टचे संत रेमंड आणि ॲरागॉनचा राजा जेम्स ह्यांनी इ.स. १२३३ साली बार्सेलोना (स्पेन) येथे स्थापन केलेल्या 'दयामाता संघा'ने सारासेनच्या गुलामगिरीतून ख्रिस्ती गुलामांना मुक्त करण्याचे प्रेषितकार्य सुरू केले. त्यासाठी लागेल ती खंडणी या संस्थेतील धर्मगुरू व धर्मबंधू स्वकष्टाने मिळवून देत असत. त्यांनी पवित्र मरियेच्या सन्मानार्थ हा सण साजरा करण्यास सुरुवात केली.

हळूहळू फ्रान्स आणि स्पेन देशांनी हा सण साजरा करण्यास प्रारंभ केला व शेवटी पोप इनोसंट तेरावे ह्यांनी १६९६ साली संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेने सदर सण साजरा करावा अशी अधिकृत घोषणा केली. 

वसईतील मर्सेस या ठिकाणी मर्सेस माऊली (दयामाता) चे चर्च आहे व सप्टेंबर महिन्याच्या शेवटी दयामातेचा सण तिथे साजरा केला जातो. 
इंग्लडच्या परिवर्तनासाठी आणि चुकीच्या धार्मिक शिकवणुकीपासून भाविकांचे संरक्षण व्हावे म्हणून दयामातेचा धावा केला जातो. सैतानाच्या विषारी तावडीतून पाप्यांची सुटका व्हावी, शुद्धीस्थानातील आत्म्यांचे तारण व्हावे म्हणून देखील पवित्र मरियेकडे मध्यस्थीची याचना केली जाते.

पहिले वाचन : : नीतिसूत्रे २१:१-६,१०-१३
वाचन :नीतिसूत्रे या पुस्तकातून घेतलेले वाचन
 
"विविध नीतिसूत्रे."
राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे, त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.
मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंत:करणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे.
धर्माने आणि न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे.
चढेल दृष्टी आणि गर्विष्ठ अंतःकरण, तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पापरूपे होत.
उद्योगी माणसाचे विचार समृद्धी करणारे असतात, जो कोणी उतावीळ करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.
असत्य जिव्हेने मिळविलेले धन इकडेतिकडे उडून जाणाऱ्या वाफेसारखे आहे, मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात.
दुर्जनांचे मन वाईट इच्छिते, शेजाऱ्यांवर तो कृपादृष्टी करीत नाही.
निंदकाला शासन केले म्हणजे भोळा शहाणा होतो,
सुज्ञाला शिक्षण दिले म्हणजे तो ज्ञानी बनतो. न्यायी परमेश्वर दुर्जनांच्या घराकडे लक्ष देतो. तो दुर्जनांना विपत्तीत पाडतो
गरिबांची आरोळी ऐकून जो कानात बोटे घालतो, तोही आरोळी करीत पण कोणी ऐकणारा नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : roverbs 21: 1-6, 10-13
As the divisions of waters, so the heart of the king is in the hand of the Lord: whithersoever he will he shall turn it.  Every way of a man seemeth right to himself: but the Lord weigheth the hearts. To do mercy and judgment, pleaseth the Lord more than victims. Haughtiness of the eyes is the enlarging of the heart: the lamp of the wicked is sin. The thoughts of the industrious always bring forth abundance: but every sluggard is always in want. He that gathereth treasures by a lying tongue, is vain and foolish, and shall stumble upon the snares of death. The soul of the wicked desireth evil, he will not have pity on his neighbour. When a pestilent man is punished, the little one will be wiser: and if he follow the wise, he will receive knowledge. The just considereth seriously the house of the wicked, that he may withdraw the wicked from evil. He that stoppeth his ear against the cry of the poor, shall also cry himself and shall not be heard.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ११८:१.२७,३०.३४,३५.४४
प्रतिसाद : प्रभो, तू आपल्या आज्ञांच्या मार्गावर मला चालव.

१ )ज्यांचे आचरण शुद्ध आहे, 
जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात, ते धन्य! 
तुझ्या आदेशाप्रमाणे कसे वागावे ते मला समजावून दे, 
म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.

२) मी सत्याचा मार्ग निवडला आहे, 
मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत. 
तुझे नियमशास्त्र आचरण्यास 
आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.

३) तू आपल्या आज्ञांच्या मार्गावर मला चालव, 
कारण त्यातच मला आनंद आहे. 
मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन.


Psalms 119: 1, 27, 30, 34, 35, 44
R.  Guide me, Lord, in the way of your commands.

Blessed are the undefiled in the way, 
who walk in the law of the Lord.

R. Guide me, Lord, in the way of your commands.

Make me to understand the way of thy justifications: 
and I shall be exercised in thy wondrous works.

R. Guide me, Lord, in the way of your commands.

 I have chosen the way of truth: 
thy judgments I have not forgotten.

R. Guide me, Lord, in the way of your commands.

Give me understanding, and I will search thy law;
 and I will keep it with my whole heart.

R. Guide me, Lord, in the way of your commands.

Lead me into the path of thy commandments; 
for this same I have desired.

R. Guide me, Lord, in the way of your commands.

So shall I always keep thy law, 
for ever and ever.

R. Guide me, Lord, in the way of your commands.

जयघोष                                             

आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. 
मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
 आलेलुया!

Acclamation: 
  Alleluia, alleluia.
 Blessed are those who hear the word of God and observe it.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक ८:१९-२१
वाचक :   लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 
"हे जे देवाचे वचन ऐकणारे आणि पाळणारे तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत."
येशूची आई आणि भाऊ त्याच्याकडे आले, परंतु गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ येता येईना. तेव्हा त्याला सांगण्यात आले की, तुझी आई आणि तुझे भाऊ तुला भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभे आहेत. त्याने त्यांस उत्तर दिले, “हे जे देवाचे वचन ऐकणारे आणि पाळणारे तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 8: 19-21
19 And his mother and brethren came unto him; and they could not come at him for the crowd.
20 And it was told him: Thy mother and thy brethren stand without, desiring to see thee.
21 Who answering, said to them: My mother and my brethren are they who hear the word of God, and do it.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन :
"जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच माझी आई व भाऊ आहेत.” या वचनावरून येशू आपणांस सांगू इच्छितो की, येशूबरोबरचे कौटुंबिक नाते हे रक्ताच्या नात्यावर अवलंबून नसते. ते देवाच्या शब्दावर अवलंबून असले तरीही त्याचे खरे कुटुंब मात्र देवाचा शब्द ऐकून त्याप्रमाणे जगताना पाहतो. बाप्तिस्मा स्वीकारल्यामुळे कदाचित आपली नोंद ही ख्रिस्ती समुहात झालेली आहे. पण त्याचा अर्थ असा होत नाही की, आपण येशूच्या कुटुंबाचे अविभाज्य घटक आहोत. येशूच्या कौटुंबिक नातेसंबंध यात सहभागी होण्यासाठी येशूच्या शिकवणूकीप्रमाणे जगले पाहिजे

प्रार्थना हे प्रभू येशू, तुझी दिव्य आणि अमर वचने आत्मसात करण्यास व त्याप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला प्रेरणा व धैर्य लाभो, आमेन.