Marathi Bible Reading | 25th week in ordinary Time | Monday 22nd September 2025

सामान्यकाळातील २५ वा सप्ताह 

सोमवार दिनांक २२ सप्टेंबर  २०२५

कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही
 "No one after lighting a lamp covers it with a jar

संत थॉमस विलानोव्हा

महागुरू, वर्तनसाक्षी (१४८८-१५५५)

  फा. थॉमस हे आपल्या अगस्तीनियन संस्थेत प्रॉव्हिन्शिअल पदाला जाऊन पोहोचले. त्यांनी मेक्सिको देशात आपल्या पहिल्या मिशनऱ्यांचे पथक पाठविले इ.स. १५४४ साली त्यांना व्हेलेन्सिया शहराचे आर्चबिशप म्हणून नेमण्यात आले. किमान १०० वर्षे तरी तेथे बिशपांचे वास्तव्य नव्हते. आर्चबिशप थॉमस ह्यांनी आज्ञाधारकपणे ही जबाबदारी स्वीकारली आणि धर्मगुरू व प्रापंचिकांच्या नूतनीकरणासाठी पुष्कळ परिश्रम घेतले.
आपल्या सरधर्मप्रांतात असलेले 'अंडरग्राउंड' तुरुंग त्यांनी बंद केले. त्यांच्या कॅथिड्रलच्या नूतनीकरणासाठी बक्षीस म्हणून मिळालेले पैसे त्यांनी जनरल हॉस्पिटलचे नूतनीकरण करण्यासाठी वापरले. तरुण धर्मगुरूंना आणखी अभ्यास करता यावा म्हणून कॉलेज उघडले. गरीब विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महाविद्यालय बांधले. उकिरड्यावर टाकलेल्या बाळांसाठी त्यांनी अनाथाश्रम सुरू केले. कामगारांना पवित्र मिस्सामध्ये सहभागी होता यावे म्हणून त्यांनी सकाळी पहाटे मिस्सा अर्पण करण्याची पद्धत चालू केली.
ते स्वतः आत्यंतिक दारिद्र्यामध्ये दिवस काढीत. त्यांच्या महागुरुपदाच्या मानधनाचा दोन तृतीयांश भाग ते दानधर्म करीतन. ५०० लोकांना ते दररोजची भाकरी पुरवीत. वरवर चांगल्या दिसणाऱ्या परंतु हाती पैसा नसलेल्या लोकांना पैशासाठी कोणापुढे हात करण्यास संकोच वाटतो ह्याची जाणीव आर्चबिशप थॉमस ह्यांना होतीच. त्यामुळे ते अशा प्रकारच्या लोकांना आपापल्या परीने स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास प्रोत्साहन देत.

काही मेकॅनिक खूप कार्यक्षम होते; परंतु त्यांच्याकडे पुरेशी शस्त्रे नसायची. त्यांनासुद्धा आर्चबिशपांनी शस्त्रे व अवजारे पुरवून आपली दररोजची भाकरी कमाविण्यास उद्युक्त केले.

व्हिलानोवाच्या बिशप थॉमस ह्यांना देवाने चमत्कारांची, आरोग्य दानाची आणि पाषाणहृदयी लोकांचे परिवर्तन करण्याची अनन्यसाधारण शक्ती दिलेलीहोती. त्यांनी 'साक्षात्कार-ईशज्ञान' (Mystical Theology) या विषयी लिहिलेल्या पुस्तकाच्या २० आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
आर्चबिशप थॉमस १५५५ साली स्वर्गवासी झाले. त्यांना पोप आलेक्झांडर सातवे ह्यांनी १ नोव्हेंबर १६५८ रोजी संतमालिकेत समाविष्ट केले.
चिंतन : जीवन जगण्याची कला हे जगातील सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. जर तुम्हाला ही कला अवगत झाली तर तुम्ही जगातील सर्वात ज्ञानी व्यक्ती म्हणून प्रसिद्धी पावाल.- संत थॉमस विलानोव्हा 

आपला जीवनरुपी दिवा सतत तेवत राहावा, आपल्या प्राप्त सर्व दानांचा उपयोग स्वतःबरोबरच इतरांच्या भल्यासाठी आणि विशेषतः देवाच्या गौरवासाठी करावा, असे आवाहन प्रभू येशू आपल्या सर्वांना करीत आहे.  आपल्याला मिळालेले देवाचे  दान इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आहे. आपण आज आपल्या | जीवनावर चिंतन करु या.  आपल्यातील हे कलागुण व वरदाने गुप्त न ठेवता त्यांचा वापर  झाला पाहिजे..
प्रभू येशू ला आपला प्रत्येक विचार आणि आपल्या प्रत्येक कृतिची जाणीव आहे. आपण परमेश्वरापासून कोणतीच गोष्ट गुप्त आणि लपवून ठेवू शकत  नाही. म्हणूनच देवाच्या गौरवासाठी, ख्रिस्त सभेच्या आणि बंधु-भगिनींच्या| कल्याणासाठी सहकार्य करण्यास प्रेरणा मिळावी, म्हणून प्रार्थना करु या. 

✝️

पहिले वाचन : एज्रा १:१-६
वाचक : एज्रा या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तुमच्यामध्ये देवाच्या सर्व लोकांपैकी जो कोणी असेल त्याने यहुदातील येरुशलेमला जावे."
यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पार्शियाचा राजा सायरस याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने ह्या राजाच्या मनाला स्फूर्ती दिली, तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले आणि लेखी फर्मानही पाठवले ते असे: “पार्शियाचा राजा सायरस असे म्हणतो, स्वर्गीचा देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहुदा प्रांतातील येरुशलेममध्ये माझ्या प्रीत्यर्थ एक मंदिर बांध. त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल त्याबरोबर त्याचा देव असो. त्याने यहुदातील येरुशलेममध्ये जाऊन इस्राएलचा देव परमेश्वर यांचे मंदिर बांधावे. येरुशलेममध्ये जो आहे तोच देव होय. जो कोणी शिल्लक राहिला असून एखाद्या ठिकाणी उपरा म्हणून राहत असेल, त्याला तेथल्या मनुष्यांनी चांदी, सोने, सामानसुमान आणि पशू देऊन सहाय्य करावे, याखेरीज येरुशलेममधील देवाच्या मंदिराकरिता त्यांनी स्वसंतोषाची अर्पणे द्यावी.”
तेव्हा येरुशलेममधील परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी वरती जायला देवाने ज्यांच्या मनात स्फूर्ती दिली ते यहुदा आणि बन्यामीन यांच्या पितृकुळांचे प्रमुख, याजक आणि लेवी उठून उभे राहिले. त्यांच्या आसपासच्या लोकांनी चांदीची पात्रे, सोने, सामानसुमान, पशू आणि मौल्यवान वस्तू देऊन त्यांना सहाय्य केले, यांखेरीज लोकांनी जे स्वसंतोषाने दिले ते वेगळेच.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Ezra 1:1-6
In the first year of Cyrus king of Persia, that the word of the Lord by the put mouth of Jeremiah might be fulfilled, the Lord stirred up the spirit of Cyrus king of Persia, so that he made a proclamation throughout all his kingdom and also it in writing: "Thus says Cyrus king of Persia: The Lord, the God of heaven, has given me all the kingdoms of the earth, and he has charged me to build him a house at Jerusalem, which is in Judah. Whoever is among you of all his people, may his God be with him, and let him go up to Jerusalem, which is in Judah, and rebuild the house of the Lord, the God of Israel- he is the God who is in Jerusalem. And let each survivor, in whatever place he sojourns, be assisted by the men of his place with silver and gold, with goods and with beasts, besides freewill offerings for the house of God that is in Jerusalem." Then rose up the heads of the fathers' houses of Judah and Benjamin, and the priests and the Levites, everyone whose spirit God had stirred to go up to rebuild the house of the Lord that is in Jerusalem. And all who were about them aided them with vessels of silver, with gold, with goods, with beasts, and with costly wares, besides all that was freely offered.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १२६ :१-६
प्रतिसाद :  परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.
१ सीयोनातून धरून नेलेल्या लोकांना 
जेव्हा पमेश्वरानेच परत आणले तेव्हा 
आम्ही स्वप्नात आहो असे आम्हांला वाटले. 
तेव्हा आमचे मुख हास्याने 
आणि आमची जीभ जयघोषाने भरली.

२) अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की, 
परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत. 
परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत. 
त्यामुळे आम्हांला आनंद झाला आहे.

३) हे परमेश्वरा, नेगेब येथील ओढ्यांप्रमाणे 
आम्हांला बंदिवासातून परत आण. 
जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील.

४) जे पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतात 
ते खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येतील.

Psalm Psalm 126:1-2ab, 2cd-3, 4-5, 6
 What great deeds the Lord worked for us!

When the Lord brought back the exiles of Sion,
we thought we were dreaming. 
Then was our mouth filled with laughter;
on our tongues, songs of joy. R 

Then the nations themselves said,
"What great deeds the Lord worked for them!" 
What great deeds the Lord
worked for us!
Indeed, we were glad. R

Bring back our exiles, O Lord, 
as streams in the south. 
Those who are sowing in tears 
will sing when they reap.R.

They go out, they go out, full of tears,
 bearing seed for the sowing;
they come back, they come back with a song,
bearing their sheaves. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो 
आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
 आलेलुया!

Acclamation: 
Let your light shine before others, so that they may see your good works and give glory to your Father who is in heaven.

शुभवर्तमान  लूक  ८:१६-१८
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
" आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून दिवा दिवठणीवर ठेवतात.”
येशू लोकसमुदायाला म्हणाला, कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा, ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 8:16-18
At that time: Jesus said to the crowds, "No one after lighting a lamp covers it with a jar or puts it under a bed, but puts it on a stand, so that those who enter may see the light. For nothing is hidden that will not be made manifest, nor is anything secret that will not be known and come to light. Take care then how you hear, for to the one who has, more will be given, and from the one who has not, even what he thinks that he has will be taken away."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
आकाशात कधी कधी चंद्र आणि ढग ह्यांच्यात लपाछपीचा खेळ सुरू असतो. कधी पांढरे शुभ्र लख्ख चांदणे पडते तर तोच चंद्र ढगाआड गेला की सर्वत्र काळोखाचे साम्राज्य सुरू होते. माणसाचे जीवन हादेखील एक लपाछपीचा खेळ आहे. माणूस जीवनात काही गोष्टी जाणूनबुजून लपवून ठेवतो आणि काही गोष्टींचा नुसताच डांगोरा पिटत राहतो. इस्रायली लोक जवळ ५० वर्षे बाबिलोनच्या हद्दपारीत जीवन जगत होते. पर्शियाचा राजा कोरेश (सायरस) ह्याने फर्मान काढून त्यांना मायदेशी जाण्यास परवानगी दिली. एज्रा याजक व शास्त्री, नेहेम्या हा राज्यपाल आणि जेरुब्बाबेल हा नगरविकास मंत्री ह्यांना राजाने लोकांबरोबर पाठविले. त्यामुळे कोरेश आपला मुक्तिदाता आहे अशी लोकांची समजूत झाली मात्र जसे जेरुसलेमचे मंदिर पुन्हा उभारले गेले तसेतसे राजाने आपले रंग उधळायला सुरुवात केली. त्याने सुरु केलेली करपद्धती पुढे खूप जाचक ठरत गेली. त्यामुळे येशू सांगतो प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नसते.
आपण कोणकोणत्या गोष्टी आणि कशासाठी झाकन ठेवतो? त्यामागे आपला उदात्त हेतू असतो की स्वार्थ असतो ?

प्रार्थना : हे परमेश्वरा, अंत:करणापासून उदारपणे तुझी व बंधु भगिनींची सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या