सामान्यकाळातील २४ वा सप्ताह
शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५
पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असतं and many others, who provided for them out of their means.
संत जानेवारीअस
महागुरू, रक्तसाक्षी (--- ३०५ )
संत जानेवारीअस ह्यांच्याविषयी इतिहासामध्ये अत्यंत थोडीशी माहिती उपलब्ध आहे. उत्तर इटलीतील बेनेवेंटुम शहराचे ते बिशप होते. डायक्लेशिअन सम्राटाच्या कारकीर्दीत त्यांना छळ सहन करावा लागला आणि अनेक उपधर्मगुरूंसह त्यांना मरणाच्या दाढेत ढकलण्यात आले.
'नेपल्सच्या कॅथिड्रलमध्ये मिराकोलो डी सान जेनारो' या नावाने त्यांचे अवशेष प्रसिद्ध आहेत. एका चांदीच्या व काचेच्या पेटिकेमध्ये या पवित्र बिशपांचे अवशेष ठेवण्यात आलेले आहेत. त्यात असलेले विशपांचे रक्त एरवी घट्ट व काळ्या रंगाचे दिसते परंतु वर्षातील तीन विविध प्रसंगी ते पातळ होताना व त्याचा रंग जांभळट- लालभडक होताना आढळतो. त्या रक्ताची घनता व पातळीदेखील वाढते. त्यावर बुडबुडे येऊ लागतात.
या चमत्काराची बरीच चिकित्सा करण्यात आलेली आहे. वातावरण, हवामान किंवा लोकांची गर्दी ह्यांचा परिणाम त्या रक्तावर कधीच होताना आढळत नाही. मोठमोठ्या वैज्ञानिकांना हे एक फार मोठे गूढ वाटत आलेले आहे. जवळ जवळ १०० वर्षे या रक्तावर संशोधन करण्यात आले तरी १३८९ पासून आतापर्यंत चमत्काराच्या नियमितपणात खंड पडलेला नाही. १३८९ पासूनची सर्व संशोधनपर माहिती तिथे जपून ठेवण्यात आलेली आहे.
प्रभू येशूची शिकवण सत्याची व त्याची वाणी देवाची होती. देवराज्य हाच त्याच्या शिकवणुकीचा गाभा होता.
शुभवर्तमानात आज विशेषकरून प्रभू येशूच्या सहवासाने परिवर्तीत जीवन जगून त्याला सहकार्य करणाऱ्या स्त्रियांचा उल्लेख करण्यात आला आहे. 'दुष्टात्मे व विकारांपासून मुक्त केलेल्या अनेक स्त्रिया.' ज्या मग्दालीया मरियेतून सात भूते काढली ती, हेरोदाच्या कारभाऱ्याची बायको योहाना तसेच सुसाना आणि इतर पुष्कळ स्त्रिया ह्या सर्व स्त्रीया येशूच्या कार्यात आपआपल्या परिने आर्थिक व इतर प्रकारची मदत करीत होत्या. त्या सर्व स्त्रियांनी देवराज्याच्या कार्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते.
जगभरात प्रभू येशूच्या देवराज्याची सुवार्ता पसरविणाऱ्या महिलांच्या अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. असंख्य स्त्रियांनी प्रभूच्या हाकेला प्रतिसाद देऊन देवराज्य पसरविण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. आरोग्य, शिक्षण, समाजसेवा, अनाथालये व इतर अनेक प्रकारे धर्मभगिनींचे कार्य जगभर सुरु आहे. संत मदर तेरेजांच्या संस्थेचे कार्य जगभरात सर्वांना परिचित आहे. आज आपण धर्मभगिनी व सर्व महिलांसाठी विशेष प्रार्थना करू या. त्यांच्या कार्याद्वारे प्रभूची सेवा घडावी व समाजात शांती प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांना सहकार्य करू या.
✝️
पहिले वाचन : तिमथी ६: २क -१२
वाचक :पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"हे देवभक्ता, तू नीतिमत्त्वाच्या पाठीस लाग.'
ह्या गोष्टी शिकव आणि ह्याविषयी बोध कर. जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती व सुभक्त्यानुसार जे शिक्षण ते मान्य करत नाही, तर तो गर्वाने फुगलेला आहे. त्याला काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध ह्यांमुळे वेडा बनला आहे. ह्यांपासून हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्यांविषयीचे दुष्ट संशय ही उत्पन्न होतात. मन बिघडलेल्या, सत्याला मुकलेल्या, भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. चित्तसमाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही, आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे; परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत पाशात आणि माणसांना नाशात व विध्वसांत बुडविणाऱ्या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.
हे देवभक्ता, तू ह्यांपासून पळ आणि नीतिमत्त्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर. युगानुयुगाच्या जीवनाचे ध्येय धर, त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे आणि अनेक साक्षीदारांसमोर तू उत्तम साक्ष दिलीस.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : 1 Timothy 6:2c-12
Beloved: Teach and urge these things. If anyone teaches a different doctrine and does not agree with the sound words of our Lord Jesus Christ and the teaching that accords with godliness, he is puffed up with conceit and understands nothing. He has an unhealthy craving for controversy and for quarrels about words, which produce envy, dissension, slander, evil suspicions, and constant friction among people who are depraved in mind and deprived of the truth, imagining that godliness is a means of gain. But godliness with contentment is great gain, for we brought nothing into the world, and we cannot take anything out of the world. But if we have food and clothing, with these we will be content. But those who desire to be rich fall into temptation, into a snare, into many senseless and harmful desires that plunge people into ruin and destruction. For the love of money is a root of all kinds of evils. It is through this craving that some have wandered away from the faith and pierced themselves with many pangs. But as for you, O man of God, flee these things. Pursue righteousness, godliness, faith, love, steadfastness, gentleness. Fight the good fight of the faith. Take hold of the eternal life to which you were called and about which you made the good confession in the presence of many witnesses.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ४९ :६-१०, १७-२०
प्रतिसाद : जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
१) मला फसवणाऱ्यांचा दुष्टपणा मला वेढतो,
अशा विपत्काली मी का भ्यावे ?
ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात
आणि आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात.
२) कोणाही मनुष्याला स्वतःला मुक्त करता येत नाही,
किंवा आपल्या जिवाबद्दल देवाला खंडणी देता येत नाही.
त्याला जीवाची खंडणी त्याच्या मर्यादेपलीकडे आहे.
तो आपला जीव कधीच विकत घेऊ शकत नाही,
किंवा गर्तेचा अनुभव टाळू शकत नही.
३) कोणी मनुष्य धनवान झाला,
त्याच्या घरचा डामडौल वाढला तरी
तू घाबरू नकोस कारण तो मृत्यू पावेल तेव्हा
बरोबर काहीच घेऊन जाणार नाही,
त्याचा थाटमाट त्याच्यामागून खाली उतरणार नाही.
४) तो जिवंत असता जरी स्वतःला धन्य समजून म्हणाला,
तू आपले बरे करून घेतलेस म्हणजे लोक
तुझी स्तुती करतील, तरी तो आपल्या
पूर्वजांना जाऊन मिळणार आहे,
ज्यांच्या दृष्टीला प्रकाश कधीच दिसणार नाही.
Psalm 49:6-10, 17-20
Blessed are the poor in spirit, for theirs is the kingdom of heaven
Why should I fear in evil days
the malice of the foes who surround me,
those who trust in their wealth,
and boast of the vastness of their riches? I
No man can ransom a brother,
nor pay a price to God for his life.
How high is the price of his soul!
The ransom can never be enough!
No one can buy life unending,
Then do not fear when a man grows rich,
when the glory of his house increases.
He takes nothing with him when he dies;
his glory does not follow him below. R.
Though he flattered himself while he lived,
"People will praise me
yet he will go to join his forebears
and will never see the light anymore. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंत:चक्षू प्रकाशित करो, म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा. कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी.
आलेलुया!
Acclamation:
Blessed are you, Father, Lord of heaven and earth, that you have revealed to little children the mysteries of the kingdom.
.
शुभवर्तमान लूक ८:१-३
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"दुसऱ्या कित्येक स्त्रिया येशूबरोबर होत्या, त्या आपल्या पैशाअडक्याने त्याची सेवाचाकरी करत असत."
येशू उपदेश करत आणि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी आणि गावोगावी फिरत होता. तेव्हा त्याच्याबरोबर ते बारा प्रेषित आणि दुष्ट आत्मे आणि विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मग्दालीया म्हटलेल्या मरियेतून सात भुते निघाली होती ती आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, तसेच सुसान्ना आणि दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 8:1-3
At that time: Jesus went on through cities and villages, proclaiming and bringing the good news of the kingdom of God. And the twelve were with him, and also some women who had been healed of evil spirits and infirmities: Mary, called Magdalene, from whom seven demons had gone out, and Joanna, the wife of Chuza, Herod's household manager, and Susanna, and many others, who provided for them out of their means.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या एक मूळ आहे. असे सांगून संत पॉल तीमथ्याला त्यापासून चार हात दूर राहण्यास सांगत आहे. त्याऐवजी त्याने नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर आणि सौम्यता ह्यांच्यामागे लागावे असे पॉल त्याला सुचवितो. स्वतः संत पॉलने येरुशलेमच्या गोरगरिबांसाठी मासिडोनिया, फिलिप्पी, करिंथ,अखया ह्या ठिकाणी वर्गणी गोळा केलेली होती, संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो असेही तो आपल्या पत्रात सांगतो. मात्र ह्या पैश्याचा वापर उदात्त हेतूंसाठी कसा करावा त्याचा विचार माणसाने केला पाहिजे. शुभवर्तमानामध्ये काही स्त्रिया येशूच्या करीत सहभागी झाल्याचे आणि वेळप्रसंगी त्याला पैश्याअडक्यानेसुद्धा मदत करीत असल्याचे संत लूक सांगतो. ह्या दोन्ही वाचनांचे सार तीन मुद्द्यात सांगता येईलः
१) पैसा किंवा धनदौलत वाईट नाही त्याचा लोभवाईट आहे,
२) पैशानेसुद्धा देवाची सेवा चाकरी करता येते,
३) पैश्यापेक्षा काही गोष्टी श्रेष्ठ असू शकतात. आज पैसा कसा कमवायचा हा प्रश्न फार थोड्या लोकांना भेडसावतो, तो कसा वापरायचा हा प्रश्न मात्र पुष्कळ लोकांना भेडसावत आहे.
पैश्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन कसा आहे? त्याचा वापर उदात्त हेतूसाठी मला कसा करता येईल?
प्रार्थना : हे प्रभू येशू, देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास कार्यरत असलेल्या सर्व व्रतस्थ महिलांना सामर्थ्य व कृपा दे, आमेन
0 टिप्पण्या