सामान्यकाळातील २३ वा सप्ताह
शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५
चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, The good person out of the good treasure of his heart produces good,
संत जॉन क्रिझोस्तोम
महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपाल आणि धर्मपंडित (३४९-४०७)
जे चांगले, दिव्य, पवित्र व ! सर्वांसाठी अनुकरणीय आहे अशा प्रभूच्या वचनात आपण सतत वाढले पाहिजे. त्या वचनाप्रमाणे आपले आचरण असावे म्हणून आज आपण आपल्या जीवनशैलीवर चिंतन करु या.
चांगुलपणा हा परमेश्वाराचा दैवी गुण आहे. परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा, असे स्तोत्रकार आपल्याला सांगतो. चांगुलपणाने भरलेला माणूस देवाच्या वचनात समृद्ध बनत असतो, तसेच परोपकार व सेवाकरुन देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. आपण चांगुलपणा हा गुण आत्मसात करु या.
ख्रिस्तसभा आज संत कोर्नेलियस व संत सिप्रियस ह्यांचा सन्मान करीत आहे. ख्रिस्तसभेच्या प्रारंभीच्या काळात डेसियन सम्राटाच्या कारकिर्दीत ख्रिस्तीजनांचा अतोनात छळ झाला. अशा प्रसंगी ह्या दोन्ही संतांनी ख्रिस्ती| विश्वासू लोकांना प्रोत्साहित केले. ख्रिस्ताची साक्ष त्यांनी आपल्या जीवनाद्वारे दिली.
✝️
पहिले वाचन : १ तिमथी १:१५-:१७
वाचक : पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्त येशू पापी लोकांना तारायला जगात आला.'
ख्रिस्त येशू पापी लोकांना तारायला जगात आला, हे वचन विश्वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारायला योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी एक मुख्य आहे, तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया केली. जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा, असा एकच देव, त्याला सन्मान आणि गौरव युगानुयुगे असो. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : 1 Timothy 1:15-17
Beloved: The saying is trustworthy and deserving of full acceptance that Christ Jesus came into the world to save sinners, of whom am the foremost. But I received mercy for this reason, that in me, as the foremost, Jesus Christ might display his perfect patience as an example to those who were to believe in him for eternal life. To the King of the ages, immortal, invisible, the only God, be honour and glory for ever and ever. Amen.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११३ :१-७
प्रतिसाद : प्रभूचे नाव सदासर्वकाळ धन्यवादित असो.
१) प्रभूचे स्तवन करा. प्रभूचे सेवकहो,
तुम्ही त्याचे स्तवन करा,
प्रभूच्या नावाचे स्तवन करा.
आतापासून सदासर्वकाळ प्रभूचे नाव धन्यवादित असो.
२) सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत
परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे.
परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे,
त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे.
३) परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे.
जो आकाश आणि पृथ्वी ह्यांचे
अवलोकन करण्यास लवून पाहतो,
त्याच्यासारखा कोण आहे ?
तो दीनांना धुळीतून उठवतो,
गरिबांना उकिरड्यावरून उचलतो.
Psalm 113:1-2, 3-4, 5a and 6-7
R. May the name of the Lord be blest for evermore.
Praise, O servants of the Lord,
praise the name of the Lord!
May the name of the Lord be blest
both now and forevermore! R
From the rising of the sun to its setting,
praised be the name of the Lord!
High above all nations is the Lord,
above the heavens his glory. R
Who is like the Lord, our God,
who lowers himself to look down
upon heaven and earth?
From the dust he lifts up the lowly,
from the ash heap he raises the poor. R.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ.
आलेलुया!
Acclamation:
If anyone loves me, he will keep my word, says the Lord; and my Father will love him, and we will come to him.
.
शुभवर्तमान लूक ६:४३-४९
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
तुम्ही मला प्रभो, प्रभो म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही ?"
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही, तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. फळावरून झाडाची परीक्षा होते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाहीत आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाहीत. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो, कारण अंत:करणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.
“तुम्ही मला प्रभू, प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही ? जो कोणी माझ्याकडे येतो आणि माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो. तो कोणी एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे, त्याने खोल खणून खडकावर पाया घातला, मग पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते घर हालले नाही. कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे, त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते घर लागलीच पडले आणि त्या घराचा सर्वनाश झाला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 6:43-49
At that time: Jesus said to his disciples, "No good tree bears bad fruit, nor again does a bad tree bear good fruit, for each tree is known by its own fruit. For figs are not gathered from thorn bushes, nor are grapes picked from a bramble bush. The good person out of the good treasure of his heart produces good, and the evil person out of his evil treasure produces evil, for out of the abundance of the heart his mouth speaks. "Why do you call me 'Lord, Lord', and not do what I tell you? Everyone who comes to me and hears my words and does them, I will show you what he is like: he is like a man building a house, who dug deep and laid the foundation on the rock. And when a flood arose, the stream broke against that house and could not shake it, because it had been well built. But the one who hears and does not do them is like a man who built a house on the ground without a foundation. When the stream broke against it, immediately it fell, and the ruin of that house was great."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
ख्रिस्त पापी लोकांना तारावयास ह्या जगात आला. त्या पापी लोकांपैकी मी एक आहे अशी कबुली संत पॉल देतो. त्यासाठी मनाची लीनता लागते. लीनता आणि नेमस्तपणा ह्यांच्यासारखी मानवी आत्म्याला शांती देणारी दुसरी कोणतीही गोष्ट ह्या जगात नाही. असे संत जॉन क्रिझोस्टमह्या धर्मपंडिताचे मत होते. हृदयात अशा सद्गुणांची बाग लावलेली असली की तिला सदाचाराचे आणि सत्कृत्यांचे फळ कधी ना कधी येतेच. मात्र त्यासाठी जीवनाची इमारत देवशब्दाच्या भक्कम पायांवर उभारलेली असावी लागते. एकीकडे प्रार्थनेतील सातत्य आणि दुसरीकडे प्रार्थनेला आज्ञाधारकपणाची जोड असली की ही जीवनाची इमारत खडकावर उभारलेल्या घरासारखी कधीही पडू शकत नाही मग जीवनात अडीअडचणींचे किंवा दुःख संकटांचे वादळवारे कितीही येवोत. मात्र केवळ ओठांनी प्रार्थना केली आणि प्रत्यक्ष जीवनात देवाच्या आज्ञांचा भंग करीत राहिलो तर वाळूवर उभारलेल्या घरासारखी आपल्या जीवनाची पडझड कधी होईल ते सांगता येत नाही. माझ्या जीवनात लीनता आणि नेमस्तवृत्ती, प्रार्थना आणि आज्ञाधारकपणा ह्यांची सांगड मी घातलेली आहे का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, चांगुलपणाने व श्रद्धेने जीवन जगून तुझी सुवार्ता घोषविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या