Marathi Bible Reading | 24th week in ordinary Time| Tuesday 16th September 2025

सामान्यकाळातील २४ वा सप्ताह 

मंगळवार  दिनांक १६ सप्टेंबर  २०२५

तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला 
when the Lord saw her, he had compassion on her



 संत कोर्नेलियस परमगुरू, 
 व संत सिप्रियस
रक्तसाक्षी 


 ✝️

पहिले वाचन : १ तिमथीला  ३:१-१

वाचक :पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 
 "महागुरू निर्दोष असावा. तसेच प्रसेवकही विश्वासाचे रहस्य शुद्ध विवेकभावाने जतन करणारे असावेत."

कोणी महागुरूचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन विश्वसनीय आहे. महागुरू निर्दोष, एकपत्नी, नेमस्त, समजूतदार, सभ्य, अतिथिप्रिय, निपुण शिक्षक असा असावा. तो मद्यपी आणि अत्याचारी नसावा, तर सौम्य, भांडण न करणारा आणि द्रव्यलोभ न धरणारा असावा. तो आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलांबाळांना भीडमर्यादेचे वळण लावून त्यांना ताब्यात ठेवणारा असा असावा. कारण ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील ? त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा, त्याची निंदा होऊ नये आणि त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीही चांगली साक्ष दिलेली असावी.

तसेच प्रसेवकही गंभीर असावेत. दुतोंडी, मद्यपानसक्त आणि अनीतीने पैसा मिळवणारे नसावेत, विश्वासाचे रहस्य शुद्ध विवेकभावाने जतन करणारे असावेत. त्यांचीही प्रथम परीक्षा घ्यावी आणि दोषरहित ठरल्यास त्यांनी प्रसेवकपण करावे. तसेच स्त्रिया गंभीर असाव्यात, चहाडखोर नसाव्यात, नेमस्त आणि सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्यात. प्रसेवक एकपत्नीव्रत असावेत, ते आपल्या मुलाबाळांची आणि घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावेत. कारण ज्यांनी प्रसेवकपण चांगले चालवले ते आपणांसाठी चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील श्रद्धेत दृढता संपादन करतात.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : 1 Timothy 3:1-13 

Beloved: The saying is trustworthy: If anyone aspires to the office of
bishop, he desires a noble task. Therefore a bishop must be above reproach, the husband of one wife, sober-minded, self-controlled, respectable, hospitable, able to teach, not a drunkard, not violent but gentle, not quarrelsome, not a lover of money. He must manage his own household well, with all dignity keeping his children submissive, for if someone does not know how to manage his own household, how will he care for God's church? He must not be a recent convert, or he may become puffed up with conceit and fall into the condemnation of the devil. Moreover, he must be well thought of by outsiders, so that he may not fall into disgrace, into a snare of the devil. Deacons likewise must be dignified, not double-tongued, not addicted to much wine, not greedy for dishonest gain. They must hold the mystery of the faith with a clear conscience. And let them also be tested first; then let them serve as deacons if they prove themselves blameless. Their wives likewise must be dignified, not slanderers, but sober-minded, faithful in all things. Let deacons each be the husband of one wife, managing their children and their own households well. For those who serve well as deacons gain a good standing for themselves and also great confidence in the faith that is in Christ Jesus.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १०१:१-३अब, ५, ६
प्रतिसाद : मी सरळ मनाने चालेन.

१ दया आणि न्याय ह्याविषयी मी गाईन. 
हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन. 
मी सुज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन. 
तू माझ्याजवळ केव्हा येशील ?

२ मी आपल्या घरी सरळ मनाने चालेन, 
नजरेसमोर कुठलीही अनुचित गोष्ट मी आणणार नाही.

३. आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चहाडी करणाऱ्याचा 
मी विध्वंस करीन. जो बढाईखोर 
आणि गर्विष्ठ मनाचा आहे 
त्याची मी गय करणार नाही.

४ देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावे 
म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. 
सात्त्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल.


Psalm 101:1-2ab, 2cd-3ab, 5, 6 

R  I will walk with blameless heart 

 I sing of merciful love and justice; 
I raise a psalm to you, O Lord.
I will ponder the way of the blameless. 
O when will you come to me? I

I will walk with blameless heart 
within my house;
I will not set before my eyes 
whatever is base. R 

Whoever slanders a neighbour in secreta
 I will bring to silence.
Proud eyes and haughty heart
I will never endure. 

My eyes are on the faithful of the land
,A that they may dwell with me...
The one who walks in the shall be my servant.R.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे, 
तू आम्हांला सत्यात समर्पित कर. 
 आलेलुया!

Acclamation: 
A great prophet has arisen among us, and God has visited his people

.
शुभवर्तमान  लूक  ७:११-१७
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "मुला, मी तुला सांगतो, ऊठ."

येशू नाईन नावाच्या गावाला गेला आणि त्याचे शिष्य आणि मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला तेव्हा पाहा, कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला आणि तो तिला म्हणाला, "रडू नको." मग जवळ जाऊन त्याने तिरडीला स्पर्श केला, तेव्हा तिरडी वाहणारे खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.” तेव्हा तो मेलेला माणूस उठून बसला आणि बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांना आश्चर्ययुक्त भय वाटले आणि ते देवाला गौरवीत म्हणाले, आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे! आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहुदियात आणि चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :Luke 7:11-17

At that time: Jesus went to a town called Nain, and his disciples and a great crowd went with him. As he drew near to the gate of the town, behold, a man who had died was being carried out, the only son of his mother, and she was a widow, and a considerable crowd from the town was with her. And when the Lord saw her, he had compassion on her and said to her, "Do not weep." Then he came up and touched the bier, and the bearers stood still. And he said, "Young man, I say to you, arise." And the dead man sat up and began to speak, and Jesus gave him to his mother. Fear seized them all, and they glorified God, saying, "A great prophet has arisen among us!" and "God has visited his people!" And this report about him spread through the whole of Judea and all the surrounding country.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
माणसापुढे जीवन आणि मरण, शाप आणि आशीर्वाद ठेवण्यात आलेले आहेत. जे त्याला हवे तेच त्याला दिले जाईल. तिमथी हा बिशप (एपिस्कोप) होता. संत पौलाने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आपल्या कळपाचा मेंढपाळ म्हणून नेमलेले होते. तसेच त्याच्या मंडळीत वडील (प्रेसबूतर म्हणजे याजक किंवा धर्मगुरू) आणि सेवक (डिकन) सुद्धा होते. हे सर्व आशीर्वाद त्यांना लाभलेले होते. मात्र ह्या आशीर्वादाचा पूर्ण मनाने स्वीकार करून त्याचा वापर कसा करायचा हे सर्वस्वी त्या त्या व्यक्तीवर अवलंबून होते. संत पॉल त्यांना काही मार्गदर्शनपर सूत्रे शिकवितो. त्यातील एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे श्रद्धेविषयी त्यांनी गंभीर असणे. शुभवर्तमानामध्ये येशू नाईनच्या विधवेच्या मुलाला जिवंत करतो. मृत्यूचा प्रसंग असताना येशू जीवनाची निवड करतो, आपले सामर्थ्य पणाला लावतो, त्या तरुण मुलाला नवजीवन देतो, त्याच्या विधवा आईचे सांत्वन करतो आणि लोकसमुदायाला चमत्काराची अनुभूती येऊ देतो.
मी माझ्या जीवनात सहसा कशाची निवड करतो? जीवनाची मरणाची? आशीर्वादाची की शापाची ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या करुणेचा स्पर्श करुन मला तुझी साक्ष देण्यास प्रेरणा  व सामर्थ्य दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या