Marathi Bible Reading | 24th week in ordinary Time| Monday 15th September 2025

सामान्यकाळातील २४ वा सप्ताह 

सोमवार  दिनांक १५ सप्टेंबर  २०२५

“बाई, पाहा, हा तुझा मुलगा." मग त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई" "Woman, behold, your son!" Then he said to the disciple, "Behold, your mother!" 


दुःखी माता मरिया

 ✝️ 
पवित्र आठवड्यामध्ये शुभशुक्रवारानंतर येणारा पवित्र शनिवार हा दुःखी मातेच्या सहवासात राहण्याचा दिवस म्हणून ख्रिस्तसभा पाळत असते. त्याप्रमाणे पुन्हा एकदा सप्टेंबरच्या महिन्यात ख्रिस्तसभा पवित्र मरियेच्या सात दुःखांचे स्मरण करीत असते.
येशूचे मंदिरात समर्पण करण्यात आले तेव्हा
 शिमोन संदेष्ट्याने केलेले भाकीत, 
मिसर देशात ३०० मैल चालत जाणे, 
येशूचे देवळात हरवणे, 
क्रुसाच्या भाराखाली वाकलेल्या प्रभू येशूची आपल्या दुःखी मातेशी भेट होणे, 
येशूला क्रुसावर खिळणे, 
येशूचे मृत शरीर क्रुसावरून काढून मरियेच्या हाती देणे 
आणि येशूला थडग्यात पुरणे हीच ती सात दुःखे होत.

प्रथम १६६८ साली फक्त सेव्हराईट संस्थेला हा सण साजरा करण्याची परवानगी देण्यात आली होती. पुढे पोप पायस सातवे हे हद्दपारीतून परतल्यानंतर इ. स. १८१४ साली त्यांनी हा सण संपूर्ण ख्रिस्तसभेचा अधिकृत सण म्हणून जाहीर केला.
प्रभू येशू शरीराने मरण पावला तेव्हा पवित्र मरिया मनाने त्याच्याशी मरण पावली. त्याने मानवजातीवरील अपार प्रेमापोटी हे मरण पत्करले; आपल्या पुत्रावरील अपार प्रेमापोटी पवित्र मरियेनेदेखील त्या मरणयातनांना मिठी मारली.: संत बर्नर्ड
 ह्या सर्व घटना मरियेचे हृदय हेलावून टाकणाऱ्या होत्या. मात्र मरियेचे हृदय देव पित्याच्या हृदयाशी व त्याच्या प्रेमाशी एकरुप झालेले होते.

पवित्र मरियेने अशा सर्व दुःखद प्रसंगाशी सामना करताना जगातील सर्व लोकांसाठी मध्यस्थीची भूमिका बजावली. जगातील दुःखी, कष्टी व भाराक्रांत असलेल्या सर्वांसाठी ती एक आदर्श माता बनली. कारण प्रभू येशूने आपल्या सर्वांना म्हटले, 'पहा ही तुझी आई'. आपल्या सर्व दुःखद प्रसंगात आपण आपल्या आईकडे जाऊ या आणि तिच्या गुणांचे अनुकरण करुन प्रार्थना करु या.

 ✝️

पहिले वाचन : इब्री  ५: ७-९
वाचक :इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
"तो आज्ञाधारकपणा शिकला आणि सार्वकालिक  तारणाचा झरा झाला."
मानवाला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ येशूने आपल्या देहावस्थेच्या दिवसात, मोठा आक्रोश करत आणि अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सदभक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले त्याद्वारे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा सार्वकालिक तारणाचा झरा झाला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Hebrews 5:7-9

In the days of his flesh, Jesus offered up prayers and supplications, with loud cries and tears, to him who was able to save him from death, and he was heard because of his reverence. Although he was a Son, he learned obedience through what he suffered. And being made perfect, he became the source of eternal salvation to all who obey him.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ३१ :२-३-६, १५-१६, २०

प्रतिसाद :  प्रभो, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर.

१) हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय घेतला आहे. 
मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. 
तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर, 
माझ्याकडे आपला कान लाव, 
मला सत्वर सोडव. तू माझा आश्रयदाता पहाड हो,

२)  माझा बचाव करणारा दुर्ग हो आणि माझे रक्षण कर, 
कारण तूच माझा आश्रयदाता पहाड आणि दुर्ग आहे. 
तुझ्या नावाच्या महिम्यासाठी मला मार्गदर्शन कर, माझा नेता हो.

३)माझ्यासाठी त्यांनी गुप्तपणे पसरलेल्या 
जाळ्यातून मला सोडव, 
कारण तूच मला आसरा देणारा दुर्ग आहेस... 
मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. 
हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा,
 तूच माझा उध्दार करशील.

४) हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे. 
मी म्हणतो, “तूच माझा देव आहेस. 
माझे बरेवाईट तुझ्याच हातात आहे. 
माझा पिच्छा पुरवणारे व माझे शत्रू, 
ह्यांच्या हातून मला सोडव."

५)  हे प्रभो, तुझे चांगुलपण किती थोर आहे. 
तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे, 
तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी
मनुष्यमात्रांदेखत तू ते सिध्द केले आहेस


Psalm  31:2-3a, 3bc-4, 5-6, 15-16, 20 

R. Save me, O Lord, in your merciful love.

In you, O Lord, I take refuge.
Let me never be put to shame. 
In your justice, set me free;
incline your ear to me,
and speedily rescue me. R

Be a rock of refuge for me,
a mighty stronghold to save me.
For you are my rock, my stronghold!
 Lead me, guide me,
for the sake of your name. R

Release me from the snare they have hidden, 
for you indeed are my refuge.
Into your hands I commend my spirit. 
You will redeem me, O Lord,
 O faithful God. R 

But as for me, I trust in you, O Lord;
 I say, "You are my God.
My lot is in your hands, deliver me 
 from the hands of my enemies 
 and those who pursue me."  R.

How great is the goodness, Lord, 
 that you keep for those who fear you, 
that show to those who trust you 
in the sight of the children of men.R.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
पवित्र मरिया धन्य आहे, तिने प्रभुख्रिस्ताच्या 
वधस्तंभाखाली उभी राहून रक्तसाक्षीत्वाचा बहुमान मिळवला
 आलेलुया!

Acclamation: 
Blessed are you, O Virgin Mary: without dying you won the martyr's crown beneath the Cross of the Lord.

.


शुभवर्तमान योहान    १९:२५-२७
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
   "काळिज झाले विदीर्ण तिचे पाहुनिया दारुण्य येशूचे गळताना रुधिराची धार."
येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया माग्दालेना ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा." मग त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई" आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
प्रभूचे हे शुभवर्तमान

                        पर्यायी शुभवर्तमान

लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन २ : ३३-३५
"तुझ्या स्वतःच्या हृदयातून तरवार भोसकून पार जाईल."
त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचे वडील आणि त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याची आई मारिया हिला म्हटले,
"पाहा, पुष्कळ लोकांच्या अंत:करणातील विचार उघडकीस यावे, ह्यासाठी इस्राएलमध्ये अनेकांचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुध्द लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे..
(आणि पाहा, तुझ्या स्वतःच्या हृदयातून तरवार भोसकून पार जाईल.)
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :John 19:25-27

Standing by the cross of Jesus were his mother, and his mother's sister, Mary the wife of Clopas, and Mary Magdalene. When Jesus saw his mother and the disciple whom he loved standing nearby, he said to his mother, "Woman, behold, your son!" Then he said to the disciple, "Behold, your mother!" And from that hour the disciple took her to his own home.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
गेल्या आठवड्यातच आपण मरियेचा जन्मदिन साजरा केला आणि ताबडतोब दुःखी मातेचा सण काय साजरा केला जातो असा प्रश्न आपल्याला पडतो. त्याचे उत्तर कालच्या सणात दडलेले आहे. ज्या पवित्र क्रुसाचा सण आपण काल साजरा केला त्याच क्रुसाच्या पायथ्याशी पवित्र मरिया निश्चलपणे उभी राहून त्याच्या दुःखत सहभागी झालेली होती. संत बर्नार्ड म्हणतात, खिस्त शरीराने मरण पावला तेव्हा मरियादेखील त्याच्या दुःखसहनात मनाने सहभागी झाली की नाही? आतापर्यंत कोणी केले नसेल असे प्रेम खिस्ताने मानवजातीवर केले आणि त्यासाठी अपार दुःख भोगिले. त्याच्यानंतर जगावर जर कोणी तितकीच प्रीती केली असेल तर ती त्याच्या मातेने ! मावलीने केवळ कालवारीच्या टेकडीवर येशूच्या दुःखात सहभागी होण्याची कामगिरी पार पाडली नाही तर त्याच्या जन्मापासून सात दुःखाची तरवार तिच्या हृदयातून जात होती. संदेष्टा शिमोनने तसे भाकीत केलेले होते. त्यानुसार हेरोदाच्या तरवारीपासून बाळाला वाचविण्यासाठी ती योसेफासह इजिप्त देशात पळून जाते. बाळ देवळात हरवतो तेव्हा तिच्या काळजाचा ठोका चुकतो. खांद्यावर क्रूस घेतलेला पुत्र पाहताच तिच्या काळजात कालवाकालव होते. त्याच्या हातापायातून खिळे जात असताना तिच्या हृदयातून भाला आरपार गेला. त्याला थडग्यात ठेवताच तिच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली.

मरियेच्या दुःखसहनातून प्रेरणा घेऊन मी माझी दुःखे श्रद्धेने पेलत आहे का ?
प्रार्थना : हे पवित्र मरिये, आमची आई, धैर्याने आणि विश्वासाने जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे व आम्हासाठी तुझ्या पुत्रापाशी सर्वदा विनंती कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या