सामान्यकाळातील २४ वा सप्ताह
बुधवार दिनांक १७ सप्टेंबर २०२५
पाहा, हा खादाड आणि दारूडा, जकातदारांचा आणि पाप्यांचा मित्र !
'Look at him! A glutton and a drunkard, a friend of tax collectors and sinners!"
संत रॉबर्ट बेलार्मीन
महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१५४२ - १६२१)
चिंतन : परोपकार ही अशी गोष्ट आहे की जिच्याशिवाय कुणाचे तारण होऊ शकत नाही आणि जिच्यामुळे कुणाचा नाश होऊ शकत नाही.
- संत रॉबर्ट बेलामन
प्रभू येशू आजसुध्दा आपल्या प्रत्येकाला बोलावित आहे. त्याचा गुणकारी स्पर्श देण्यासाठी प्रभू तयार आहे. आपण कितीही पापी असलो तरी क्षमा करण्यास प्रभू तयार आहे. आपल्या शारीरिक व मानसिक आजारात धीर | देण्यासाठी प्रभू आपल्या सर्वांच्या घरात, जीवनात येऊ इच्छित आहे. प्रभू येशू | सर्वांसाठी तारणारा बनून नवजीवनाचा मार्ग दाखविणारा व सांभाळ करणारा प्रभू । आहे. विश्वासाने आणि दृढ निश्चयाने प्रभूला आपला स्वामी म्हणून स्वीकारू या. । | त्याच्यापुढे शरण येऊन त्याला आपले सर्वस्व समर्पित करू या.
✝️
पहिले वाचन : १ तिमथीला ३:१४-१६
वाचक :पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे."
तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरून हे तुला लिहिले आहे, तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ आणि पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे. सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे:
तो देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला. त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : 1 Timothy 3:14-16
Beloved: I hope to come to you soon, but I am writing these things to you so that, if I delay, you may know how one ought to behave in the household of God, which is the church of the living God, a pillar and buttress of the truth. Great indeed, we confess, is the mystery of godliness: He was manifested in the flesh, vindicated by the Spirit, seen by angels, proclaimed among the nations, believed on in the world, taken up in glory.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १११:१- ६
प्रतिसाद : परमेश्वराची कृत्ये थोर आहेत,
१ परमेश्वराचे स्तवन करा,
सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत
मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन,
परमेश्वराची कृत्ये थोर आहेत,
ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात.
२ त्याची कृती महान आणि गौरवशाली आहे
त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते.
आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे,
परमेश्वर दयाळू आणि कनवाळू आहे.
३. त्याने आपले भय धरणाऱ्यांना अन्न दिले आहे,
तो आपला करार सदा स्मरतो.
त्याने आपल्या लोकांना राष्ट्रे वतनादाखल देऊन
आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे.
Psalm 111:1b-2, 3-4, 5-6
R Great are the works of the Lord.
I will praise the Lord with all my heart,
in the meeting of the just and the assembly.
Great are the works of the Lord,
to be pondered by all who delight in them. R
Majestic and glorious his work;
his justice stands firm forever.
He has given us a memorial of his wonders.
The Lord is gracious and merciful. R
He gives food to those who fear him:
keeps his covenant ever in mind.
His mighty works he has shown to his people
by giving them the heritage of nations. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंत:करण प्रफुल्लित कर.
आलेलुया!
Acclamation:
A great prophet has arisen among us, and God has visited his people
.
शुभवर्तमान लूक ७ : ३१-३५
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचला नाहीत, आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही रडला नाहीत."
येशू लोकसमुदायाला म्हणाला, ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत ? जी मुले बाजारात बसून एकमेकांना हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत. ती म्हणतात,“आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचले नाहीत, आम्ही आक्रोश केला, तरी तुम्ही रडला नाहीत.
बाप्तिस्मा करणारा योहान भाकरी खात आला नाही की, द्राक्षरस पीत आला नाही आणि तुम्ही म्हणता, त्याला भूत लागले आहे. मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड आणि दारूडा, जकातदारांचा आणि पाप्यांचा मित्र ! परंतु ज्ञान आपल्या सर्व संततीच्या योगे न्यायी ठरते."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो
Gospel Reading :Luke 7:31-35
At that time: Jesus said, "To what then shall I compare the people of this generation, and what are they like? They are like children sitting in the market-place and calling to one another, 'We played the flute for you, and you did not dance; we sang a dirge, and you did not weep. For John the Baptist has come eating no bread and drinking no wine. and you say, 'He has a demon. The Son of Man has come eating and drinking, and you say, 'Look at him! A glutton and a drunkard, a friend of tax collectors and sinners!" Yet wisdom is justified by all her children."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
मानवी जीवन जगत असताना माणसाला जीवनात योग्य ती भूमिका घ्यावी लागते, त्यासाठी योग्य त्या गोष्टींची निवड करावी लागते. संत पॉलने येशूविषयी अगदी स्पष्ट भूमिका घेतलेली होती. त्यामुळेच तो तीमथ्याला सुभक्तीचे रहस्य अगदी पाच-सहा वाक्यात सांगू शकलाः येशू देहाने प्रकट झाला (देहधारण), तो आत्म्याने नीतिमान ठरला (मोहांवर विजय), तो देवदूतांच्या दृष्टीस पडला (देवदूत त्याची सेवा करीत होते), राष्ट्रांत त्याची घोषणा करण्यात आली (प्रेषितांचे कार्य), जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला (चमत्कार) तो गौरवात वर घेतला गेला (स्वर्गारोहण). दुर्दैवाने येशूच्या काळातील पिढीने त्याच्याविषयी स्पष्ट भूमिका घेतलेली नव्हती हयाविषयी खुद्द येशू स्वतः खंत व्यक्त करतो. निरासक्त वृत्तीच्या योहानाला भूत लागले आहे अशी लोकांनी त्याच्याविषयी समजूत करून घेतली. सर्वांशी मिळून मिसळून वागणारी येशूला खादाड आणि दारूबाज अशी नावे ठेवण्यात आली.
देवाधर्माविषयी आणि श्रध्दामय जीवनाविषयी माझी भूमिका स्पष्ट आहे का? मी अजून कोणकोणत्या बाबतीत स्पष्ट भूमिका घ्यायला हवी ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्ही अपात्र असताना दाखील तू आम्हाला अनेक दानांनी भरतोस, इतरांच्या गरजा भागविण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या