सामान्यकाळातील २४ वा सप्ताह
शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५
चांगल्या मातीत पडलेले हे आहे की, ते वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंत:करणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.
the good soil, they are those who, hearing the word, hold it fast in an honest and good heart, and bear fruit with patience.
संत अँण्ड्रयू कीम, पॉल काँग आणि सहकारी
कोरीयाचे रक्तसाक्षी (१८३९, १८४६, १८६२, १८६७)
इ. स. १८८६ साली कोरियामध्ये धर्मप्रसार बंदी उठविण्यात आली आणि ख्रिस्ती धर्माचा अधिकृतरित्या प्रसार होण्यास सुरुवात झाली. परंतु तोपर्यंतच्या १०० वर्षात (१७८४-१८८६) १०,००० लोकांना रक्तसाक्षित्वाचे मरण आले. त्यात अकरा धर्मगुरू, ९२ प्रापंचिक, पंधरा कुमारिका किंवा व्रतस्थ भगिनी आणि अवघ्या १३ वर्षीय पीटर-यू- ताय चोल नावाचे बालक ह्यांचा समावेश होता.
अॅण्ड्रयू कीम हे पहिले कोरियन धर्मगुरू होते. त्यांनी ख्रिस्तावरील प्रेमापोटीआणि लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी कोरियामध्ये सुवार्ता प्रसार कार्यास प्रारंभ केला. परंतु दुर्दैवाने त्यांच्या गुरुदीक्षेच्या दिवशी त्यांच्या हाताला लावण्यात आलेले पवित्र तेल ओले असतानाच एक वर्ष व एक महिन्यानेच त्यांना रक्तसाक्षित्वाचा मुकूट घालण्यात आला. त्यावेळी त्यांचे वय अवघे २६ वर्षांचे होते.
पॉल कॉंग ह्यांनी कोरियामध्ये सुवार्ता प्रसारानिमित्ते प्रवेश करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी पेकिंग शहराला खूप भेटी दिल्या. इ. स. १८०१ च्या छळवादानंतर कोरियामध्ये ख्रिस्ती लोकांचे नेतृत्व करणारे धर्मगुरूच नव्हते. शेवटी पॉल काँगच्या प्रयत्नांना यश आले आणि कोरियामध्ये एक महागुरू व काही धर्मगुरू ह्यांना सुवार्ता प्रसार करण्याची संधी मिळाली.
आज कोरियामध्ये जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्या श्रद्धेचा पाया ॲण्ड्रयू कीम, पॉल कॉंग आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घातला. त्यामुळे १४ मे १९८४ साली पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी त्यांना संतपद बहाल केले.
✝️
पहिले वाचन :तिमथी ६: १३ -१६
वाचक :पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू ही आज्ञा निर्मळ ठेव."
सर्व प्राणिमात्रांला जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पोंती पिलातासमक्ष स्वतःविषयी निर्भय साक्ष दिली, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू ही आज्ञा निर्मळ तू ठेव. जो धन्य आणि एकच अधिपती, राजाचा राजा आणि प्रभूचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही, तो ते त्याचे प्रगट होणे यथाकाळी दाखवील. त्याला सन्मान आणि पराक्रम युगानुयुगे आहे. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : 1 Timothy 6:13-16
Beloved: I charge you in the presence of God, who gives life to all things and of Christ Jesus, who in his testimony before Pontius Pilate made the good confession, to keep the commandment unstained and free from reproach until the appearing of our Lord Jesus Christ, which he will display at the proper time - he who is the blessed and only Sovereign, the King of kings and Lord of lords, who alone has immortality, who dwells in unapproachable light, whom no one has ever seen or can see, To him be honour and eternal dominion. Amen.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १०० :१-५
प्रतिसाद :आनंदगीत गात परमेश्वरासमोर या.
१) अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो,
परमेश्वराचा जयजयकार करा.
हर्षाने परमेश्वराची सेवा करा.
आनंदगीत गात त्याच्यापुढे या.
२) परमेश्वर हाच देव आहे
याची जाणीव ठेवा.
त्यानेच आम्हांला उत्पन्न केले,
आम्ही त्याचेच आहोत,
आम्ही त्याची प्रजा,
त्याच्या कुरणातील कळप आहो.
३) त्याचे उपकारस्मरण करत त्याच्या दारात,
स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करा,
त्याचे उपकारस्मरण करा,
त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
४) खरोखर, परमेश्वर चांगला आहे,
त्याची दया सनातन आहे.
त्याची सत्यता पिढ्यान्पिढ्या टिकते.
Psalm 100:1-2, 3, 4, 5
R. Come before the Lord, singing for joy.
Cry out with joy to the Lord, all the earth.
Serve the Lord with gladness.
Come before him, singing for joy. R.
Know that he, the Lord, is God.
He made us; we belong to him.
We are his people, the sheep of his flock. R
Enter his gates with thanksgiving
and his courts with songs of praise.
Give thanks to him, and bless his name. R
Indeed, how good is the Lord,
eternal his merciful love.
He is faithful from age to age.R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना
ज्योतीसारखे जगात दिसता
आलेलुया!
Acclamation:
Blessed are those who, hearing the word, hold it fast in an honest and good heart, and bear fruit with patience.
शुभवर्तमान लूक ८:४-१५
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"वचन ऐकून जे सालस आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. ते चांगल्या मातीत पडलेले बी आहे."
जेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला आणि गावोगावचेही लोक येशूजवळ आले तेव्हा तो दाखला देऊन म्हणाला : “पेरणारा आपले बी पेरायला निघाला आणि तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले, ते तुडवले गेले आणि आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले, ते उगवून शंभरपट पीक आले. असे सांगून तो मोठ्याने म्हणाला, ज्याला ऐकायला कान आहेत, तो ऐको."
तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, ह्या दाखल्याचा अर्थ काय? येशू म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हांला दिली आहे, परंतु इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत, कारण त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये आणि ऐकत असता त्यांना समजू नये." हा दाखला असा आहे : बी हे देवाचे वचन आहे. वाटेवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये आणि त्यांना तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले हे आहे की, ते ऐकतात, वचन आनंदाने ग्रहण करतात, पण त्यांना मूळ नसते, ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात आणि परीक्षेच्या वेळी गळून पडतात. काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहे की, ते ऐकतात आणि संसाराच्या चिंता, धन आणि विषयसुख ह्यात आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते आणि ते पक्व फळ देत नाहीत. चांगल्या मातीत पडलेले हे आहे की, ते वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंत:करणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Luke 8:4-15
At that time: When a great crowd was gathering and people from town after town came to Jesus, he said in a parable, "A sower went out to sow his seed. And as he sowed, some fell along the path and was trampled underfoot, and the birds of the air devoured it. And some fell on the rock, and as it grew up, it withered away, because it had no moisture. And some fell among thorns, and the thorns grew up with it and choked it. And some fell into good soil and grew and yielded a hundredfold." As he said these things, he called out, "He who has ears to hear, let him hear." And when his disciples asked him what this parable meant, he said, "To you it has been given to know the secrets of the kingdom of God, but for others they are in parables, so that 'seeing they may not see, and hearing they may not understand'. Now the parable is this: The seed is the word of God. The ones along the path are those who have heard; then the devil comes and takes away the word from their hearts, so that they may believe and be saved. And the ones on the rock are those who, when they hear the word, receive it with joy. But these have no root; they believe for a while, and in time of testing fall away. And as for what fell among the thorns, they are those who hear, but as they go on their way they are choked by the cares and riches and pleasures of life, and their fruit does not mature. As for that in the good soil, they are those who, hearing the word, hold it fast in an honest and good heart, and bear fruit with patience.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
संत पॉलच्या परिवर्तनानंतर त्याने बऱ्याच ठिकाणी जाऊन प्रभूची सुवार्ता पसरविली. काही ठिकाणी त्याने ख्रिस्तमंडळया स्थापन केल्या तर काही ठिकाणी त्याने त्या ख्रिस्तमंडळयांवर प्रमुखही नेमले. ह्या सर्व ठिकाणी संत पॉल देवशब्दाचे बीज पेरत राहिला. काही ठिकाणी त्याच्या शत्रूनी लोकांच्या मनात गोंधळ निर्माण केला. काहींनी त्याच्या प्रेषितपदावरच संशयव्यक्त केला तर काही लोकांनी त्याच्या भूतकाळावरून त्याला छेडले. त्यामुळे जरी पुष्कळ ठिकाणी त्याने पेरलेल्या बियांना कोठे तीसपट, कोठे साठपट तर कोठे शंभर पट पीक जरी आलेले असले तरी त्या पिकाची निगा राखण्यासाठी संत पॉल डोळयात तेल घालून मार्गदर्शन करीत राहिला. येशूच्या आगमनापर्यन्त आपण हे करीतच रहावे असा सल्ला त्याने तीमथ्याला दिला. शुभवर्तमानात येशू पेरणाऱ्याचा दाखला आणि त्याचे स्पष्टीकरण देतो. जमीन कशीही असली तरी परमेश्वर पिता पेरतच राहतो. माणूस फळाची अपेक्षा ठेवून पेरणी करीत असतो मग ती वस्तूंची असो, सत्कृत्यांची असो, प्रेमाची असो की दानधर्माची असो. निरपेक्ष भावनेने पेरतच रहावे.
कोणतेही कृत्य करण्यामागे माझा त्यामागे माझा कोणता हेतू असतो? माझी त्यापासून कोणती अपेक्षा असते ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या स्वर्गीय वचनांवर मनन-चिंतन करुन स्वर्गीय रहस्य जाणण्यास व फलदायी जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या