Marathi Bible Reading | Wednesday 25th September 2024 | 25th Week in Ordinary Time

सामान्य काळातील पंचविसावा   सप्ताह 

बुधवार २५  सप्टेंबर  २०२४

"येशूने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी आणि रोग्यांना बरे करण्यास पाठवले."

he gave them power and authority over all devils, and to cure diseases. 




संत सेओलफ्रिड
मठाधिपती, वर्तनसाक्षी (६४२-७१६) 

देवराज्य म्हणजे प्रेम, शांति, परोपरकार, दया, समेट सर्व प्रकारच्या दुःखातून व अनिष्टतेपासून मुक्तता, म्हणजेच आनंदाचे राज्य. प्रभू येशू  ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना देवराज्याची घोषणा करावयास पाठविले. प्रभूच्या  शिष्यांनी देवराज्य साक्षात प्रभूच्या सहवासात असताना अनुभवले, त्याची स्थापना आपल्या अंतःकरणात केली. विश्वास, नम्रता, सहनशीलता, रोपरकार व आज्ञाधारकपणा हे गुण शिष्यांनी आत्मसात केले. आपल्या
प्रत्येकाला प्रभू आज देवराज्याची घोषणा करावयास बोलवित आहे.
ख्रिस्ती स्नान संस्कार स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तिला आज पाचारण करण्यात आले आहे. प्रत्येक ख्रिस्ती माणूस प्रभू येशूच्या सुवार्तेचा साक्षीदार  बनावे ही प्रभूची हाक आहे. आपल्याला प्रभू पवित्र आत्म्याचे सामर्थ्य व कृपा  देवून रंजले-गांजलेल्यांना आजार मुक्ती आणि शांति देण्यासाठी बोलवित आहे.| आपण विश्वासाने त्याची आज्ञा पाळावी आणि ह्या जगात देवाचे राज्य प्रस्थापित  करण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करू या.


पहिले वाचन : : नीतिसूत्रे  ३०:५-९
वाचन :नीतिसूत्रे या पुस्तकातून घेतलेले वाचन
 
"गरिबी किंवा श्रीमंती मला देऊ नकोस, मला आवश्यक तेवढे अन्न खावयाला दे." 
देवाचा प्रत्येक शब्द खरा होतो, त्याचा आश्रय घेणाऱ्यांची तो ढाल आहे.
त्याच्या वचनात तू काही भर घालू नकोस, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील. मी तुझ्याजवळ दोन वर मागतो. मी मरण्यापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नकोस. व्यर्थ अभिमान आणि लबाडी माझ्यापासून दूर राख.गरिबी किंवा श्रीमंती मला देऊ नकोस, मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे.माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन आणि परमेश्वर कोण आहे, असे म्हणेन,मी गरीब राहिल्यास कदाचित चोरी करीन आणि माझ्या देवाच्या नावाची निंदा करीन.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Proverbs 30: 5-9
 Every word of God is fire tried: he is a buckler to them that hope in him. Add not any thing to his words, lest thou be reproved, and found a liar: Two things I have asked of thee, deny them not to me before I die. Remove far from me vanity, and lying words. Give me neither beggary, nor riches: give me only the necessaries of life: Lest perhaps being filled, I should be tempted to deny, and say: Who is the Lord? or being compelled by poverty, I should steal, and forswear the name of my God.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ११९:२९.७२,८९.१०१,१०४.१६३

प्रतिसाद :  तुझे नियमशास्त्र मला शिकव.

१ असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर 
आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव. 
सोन्यारुप्याच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा 
तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.

२ हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे. 
तुझे वचन पाळावे म्हणून
मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो.

३ तुझ्या आदेशांमुळे सुबुद्धी प्राप्त होते, 
म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. 
मी असत्याचा द्वेष करतो आणि त्याचा वीट मानतो, 
परंतु तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे.

Psalms 1119: 29, 72, 89, 101, 104, 163
R.  Your word, O Lord, is a lamp for my feet.

 Remove from me the way of iniquity:
 and out of thy law have mercy on me.
R. Your word, O Lord, is a lamp for my feet.

The law of thy mouth is good to me, 
above thousands of gold and silver.
R. Your word, O Lord, is a lamp for my feet.

For ever, O Lord, thy word standeth firm in heaven.
R. Your word, O Lord, is a lamp for my feet.

 I have restrained my feet from every evil way: 
that I may keep thy words. By thy commandments I have had understanding: therefore have I hated every way of iniquity.
R. Your word, O Lord, is a lamp for my feet.

I have hated and abhorred iniquity; 
but I have loved thy law.
R. Your word, O Lord, is a lamp for my feet.

जयघोष                                             

आलेलुया, आलेलुया! 
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. 
 आलेलुया!

Acclamation: 
  Alleluia, alleluia.
 The Kingdom of God is at hand; repent and believe in the Gospel.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक ९:१-६
वाचक :   लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
  "येशूने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी आणि रोग्यांना बरे करण्यास पाठवले."

येशूने बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भुते काढण्याचे आणि रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी आणि रोग्यांना बरे करण्यासाठी पाठवले. त्याने त्यांना सांगितले, प्रवासासाठी काही घेऊ नका, काठी, झोळी, भाकरी किंवा पैसा घेऊ नका, अंगरखे दोन दोन घेऊ नका. ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा आणि तेथूनच निघून जा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून त्या गावातून निघतेवेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका. मग ते निघून सर्वत्र सुर्वाता सांगत आणि रोगी बरे करत गावोगावी फिरू लागले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 9: 1-6
Then calling together the twelve apostles, he gave them power and authority over all devils, and to cure diseases. And he sent them to preach the kingdom of God, and to heal the sick. And he said to them: Take nothing for your journey; neither staff, nor scrip, nor bread, nor money; neither have two coats. And whatsoever house you shall enter into, abide there, and depart not from thence. And whosoever will not receive you, when ye go out of that city, shake off even the dust of your feet, for a testimony against them. And going out, they went about through the towns, preaching the gospel, and healing everywhere.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन :
प्रभूच्या शिष्यांनी प्रेषितीय कार्य करताना उपदेश करणे (सुवार्ता प्रचार) व रोग्यांना बरे करणे या दोन प्राथमिक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करावे. सामर्थ्य व अधिकार याशिवाय येशू आपल्या शिष्यांना प्रेषितकार्याविषयी एक कार्य प्रणालीही देतो. ज्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टीचा संदर्भ देण्यात येतो. १) वस्तूपासून निरासक्त जीवन जगणे  प्रवासासाठी काही घेऊ नका. साधेपणाने राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे लोक हे या कामातून पैसा मिळवतात असा आरोप करणार नाही. २) सर्व व्यक्तीपासून निरासक्त जीवन जगणे : तेथेच राहा आणि तेथूनच निघून जा. चांगला पाहुणचार कोठे मिळेल ते पाहात घरे शोधायची नाहीत. ३) सर्व घटनांपासून निरासक्त जीवन  जगणेः जेथे तुमचा स्वीकार होत नाही. तेथून निघताना तुमच्या पायाची धुळदेखील झटकून टाका. त्या लोकांनी खऱ्या इस्रायलला तोडून टाकल्याचे ते चिन्ह होते. प्रभूच्या शिष्यांनी मानवी सामर्थ्याऐवजी दैवी सामर्थ्यावर (देवाच्या औदार्यावर) अवलंबून राहावे.

प्रार्थना हे प्रभू येशू, देवराज्याच्या सुवार्तेचे साक्षीदार बनवण्यास व तुझा पावन  स्पर्श व अनुभव इतरांना देण्यासाठी आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या