Marathi Bible Reading | Monday 23rd September 2024 | 25th Week in Ordinary Time

सामान्य काळातील पंचविसावा   सप्ताह 

सोमवार २३ सप्टेंबर  २०२४

आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. 

For there is not any thing secret that shall not be made manifest, nor hidden


 पीएटरेलचीनचे संत  फादर पीओ 

  

पहिले वाचन : : नीतिसूत्रे ३:२७-३४
वाचन :नीतिसूत्रे या पुस्तकातून घेतलेले वाचन
कुटील माणसाचा परमेश्वराला वीट आहे.

माझ्या मुला, एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास माघार घेऊ नकोस.
एखादी वस्तू तुझ्याजवळ असता आपल्या शेजाऱ्याला असे सांगू नकोस की, तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे ती मी तुला देईन. तुझा शेजारी तुझ्याजवळ निर्भय राहतो असे पाहून त्याचे वाईट योजू नकोस. एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसता त्याच्याशी उगीच भांडण करू नकोस.
जुलूम करणाऱ्याचा हेवा करू नकोस आणि त्याच्या कोणत्याही मार्गाने जाऊ नकोस. कारण परमेश्वराला कुटील माणसाचा वीट आहे, पण सरळांबरोबर त्याचे सख्य आहे. परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो, पण सज्जनांच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. उपहास करणाऱ्यांचा तो अवश्य उपहास करतो, पण दीनजनांवर तो अनुग्रह करतो
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Proverbs 3: 27-34
Do not withhold him from doing good, who is able: if thou art able, do good thyself also. Say not to thy friend: Go, and come again: and tomorrow I will give to thee: when thou canst give at present. Practise not evil against thy friend, when he hath confidence in thee. Strive not against a man without cause, when he hath done thee no evil. Envy not the unjust man, and do not follow his ways: For every mocker is an abomination to the Lord, and his communication is with the simple. Want is from the Lord in the house of the wicked: but the habitations of the just shall be blessed. He shall scorn the scorners, and to the meek he will give grace
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र    १५:१- ५
प्रतिसाद : हे परमेश्वरा, जो नीतीने वागतो तो तुझ्या 
पवित्र पर्वतावर वस्ती करील.

१) हे परमेश्वर, तुझ्या पवित्र पर्वतावर कोण
 वस्ती करील ? जो सात्त्विकतेने चालतो 
आणिनीतीने वागतो तो, 
जो मनापासून सत्य बोलतो तो, 
जो आपल्या जिभेने चुगली करत नाही तो.

२ )तो आपल्या बंधूंचे वाईट करत नाही, 
तो आपल्या शेजाऱ्यांची निंदा करत नाही, 
तो अधर्माला तुच्छ लेखतो, 
तो परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो.

३) तो आपण वाहिलेल्या शपथेने स्वत:चे 
अहित झाले तरी ती मोडत नाही, 
आपला पैसा व्याजी लावत नाही, 
तो निरपराध्यांची हानी करण्याकरिता 
लाच घेत नाही, जो असा वागतो तो
 कधी ढळणार नाही.

: Psalms 15: 2-3a, 3bc-4ab, 5
R.  The just one shall live on your holy mountain, O Lord.

He that walketh without blemish, 
and worketh justice:
He that speaketh truth in his heart, 
who hath not used deceit in his tongue.

R. The just one shall live on your holy mountain, O Lord.

Nor hath done evil to his neighbour: 
nor taken up a reproach against his neighbours.
4ab In his sight the malignant is brought to nothing:
 but he glorifieth them that fear the Lord.

R. The just one shall live on your holy mountain, O Lord.

He that hath not put out his money to usury, 
nor taken bribes against the innocent: 
He that doth these things shall not be moved for ever.

R. The just one shall live on your holy mountain, O Lord.

जयघोष                                             

आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, 
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
 आलेलुया!

Acclamation: 
  Alleluia, alleluia.
Let your light shine before others, that they may see your good deeds and glorify your heavenly Father.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक ८:१६-१८
वाचक :   लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून दिवा दिवठणीवर ठेवतात. "

येशू लोकसमुदायाला म्हणाला, कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा, ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 8: 16-18
Now no man lighting a candle covereth it with a vessel, or putteth it under a bed; but setteth it upon a candlestick, that they who come in may see the light. For there is not any thing secret that shall not be made manifest, nor hidden, that shall not be known and come abroad. Take heed therefore how you hear. For whosoever hath, to him shall be given: and whosoever hath not, that also which he thinketh he hath, shall be taken away from him.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन :
देवराज्याचे ज्ञान (शिकवण) ही केवळ निवडक लोकांसाठीच राखून ठेवली आहे असे नाही. ती सर्वांसाठी उपलब्ध करून द्यायला हवी. हे ज्ञान सर्वांना उघडपणे घोषित करून घ्यायला हवे. कारण तीच खरीखुरी सुवार्ता आहे. सुवार्ता केवळ कानांनी ऐकून घेऊन पुरेसे नाही तर त्यांचा अनुभव घेणे महत्वाचे आहे. दिव्याचा उजेड सर्वांना मिळावा म्हणून तो लावतात त्याचप्रमाणे येशूच्या शिष्यांनी त्यांना मिळालेला प्रकाश इतरांना द्यायला हवा. तो स्वतःसाठी ठेवू नये. दुसरी महत्वाची शिकवणूक अशी की, येशूची शिकवणूक जे स्वीकारतील ते येशूच्या ज्ञानात परिपूर्ण होतील. मात्र जे नाकारतील त्यांच्याकडे जे काही असेल ते देखील गमावून बसतील.

प्रार्थना  हे प्रभू येशू, उदार अंतःकरणाने आम्ही आमच्या कलागुणांचा वापर करून तुझी व गरजवंतांची सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा व बळ दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या