संत ल्यूसी ही सिसिली देशातील सायराकूस प्रांताची आश्रयदाती संत आहे. डोळे येणे, घशाचे विकार, रक्तस्त्राव आणि संसर्गजन्य रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी तिचा धावा केला जातो.
"ज्यांची हृदये शुद्ध आहेत तेच खऱ्या अर्थाने पवित्र आत्म्याचे मंदिर आहे". -संत ल्यूसी
"मी पाण्याने पाण्याने बाप्तिस्मा करतो ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुम्हांमध्ये उभा आहे"
पवित्र मरियेच्या आगमनाने अलीशीबेच्या उदरातील बालकाने आनंदाने उडी मारली होती. तेव्हापासूनच योहान बाप्तिस्ता पवित्र आत्म्याने जणू अभिषिक्त झाला होता. त्याच्या पवित्र आत्म्याठायी अभिषिक्तपणाचे वर्णन शेकडो वर्षापूर्वी यशया संदेष्ट्याने सांगितले होते. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या पुत्राचे प्रकटीकरण अलीशीबेला झाल्यानंतर धन्य कुमारी मरियेने गायीलेले स्तोत्र म्हणजेच आजच्या पहिल्या वाचनातील शब्द, 'मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठायी माझ्या जीव उल्हासतो.'
ख्रिस्ती व्यक्तिला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो जगाचा प्रकाश आहे ह्याची साक्ष जगाला द्यायची आहे. अंत:करणापासून प्रभूला स्वीकारण्यास व त्याची साक्ष देण्यास आपण पात्र बनावेत म्हणून अंतर्मुख बनू या.
पहिले वाचन : यशया ६१:१-२,१०-११
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी परमेशराठायी अत्यंत हर्ष पावतो."
प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना शुभवर्तमान सांगण्यासाठी परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्नहदयी जनाना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता आणि बंदिवानांना सुटका जाहीर करावी, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष आणि आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा म्हणून त्याने मला पाठवले आहे.
मी परमेश्वराच्याठायी अत्यंत हर्ष पावतो , माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेलापागोटे लेवून स्वत:ला याजकासारखा मंडित करतो आणि नवरी जशी अलंकारांनी स्वत:ला विभूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली ओह. मला धार्मिकतेच्या झग्याने सजवले आहे, कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवितो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रादेखत धार्मिकता आणि कीर्ती अंकुरित करील.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र लूक १:४६-५०,५३-५४
प्रतिसाद : देवाच्या ठायी माझा जीव उल्हासला आहे.
१) माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे,कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.
२) कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे.जे त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यान्पिढ्या आहे.
३) त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानांना रिकामे लावून दिले आहे. आपली दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला सहाय्य केले आहे.
दुसरे वाचन : १ थेस्सलनीकाकरांस ५:१६-२४
वाचक : पौलचे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन.
प्रिय जनहो, सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. सर्व स्थितीत उपकारस्तुती करा. कारण तुम्हांविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका. सर्व गोष्टीची पारख करा. बऱ्याला चिकटून राहा. वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा.
शांतीचा देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव आणि शरीर ही निर्दोष राखली जावोत. तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे. तो हे करीलच.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे.
आलेलूया !
शुभवर्तमान
योहान १:६-८.१९-२८
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला. त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला. ह्यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला आहे.
पुढे यहुद्यांनी येरुशलेमहून याजक आणि लेवी ह्यांना योहानला 'आपण कोण आहा' असे विचारावयास पाठवले तेव्हा त्याची साक्ष हीच आहे. त्याने कबूल केले, नाकारले नाही. 'मी ख्रिस्त नाही' असे त्याने कबूल केले. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, "तर मग आपण कोण आहा ? एलिया आहा काय?" तो म्हणाला "मी नाही" "आपण तो संदेष्टा आहा काय?" त्यावर त्याने "नाही" असे उत्तर दिले. ह्यावरून ते त्याला म्हणाले, "ज्यांनी आम्हांला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहा हे सांगा स्वत:विषयी आपले काय म्हणणे आहे ?" तो म्हणाला, "यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, "परमेश्वराचा मार्ग नीट करा असे अरण्यात ओरडणाऱ्यांची वाणी मी आहे." पाठवलेली माणसे परुश्यांपैकी होत. त्यांनी त्याला विचारले, आपण ख्रिस्त नाही, एलिया नाही आणि संदेष्टाही नाही, तर मग बाप्तिस्मा का करता ? योहानने त्यांना उत्तर दिले, "मी पाण्याने पाण्याने बाप्तिस्मा करतो ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुम्हांमध्ये उभा आहे तो माझ्यामागून येणारा आहे. त्याच्या पायतणाचा बंद सोडावयास मी योग्य नाही." यार्देनच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा करीत होता तेथे ह्या गोष्टी घडल्या.
प्रभूचे हे शुभवर्तमान...