Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Tuesday 13th August 2024 | 19th Week in Ordinary Time

सामान्य काळातील  एकोणिसावा सप्ताह 

मंगळवार १३ ऑगस्ट  २०२४

तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.  

unless you turn and become like children, you will never enter the kingdom of heaven.



संत हिप्पोलिटस व पोन्तिआतुस

धर्मगुरू, रक्तसाक्षी व परमगुरु रक्तसाक्षी (२३५)

येहज्केलने देवाची आज्ञा स्वीकारुन इस्त्राएलला मार्गदर्शन केले.
  लहान बालके ही देवाघरची जणू फुले आहेत. आज आपण त्यांच्यातील| निरनिराळ्या गुणांवर चिंतन करु या. विशेषतः प्रभूयेशू आपल्याला नम्रतेचा गुण लहान मुलांतून शिकण्यासाठी सांगत आहे. 
नम्रता म्हणजे निरागसता, शुध्दता व आज्ञापालन. लहान बालकांच्या शब्दाद्वारे व आचरणाद्वारे त्यांच्यातील पवित्रता, शुध्दता आणि प्रेमळता दिसून येते. लहान बालके पूर्णतः आपल्या आई-वडिलांवर अवलंबून असतात. त्यांची पूर्ण भिस्त त्यांच्यावर  असते. आपण आज चिंतन करु या की आपण त्या बालकांप्रमाणे शुध्द, पवित्र, निरागस, आज्ञाधारक व प्रेमळ आहोत का ?  
✝️             

पहिले वाचन : यहेज्केल  २:८-३:४
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"त्याने मला तो ग्रंथपट सेवन करायला दिला. तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला.'
“हे मानवपुत्रा, मी सांगतो ते ऐक, त्या फितुरी जातीप्रमाणे तू फितूर होऊ नकोस, आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा." मी पाहिले तो माझ्याकडे एक हात पुढे झाला आणि पाहा, त्या हातात ग्रंथपट होता, तो त्याने माझ्यापुढे पसरला, त्यावर पाठपोट लिहिले होते आणि त्यात विलाप, शोक आणि आकांत ह्यांविषयी लेख होता. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर. हा पट सेवन कर आणि जाऊन इस्राएल घराण्याबरोबर बोल." तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करायला लावले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आतडी भर." मी तो सेवन केला. तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. मग़ तो मला म्हणाला, “मानवपुत्रा. जा, इस्राएल घराण्याकडे जा आणि त्याच्याजवळ माझी वचने बोल."
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Ezekiel 2:8-3:4

Thus says the Lord: "You, son of man, hear what I say to you. Be not rebellious like that rebellious house, Open your mouth and eat what I give you." And when I looked, behold, a hand was stretched out to me, and behold, a scroll of a book was in it. And he spread it before me.

And it had writing on the front and on the back, and there were written on it words of lamentation and mourning and woe. And he said to me, "Son of man, eat whatever you find here. Eat this scroll, and go, speak to the house of Israel. So I opened my mouth, and he gave me this scroll to eat. And he said to me, "Son of man, feed your belly with this scroll that I give you and fill your stomach with it." Then I ate it, and it was in my mouth as sweet as honey. And he said to me, "Son of man, go to the house of Israel, and speak with my words to them."
This is the word of God 

Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र : ११९:१४; २४, ७२.१०३,१११,१३१
प्रतिसाद : प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात.

१ तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा 
असे मानून मी अत्यांनद करतो. 
तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत,
 ते माझे मंत्री आहेत.

२ सोन्यारुप्याच्या लक्ष्यावधी नाण्यांपेक्षा 
तुझे तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.
 तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात! 
माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात.

३ तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन 
म्हणून मी स्वीकारले आहेत,
 कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो, 
मी तोंड उघडून धापा टाकल्या, 
कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला.

Psalm 119:14, 24, 72, 103, 111, 131 
How sweet is your promise to my tongue, O Lord!

rejoice in the way of your precepts. 
as though all riches were mine.

See, your decrees are my delight;
your statutes are my counsellors. R

The law from your mouth means more to me 
than large quantities of silver and gold. R

How sweet is your promise to my tongue, 
more than honey in the mouth. R

Your decrees are my heritage forever, 
the joy of my heart. R

I have opened my mouth and I sigh,
 for I yearn for your commands. R


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
 हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास 
आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.

Acclamation: 
Take my yoke upon you, says and lowly in heart. the Lord; and learn from me, for I am gentle

शुभवर्तमान  मत्तय १८ : १-५,१०,१२-१४
वाचक :  मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“संभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका." 
शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण ?” तेव्हा त्याने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, "मी तुम्हांला खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्यास्तव जो कोणी स्वत:ला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गांच्या राज्यात सर्वांत मोठा होय. जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. संभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हांला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. तुम्हांला काय वाटते ? कोणाएका मनुष्याजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले तर ती नव्याण्णव डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही का ? आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हांला खचित सांगतो. तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading: Matthew 18:1-5, 10, 12-14
At that time the disciples came to Jesus saying, "Who is the greatest in the kingdom of heaven?" And calling to him a child, he put him in the midst of them and said, "Truly, 1 say to you, unless you turn and become like children, you will never enter the kingdom of heaven. Whoever humbles himself like this child is the greatest in the kingdom of heaven." Whoever receives one such child in my name receives me. See that you do not despise one of these little ones. For I tell you that in heaven their angels always see the face of my Father who is in heaven. What do you think? If a man has a hundred sheep, and one of them has gone astray, does he not leave the ninety-nine on the mountains and go in search of the one that went astray? And if he finds it, truly, I say to you, he rejoices over it more than over the ninety-nine that never went astray. So it is not the will of my Father who is in heaven that one of these little ones should perish."

 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनलहान मुले सर्वस्वी मोठ्या माणसांवर अवलंबून राहतात. आपल्या सर्व गरजा भागवण्यासाठी ती मोठ्या माणसांची मदत घेतात. त्याचप्रमाणे मेंढरांना कुरणात नेण्यासाठी, चारा पाणी देण्यासाठी मेंढपाळांची गरज लागते. मेंढपाळ अगदी मोठ्या आनंदाने ते काम करतो. त्याच्यासाठी सर्वच मेंढरे महत्त्वाची आणि खास असतात. मेंढरे देखील सर्वस्वी मेंढपाळांवर अवलंबून राहतात. त्याचप्रमाणे आपण प्रत्येकजण परमेश्वराला प्रिय आहोत. तो आपला पिता आहे आणि आपण त्याची लेकरे आहोत. आपण सर्वस्वी परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून राहायला हवे. मेंढपाळ जसा नव्याण्णव मेंढरांना देवाच्या निगराणीखाली ठेवून हरवलेल्या मेंढराचा शोध घेतो; त्याचप्रमाणे परमेश्वर त्याच्यापासून दूर गेलेल्या, आपल्या पापात हरवलेल्या माणसांचा शोध घेतो आणि ती माणसे सापडल्यावर आनंद व्यक्त करतो. लहान मुले आपल्या आई- वडिलांचे ऐकतात. मेंढरे मेंढपाळांचे ऐकतात. यहज्केल संदेष्टा परमेश्वराचे ऐकतो. मग आपण कोणाचे ऐकतो ? परमेश्वराचे की आपल्या दुष्ट प्रवृत्तीचे ?

प्रार्थना : हे प्रभू येशु, तुझ्या वचनांवर चिंतन-मनन करीत सर्वदा तुझ्या आज्ञेत राहण्यास मला कृपा दे, आमेन.
✝️