Marathi Bible Reading | Wednesday 14th August 2024 | 19th Week in Ordinary Time

सामान्य काळातील एकोणिसावा  सप्ताह 

बुधवार १४ ऑगस्ट  २०२४

जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल 

 whatever you bind on earth will be bound in heaven; 


संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे

धर्मगुरू, रक्तसाक्षी  (१८९४-१९४१)

मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे ह्यांचा जन्म पोलंड देशात ८ जाने. १८९४ रोजी झाला. आपल्या तारुण्यावस्थेतच तो 'फ्रायर्स मायनर कन्व्हेंच्युयल्स' नावाच्या एका व्रतस्थ धार्मिक संस्थेत दाखल झाला आणि इ.स. १९१८ साली रोम शहरात त्याला धर्मगुरुपदाची दीक्षा देण्यात आली.

फा. मॅक्सिमिलियन ह्यांचे धन्य कुमारी देवमाता मरिया हिच्यावर विशेष प्रेम होते. त्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या धर्मग्रामात 'निष्कलंक मरियेची फौज' (आर्मी ऑफ इमॅक्युलेट मेरी) नावाची संघटना सुरू केली. लवकरच या संघटनेचा प्रसार संपूर्ण पोलंड देशात आणि इतर देशांमध्ये झाला..

फा. मॅक्सिमिलियन पुढे जपान देशात मिशनरी म्हणून गेले तेथे त्यांनी धन्य कुमारी निष्कलंक मरिया हिच्या आश्रयाखाली आणि मार्गदर्शनाने ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसार करण्यास सुरुवात केली. तेथून परतल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना 'कॉन्सेंट्रेशन कॅम्प'मध्ये बराच काळ पुष्कळ हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्याचवेळी एका प्रापंचिक गृहस्थाला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली होती. त्याला कुटुंब होते, बायकोमुले होती. फा. कोल्बे क्षणार्धात पुढे झाले. त्यांनी म्हटले, 'मी पोलंड देशातील एक कॅथलिक धर्मगुरू आहे. या माणसाला कुटुंब आहे. त्याला मुक्त करा. त्याच्या जागी मला ठार करा.' अशाप्रकारे आपल्या प्रभूच्या शिकवणुकीनुसार शेजारप्रीतीपायी त्यांनी आपला स्वतःचा प्राण दिला.

१४ ऑगस्ट १९४१ रोजी मरण पावलेल्या फा. मॅक्सिमिलियन कोल्बे ह्यांना पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी १० ऑक्टोबर १९८२ रोजी संतपदाचा बहुमान दिला.

चिंतन : जितक्या प्रमाणात आपण आत्म्याचे तारण करण्यासाठी धडपडू तितक्या प्रमाणात आपले पावित्र्य वाढत राहील. संत मॅक्सिमिलियन कोल्बे  
✝️             

पहिले वाचन : यहेज्केल ९:१-७:१०:१८-२२
वाचन :येहज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 "येरुशलेमला जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या अमंगळ कृत्यामुळे उसासे टाकत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर."

प्रभूने मला ऐकू येईल असे मोठ्याने म्हटले, "नगररक्षकहो, तुम्ही सगळी आपली विध्वंसक हत्यारे हाती घेऊन इकडे या." तेव्हा उत्तरेकडील वरच्या वेशीने सहा पुरुष आपल्या हाती विध्वंसक हत्यारे घेऊन आले. त्याच्यामध्ये शुभ्र तागाचे वस्त्र परिधान केलेला एक मनुष्य होता. त्याच्या कमरेनजीक कारकुनाची दौत होती. ते आत जाऊन पितळी वेदीजवळ उभे राहिले.
करुबारूढ असलेल्या इस्राएलच्या देवाचे तेज तेथून निघून मंदिराच्या उंबरठ्यावर आले आणि कमरेनजीक कारकुनाचा दौत असलेल्या आणि शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याला त्याने हाक मारली. परमेश्वर त्याला म्हणाला, "नगरामधून, येरुशलेममधून जाऊन जी माणसे आपल्याला होत असलेल्या अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करत आहेत त्यांच्या कपाळांवर चिन्ह कर." मला ऐकू येईल असे तो त्या बाकीच्यांना म्हणाला, त्याच्यामागून नगरात जा आणि संहार करा, कृपादृष्टी करू नका, गय करू नका. वृद्ध तरुण, कुमारी, मुले आणि स्त्रिया याची निखालस कत्तल करा; पण ज्यांवर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका; माझ्या पवित्रस्थानापासून आरंभ करा. तेव्हा मंदिरापुढे असलेल्या वडिलांपासून त्याने आरंभ केला. त्याने त्यांना म्हटले, "मंदिर भ्रष्ट करा, अंगणे वधिलेल्यांनी भरून टाका. चला, निघा." तेव्हा त्यांनी जाऊन नगरात संहार चालवला.
परमेश्वराचे तेज मंदिराच्या उंबरठ्यावरून निघून करुबांवर जाऊन राहिले. निघतेवेळी करुबांनी आपले पंख उचलले आणि ते माझ्यादेखत भूमीवरून वर चढून गेले, त्याबरोबर चाकेही गेली. ते परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वद्वारेपुढे थांबले; त्यांच्यावर इस्राएलच्या देवाचे तेज होते.

खबार नदीच्या तिरी मी इस्राएलच्या देवाच्या आसनाखाली पाहिला होता तो हा प्राणी होय; ते करूब आहेत हे मला कळले. त्या प्रत्येकाला चार मुखे होती आणि प्रत्येकाला चार पंख होते, त्यांच्या पंखांखाली मनुष्याच्या हातासारखी आकृती होती. त्यांच्या चेहऱ्याविषयी म्हणाल, तर खबार नदीच्या तिरी मी पाहिलेल्या चेहऱ्यांसारखेच ते होते; त्यांची स्वरुपे आणि ते स्वतः तसेच होते, ते नीट आपल्यासमोर चालत
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Ezekiel 9:1-7; 10:18-22 
 he shouted loudly for me to hear, 'The scourges of the city are
approaching, each carrying his weapon of destruction!" Immediately six men advanced from the upper north gate, each holding a deadly weapon. Among them was a man dressed in linen, with a scribe's ink-horn in his belt. They came in and halted in front of the bronze altar. The glory of the God of Israel rose from above the winged creature where it had been, towards the threshold of the Temple. He called to the man dressed in linen with a scribe's ink-horn in his belt and Yahweh said to him, 'Go all through the city, all through Jerusalem, and mark a cross on the foreheads of all who grieve and lament over all the loathsome practices in it.' I heard him say to the others, 'Follow him through the city and strike. Not one glance of pity; show no mercy; old men, young men, girls, children, women, kill and exterminate them all. But do not touch anyone with a cross on his forehead. Begin at my sanctuary.' So they began with the old men who were in the Temple. He said to them, 'Defile the Temple; fill the courts with corpses; then go out!' They went out and hacked their way through the city. The glory of Yahweh then came out over the Temple threshold and paused over the winged creatures. These raised their wings and rose from the ground as I watched, and the wheels were beside them....
This is the word of God 

Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र : ११३:१-२,३-४,५-६
प्रतिसाद :  परमेश्वराचे वैभव आकाशाहून उंच आहे.

१ परमेश्वराचे स्तवन करा, 
परमेश्वराचे सेवकहो, तुम्ही त्याचे स्तवन करा. 
परमेश्वराच्या नावाने स्तवन करा.
 येथून पुढे सर्वकाळ परमेश्वराच्या नामाला धन्यवाद असो.

२ सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत 
परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. 
परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे.
 त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे.

३ परमेश्वर आमचा देव जो उच्चस्थळी 
राजासनारूढ आहे.
जो आकाश आणि पृथ्वी ह्यांचे अवलोकन 
करण्यास लवून पाहतो, 
त्याच्यासारखा कोण आहे ?

Psalm 113:1b-2, 3-4, 5-6
The glory of the Lord is above the heavens.

1 Praise ye the Lord. Praise,
O ye servants of the Lord,
praise the name of the Lord.

2 Blessed be the name of the Lord
from this time forth and for evermore.
From the rising of the sun unto
the going down of the same the Lord’s name is to be praised.

३ The Lord is high above all nations,
and his glory above the heavens.
Who is like unto the Lord our God,
who dwelleth on high,
Who humbleth himself to behold the things
that are in heaven, and in the earth!. R


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
 हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
आलेलुया !

Acclamation: 
Take my yoke upon you, says and lowly in heart. the Lord; and learn from me, for I am gentle

शुभवर्तमान  मत्तय  १८:१५-२० 
वाचक :  मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकान्ती असताना त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल. परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एकादोघांना आपल्याबरोबर घे, अशासाठी की, दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळव आणि जर त्याने मंडळीचेही न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो. मी तुम्हांला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मी आणखी तुम्हांला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी मान्य केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading: Matthew 18:15-20

Jesus said to his disciples: 'If your brother does something wrong, go and have it out with him alone, between your two selves. If he listens to you, you have won back your brother. If he does not listen, take one or two others along with you: whatever the misdemeanour, the evidence of two or three witnesses is required to sustain the charge. But if he refuses to listen to these, report it to the community; and if he refuses to listen to the community, treat him like a gentile or a tax collector. In truth I tell you, whatever you bind on earth will be bound in heaven; whatever you loose on earth will be loosed in heaven. In truth I tell you once again, if two of you on earth agree to ask anything at all, it will be granted to you by my Father in heaven. For where two or three meet in my name, I am there among them.

 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनस्वतःच्या चुका आणि अपराध मान्य करण्यास किंवा सुधारण्यास पश्चात्तापाची गरज असते. कधी-कधी आपल्या जवळची माणसे आपल्या चुका आपल्या निदर्शनास आणतात कारण त्यांना आपली काळजी असते. आपण वेळीच क्षमा मागितली किंवा क्षमा केली तर खऱ्या अर्थाने आपण ख्रिस्ताचे अनुयायी बनतो. क्षमा मागणारी किंवा क्षमा करणारी व्यक्ती ख्रिस्ताचे मिशनकार्य पुढे नेण्यास समर्थ असते आणि अशा व्यक्तींसाठी ख्रिस्त नेहमी मध्यस्थी करीत असतो. आजच्या पहिल्या वाचनातही परमेश्वर आपल्याला तेच सांगत आहे. ज्यांनी अमंगळ कृत्ये केली होती त्यांना आता पश्चात्ताप होत आहे. त्यांच्या कपाळावर देवाचे चिन्ह आहे. त्या सर्व लोकांचे देव संरक्षण करतो कारण आपल्या पश्चात्तापाने त्यांनी परमेश्वराला प्रसन्न केले आहे. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी पद, प्रतिष्ठा किंवा पैसा यांची गरज नाही. तर पश्चात्तापाची आहे. संत मॅक्समिलन कोल्बे हा सर्व तुरुंगवासीयांचा आश्रयदाता संत आहे. तुरूंगातील अपराध्यांनी वेळीच पश्चात्ताप करून देवाचा आशीर्वाद मिळवावा म्हणून त्यांच्याकरीता आपण प्रार्थना करू या.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या वचनाप्रमाणे, आज्ञेप्रमाणे आणि देवाच्या मार्गाने जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन
✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या