(पुनरुत्थान दुसरा सप्ताह
सोमवार
१२ एप्रिल २०२१
"त्यांनी प्रार्थना केल्यावर ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले व देवाचे वचन धैर्याने बोलू लागले."
पेत्र आणि योहान यांची सुटका झाल्यावर ते आपल्या मित्रमंडळींकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडीलजन त्यांना जे काही म्हणाले होते ते सर्व त्यांनी त्यांना सांगितले. हे ऐकून ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, "हे देवा, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा आणि त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने फार पूर्वी तू पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हटले, राष्ट्रे का खवळली आणि लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभूविरूद्ध आणि त्याच्या अभिषिक्तांविरूद्ध लढण्यास पृथ्वीवरील राजे उभे राहिले आणि अधिकारी एकत्र जमले.
आज हेच ह्या शहरात घडत आहे. कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्याविरूद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय आणि इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद आणि पोन्ती पिलात हे एकत्र झाले आहेत. ह्यासाठी जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते आणि स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे. हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे लक्ष दे आणि आरोग्यदान देण्याकरिता तू आपला हात लांब करत असता आपल्या सेवकांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना सामर्थ्य दे. तुझा पवित्र सेवक येशू ह्यांच्या नावाने चिन्हे आणि चमत्कार घडू देत." त्यांनी ही प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.
हा प्रभूचा शब्द आहे
शुभवर्तमान योहान ३:१-८

0 टिप्पण्या