Marathi Bible Reading | 13th week in ordinary Time | Thursday 6th July 2023

 सामान्यकाळातील १३वा सप्ताह 

गुरुवार ६  जुलै २०२३

 "मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे."


 संत मारिया गोरेटी
कुमारिका, रक्तसाक्षी (१८९०-१९०२)

इटालीतील मार्चे प्रांतातील कोरियाल्डो येथे एका शेतमजुराच्या घरात जन्मलेल्या सात भावंडांमध्ये मारियाचा क्रमांक तिसरा होता. घरच्या गरीब परिस्थितीमुळे ती कधीही शाळेत जाऊ शकली नाही. तिच्या अशिक्षित आईने मात्र आपल्या माहितीतले सर्व प्रकारचे धर्मशिक्षण घरीच शिकवून तिच्यात ख्रिस्ती सद्गुणांची जोपासना केलेली होती.
मारिया नऊ वर्षांची असताना मारियेचे वडील मरण पावले. त्यामुळे शेतमजुरीच्या कामाचा संपूर्ण भार तिच्या आईवर येऊन पडला. आपल्या लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी मात्र मारियेने पूर्ण मनाने स्वीकारली.
वयाच्या ११ व्या वर्षी प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारण्याचा दिवस तिच्या जीवनात उजाडला. त्याची पूर्वतयारी म्हणून तिने खास आध्यात्मिक तपसाधना केलेली होती. प्रथम ख्रिस्तशरीर संस्काराच्या घटनेवेळी तिच्या हृदयावर कधीही न पुसला जाणारा पावित्र्याचा ठसा उमटला. आतापर्यंत येशूला कोणत्याही पापाने तिने दुःखविण्याचे कौशल्याने टाळलेले होते. आज्ञाधारकपणा, नेमस्तपणा, शुद्धता आणि देवाचे भय तिच्याठायी ओतप्रोत भरून वाहात होते. परंतु आता तिने आपल्या प्रभूला संतोषविण्याचा आणि सर्वांना मदत करण्याचा जाणीवपूर्वक निश्चय केला.
कुमसाराला जायचे म्हणजे सात मैलांचे अंतर कापायचे आणि येताना तितकेच अंतर चालायचे. 
तिच्या घराशेजारी आलेक्झांड्रो नावाचा एक विकृत मनोवृत्तीचा आणि वासनेने होरपळत असलेला तरुण राहात होता. अनैतिक कृत्य करण्यासाठी त्याने ११ वर्षीय मारिया हिला तीन वेळा मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्याने तिच्यावर १४ वेळा वार केले. मारिया रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि ६ जुलै १९०२ साली मरण पावली. मरता मरता तिने आपल्या आईजवळ एक इच्छा व्यक्त केली की, 'ज्या व्यक्तीने हे पापकृत्य केलेले आहे तिचे पूर्णपणे परिवर्तन व्हावे'
देव नीतिमानांची प्रार्थना ऐकतो. आलेक्झांड्रोने हे कृत्य केल्यानंतर तो घरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आले. २९ वर्षे तुरुंगात राहिला. परंतु त्या कालावधीत कित्येक वेळा त्याला मारिया गोरेटी हिने दर्शने देऊन आपल्या पापांबद्दल पूर्णपणे पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त केले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आलेक्झांड्रो एका मठात गेला. तेथे त्याने आपल्या पूर्वायुष्यातील सर्व पापांबद्दल पश्चात्ताप केला आणि धर्मगुरूपदाची दीक्षा स्वीकारली.
असे करता करता १९५० साल उजाडले. पोप पायस बारावे ह्यांनी २५ जून रोजी पवित्र वर्षानिमित्ते आयोजित केलेल्या एका सोहळ्यात मारिया गोरेटी हिला संतपद बहाल केले. त्यावेळी इतिहासात नोंदविल्या जाव्यात अशा तीन गोष्टी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. पहिली गोष्ट म्हणजे रोमच्या इतिहासात पहिल्यांदाच संत पीटर बॅसिलिकामध्ये भाविकांची एवढी प्रचंड गर्दी जमलेली होती की हा अतिभव्य सोहळा संत पीटरच्या उघड्या मैदानावर घेण्यात आला.
दुसरी गोष्ट ह्या संताच्या संतीकरणासाठी स्वतः तिची वृद्ध, अर्धांगवायूने पछाडलेली आई उपस्थित होती आणि तिसरी गोष्ट आलेक्झांड्रो हा धर्मगुरू होऊन या सोहळ्यासाठी उपस्थित होता. मारिया गोरेटीने केलेली प्रार्थना ऐकली गेली होती तर !

 मरतेसमयी मारिया गोरेटीने आपल्या आईला सांगितले, “आई, जरी त्याने माझे तुकडे केले असते तरी मी कधीच पाप केले नसते. पापापेक्षा मला मरण आले तरी चालेल."- संत मारिया गोरेटी

                                    ✝️            

पहिले वाचन :  उत्पत्ती  २२:१-१९ 
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"आपला पिता आब्राहाम याचे होमार्पण." 
देवाने आब्राहामला कसोटीस लावले; त्याने “आब्राहाम, " अशी हाक मारली, तेव्हा आब्राहाम म्हणाला, "काय आज्ञा ?" देव म्हणाला, “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.” तेव्हा आब्राहामने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर दोघे सेवक आणि आपला मुलगा इसहाक यांना घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली, मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. तिसऱ्या दिवशी आब्राहामने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. आब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा आणि मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो." तेव्हा आब्राहामने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव आणि सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर निघाले. तेव्हा इसहाकने आपला बाप आब्राहाम याला म्हटले, “बाबा!" तो म्हणाला, "काय म्हणतोस बाळा?" त्याने म्हटले, "पाहा, विस्तव आणि लाकडे, आहेत पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे ?" आब्राहाम त्याला म्हणाला, “बाळा? देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल" आणि ते दोघे बरोबर चालू लागले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा आब्राहामने तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक याला बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले. मग आब्राहामने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, “आब्राहाम, आब्राहाम!" तो म्हणाला, "काय आज्ञा ?" मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला अपाय करू नकोस; कारण तू आपल्या मुलाला आपल्या एकुलत्या एका मुलाला ही राखून ठेवले नाहीस, यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले." तेव्हा आब्राहामने दृष्टी वर करून पाहिले तो आपल्यामागे झुडूपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला; मग आब्राहामने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि आब्राहामने त्या ठिकाणचे नाव याव्हे - यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेवले. त्यावरून “परमेश्वराच्या पर्वतावर पाहून देण्यात येईल” असे आजपर्यंत बोलतात.
परमेश्वराच्या दूताने आकाशातून आब्राहामला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, “परमेश्वर म्हणतो, “मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की, तू हे कृत्य केलेस; आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, म्हणून मी तुला आशीर्वादित करीन आणि वृध्दीच वृध्दी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन आणि तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील; तू माझा शब्द ऐकलास म्हणून पृथ्वीची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील." मग आब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला आणि ते उठून त्याच्याबरोबर बैरशेबा येथे गेले आणि आब्राहाम बैरशेबा येथे राहिला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Genesis 22:1-19 

In those days: God tested Abraham and said to him, "Abraham!" And he said, "Here I am." He said, "Take your son, your only son Isaac, whom you love, and go to the land of Moriah, and offer him there as a burnt offering on one of the mountains of which I shall tell you." So Abraham rose early in the morning, saddled his donkey, and took two of his young men with him, and his son Isaac. And he cut the wood for the burnt offering and arose and went to the place of which God had told him On the third day Abraham lifted up his eyes and saw the place from afar. Then Abraham said to his young men, "Stay here with the donkey; I and the boy will go over there and worship and come again to you." And Abraham took the wood of the burnt offering and laid it on Isaac his son. And he took in his hand the fire and the knife. So they went both of them together. And Isaac said to his father Abraham, "My father!" And he said, "Here I am, my son." He said, "Behold, the fire and the wood, but where is the lamb for a burnt offering?" Abraham said, "God will provide for himself the lamb for a burnt offering my son." So they went both of them together. When they came to the place of which God had told him, Abraham built the altar there and laid the wood in order and bound Isaac his son and laid him on the altar, on top of the wood. Then Abraham reached out his hand and took the knife to slaughter his son. But the angel of the Lord called to him from heaven and said, "Abraham, Abraham!" And he said, "Here I am." He said, "Do not lay your hand on the boy or do anything to him, for now I know that you fear God, seeing you have not withheld your son, your only son, from me." And Abraham lifted up his eyes and looked, and behold, behind him was a ram, caught in a thicket by his horns. And Abraham went and took the ram and offered it up as a burnt offering instead of his son. So Abraham called the name of that place, "The Lord will provide"; as it is said to this day, "On the mount of the Lord it shall be provided." And the angel of the Lord called to Abraham a second time from heaven and said, "By myself I have sworn, declares the Lord, because you have done this and have not withheld your son, your only son, I will surely bless you, and I will surely multiply your offspring as the stars of heaven and as the sand that is on the seashore. And your offspring shall possess the gate of his enemies, and in your offspring shall all the nations of the earth be blessed, because you have obeyed my voice." So Abraham returned to his young men, and they arose and went together to Beersheba. And Abraham lived at Beersheba.

This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र   ११ : १-६ ,८-९

प्रतिसाद : जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन,

१) परमेश्वराचे स्तवन करा, मी परमेश्वरावर प्रेम करतो, 
कारण तो माझी विनवणी ऐकतो;
 त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, 
म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन.

२) मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, 
मला अधोलोकांच्या यातना झाल्या; 
मला उपद्रव व क्लेश झाले, 
तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो,
 हे परमेश्वरा, तुला मी विनवितो की माझी जीव मुक्त कर.

३) परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे;
 आमचा देव कनवाळू आहे, 
परमेश्वर भोळ्याचे रक्षण करतो;
 मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला.

४) तू माझा जीव मरणापासून, 
माझे डोळे अश्रूपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून रक्षिले आहेत. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन.



Psalm:  116:1-2, 3-4, 5-6, 8-9

I will walk in the presence of the Lord in the land of the living.

I love the Lord, for he has heard
my voice, my appeal;
for he has turned his ear to me
whenever I call. R

They surrounded me, the snares of death;
the anguish of the grave has found me;
anguish and sorrow found.
 I called on the name of the Lord:
"Deliver my soul, O Lord!" R

How gracious is the Lord, and just; 
our God has compassion.
The Lord protects the simple; 
To I was brought low, and he saved me. R

He has kept my soul from death, 
my eyes from tears, and my feet from stumbling. 
I will walk in the presence of the Lord
in the land of the living.R

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
आपण पित्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणांस सत्यवचनाने जन्म दिला.
  आलेलुया!

Acclamation: 
In Christ, God was reconciling the world to himself, and entrusting to us the message of reconciliation.


शुभवर्तमान   मत्तय   ९:१-८
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला."

येशू तारवात बसून पलीकडे गेला आणि आपल्या नगराला जाऊन पोहोचला. मग पाहा, खाटेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, "मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." मग पाहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करतो.” येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता ? कारण 'तुझ्या पापाची क्षमा झाली आहे' असे बोलणे, किंवा 'उठून चाल' असे बोलणे ह्यातून कोणते सोपे ? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून" मग तो पक्षपाती मनुष्याला म्हणाला, "ऊठ, आपली खाट उचलून घेऊन घरी जा." मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भ्याला आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 9:1-8

At that time: Getting into a boat Jesus crossed over and came to his own city. And behold, some people brought to him a paralytic, lying on a bed. And when Jesus saw their faith, he said to the paralytic, "Take heart, my son; your sins are forgiven." And behold, some of the scribes said to themselves, "This man is blaspheming." But Jesus, knowing their thoughts, said, "Why do you think evil in your hearts? For which is easier, to say, "Your sins are forgiven,' or to say, 'Rise and walk? But that you may know that the Son of Man has authority on earth to forgive sins" - he then said to the paralytic- "Rise, pick up your bed and go home." And he rose and went home. When the crowds saw it, they were afraid, and they glorified God, who had given such authority to men:
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: आजच्या शुभवर्तमानात येशू एका पक्षघाती व्यक्तीला रोगमुक्ती प्रदान करतो. शुभवर्तमान स्पष्ट करतो की रोगमुक्ती प्रदान करण्याअगोदर येशूने त्या व्यक्तीला पापमुक्त ही केले. ज्याच्यावर शास्त्र्यांनी आक्षेप घेतला. यहुदी लोकांचे असे ठाम मत होते की, पक्षघात सारखा भयानक रोग जो मनुष्याला आजीवन मरणशय्येवर खिलविते त्या व्यक्तीने केलेल्या पापांचा परिणाम होता. त्यामुळे लोक त्याची निंदानालस्ती करत असत व स्वाभाविकपणे ती व्यक्ती केवळ शारीरिक दृष्ट्या नव्हे तर मानसिक व आध्यात्मिक दृष्ट्यासुद्धा आजारी होत असते. येशू त्या व्यक्तीला अशी खात्री देऊ इच्छितो की मनुष्याच्या पापापेक्षा परमेश्वराची क्षमा व दया सखोल व गहन आहे. येशूने क्षमचे महत्त्व आपल्या जीवनाद्वारे आणि सरतेशेवटी आपल्या वधस्तंभाद्वारे शिकवले. क्षमा रोगमुक्तीचे माध्यम बनू शकते. येशू प्रमाणे आपण सुद्धा क्षमा करून व क्षमा स्वीकारून रोगमुक्तीचे माध्यम बनतो का? दैवी क्षमादानाला कोणतीच मर्यादा अथवा मोजमाप नाही. जर एखादा (लूक ११:४) पापाविषयी बोलत किंवा (मत्तय ६:१२) कर्जाविषयी बोलत असेल, तरीही त्या अमर्यादित क्षमादानाची त्याला गरज असते. आपण नेहमीच कर्जदार असतो. प्रेमाव्यतिरिक्त कोणत्याही बाबतीत ऋणी राहू नये.” (CCC२८४५)

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्यावरील विश्वासात वाढण्यास व तुझ्या आज्ञा पाळण्यास आम्हाला कृपा व शक्ती दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या