Marathi Bible Reading | 14th week in ordinary Time |Tuesday 11th July 2023

 सामान्यकाळातील १४वा सप्ताह 

मंगळवार ११  जुलै २०२३

 “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”





 



 नॉर्सियाचे संत बेनेडिक्ट 

मठाधिकारी, वर्तनसाक्षी (४८०-५४७)


संत बेनेडिक्ट ह्यांच्या ज्ञानाची कीर्ती त्या काळात दिगंतापर्यंत पसरलेली होती. त्यामुळे महागुरू, मठाधिकारी, सरदार, राजे, राजपुत्र आणि सामान्य जनता आपल्या जीवनातील प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्यासाठी या ज्ञानपिपासू व नीतिमान साधुपुरुषाकडे येत असत. त्यांच्या शांतचित्त, पवित्र, संयमी आणि समतोल विचारसरणीने थक्क होऊन जात. सार्वजनिक ठिकाणी ज्या व्यक्ती अधिकाराच्या जागी आहेत त्यांनी सामान्य जनतेमध्ये आपल्याविषयी धाक आणि भीती नव्हे तर प्रेम उत्पन्न करायला हवे असे त्यांना वाटे. गोरगरिबांना संत बेनेडिक्ट ह्यांच्याठायी एक सहानुभूती देणारा सत्पुरुष लाभलेला होता.

समाजातील सर्व थरातील लोकांचा आसरा आणि आश्रयदाता बनलेला ऋषीतुल्य संत बेनेडिक्ट २१ मार्च ५४७ रोजी हजारो लोकांच्या हृदयाचा ठोका चुकवून देवाघरी निघून गेला. मुख्य वेदीवरून पवित्र ख्रिस्तशरीर स्वीकारून आपले हात स्वर्गाकडे उंचावलेल्या अवस्थेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
चिंतन : प्रार्थनापूर्वक परिश्रम करा आणि परिश्रमपूर्वक प्रार्थना करा.• संत बेनेडिक्टचे ब्रीदवाक्य


                                    ✝️            

पहिले वाचन :  उत्पत्ती  ३२:२२-३२

वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन

"तुला यापुढे इस्त्राएल म्हणतील, कारण तू देवाशी नेटाने झगडला आहेस."

याकोब रात्रीचाच उठून आपल्या दोन बायका, दोन दासी आणि आपली अकरा मुले यांना घेऊन याब्बोक नदीच्या उताराने पार गेला. त्याने त्यांना नदीपलीकडे उतरून लावले आणि आपले जे काही होते तेही पाठवले. याकोब मागे राहिला. तेव्हा कोणी पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबवर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेला स्पर्श केला; तो याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली. मग तो म्हणाला, "पहाट होत आहे, मला जाऊ दे.” तो म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ देणार नाही." त्याने मग त्याला विचारले, "तुझे नाव काय ?" तो म्हणाला, “याकोब." यावर तो त्याला म्हणाला, “यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी आणि मनुष्याशी नेटाने झगडून जय पावला आहेस." मग याकोबने विचारले, "तुझे नाव काय ते सांग." तो म्हणाला, "माझे नाव का विचारतोस ?" असे म्हणून त्याने त्याला आशीर्वाद दिला. मग याकोबने त्या ठिकाणाचे नाव पनीएल (देवाचे मुख) असे ठेवले, कारण तो म्हणाला, “मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला.” तो पनीएल सोडून चालला असता सूर्योदय झाला आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला. म्हणून इस्राएल लोक जनावरांच्या जांघेचा स्नायू अजूनही खात नाहीत; याचे कारण त्याने याकोबच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श केला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Genesis 32:22-32

In those days: Jacob arose at night and took his two wives, his two female

servants, and his eleven children, and crossed the ford of the Jabbok. He took them and sent them across the stream, and everything else that he had. And Jacob was left alone. And a man wrestled with him until the breaking of the day. When the man saw that he did not prevail against Jacob, he touched his hip socket, and Jacob's hip was put out of joint as he wrestled with him. Then he said, "Let me go, for the day has broken." But Jacob said, "I will not let you go unless you bless me." And he said to him, "What is your name?" And he said, "Jacob." Then he said, "Your name shall no longer be called Jacob, but Israel, for you have striven with God and with men, and have prevailed." Then Jacob asked him, "Please tell me your name." But he said, "Why is it that you ask my name?" And there he blessed him. So Jacob called the name of the place Peniel, saying, "For I have seen God face to face, and yet my life has been delivered." The sun rose upon him as he passed Penuel, limping because of his hip. Therefore to this day the people of Israel do not eat the sinew of the thigh that is on the hip socket, because he touched the socket of Jacob's hip on the sinew of the thigh.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  : १७:१-३, ६-८, १५ 

प्रतिसाद :मी नीतिमान ठरून, मला तुझे दर्शन घडू दे. 

१) हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, 
माझ्या आरोळीकडे लक्ष दे. 
माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या 
प्रार्थनेकडे कान दे.

२) माझा निवाडा तुझ्यापुढे होवो.
 तुझे डोळे समतेने पाहतात. 
तू माझे हृदय पारखले आहेस, 
रात्री तू माझी झडती घेतली आहेस, 
तू मला तावूनसुलाखून पाहिले आहेस, 
तरी तुला काही आढळले नाही.

३)मी तुझा धावा केला आहे, कारण, 
हे देवा, तू माझे ऐकतोस. 
माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. 
तुझा आश्रय धरणाऱ्यांचे त्यांच्या विरोधकांपासून 
तू आपल्या उजव्या हाताने रक्षण करतोस;
तर तू आता विशेष वात्सल्य दाखव.

 ४) मला आपल्या पंखाच्या छायेत लपव. 
मी तर नीतिमान ठरून मला तुझे दर्शन घडो;
मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो

Psalm:  Psalm 17:1, 2-3, 6-7, 8 and 15

In justice I shall behold your face. 

O Lord, hear a cause that is just;
pay heed to my cry.
Turn your ear to my prayer:
no deceit is on my lips. R 

From you may my justice come forth. 
Your eyes discern what is upright.
a Search my heart and visit me by night. 
Test me by fire, and you will find 
no wrong in me. R

To you I call;
for you will surely heed me, O God. 
Turn your ear to me; hear my words.
Display your merciful love.
By your right hand you deliver from their foes 
those who put their trust in you. R

 Guard me as the apple of your eye.
Hide me in the shadow of your wings 
As for me, in justice I shall behold your face; 
when I awake I shall be filled 
with the vision of your presence. 

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, 
ती नेत्रांना प्रकाश देतात.
  आलेलुया!

Acclamation: 
 I am the good shepherd, says the Lord; 
I know my own and my own know me.

शुभवर्तमान   मत्तय ९:३२-३८
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. "

एका मुक्या भूतग्रस्त मनुष्याला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याचे भूत काढल्यावर त्या मुक्या मनुष्याला वाचा प्राप्त झाली. तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “इस्राएलात असे कधीही पाहण्यात मिळाले नव्हते.” परंतु परुशी म्हणू लागले, हा भुतांच्या अधिपतीच्या सहाय्याने भुते काढतो.” नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवत, राज्यांच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुखणी बरी करत नगरातून आणि गावातून फिरत होता. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला; कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे, ते गांजलेले आणि पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 9:32-38

At that time: A demon-oppressed man who was mute was brought to Jesus. And when the demon had been cast out, the mute man spoke. And the crowds marvelled, saying, "Never was anything like this seen in Israel." But the Pharisees said, "He casts out demons by the prince of demons." And Jesus went throughout all the cities and villages, teaching in their synagogues and proclaiming the gospel of the kingdom and healing every disease and every infirmity. When he saw the crowds, he had compassion for them, because they were harassed and helpless, like sheep without a shepherd. Then he said to his disciples, "The harvest is plentiful, but the labourers are few; therefore pray earnestly to the Lord of the harvest to send out labourers into his harvest."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की, लोकसमुदायाला पाहून येशूला कळवला आला. कळवला ह्या शब्दासाठी पवित्रशास्त्रात वापरलेला मुळ ग्रीक शब्द आहे. splagchnizomai आणि ह्या शब्दाचा अर्थ आहे आतड्यांचे बाहेर येणे आणि म्हणून येशूच्या मनात आपल्या मेंढरांकरिता उद्भवलेली करुणा, दया व अनुकंपेची तीव्रता अनिर्वचनीय व अवर्णनीय आहेत. येशू खरा मेंढपाळ आहे व एहजकेल ग्रंथाच्या ३४व्या अध्यायात आपल्याला ह्या तथ्याची जाणीव मिळते. इस्राएल देशाचे राजे,पुरोहित व संदेष्टे उत्तम मेंढपाळ बनण्यास अपयशी ठरले होते, मेंढरांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांनी त्यांच्यावर छळ केला म्हणून परमेश्वर एक करुणावंत मेंढपाळ पाठवण्याचे वचन देतो. येशू परमेश्वराचे दयावंत मेंढपाळ आहे व त्याच्या करुणेचा कळस होता वधस्तंभ. येशूप्रमाणे आपणसुद्धा दयेचे माध्यम बनतो का? सल्ला देणे, मार्गदर्शन करणे, सांत्वन करणे, क्षमा करणे, सहनशीलता दाखविणे ही आध्यात्मिक तर भुकेल्यांस अन्न देणे, निरश्रितांस आश्रय देणे, उघड्यांस वस्त्र देणे, आजारी आणि कैद्यांस भेटी देणे, मेलेल्यांस पुरणे ही शारीरिक दयाकृत्ये मानली जातात. ह्या सर्वांमध्ये गरिबांना दान देणे हे बंधुप्रीतीचे एक ठळक वैशिष्ट्ये आहे. (CCC २४४७)

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या