Marathi Bible Reading | 20th Sunday in Ordinary Time |20th August 2023

 सामान्यकाळातील २०वा सप्ताह 

रविवार २०  ऑगस्ट २०२३

 “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझी इच्छा सफळ होवो”



'प्रभूजी मला सहाय्य करा.'

 परमेश्वर प्रेमळ, दयाळू  कनवाळू आहे. परमेश्वर त्याच्या नियमांचे व आज्ञांचे विश्वासाने पालन करणाऱ्यावर आपली कृपा दृष्टी ठेवतो.
 एका परराष्ट्रीय बाईने विनंती करुन प्रभू  येशूला मोठ्या विश्वासाने पुन्हा विनंती केली, 'प्रभूजी मला सहाय्य करा.' प्रभू येशूने तिच्या विश्वासाची कसोटी घेतली व  तिला म्हटले, 'बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होवो.' प्रभू येशूने विश्वासु बाईवर अन्याय न करता तिच्या मुलाला जीवन दान दिले. प्रभू येशूने  केलेल्या अनेक चमत्कारांमध्ये प्रभूने म्हटले आहे, 'तुझ्या विश्वसाने तुला बरे केले आहे.' आपला विश्वास आपल्यामध्ये हवा तो चमत्कार घडवून आणू  शकतो.विश्वासात टिकून राहण्यास व न्यायाने जीवन जगण्यास प्रभूकडे विनवणी करु या. 

✝️             

पहिले वाचन :५६:१.६-७
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
मी विदेशी लोकांना आपल्या पवित्र पर्वतावरआणीन.

परमेश्वर म्हणतो, “न्यायाने पालन करा, धर्माचरण करा; कारण माझे तारण जवळ आले आहे, माझे न्याय्यत्व प्रकट व्हायला आले आहे."
तसेच परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नावाची आवड धरण्यासाठी आणि त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यातील जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात आणि माझा करार दृढ धरून राहतात, त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांस हर्षित करीन; माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम आणि यज्ञ मला पसंत होतील, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनामंदिर आहे असे म्हणतील.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Isaiah 56:1, 6-7

does Thus says the Lord: "Keep justice, and do righteousness, for soon my salvation will come, and my righteousness be revealed." "And the foreigners who join themselves to the Lord, to minister to him, to love the name of the Lord, and to be his servants, everyone who keeps the Sabbath and not profane it, and holds fast my covenant- these I will bring to my holy mountain, and make them joyful in my house of prayer; their burnt offerings and their sacrifices will be accepted on my altar, for my house shall be called a house of prayer for all peoples
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ६६:२- ३, ५, ६.८

प्रतिसाद :  हे देवा, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत.

१ देवाने आमच्यावर दया करावी आणि
 आम्हाला आशीर्वाद दयावा त्याने 
आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा 
आणि पृथ्वीवर तुझा मार्ग आम्हाला कळावा, 
तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना जाहीर व्हावे.

२ राष्ट्रे हर्ष करोत आणि जयघोष करोत.
 कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील, 
आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील.

३ हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, 
सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत, 
देव आम्हांला आशीर्वाद देवो, 
आणि पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत..


Psalm Psalm 67:2-3, 5, 6 and 8

Let the peoples praise you, O God; let all the peoples praise you!
 
O God, be gracious and bless us
and let your face shed its light upon us. 
So will your ways be known upon earth 
and all nations learn your salvation. R

Let the nations be glad and shout for joy, 
with uprightness you rule the peoples;
you guide the nations on earth. R

Let the peoples praise you, O God;
let all the peoples praise you. 
May God still give us his blessing that 
all the ends of the earth may revere him. R

दुसरे वाचन  रोम ११:१३ - १५.२९-३२
 वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

"देव इस्राएल लोकांना दिलेली दाने किंवा त्यांच्यावर केलेले उपकार कधीच परत घेत नसतो. "
तुम्हा परराष्ट्रीयांना मी सांगतो : ज्याअर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्याअर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो; त्यात माझा उद्देश हा की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत त्यांच्यामध्ये निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे. कारण त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्याचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यातून जिवंत होणे ठरणार ना.
देवाला आपल्या कृपादानांचा आणि पाचारणाचा अनुताप होत नाही. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करीत होता, परंतु तुम्हांला त्याच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे, त्याप्रमाणे तुम्हावरील ममतेने त्यांनीही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे.

हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद

Second Reading  :Romans 11:13-15, 29-32

Brethren: Now I am speaking to you Gentiles, Inasmuch then as I am an apostle to the Gentiles, I magnify my ministry in order somehow to make my fellow Jews jealous, and thus save some of them. For if their rejection means the reconciliation of the world, what will their acceptance mean but life from the dead? For the gifts and the calling of God are irrevocable. For just as you were at one time disobedient to God but now have received mercy because of their disobedience, so they too have now been disobedient in order that by the mercy shown to you they also may now receive mercy. For God has consigned all to disobedience, that he may have mercy on all. 
This is the word of God 
Thanks be to God 


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 

प्रभू म्हणतो, स्वर्गातील उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल
  आलेलुया!

Acclamation: 
 Jesus was proclaiming the gospel of the kingdom and healing every disease and every affliction among the people.

शुभवर्तमान मत्तय  १५:२१-२८
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

"बाई, तुझा विश्वास मोठा आहे. "

येशू तेथून निघून सोर आणि सिदोन ह्या भागात गेला असताना त्या भागातील कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, "हे प्रभो, दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने फार जर्जर केली आहे." तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे." त्याने उत्तर दिले,"इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही.” तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभुजी, मला सहाय्य करा.” त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे.” तिने म्हटले, "खरेच, प्रभो, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेले तुकडे खातात.” तेव्हा येशूने उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझी इच्छा सफळ होवो” आणि त्याच घटकेला तिची मुलगी बरी झाली.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 15:21-28

At that time: Jesus went away and withdrew to the district of Tyre and Sidon. And behold, a Canaanite woman from that region came out and was crying, "Have mercy on me, O Lord, Son of David; my daughter is severely oppressed by a demon." But he did not answer her a word. And his disciples came and begged him, saying, "Send her away, for she is crying out after us." He answered, "I was sent only to the lost sheep of the house of Israel." But she came and knelt before him, saying, "Lord, help me." And he answered. "It is not right to take the children's bread and throw it to the dogs." She said, "Yes, Lord, yet even the dogs eat the crumbs that fall from their masters' table." Then Jesus answered her, "O woman, great is your faith! Be it done for you as you desire." And her daughter was healed instantly.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:  यहूदी आणि बिगरयहुदी लोकांमधील परस्परसंबंध कमालीचे विकोपाला गेलेले होते. यहुदी लोक कनानी लोकांना अक्षरशः कुत्र्यासारखी वागणूक देत असत. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्यातील परस्परसंबंध सुरळीत करण्याच्या हेतूने आजची तिन्ही वाचने आपल्यासमोर काही महत्वाची चिंतने सादर करतात. 
अ. परमेश्वराची अस्सल आराधना द्वेषाच्या भिंती पाडून टाकण्यास आणि प्रेमाचे सेतू उभारण्यास हातभार लावते : आजच्या पहिल्या वाचनात (यशया ५६:१, ६-७) आपल्या निवडलेल्या इस्राएली लोकांव्यतिरिक्त इतरांवरही परमेश्वर कसे प्रेम करतो त्याचे दर्शन घडते. केवळ शब्बाथ पाळणारे इस्त्राएलीच नाही तर इतर जनही आपल्या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी येऊ शकतील अशी परमेश्वराची सर्वसमावेशक वृत्ती इथे प्रतिबिंबित झालेली आहे. अशा परमेश्वराची अस्सल उपासना करणारे आपापसांतील वैरभाव विसरून शांती सलोख्याने नांदू शकतात. 
ब. परराष्ट्रीयांना नाकारणे हे जगाशी मैत्री करण्यासारखे आहे : मात्र त्यांचा मोकळ्या मनाने स्वीकार करणे ह्यातच जगाचे तारण दडलेले आहे. आजचे दुसरे वाचन (रोम ११:१३-१५, २९-३२) रोमच्या लोकांचे परराष्ट्रीयांशी असलेले संबंध सुधारण्यासाठी मार्गदर्शन करते. ज्याप्रमाणे यहुदी  लोकही कधीतरी आज्ञाभंगाचे पातक करीत होते। तसेच बिगरयहुदी आज ते पातक करीत असावेत.मात्र परराष्ट्रीयांचा प्रेषित असलेला संत पॉल यहुद्यांनी त्यांचा स्वीकार करावा, असे सुचवितो. 
क. श्रद्धा ही सामाजिक दुष्प्रवृत्तीवर मात करण्यास साहाय्यभूत ठरते आजच्या शुभवर्तमानात (मत्तय १५:२१-२८) प्रभू येशू एका कनानी स्त्रीचा विश्वास पाहून तिच्या मुलीला बरे करतो. बिगर यहुदी लोकांसाठी वापरण्यात आलेला "कुत्रा” हा शब्द आजआपल्याला कितीही खटकत असला तरी त्यावेळच्या संदर्भाचे ते प्रतिबिंब होते. ती स्त्री त्याचाच आधार घेऊन किमान “चुरा” तरी मिळावा अशी अपेक्षा प्रकट करते. तिची ही श्रद्धा सामाजिक दुष्प्रवृत्तीवर मात करते आणि तिची इच्छा सफळ होते.
आत्मपरीक्षण : इतर धर्मीय व परप्रांतीय ह्यांच्याविषयी माझा दृष्टीकोण कसा आहे ? सामाजिक दुष्प्रवृत्तीवर मात करण्यासाठी माझी श्रद्धा कशी काय साहाय्यभूत ठरते?

प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्हावर दया करा, आम्हाला सहाय्य करा, आमचा विश्वास बळकट करा, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या