Marathi Bible Reading | 20th week in ordinary Time |Friday 25th August 2023

 सामान्यकाळातील २०वा सप्ताह 

शुक्रवार २५ ऑगस्ट २०२३

 तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे



संत लुईस नववे 

राजा, वर्तनसाक्षी (१२१४-१२७०)

“पाप करण्याऐवजी कोणतेही दुःख सहन करण्यास तयार असा.”संत लुईस नववे -


✝️             

हिले वाचन  रूथ  १:१,३-६,१४,१६,२२

वाचक :रूथ  या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"नामी रुथ मवाबीकर हिला घेऊन परतली आणि त्या दोघी बेथलेहेमला आल्या. "

शास्त्यांच्या अमदानीत देशात दुष्काळ पडला. त्यासमयी बेथलेहेम-यहुदा येथील एक पुरुष आपली पत्नी आणि दोन पुत्र घेऊन मवाब देशात काही दिवस राहायला गेला. पुढे नामीचा पती अलीमलेख हा मरण पावला आणि नामी आणि तिचे दोन पुत्र मागे राहिले. त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया बायका केल्या एकीचे नाव अर्पा आणि दुसरीचे नाव रुथ होते. ती तेथे सुमारे दहा वर्षे राहिली. नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले. याप्रमाणे नामी आपली दोन मुलगे आणि आपला पती यांना अंतरली.
परमेश्वराने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांना अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मवाब देशात कळले, तेव्हा त्या देशातून आपल्या दोघी सुनांसह परत जायला ती निघाली. अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला आणि ती निघून गेली. पण रुथ तिला बिलगून राहिली.
तेव्हा ती म्हणाली, पाहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे आणि आपल्या देवाकडे परत गेली आहे तर तूही आपल्या जाऊच्या मागून जा. रुथ म्हणाली, "मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.
याप्रमाणे ती आपली सून मवाबीकर रुथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली. त्या दोघी बेथलेहेमला आल्या. तेव्हा सातूच्या हंगामाला आरंभ झाला होता.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Ruth 1:1, 3-6, 14b-16, 22 In the days when the judges ruled there was a famine in the land, and a man of Bethlehem in Judah went to sojourn in the country of Moab, he and his wife and his two sons. But Elimelech, the husband of Naomi, died, and she was left with her two sons. These took Moabite wives; the name of one was Orpah and the name of the other Ruth. They lived there about ten years, and both Mahlon and Chilion died, so that the woman was left without her two sons and her husband. Then she arose with her daughters-in-law to return from the country of Moab, for she had heard in the fields of Moab that the Lord had visited his people and given them food. And Orpah kissed her mother-in-law, but Ruth clung to her. And she said, "See, your sister-in-law has gone back to her people and to her gods; return after your sister-in-law." But Ruth said, "Do not urge me to leave you or to return from following you. For where you go I will go, and where you lodge I will lodge. Your people shall be my people, and your God my God. So Naomi returned, and Ruth the Moabite her daughter-in-law with her, who returned from the country of Moab. And they came to Bethlehem at the beginning of barley harvest.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १४६:५-१०

प्रतिसाद : हे माझ्या मना, परमेश्वराचे स्तवन कर.

१) ज्याच्या साहाय्याकरिता याकोबचा देव आहे, 
ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, 
तो धन्य त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र आणि 
त्यातील सर्वकाही निर्माण केले.

२) तो सदा आपले सत्यवचन पाळतो, 
तो छळलेल्यांचा निवाडा करतो. 
भुकेल्यांना अन्न देतो, 
परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.

३) परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो,
 परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो, 
अनाथ आणि विधवा ह्यांची दाद घेतो.

४) परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो, 
परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो, 
परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, हे सियोन, 
तुझा देव पिढ्यान्पिढ्या राज्य करतो. 
परमेश्वराचे स्तवन करा.


Psalm 146:5-6ab, 6c-7, 8-9a, 9bc-10

My soul, give praise to the Lord!

Blessed is he who is helped by Jacob's God,
whose hope is in the Lord his God, 
who made the heavens and the earth, 
the seas and all they contain. R

It is the Lord who preserves fidelity forever, 
who does justice to those who are oppressed. 
It is he who gives bread to the hungry,
the Lord who sets prisoners free. R

 the Lord who raises up those
who are bowed down.
It is the Lord who loves the just, 
the Lord who protects the stranger. R

The Lord upholds the orphan 
and the widow,
but thwarts the path of the wicked. 
The Lord will reign forever,
the God of Sion from age to age 
जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
तुम्ही आपली मने आज कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
 आलेलुया!

Acclamation: 

Teach me your paths, O Lord. Guide me in your truth.


शुभवर्तमान   मत्तय २२:३४-४०
वाचक :मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर आणि स्वतःसारखी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. "

येशूने सदुक्यांना निरुत्तर केले हे ऐकून परुशी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परिक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे ? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, तू आपल्या शेजाऱ्यांवर स्वतः सारखी प्रीती कर. ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :Matthew 22:34-40

At that time: When the Pharisees heard that Jesus had silenced the Sadducees, they gathered together. And one of them, a lawyer, asked him a question to test him. "Teacher which is the great commandment in the Law?" And he said to him, "You shall love the Lord your God with all your heart and with all your soul and with all your mind. This is the great and first commandment. And a second is like it: You shall love your neighbour as yourself. On these two commandments depend all the Law and the Prophets."

This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
परमेश्वरावरील प्रेम व त्याच्याजोडीला शेजाऱ्यावर प्रेम ह्या दोन गोष्टींवर संपूर्ण नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहे असे येशू ख्रिस्ताने म्हटलेले आहे. परमेश्वरावर प्रेम करणे म्हणजे नक्की काय करणे? ज्या व्यक्तींवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तींवर आपला पूर्ण विश्वास असतो.तसेच ती व्यक्ती सांगेल ते ऐकतो. अशाचप्रकारे जर आपण परमेश्वरावर खरोखर प्रेम करतो असे म्हणतो म्हणजेच आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळतो. परमेश्वराने आपल्याला दहा आज्ञा दिलेल्या आहेत व जर आपले परमेश्वरावर खरे प्रेम असेल तर आपण ज्या आज्ञा तंतोतंत पाळणार. तसेच त्यासारखी दुसरी आज्ञा म्हणजे तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. शेजारी म्हणजे तुम्ही स्वतः सोडून जगातील कोणतीही इतर व्यक्ती. जर एखादा मनुष्य म्हणत असेल की, मी परमेश्वरावर प्रेम करतो पण माझे शेजाऱ्यावर प्रेम नाही कारण तो वाईट आहे. माझे त्याच्याबरोबरचे संबंध बरोबर नाहीत. असे जो म्हणतो तो खोटारडा आहे कारण ज्या परमेश्वराला तो त्याच्या डोळ्यांनी पहात नाही त्याच्यावर प्रेम करतो • पण त्याच्या शेजारी जो डोळ्यांनी पहातो तो गरीब आहे, उपाशी आहे त्याला जेवण देत नसेल, उघडा आहे त्याला पांघरायला कपडे देत नसेल तर त्याच्या जीवनाला काय अर्थ ? तेव्हा जसे आपले देवाबरोबरचे प्रेमाचे संबंध आहेत तसेच शेजाऱ्याबरोबर असायला पाहिजे. आपल्या भक्तीचे रुपांतर सेवेत झाले पाहिजे.

प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, प्रीति ह्या सर्वोत्कृष्ट दानाबद्दल तुझे मनापासून आभार, तुजवर व बंधू-भगिनींवर प्रीति करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन. 

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या