सामान्यकाळातील २१वा सप्ताह
रविवार २७ ऑगस्ट २०२३
“आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.
मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल
I will give you the keys of the kingdom of heaven
देवाचे मार्ग गहन आणि अनाकलनीय असतात. देव त्याचे कार्य सिद्धिस नेण्यासाठी योग्य अशा माणसाची निवड करीत असतो.
प्रभू येशूने पेत्राला म्हटले होते, 'पृथ्वीवर जे काहीं तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.' ह्याचाच अर्थ प्रभू येशूने पेत्राला पापांची क्षमा करण्यांचा अधिकार बहाल केला आहे. तोच अधिकार ख्रिस्तसभेतील सर्व दिक्षित धर्मगुरूंना देण्यात आला आहे.आपल्याधर्मग्रामातील भाविकांची आध्यात्मिक काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविलेली असते. प्रायश्चित संस्कारद्वारे आपल्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला आहे. आपल्या सर्वांसाठी| ख्रिस्तबलिदानविधी साजरा करणे व आशिर्वाद विधी द्वारे पापक्षालन करणेसर्वस्वी धर्मगुरूंच करीत असतात.
पहिले वाचन :यशया २२:१९-२३
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन २२:१९-२३
"दावीदच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांदयावर ठेवीन."
सेनाधीश प्रभू परमेश्वर राजमहालातील व्यवस्थापक शेबाना ह्याला म्हणतो, “मी तुला हुद्यावरून काढून टाकीन आणि तुला तुझ्या पदावरून खाली ओढीन. त्यासमयी असे होईल की माझा सेवक, हिल्कियाचा पुत्र एल्याकीन, यास मी बोलावीन. त्याला तुझा झगा घालीन. त्याला तुझा कमरबंद करीन. तुझी सत्ता त्याच्या हाती देईन. तो येरुशलेमेकरांचा आणि यहुदाच्या घराण्याचा पिता होईल. दार्वीदच्या घराण्याची किल्ली त्याच्या हातात ठेवीन. त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही, त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही. मजबूत ठिकाणच्या खुंटीसारखे मी त्याला स्थिर करीन, म्हणजे तो आपल्या पित्याच्या घराण्याला वैभवशाली आसन होईल."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Isaiah 22:19-23
SUN G Thus says the Lord to Shebna, who is over the household: "I will thrust you from your office, and you will be pulled down from your station. In that day I will call my servant Eliakim the son of Hilkiah, and I will clothe him with your robe, and will bind your sash on him, and will commit your authority to his hand. And he shall be a father to the inhabitants of jerusalem and to the house of Judah. And I will place on his shoulder the key of the house of David. He shall open, and shall shut; and he shall shut, and none shall open. And I will fasten him like a peg in a secure place, and he will become a throne of honour to his father's house.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३७:१-२अ, २बक- ३,६.८बक
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे.
१ मी अगदी मनापासून तुझे उपकारस्मरण करीन
देवदूतांच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन,
तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून
मी तुझी उपासना करीन.
२ तुझ्या दयेमुळे आणि तुझ्या सत्यामुळे
मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करीन,
कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून
आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहेस.
मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला,
तू मला हिम्मत दिलीस तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
३ परमेश्वर थोर आहे तरी तो नम्रजनांकडे लक्ष देतो,
पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो,
हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे.
तू आपल्या हातचे काम सोडू नकोस.
Psalm 138:1-2a, 2bcd-3, 6 and 8bc
R O Lord, your merciful love is eternal: discard not the work of your hands.
I thank you, Lord, with all my heart;
you have heard the words of my mouth
In the presence of the angels I praise you.
I bow down toward your holy temple. R
I give thanks to your name
for your merciful love and your faithfulness.
You have exalted your name over all.
On the day I called, you answered me;
you increased the strength of my soul. R
The Lord is high, yet he looks on the lowly,
and the he knows from afar,
O Lord, your merciful love is eternal;
discard not the work of your hands. R
दुसरे वाचन रोम ११:३३-३६
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“सर्व काही त्याच्याचपासून, त्याच्याचद्वारे आणि त्याच्याच प्रीत्यर्थ आहे."
अहाहा, , देवाच्या बुद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत !
"प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता ?"
"त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे ?"
कारण सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याचद्वारे आणि त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद
Second Reading :Romans 11:33-36
Oh, the depth of the riches and wisdom and knowledge of God! How unsearchable are his judgments and how inscrutable his ways! "For who has known the mind of the Lord, or who has been his counsellor?" "Or who has given a gift to him that he might be repaid?" For from him and through him and to him are all things. To him be glory for ever. Amen.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंतःचक्षू प्रकाशित करो, म्हणजे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही आम्ही ओळखावी.
Acclamation:
You are Peter, and on this rock I will build my church, and the gates of hell shall not prevail against it.
शुभवर्तमान मत्तय १६:१३-२०
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तू पेत्र आहेस आणि मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन."
फिलिप्पाच्या कैसरीयाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात ?" ते म्हणाले, “कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेष्ट्यातील कोणी एक, असे म्हणतात.” तो त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?” शिमोन पेत्रने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा. येशूने त्याला म्हटले. शिमोन बार्योना, धन्य तुझी! कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावरमी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे नरकाची कोणतीही शक्ती चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यांना निक्षून सांगितले की, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Matthew 16:13-20
At that time: When Jesus came into the district of Caesarea Philippi, he asked his disciples, "Who do people say that the Son of Man is?" And they said, "Some say John the Baptist, others say Elijah, and others Jeremiah or one of the prophets." He said to them. "But who do you say that am?" Simon Peter replied, "You are the Christ, the Son of the living God." And Jesus answered him, "Blessed are you, Simon Bar-Jonah! For flesh and blood has not revealed this to you, but my Father who is in heaven. And I tell you, you are Peter, and on this rock will build my church, and the gates of hell shall not prevail against it. I will give you the keys of the kingdom of heaven, and whatever you bind on earth shall be bound in heaven, and whatever you loose on earth shall be loosed in heaven." Then he strictly charged the disciples to tell no one that he was the Christ.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजच्या शात्रवाचनांतील (यशया २२:१९-२३; रोम ११:३३-३६; मत्तय १६:१३-(२०) सगळ्यात महत्वाचा शब्द आहे, “किल्ली !” आजच्या पहिल्या वाचनात दावीदच्या घराण्याची किल्ली एल्याकीमला देऊन त्याला त्याच्या घराण्यावर पूर्णपणे अधिकार देण्याचे वचन परमेश्वर देतो. दुसऱ्या वाचनात (रोम ११:३३-३६) मात्र संत पॉल रोमकरांना परमेश्वराकडे अगाध बुद्धीचे आणि संपत्तीचे भांडार आहे ह्याची जाणीव करून देतो. हा खजिना उघडण्यासाठी प्रार्थना व मनन-चिंतन ह्याची किल्ली माणसाकडे असायला हवी. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू पेत्राला स्वर्गाच्या किल्ल्या देण्याचे अभिवचन देतो. त्यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांमध्ये एक ज्ञानाची किल्ली व दुसरी अनुभवाची किल्ली दडलेली आहे. प्रभू येशूची खरी ओळख करून घेण्यासाठी ज्ञानाची किल्ली (लोक मला कोण म्हणून म्हणतात या प्रश्नाचे उत्तर) पुरेशी नाही. त्यासाठी अनुभवाची किल्ली (तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ह्या प्रश्नाचे उत्तर) जवळ असणे गरजेचे आहे. ईशज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव ह्या दोन किल्ल्या परस्परपूरक आहेत. कारण अभ्यासाविना अध्यात्म हे सांगाड्याविना असलेल्या मांसाच्या गोळ्यासमान असते तर अध्यात्माविना कोरडा अभ्यास हा मांसाविना असलेल्या शुष्क सांगाड्यासारखा असतो. पेत्राठायी पुढे ह्या दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला. त्याला देण्यात आलेल्या दुहेरी अधिकाराचे चिन्ह म्हणून आजही त्याचे वारस असलेल्या पोप महोदयाच्या बोधचिन्हामध्ये दोन किल्ल्यांचा समावेश करण्यात येतो. सोनेरी रंगाची किल्ली त्यांच्या स्वर्गातील अधिकाराचे व रूपेरी / चंदेरी रंगाची किल्ली हे त्यांच्या पृथ्वीवरील अधिकाराचे चिन्ह होय.
आत्मपरीक्षण : श्रद्धेमध्ये वाढण्यासाठी मला ईशज्ञान आणि ईश्वर अनुभव (अध्यात्म, अभ्यास) ह्या दोन किल्ल्यांचा वापर कशाप्रकारे करता येईल ?
प्रार्थना : हे प्रभू, आम्हावर दया कर, आमच्या पापांची क्षमा कर व ख्रिस्ताचा अनुसरण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या