सामान्यकाळातील २१वा सप्ताह
बुधवार ३० ऑगस्ट २०२३
मनुष्यानें सर्व जग मिळविलें आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ ?.
ख्रिस्तसभा आज कार्मेलाईट संस्थेची मदर संत युफ्रेसीया ह्यांचा सण साजरा करीता आहे. केरळ मध्ये जन्मलेली मदर युफ्रेसीया ह्यांनी आपले सर्वस्व त्याग करून दयाकृत्ये करून व प्रार्थनामय जीवन सर्वांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. त्यांना प्रार्थना करणारी मदर म्हणून देखिल संबोधले जाई. विशेष म्हणजे त्यांनी पवित्र कुटुंबाच्या भक्तीला प्राधान्य दिले होते. मदर युफ्रेसीया ह्यांचे अनुसरण करीत आपण सुद्धा त्यागमय, व प्रार्थनामय जीवन जगत असतांना इतरांसाठी मध्यस्थी करावी.
प्रभू येशू ख्रिस्त त्याचे अनुयायी बनण्याची इच्छा असणाऱ्यांना स्पष्टपणे सांगत आहे की, 'माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतः चा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे'. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आत्मत्यागाचे आमंत्रण दिले आहे. ह्या जगातील आपण सर्वजण प्रवासी आहोत. जन्मापासून ते मृत्युपर्यंत आपण जे जीवन जगतो ते सर्वस्वी देवाच्या कृपेनुसारच असते. विशेषतः ख्रिस्ती माणसाचे जीवन ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी असते.
पहिले वाचन : गलती २:१९-२०
वाचन :गलतीकरांस पत्र पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस."
मी नियम शास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलों, ह्यासाठीं कीं मी देवाकरितां जगावें. मी ख्रिस्ताबरो बर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढें मी जगतों असें नाहीं, तर ख्रिस्त माझ्याठायीं जगतो; आणि आतां देहामध्यें जें माझें जीवित आहे तें देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगानें आहे; त्याने माझ्यावर प्रीति केली व स्वतःला माझ्याकरितां दिलें.
First Reading :Galatian 2: 19-20
So far as the Law is concerned, however, I am dead-killed by the Law itself-in order that I might live for God. I have been put to death with Christ on his cross, 20 so that it is no longer I who live, but it is Christ who lives in me. This life that I live now, I live by faith in the Son of God, who loved me and gave his life for me.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १६ :१-२, ५,७-८,११
प्रतिसाद : हे देवा, माझें रक्षण कर, , कारण मी तुझा आश्रय धरिला आहे.
१) हे देवा, माझें रक्षण कर, ,
कारण मी तुझा आश्रय धरिला आहे.
मीं परमेश्वराला म्हटलें, तूंच माझा प्रभु आहेस,
तुझ्यापरतें मला सुख नाहीं.
२) परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वांटा आहे;
माझा वांटा संभाळणारा तूंच आहेस.
माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत.
माझे वतन माझ्या मनाजोगे आहे.
३) परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा
मी धन्यवाद करितों; माझें अंतर्यामहि मला रात्री शिक्षण देतें.
मी आपल्यापुढें परमेश्वराला नित्य ठेविलें आहे;
तो माझ्या उजवीकडे आहे,म्हणून मी ढळणार नाहीं.
४)जीवनाचा मार्ग तूं मला दाखविशील;
तुझ्या सान्निध्यांत पूर्णानंद आहे;
तुझ्या उजव्या हातांत सौख्ये सदोदित आहेत.
Psalm 16:1-2,5,7and11
Protect me God; I trust in you for safety.
Protect me God; I trust in you for safety.
I say to the LORD, "You are my Lord;
all the good things I have come from you."
You, LORD, are all I have,
and you give me all I need;
my future is in your hands.
I praise the LORD, because he guides me,
and in the night my conscience warns me.
You will show me the path that leads to life;
your presence fills me with joy
and brings me pleasure for ever.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
Acclamation:
Happy are those who know they are spiritually poor the kingdom of heaven belongs to them .
शुभवर्तमान मत्तय १६ : २४-२७
वाचक :मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
'तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणें फळ देईल. '
मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्यामागें येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावें. कारण जो कोणी आपला जीव वाचवूं पाहतो, तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरितां आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्यानें सर्व जग मिळविलें आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार ? मनु ष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशीं आपल्या दूतांसह येईल त्यावेळी 'तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणें फळ देईल. '
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Matthew 16:24-27
Then Jesus said to his disciples, "If anyone wants to come with me, he must forget self, carry his cross, and follow me. For whoever wants to save his own life will lose it; but whoever loses his life for my sake will find it. Will a person gain anything if he wins the whole world but loses his life? Of course not! There is nothing he can give to regain his life. For the Son of Man is about to come in the glory of his Father with his angels, and then he will repay everyone according to his deeds. I assure you that there are some here who will not die until they have seen the Son of Man come as King."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
परमेश्वर जसा, दयाळू, कनवाळू, मंदक्रोध व प्रेमळ आहे तसे आपण सर्वांनी असावे असे आवाहन प्रभू ख्रिस्ताने केलेले आहे. विशेषतः प्रभू येशूच्या शिकवणूकीचा गाभा देवप्रीती व परस्परप्रीति मध्ये सामावलेला आहे. म्हणूनच जीवनात येणाऱ्या सर्व संकटांचा वधस्तंभ घेऊन आणि आत्मत्याग करुन आपण ख्रिस्तानुकरण करायचे आहे.
प्रभू येशू शेवटी सांगत आहे, 'मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दुतांसह येईल त्यावेळी तो प्रत्येकाला त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल'.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आत्मत्याग करुन तुला अनुसरण्यास व तुझी साक्ष जगाला देण्यास मला आत्मिक बळ दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या