सामान्यकाळातील २१वा सप्ताह
शुक्रवार १ सप्टेंबर २०२३
म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही."
पवित्र मरियेच्या जन्मदिन नोव्हेना
देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. आपल्याला पवित्रतेचे जीवन जगण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे, म्हणूनच भविष्यातील जीवनामध्ये येण्याऱ्या आव्हानांना धैर्याने आणि चातुर्याने तसेच शहाणपणाने समोर जाण्यासाठी आपण सतत सावध आणि जागृत राहावयाचे आहे.
आजचे शुभवर्तमान आपल्याला देवाच्या अस्तीत्वाची, सामर्थ्याची, त्याच्या आशादायी वचनांची आणि सार्वकालिक जीवनाची जाणीव करून देत असताना सतत जागृत राहण्यासाठी आवाहन करीत आहे. आपण देवाला त्याच्या आज्ञेला, पाचारणाला तसेच जीवनात प्रार्थनेला प्राधान्य देवून देवाच्या भेटीसाठी सदैव तयार असावे म्हणून आपल्या जीवनावर चिंतन करूया..
पहिले वाचन : १ थेस्सलनिकाकरांस ४:१-८
वाचक : पौलचे थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"तुमचे पवित्रीकरण व्हावे अशी देवाची इच्छा ही आहे."
बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो आणि प्रभू येशूमध्ये बोध करतो की, तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले आणि तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांला दिल्या त्या तुम्हांला ठाऊक आहेत. कारण देवाची इच्छा आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे कामवासनेने नव्हे तर पवित्रतेने आणि अब्रूने तुम्हांतील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे. कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये, कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते आणि बजावलेही होते. देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.
First Reading : 1 Thessalonians 4:1-8
Brothers, we ask and urge you in the Lord Jesus, that as you received from us how you ought to walk and to please God, just as you are doing, that you do so more and more. For you know what instructions we gave you through the Lord Jesus. For this is the will of God, your sanctification: that you abstain from sexual immorality; that each one of you know how to control his own body in holiness and honour, not in the passion of lust like the Gentiles who do not know God, that no one transgress and wrong his brother in this matter, because the Lord is an avenger in all these things, as we told you beforehand and solemnly warned you. For God has not called us for impurity, but in holiness. Therefore whoever disregards this, disregards not man but God, who gives his Holy Spirit to you.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ९७:१-२,५-६,१०-१२
प्रतिसाद : अहो, नीतिमान जनहो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा.
१) परमेश्वर राज्य करतो, पृथ्वी उल्हास करो,
द्वीपसमूह हर्ष करो, ढग आणि अंधार
त्याच्या सभोवती आहेत, नीती आणि
न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.
२) परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर
पर्वत मेणाप्रमाणे वितळले.
आकाशाने त्याची नीती प्रकट केली,
सर्व लोकांनी त्याचा गौरव पाहिला.
३) वाइटाचा द्वेष करणारांवर परमेश्वर प्रीती करतो,
तो आपल्या भक्तांच्या जीवांचे रक्षण करतो
तो त्यांस दुर्जनांच्या हातातून सोडवतो.
४) नीतिमानांसाठी प्रकाश आणि जे सरळ
अंत:करणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.
अहो नीतीमान जनहो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा.
त्याच्या पवित्र नामाचे कृतज्ञतापूर्वक स्तवन करा.
Psalm 97:1 and 2b, 5-6, 10, 11-12
R Rejoice in the Lord, you just.
The Lord is king, let earth rejoice;
let the many islands be glad.
Justice and right are the foundation
of his throne. R
The mountains melt like wax
before the face of the Lord,
before the face of the Lord of all the earth.
The skies proclaim his justice; all peoples see his glory.R
The Lord loves those who hate evil;
he guards the souls of his faithful;
he sets them free from the wicked. R
Light shines forth for the just one,
and joy for the upright of heart.
Rejoice in the Lord, you just;
to the memory of his holiness give thanks. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
Acclamation:
Stay awake at all times, praying that you may have strength to stand before the Son of Man."
शुभवर्तमान मत्तय २५:१-१३
वाचक :मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला."
येशूने आपल्या शिष्यांना हा दाखला सांगितलाः “स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे होईल, त्या आपले दिवे घेऊन वराला सामोच्या जायला निघाल्या. त्यात पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपणांबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले आणि भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला आणि सर्वांना डुलक्या आल्या आणि झोप लागली. तेव्हा मध्यरात्री हाक आली की, पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपआपले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खानी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही दया, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले की, कदाचित आम्हांला आणि तुम्हांला पुरणार नाही, तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वत:करिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला, तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर लग्नाला आत गेल्या आणि दरवाजा बंद झाला. नंतर त्या दुसऱ्यांही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभो आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हांला नक्की" सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Matthew 25:1-13
At that time: Jesus told his disciples this parable: "Then the kingdom of heaven will be like ten virgins who took their lamps and went to meet the bridegroom. Five of them were foolish, and five were wise. For when the foolish took their lamps, they took no oil with them, but the wise took flasks of oil with their lamps. As the bridegroom was delayed, they all became drowsy and slept. But at midnight there was a cry, 'Here is the bridegroom! Come out to meet him.' Then all those virgins rose and trimmed their lamps: And the foolish said to the wise, 'Give us some of your oil, for our lamps are going out. But the wise answered, saying, 'Since there will not be enough for us and for you, go rather to the dealers and buy for yourselves! And while they were going to buy, the bridegroom came, and those who were ready went in with him to the marriage feast, and the door was shut. Afterwards the other virgins came also, saying, 'Lord, lord, open to us. But he answered, Truly, say to you, I do not know you.' Watch therefore, for you know neither the day nor the hour.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
जागृतता, तयारी, दक्षता, उत्सुकता, सावधान, चेतावनी, अपेक्षा आणि आशा या अशा गोष्टी आहेत ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या काही दाखल्यांद्वारे आपणाला स्वर्गाच्या राज्याचा मार्ग दाखवित आहेत. शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे वराला (प्रभूला) भेटावयास निघालेल्या त्या पाच कुमारींनी आपणांबरोबर दिवे घेतले पण तेल (प्रामाणिकपणा) मात्र घेतले नाही. हा त्यांचा मूर्खपणा दिसून येतो. प्रभू पुन्हा येणार आहे हे निश्चित आहे पण केव्हा आणि कसा आपणाला ठाऊक नाही. प्रभूला भेटण्यासाठी निघालेल्या त्या पाच मूर्ख कुमारीप्रमाणे नव्हे तर त्या पाच शहाण्या कुमारींसारखे आपल्या जीवनात प्रामाणिकपणा, नैतिकता व सदाचरण असणे गरजेचे आहे. म्हणून परमेश्वराने आपणाला दिलेले हे जे जीवन आहे ते अधिक सुंदर बनविण्यासाठी प्रभूने देलेल्या आज्ञांचे पालन करू या.
प्रार्थना :हे प्रभूयेशू पवित्रतेचे जीवन जगून सतत जागृत राहण्यास व तुला धैर्याने सामोरे जाण्यास आम्हाला सामर्थ्य व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या