Marathi Bible Reading | 22nd Sunday in ordinary Time | 3rd September 2023

 सामान्यकाळातील २२वा सप्ताह 

रविवार ०३ सेप्टेंबर  २०२३

“माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वत:चा त्याग करावा आणि आपला क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे.

 


“मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला "
काय लाभ?

जगातील क्षणभंगूर गोष्टीत गुंतून न पडता आपण आध्यात्मिकतेची कास धरावी. प्रभू येशू  सर्व शिष्यांना आत्मत्यागाचे आमंत्रण देत आहे. जगातील सर्व गोष्टी क्षणभंगूर असून त्या जगातच राहणार आहेत. आपला जीव म्हणजेच आत्मा हा सर्वकाळाच्या जीवनात जाणार आहे म्हणूनच आपण आपल्या आत्म्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी देवाची आपल्या जीवनातील इच्छा समजून घेऊन आत्मत्याग करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांच्या तारणासाठी वधस्तंभावरील मरण स्वीकारुन आत्मबलिदान केले.
वधस्तंभ हा ख्रिस्ती माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.  वधस्तंभा पासूनच प्रेम, दया, क्षमा, समेट आणि सेवेचा उगम झालेला आहे.  आत्मत्यागात आणि बलिदानात सर्वकाळचे जीवन सामावलेले आहे. आपण प्रभूला शरण जाऊ या, त्याचे अनुकरण करुन त्याच्या  पुनरुत्थानात व सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास कृपा मागू या.

✝️             

पहिले वाचन :यिर्मया  २०:७-९ 

वाचक :यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 "दिवसभर परमेश्वराचे वचन माझ्या निंदेला कारण झाले आहे."

हे परमेश्वरा, तू मला फसवले आणि मी फसलो, तू माझ्यापेक्षा प्रबळ असल्यामुळे विजयी झालास. मी दिवसभर हसण्याचा विषय झालो. जो तो माझा उपहास करतो. कारण मी बोलू लागलो की, जुलूम, लूट हे शब्द मला उच्चारावे लागतात आणि दिवसभर परमेश्वराचे वचन माझ्या निंदेला आणि अप्रतिष्ठेला कारण झाले आहे. मी म्हणालो, "मी त्याचे नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही," तेव्हा माझ्या हाडात कोंडलेला अग्नी जळत आहे जसे माझ्या हृदयाला झाले. मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते आवरेना.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Jeremiah 20:7-9

O Lord, you have deceived me, and I was deceived, you are stronger than I, and you have prevailed. I have become a laughing-stock all the day, everyone mocks me. For whenever I speak, I cry out, I shout, "Violence and destruction!" For the word of the Lord has become for me a reproach and derision all day long. If say, "I will not mention him, or speak any more in his name there is in my heart as it were a burning fire shut up in my bones, and I am weary with holding it in, and I cannot.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ६३:२, ३-४, ५-६,८-९
प्रतिसाद : हे माझ्या देवा, माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे. 
१ हे देवा, तू माझा देव आहेस,
 मी आस्थेने तुझा शोध करीन.
शुष्क, रुक्ष आणि निर्जल प्रदेशात 
माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला आहे, 
माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.

२ अशा प्रकारे तुझे बळ आणि वैभव पाहण्यास 
पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. 
तुझे वात्सल्य माझ्या प्राणाहून उत्तम आहे, 
माझे ओठ तुझे स्तवन करतील.

३. मी जिवंत आहे तोपर्यंत तुला असाच धन्यवाद देईन, 
तुझ्या नामाने मी आपले हात उभारीन.
 मज्जेने आणि मेदाने व्हावा तसा 
माझा जीव तृप्त होईल, 
माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील.

४ कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस, 
म्हणून तुझ्या पंखांच्या सावलीत मी आनंद करीन. 
मी तुझी कास धरली आहे,
तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो.


Psalm 63:2, 3-4, 5-6, 8-9

For you my soul is thirsting, O Lord, my God. 

O God, you are my God, at dawn I seek you;
for you my soul is thirsting. For you my flesh is pining
like a dry, weary land without water. R

I have come before you in the sanctuary,
 to behold your strength and your glory. 
Your loving mercy is better than life;
my lips will speak your praise. R

I will bless you all my life;
in your name I will lift up my hands.
My soul shall be filled as with a banquet; 
with joyful lips, my mouth shall praise you. R

For you have been my strength;
in the shadow of your wings I rejoice. 
My soul clings fast to you;
your right hand upholds me. R

दुसरे वाचन  रोम  १२:१-२
 वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
  "तुम्ही आपली शरीरे जिवंत यज्ञ म्हणून समर्पण करा.'
बंधुजनहो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नूतनीकरणाने स्वतः चे रूपांतर होऊ द्या.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद

Second Reading  :Romans 12:1-2

I appeal to you, brothers, by the mercies of God, to present your bodies as a living sacrifice, holy and acceptable to God, which is your spiritual worship. Do not be conformed to this world, but be transformed by the renewal of your mind, that by testing you may discern what is the will of God, what is good and acceptable and perfect.

This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ही भाकर जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
  आलेलुया!

Acclamation: 
 May the God of our Lord Jesus Christ enlighten the eyes of our hearts that we may know what is the hope to which he has called us.

शुभवर्तमान मत्तय   १६:२१-२७
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

"माझ्यामागे येण्याची कोणाला इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा. "

येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, मी यरुशलेमला जाऊन वडील, मुख्य याजक, आणि शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याला निषेध करून म्हणाला, “प्रभो, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.” तेव्हा तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, तर माणसाच्या गोष्टींकडे आहे."मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वत:चा त्याग करावा आणि आपला क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading : Matthew 16:21-27

At that time: Jesus began to show his disciples that he must go to Jerusalem and suffer many things from the elders and chief priests and scribes, and be killed, and on the third day be raised. And Peter took him aside and began to rebuke him, saying, "Far be it from you, Lord! This shall never happen to you." But he turned and said to Peter, "Get behind me, Satan! You are a hindrance to me. For you are not setting your mind on the things of God, but on the things of man. Then Jesus told his disciples, "If anyone would come after me, let him deny himself and take up his cross and follow me. For whoever would save his life will lose it, but whoever loses his life for my sake will find it. For what will it profit a man if he gains the whole world and forfeits his soul? Or what shall a man give in return for his soul? For the Son of Man is going to come with his angels in the glory of his Father, and then he will repay each person according to what he has done.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:  परमेश्वराचे मार्ग मानवाच्या मार्गापेक्षा व त्याच्या योजना मानवाच्या योजनांपेक्षा भिन्न असतात, आजच्या पहिल्या वाचनात (यिर्मया २०:७-९) यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराचा शब्द घोषित करण्याची उत्कंठा लागलेली दिसून येते. परमेश्वराच्या शब्दामुळे सर्वत्र शांती पसरेल असे त्याला वाटत होते. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याला सर्वत्र हिंसा आणि विनाश होत असल्याचे दिसून आले. तरीही तो परमेश्वराचे वचन घोषवित राहतो. हाच परमेश्वराचा शब्द आपल्याला ह्या जगाशी समरस होण्यापेक्षा नव्या युगासाठी आपल्या मनाचे नूतनीकरण करण्याचे आवाहन करीत असल्याचे दुसऱ्या वाचनात आपल्याला सांगण्यात आलेले आहे. (रोम १२: १-२ ). मात्र आपल्या मनात येणारे विचार परमेश्वरांकडून येतात की, सैतानाकडून येतात ह्याची खातरजमा माणसाने सतत करायची असते असे येशू आजच्या शुभवर्तमानात (मत्तय १६ : २१-२७) आपल्याला शिकवितो. पेत्राने येशू हा ख्रिस्त आहे, अशी कबुली देताच "मांस आणि रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रकट केले आहे" असे येथूने जाहीर केले; आणि त्याला भक्कम खडकाची उपमा दिली. मात्र मसिहा (ख्रिस्त) म्हणून येशूला जे दुःख सोसावे लागणार होते त्याचे सुतोवाच करताच पेत्र म्हणाला, “प्रभुजी, आपणावर दया असो, आपल्याबाबतीत असे होणारच नाही." इथेही येशूने सैतानाची वाणी ओळखली आणि त्याने पेत्राला "आपल्या मार्गातील धोंड" अशी उपमा दिली. 
आत्मपरीक्षण : परमेश्वराच्या योजना व त्याची वाणी ओळखून माझ्या जीवनाचे नूतनीकरण करण्यासाठी मी कोणकोणती पावले उचलत असतो ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, जीवनातील सर्व वधस्तंभ स्वीकारण्यास व अंत:करणापासून तुला अनुसरण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या