सामान्यकाळातील २५वा सप्ताह
गुरुवार २८ सप्टेंबर २०२३
“मी योहानचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण?”
✝️
संत वेन्सेस्लॉस
राजा, रक्तसाक्षी (९०७-९२९)
बोहेमिया (झेकोस्लाव्हाकिया) येथे लुडमिला नावाची एक साध्वी स्त्री राहात होती. तिच्यामध्ये अतिपवित्र साक्रामेंताविषयी नितांत आदर व भक्तिभाव होता. तिने आपला नातू वेन्सेस्लॉस ह्या राजपुत्रामध्ये खऱ्या ख्रिस्ती धर्माविषयी आवड व तळमळ उत्पन्न केली. परंतु त्याचे ख्रिस्ती वडील मरण पावल्यानंतर त्याच्या आईने पुन्हा एकदा मूर्तिपूजेला प्रोत्साहन द्यावयास सुरुवात केली. तिने प्रथम जर्मन मिशनऱ्यांना आपल्या राज्याबाहेर हाकलून दिले. तरुण राजपुत्र वेन्सेस्लॉस ह्याच्या हातून राजसत्ता हिसकावून घेतली आणि लुडमिला हिचा गळा दाबून खून केला.
अशा क्रूर स्त्रीच्या राज्यकारभाराला लोकांकडून कडवा विरोध झाला. त्यांनी राजपुत्र वेन्सेस्लॉस ह्याला पाठिंबा देऊन त्याच्या आईच्या हातून राजसत्ता हस्तगत केली. राज्यपदावर येताच राजा वेन्सेस्लॉस ह्यांनी जर्मन धर्मगुरूंना पुन्हा आपल्या राज्यात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी बोलाविले. त्यांना भरपूर प्रोत्साहन दिले व बोहेमियाचा धार्मिक, नैतिक आणि सांस्कृतिक दर्जा उंचावला. त्याला हृदयाची कोमलता, धैर्य व उत्साह ह्यांची अनमोल अशी देणगी देवाकडून मिळालेली होती.
सम्राट ओटो पहिला ह्यांच्याकडून त्याला 'बोहेमियाचा राजा' हे पद मिळाले होते. परंतु बऱ्याचशा सरदारांनी त्याच्या राजकीय धोरणांना विरोध केला व त्याचा फायदा त्याच्या आईने उठविला. तिने वेन्सेस्लॉसला सिंहासनावरून बाजूला सारून त्याच्या जागी आपला दुसरा मुलगा बोलेस्लाव ह्याला बसविले.
दररोज अतिपवित्र साक्रामेंतासमोर गुडघे टेकून प्रार्थना करणे ही वेन्सेस्लॉस ह्याची सवय सर्वांना परिचित होती. एकदा तो असाच आल्तबुन्झलाव चर्चमधून प्रार्थना करून बाहेर पडत असताना त्याच्या भावाने त्याला चर्चच्या उंबरठ्यावरच ठार मारले.
संत वेन्सेस्लॉस हा बोहेमियाचा आश्रयदाता संत मानला जातो.
✝️
पहिले वाचन : हाग्गय १ : १-८
वाचक :हाग्गय या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मंदिर पुन्हा बांधा, त्याने मी प्रसन्न होईन."
दारियस राजाच्या कारकिर्दीत दुसऱ्या वर्षी, सहाव्या महिन्याच्या प्रतिपदेस यहुदाचा प्रांताधिकारी शल्तीएल याचा पुत्र जेरुब्बाबेल आणि मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यांला हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे : "सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही." तेव्हा परमेश्वराचे वचन हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे प्राप्त झाले ते असे: "इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते, तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही, तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हांला ऊब येत नाही, मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो."
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, “तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा आणि मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईन आणि माझा महिमा प्रकट करीन, असे परमेश्वर म्हणतो."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Haggai 1:1-8
In the second year of Darius the king, in the sixth month, on the first day of the month, the word of the Lord came by the hand of Haggai the prophet to Zerubbabel the son of Shealtiel, governor of Judah, and to Joshua the son of Jehozadak, the high priest: "Thus says the Lord of hosts: These people say the time has not yet come to rebuild the house of the Lord." Then the word of the Lord came by the hand of Haggai the prophet, "Is it a time for you yourselves to dwell in your panelled houses, while this house lies in ruins? Now, therefore, thus says the Lord of hosts: Consider your ways. You have sown much, and harvested little. You eat, but you never have enough; you drink, but you never have your fill. You clothe yourselves, but no one is warm. And he who earns wages does so to put them into a bag with holes. Thus says the Lord of hosts: Consider your ways. Go up to the hills and bring wood and build the house, that I may take pleasure in it and that I may be glorified, says the Lord."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १५०:१-९
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे.
१). परमेश्वराचे स्तवन करा.
नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा,
भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा.
इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो.
सियोनची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हासोत.
२) ती नृत्य करीत त्याच्या नामाचे स्तवन करोत,
डफ आणि वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत.
कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे.
तो नम्रजनांना तारणाने सुशोभित करतो.
३) भक्त गौरवामुळे उल्हासोत,
ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत.
परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो,
जे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल.
परमेश्वराचे स्तवन करा.
Psalm 149: 1b-2, 3-4, 5-6a and 9b
The Lord takes delight in his people
Sing a new song to the Lord,
his praise in the assembly of the faithful.
Let Israel rejoice in its Maker;
let Sion's children exult in their king. R
Let them praise his name with dancing,
and make music with timbrel and harp.
For the Lord takes delight in his people;
he crowns the poor with salvation. R
Let the faithful exult in glory,
and rejoice as they take their rest.
Let the praise of God be in their mouths.
This is an honour for all his faithful. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्याद्वारे जीवन मिळवून दिले.
आलेलुया!
Acclamation:
I am the way, and the truth, and the life, says the Lord no one comes to the Father except through me.
.
शुभवर्तमान लूक ९:७-९
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी योहानचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण ?"
घडत असलेल्या सर्व गोष्टीविषयी मांडलिक हेरोदने ऐकले आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला, कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक म्हणत होते, कित्येक एलिया प्रकट झाला आहे असे म्हणत होते आणि कित्येक प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे असे म्हणत होते. पण हेरोद म्हणाला, “मी योहानचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण?” म्हणून त्याला पाहण्याची तो संधी पाहत होता..
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Luke 9:7-9
At that time: Herod the tetrarch heard about all that was happening, and he was perplexed, because it was said by some that John had been raised from the dead, by some that Elijah had appeared, and by others that one of the prophets of old had risen. Herod said, "John beheaded, but who is this about whom hear such things?" And he sought to see him.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
हेरोदाने योहानाचा शिरच्छेद केलेला आणि मरण पावलेला योहान पुन्हा येऊच शकत नाही याची हेरोदाला पूर्ण खात्री होती. पण येशू विषयी गावोगावी चाललेली चर्चा ऐकून हेरोद मात्र गोंधळात पडलेला. तो चिंताग्रस्त झालेला. अशा अवस्थेत हेरोद येशूला पाहण्याचा प्रयत्न करतो पण खऱ्या मनाने नव्हे तर त्याच्यात निर्माण झालेल्या त्या भीतीमुळे. येशूला आपण पाहावे, येशूशी आपली भेट व्हावी किंवा त्याच्या नाते-संबंधात आपली वाढ व्हावी असे जर आपल्यालावाटत असेल तर ही तीव्र इच्छा आपल्या मनातून व्यक्त व्हायला हवी. कारण खऱ्या शिष्यत्वाची किंवा विश्वासाची प्रार्थना म्हणजे देवाला पाहणे. आणि त्याला पाहण्यासाठी आपले शरीर, आत्मा व मन हेरोदासारखे गोंधळलेले नसून ते नितल, शुद्ध व साफ असावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तूच मार्ग व जीवन आहेस, आम्हाला तुझ्या वचना प्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या