Marathi Bible Reading | 26th November 2023| 34nd Sunday in ordinary Time |

<

 सामान्यकाळातील ३४ वा रविवार 

२६ नोव्हेंबर २०२३

ज्याअर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्याअर्थी ते मला केले नाही. 

Truly, I say to you, as you did not do it to one of the least of these, you did not do it to me.


CHRIST THE KING -

 ख्रिस्तसभा आज प्रभू येशू विश्वाचा राजा हा सण साजरा करीत आहे.

अराजकता, अशांतता व लढाया ह्यामुळे सामान्य जनांचे जीवन राज्यकर्ते उधस्त करीत आहेत. हे राजे व राज्यकर्ते जागतिक आनंदात रममाण होत आहेत हे  राज्य क्षणभंगूर आणि विनाशी आहे. 
प्रभू येशू ज्या राज्याची स्थापना करण्यास ह्या जगात आला ते सार्वकालिक अविनाशी आणि सर्वकाळ टिकणारे आहे. ख्रिस्तसभा आज प्रभू येशू विश्वाचा राजा हा सण साजरा करीत आहे.  सर्वांसाठी न्यायाचा दिवस प्रभू येशू वैभवाने पुन्हा येणार आहे आणि वैभवशाली राजासनावर बसून तो सर्वांचा न्याय करणार आहे. 
 प्रभू येशू स्पष्ट करीत आहे की, आपण भुकेल्यांस अन्न द्यावे, तान्हेल्यास पाणी द्यावे, परकियांस आसरा द्यावा, उघड्यास वस्त्र द्यावे, आजाऱ्यांच्या भेटीस जावे व कैदेत असलेल्यांना धीर द्यावा, असे केल्यानेच आपण प्रभू येशूच्या राज्याचे वारसदार बनणार आहोत. | 
✝️             

पहिले वाचन : यहेज्केल  ३४:११-१२.१५-१७
वाचक :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"माझ्या कळपा, तुमचे असे होईल, मी मेंढरामेंढरांमध्ये निवाडा करीन."

"प्रभू परमेश्वर म्हणतोः पाहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्याला मी हुडकीन. जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यांना हुडकतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अभ्राच्छादित व अंध:काराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणांतून त्यांना वाचवून आणीन. मी स्वतः माझा कळप चारीन आणि त्यांची निजण्या-बसण्याची सोय करीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
मी हरवलेल्यांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन, पण लठ्ठ आणि बलिष्ठ यांचा मी नाश करीन, त्यांना मी यथान्याय चारीन.
“प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या कळपा, तुमचे असे होईल, मी मेंढरामेंढरांमध्ये, एडक्याबोकडांमध्ये निवाडा करीन."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Ezekiel 34:11-12, 15-17

"Thus says the Lord God: Behold, I myself will search for my sheep and will seek them out. As a shepherd seeks out his flock when he is among his sheep that have been scattered, so will I seek out my sheep, and I will rescue them from all places where they have been scattered on a day of clouds and thick darkness. I myself will be the shepherd of my sheep, and I myself will make them lie down, declares the Lord God. I will seek the lost, and I will bring back the strayed, and I will bind up the injured, and I will strengthen the weak, and the fat and the strong I will destroy. I will feed them in justice. "As for you, my flock, thus says the Lord God: Behold, I judge between sheep and sheep, between rams and male goats."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  २२:१-२अ, २ब-३,५-६
प्रतिसाद :  परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.

१ परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, 
मला काही उणे पडणार नाही. 
तो मला हिरव्यागार कुरणात

२ तो मला संथ पाण्यावर नेतो, 
तो माझा जीव ताजातवाना करतो, 
तो आपल्या नामासाठी मला नीतीमार्गाने चालवतो.

३ तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस. 
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, 
माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.

४ खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस
 मला कल्याण आणि दया ही लाभतील 
आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.


Psalm 23:1-2a, 2b-3, 5, 6

The Lord is my shepherd; there is nothing I shall want. 

The Lord is my shepherd;
 there is nothing I shall want. 
Fresh and green are the pastures 
where he gives me repose. 

Near restful waters he leads me;
 he revives my soul. 
He guides me along the right path, 
for the sake of his name.

You have prepared a table before me
hing I shall want.
in the sight of my foes. 
My head you have anointed with oil; 
my cup is overflowing. R 

Surely goodness and mercy shall follow me
all the days of my life. 
In the Lord's own house shall I dwell
 for length of days unending.


दुसरे वाचन  करिंथकरांस पहिले पत्र १५:२०-२६.२८
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"देव सर्वांना सर्वकाही व्हावा अशा हेतूने तो देवपित्याला राज्य सोपवून देईल."

ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यांतले प्रथमफळ असा आहे. मनुष्याच्याद्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्याद्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे, कारण जसे आदाममध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. प्रथम ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी, नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार आणि सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याकडे राज्य सोपवून देईल. कारण आपल्या पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. त्याच्या अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद

Second Reading 1 Corinthians 15:20-26, 28

Brethren: In fact Christ has been raised from the dead, the first fruits of those who have fallen asleep. For as by a man came death, by a man has come also the resurrection of the dead. For as in Adam all die, so also in Christ shall all be made alive. But each in his own order: Christ the first fruits, then at his coming those who belong to Christ. Then comes the end, when he delivers the kingdom to God the Father after destroying every rule and every authority and power. For he must reign until he has put all his enemies under his feet. The last enemy to be destroyed is death. When all things are subjected to him, then the Son himself will also be subjected to him who put all things in subjection under him, that God may be all in all.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
प्रभूच्या नामाने येत आहे तो धन्य! आमचा पूर्वज दावीद ह्याचे राज्य सुवंदित असो.
  आलेलुया!

Acclamation: Blessed is he who comes in the name of the Lord! Blessed is the coming kingdom of our father David!


शुभवर्तमान मत्तय २५:३१-४६ 
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  
"मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल आणि तो मनुष्यांना एकमेकांपासून वेगळे करील."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हांकरिता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, प्रभो आम्ही तुम्हांला केव्हा भुकेले पाहून खायला दिले? केव्हा तान्हेले पाहून प्यायला दिले ? तुम्हांला परके पाहून केव्हा घरात घेतले ? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले ? आणि तुम्हांला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो? तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला नक्की सांगतो, की, ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्याअर्थी ते मला केले आहे.
मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, अहो, शापग्ग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान आणि त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी आणि बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही, त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभो, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही? तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला नक्की सांगतो की, ज्याअर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्याअर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगायला जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगायला जातील.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Matthew 25:31-46

At that time: Jesus said to his disciples, "When the Son of Man comes in his glory, and all the angels with him, then he will sit on his glorious throne. Before him will be gathered all the nations, and he will separate people one from another as a shepherd separates the sheep from the goats. And he will place the sheep on his right, but the goats on the left. Then the King will say to those on his right, 'Come, you who are blessed by my Father, inherit the kingdom prepared for you from the foundation of the world. For I was hungry and you gave me food, I was thirsty and you gave me drink, I was a stranger and you welcomed me, I was naked and you clothed me, I was sick and you visited me, I was in prison and you came to me. Then the righteous will answer him, saying, 'Lord, when did we see you hungry and feed you, or thirsty and give you drink? And when did we see you a stranger and welcome you, or naked and clothe you? And when did we see you sick or in prison and visit you?" And the King will answer them, Truly, I say to you, as you did it to one of the least of these my brothers, you did it to me." "Then he will say to those on his left, 'Depart from me, you cursed, into the eternal fire prepared for the devil and his angels. For I was hungry and you gave me no food, I was thirsty and you gave me no drink, I was a stranger and you did not welcome me, naked and you did not clothe me, sick and in prison and you did not visit me. Then they also will answer, saying, "Lord, when did we see you hungry or thirsty or a stranger or naked or sick or in prison, and did not minister to you?" Then he will answer them, saying, Truly, I say to you, as you did not do it to one of the least of these, you did not do it to me. And these will go away into eternal punishment, but the righteous into eternal life."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:  ख्रिस्तसभा आज प्रभू येशू विश्वाचा सम्राट, राजांचा राजा याचा सोहळा साजरा करीत आहे. आजच्या शास्रपाठातून आपल्याला येशू ख्रिस्ताचे आगळे वेगळे राजेपद आपल्यासमोर मांडण्यात आलेले आहे. त्याचे तेज व वैभव हे स्वर्गीय आहे. एक असा राजा जो देव व प्रभू असून मानव झाला. मानवजात मिळविण्यासाठी त्याचे राज्यासन व पदासन हे वधस्तंभावरून घोषित करतो. आजचे पहिले वाचन यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले असून इथे इस्रायलमधील अधिपती जे जनसामान्याची हानी  करतात त्यांच्या बद्दल सांगितले आहे. इस्त्रायल मधील अधिपती हे अतिलोभी व स्वार्थी होते. आपल्या प्रजेची त्यांना जराही काळजी नव्हती. जे दुबळे होते त्यांच्यावर जुलूम करून त्यांनी सत्ता आणि धन मिळविले होते. याठिकाणी देव आपल्या मेंढरांचा बचाव करील व त्यांच्या संरक्षणासाठी दाविद याला मेंढपाळ नेमील असा सल्ला दिला गेला आहे. शुभवर्तमानात प्रभू म्हणतो, न्यायाचा दिवस जवळ आहे. न्याय होणार आहे. अंधाराचा आणि प्रकाशाचा, शेरडांचा व मेंढरांचा, गरिबांचा आणि श्रीमंतांचा, खऱ्या भक्तांचा व ढोंग्याचा असा राजा आपणांस त्यांच्या राजाचा घोषवारा करतो. “ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे.” या संपूर्ण उताऱ्यात दयेच्या कृत्यांला अधिक प्राधान्य देण्यात आलेले आहे. ज्यांच्यावर दया करतो ते कनिष्ठ बंधूपैकी एक असा निकष होतो. कनिष्ठ म्हणजे अगदी लहान, लहानातील एक असा अर्थ होतो. शेवटच्या न्यायाच्या दिवशी येशू जो विश्वाचा सम्राट आहे तो योग्य न्याय करणार आहे. प्रभूच्या राज्यात मी माझ्या कनिष्ठ बंधूसाठी दयेची कृत्ये करीत आहे का?

प्रार्थना : हे प्रभू येशू तुझे विश्वासु, कर्तदक्ष व एकनिष्ठ अनुयायी बनण्यास व फलदायी जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या