सामान्यकाळातील ३३वा सप्ताह
शुक्रवार २४ नोव्हेंबर २०२३
"माझे घर प्रार्थनेचे घर होईल, असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे."
" 'My house shall be a house of prayer, but you have made it a den of robbers."
✝️
✝️
पहिले वाचन : १ मक्काबी ४: ३६-३७,५२-५९
वाचक :मक्काबीच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“लोकांनी वेदीसमर्पणाचा सण साजरा केला आणि मोठ्या आनंदाने होमयज्ञ अर्पण केले."
यहुदा व त्याचे भाऊ म्हणाले, “पाहा, आपले शत्रू नष्ट झाले आहेत. चला आपण वर जाऊ." मग सर्व सैन्य गोळा झाले आणि ते सियोन पर्वतावर गेले. ग्रीक शकाच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या वर्षी नवव्या महिन्याच्या म्हणजेच किस्लेव महिन्याच्या पंचविसाव्या तारखेला अगदी सकाळी ते उठले आणि धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे होमयज्ञासाठी नव्याने बांधलेल्या वेदीवर यज्ञ अर्पण केला. त्याच ऋतूच्या त्याच दिवशी परराष्ट्रीयांनी वेदीस भ्रष्ट केले होते. त्यांनी भावगीते गाऊन, सतार, बासरी आणि टाळ या वाद्यांच्या घोषात वेदीची पुन्हा प्रतिष्ठापना केली. त्यावेळी सर्व लोक पालथे पडले. त्यांनी उपासना केली आणि त्याची भरभराट करणाऱ्या स्वर्गीय प्रभूला धन्यवाद दिले. आठ दिवसपर्यंत त्यांनी वेदी समर्पणाचा सण साजरा केला आणि मोठ्या आनंदाने होमयज्ञ व सुटका झाल्याबद्दलचा यज्ञ अर्पून स्तुती गायिली. मंदिरांच्या समोरील भाग सोन्याचे मुकुट आणि लहान लहान ढाली लावून सजवला. फाटके पुन्हा बसवली, पुरोहितांच्या खोल्या पुन्हा बांधल्या व त्यांना दारे लावली. लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही, अशा प्रकारे परराष्ट्रीयांकडून झालेला अपमान त्यांनी भरून काढला.
यहुदा, त्याचे बंधू आणि इस्राएलच्या सर्व मंडळींनी एकमते ठरवले की, प्रतिवर्षी ह्याच ऋतूत म्हणजे किस्लेव महिन्याच्या पंचविसाव्या तारखेपसून तर पुढील आठ दिवसापर्यंत वेदीच्या समर्पणाचा उत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करावा.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :1 Maccabees 4:36-37, 52-59
In those days: Judas and his brothers said, "Behold, our enemies are
crushed; let us go up to cleanse the sanctuary and dedicate it." So all the army assembled and they went up to Mount Sion, Early in the morning on the twenty-fifth day of the ninth month, which is the month of Chislev, in the one hundred forty-eighth year, they rose and offered sacrifice, as the law directs, on the new altar of whole burnt offering that they had built. At the very season and on the very day that the Gentiles had profaned it, it was dedicated with songs and harps and lutes and cymbals. All the people fell on their faces and worshipped and blessed heaven, who had prospered them. So they celebrated the dedication of the altar for eight days and offered whole burnt offerings with gladness; they offered a sacrifice of deliverance and praise. They decorated the front of the temple with golden crowns and small shields; they restored the gates and the chambers for the priests and furnished them with doors. There was very great gladness among the people, and the reproach of the Gentiles was removed. Then Judas and his brothers and all the assembly of Israel determined that every year at that season the days of the dedication of the altar should be observed with gladness and joy for eight days, beginning with the twenty-fifth day of the month of Chislev.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १ इतिहास २९ : १०- १२बकड
प्रतिसाद :प्रभो, आम्ही तुझ्या प्रतापी नामाची प्रशंसा करतो.
१) हे परमेश्वरा, आमचा पिता इस्राएल याच्या देवा,
तू सदासर्वकाळ धन्य आहेस.
२) हे परमेश्वरा,
महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि वैभव ही
तुझीच आहेत. आकाशात आणि
पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच आहे.
३) हे परमेश्वरा, राज्यही तुझेच आहे,
तू सर्वांहून श्रेष्ठ आणि उन्नत आहेस.
धन आणि सन्मान तुझ्यापासून प्राप्त होतात.
४) तू सर्वांवर प्रभूत्व करतोस, सामर्थ्य
आणि पराक्रम तुझ्याच हाती आहेत,
लोकांना थोर करणे आणि सामर्थ्य देणे
हे तुझ्याच हाती आहे
Psalm 1 Chronicles 29:10b, 11abc, 11d-12a, 12bcd
We praise your glorious name, O Lord.
Blessed are you, O Lord,
the God of Israel our father,
for ever and ever. R
Yours, O Lord, is the greatness
and the power
and the glory and the victory
and the majesty,
for all that is in the heavens
and in the earth is yours.
Yours is the kingdom, O Lord. R
You are exalted as head above all.
Both riches and honour come from you.
You rule over all.
In your hand are power and might,
and in your hand it is to make great
and to give strength to all. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे,
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
आलेलुया!
Acclamation:
My sheep hear my voice, says the Lord; and I know them, and they follow me.
शुभवर्तमान लुक १९:४५-४८
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझे घर तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे. '
येशू मंदिरात गेला आणि त्यात जे विक्री करत होते त्यांना तो बाहेर घालवू लागला आणि त्यांना म्हणाला, "माझे घर प्रार्थनेचे घर होईल, असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे."
तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे. पण मुख्य याजक, शास्त्री आणि लोकांचे पुढारी हे त्याचा घात करायला पाहत असत. तरी काय करावे हे त्यांना सुचेना, कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Luke 19:45-48
At that time: Jesus entered the temple and began to drive out those who sold, saying to them, "It is written, 'My house shall be a house of prayer, but you have made it a den of robbers." And he was teaching daily in the temple. The chief priests and the scribes and the principal men of the people were seeking to destroy him, but they did not find anything they could do, for all the people were hanging on his words.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: एका राजाने आपल्या राज्यात ऐलान केले की उद्या सकाळी सात वाजता राज्यातील सर्व लोक राजवाड्यात येऊन राजवाड्यातील ज्या वस्तूला प्रथम हात लावतील ती वस्तू त्यांची होऊन जाईल. सर्व लोकांनी रात्रभर विचार केला. सकाळ होताच सर्वजण राजवाड्यात धावले आणि कोण राजवाड्यातील सोने- नाण्याला स्पर्श करीत होते, तर कोण हिरे जवाहरात, तर कोण राजेशाही कपड्यांना, कोण राजवाड्यातील महागड्या वस्तूंना, तर कोण राजवाड्यातील संपत्तीला, त्यामध्ये एक चिमुकली मुलगी हळूहळू चालत गेली आणि सिंहासनावर बसलेल्या राजाच्या मांडीवर जाऊन बसली. तेव्हा सर्वजण एक क्षणभर स्तब्ध झाले. सर्वांना आश्चर्य वाटले. हे आम्हाला कसे सुचले नाही. कारण राजा ज्याचा होणार त्याला राजाकडे असलेले सर्वकाही मिळणार. प्रार्थनेमध्ये देखील आपले असेच होते. प्रार्थना ही वस्तू मिळविण्यासाठी नाही तर परमेश्वर मिळविण्यासाठी आहे. परमेश्वराला स्पर्श करण्यासाठी आहे. ख्रिस्ताने शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे आपणही प्रार्थनेला व्यवहारच समजतो. प्रार्थनेमध्ये आपण फक्त वस्तूच मागत असतो. पण मुळात प्रार्थना ही वस्तू प्राप्त करण्यासाठी नाही तर परमेश्वर प्राप्त करण्यासाठी आहे.
प्रार्थना: हे प्रभू परमेश्वरा, तुला शुद्ध अंतःकरणाने स्वीकारण्यास व तुझ्याशी एकरुप होण्यास मला कृपा दे,आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या