उपवास काळातील दुसरा रविवार
दि. २५ फेब्रुवारी २०२४
"हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका."
"This is my beloved Son; listen to him."
✝️
✝️
"हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका."
✝️
परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एक पुत्राचे होमार्पण मागितले तरी आब्राहम डगमगला नाही. देवाच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे देवाने आब्राहमाला आशिर्वादित करुन श्रद्धेचा महान आदर्श व राष्ट्र त्याच्याद्वारे निर्माण केले.
. प्रभू येशूच्या रुपांतराचे प्रकटीकरण शिष्यांना परमेश्वराच्या स्वर्गीय वैभवाचे दर्शन घडविणारे आहे. आज परमेश्वर आपल्या सर्वांना आवाहन पूर्वक सांगत आहे, 'ह्याचे (येशूचे) तुम्ही ऐका. ' प्रभू येशूचे ऐकणे म्हणजेच त्याची शिकवण, त्याची वचने व त्याची आज्ञा आचरणात आणणे होय. प्रभू येशूच्या आज्ञेप्रमाणे आचरण करणारे सर्वजण देवाचा प्रिय पुत्र व कन्या बनत असतात. प्रभू येशू स्वत: अति पवित्र ख्रिस्तशरीर साक्रामेंताद्वारे आपल्या जीवनात येत असतो. त्याच्या पवित्र साक्रामेंताद्वारे आपण त्याच्याशी एकरुप होऊन त्याच्या रुपांतराचे आपण साक्षीदार बनू शकतो.
आपली श्रद्धा आब्राहमासारखी दृढ असावी, आपण संत पौलासारखे सुवार्तेचे साक्षीदार बनावे आणि रुपांतरित जीवन जगून ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यास परमेश्वराकडे प्रेरणा व कृपा मागू या.
पहिले वाचन :उत्पत्ती २२:१-२,९-१३.१५-१८
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
देवाने आब्राहामला कसोटीस लावले, त्याने “आब्राहाम!" अशी हाक मारली. तेव्हा आब्राहाम म्हणाला, "काय आज्ञा ?" देव म्हणाला, "तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर." देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले. मग आब्राहामने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, “आब्राहाम, आब्राहाम!" तो म्हणाला, "काय आज्ञा ?" मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको; कारण तू "आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलालासुद्धा माझ्यापासून राखून ठेवले नाही, यावरून तू देवाला भिऊन चालणार आहेस हे मला कळले." तेव्हा आब्राहामने दृष्टी वर करून पाहिले, इतक्यात आपल्यामागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग आब्राहामने तो एडका घेऊन आपल्या पुत्राऐवजी अर्पण केला.परमेश्वराच्या दूताने आकाशातून आब्राहामला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, "परमेश्वर म्हणतो, मी स्वत:ची शपथ घेऊन सांगतो की, तू हे कृत्य केलेस. आपल्या मुलाला आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस. यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूची हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकलास म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील."
First Reading :Genesis 22:1-2.9a.10-13.15-18
In those days: God tested Abraham and said to him, "Abraham!" And he said, "Here I am." He said, "Take your son, your only son Isaac, whom you love, and go to the land of Moriah, and offer him there as a burnt offering on one of the mountains of which I shall tell you." When they came to the place of which God had told him, Abraham reached out his hand and took the knife to slaughter his son. But the angel of the LORD called to him from heaven and said, "Abraham, Abraham!" And he said, "Here I am." He said, "Do not lay your hand on the boy or do anything to him, for now I know that you fear God, seeing you have not withheld your son, your only son, from me." And Abraham lifted up his eyes and looked, and behold, behind him was a ram, caught in a thicket by his horns. And Abraham went and took the ram and offered it up as a burnt offering instead of his son. And the angel of the LORD called to Abraham a second time from heaven and said, "By myself I have sworn, declares the LORD, because you have done this and have not withheld your son, your only son, I will surely bless you, and I will surely multiply your offspring as the stars of heaven and as the sand that is on the seashore. And your offspring shall possess the gate of his enemies, and in your offspring shall all the nations of the earth be blessed, because you have obeyed my voice."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११६:१०,१५-१९
प्रतिसाद :जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन.
१) "मी फार पीडित आहे" असे मी म्हणतो तरी देवावर माझी श्रद्धा आहे. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे.
२) हे परमेश्वरा, मी दास आहे. खरोखर मी तुझा दास आहे. तू माझी बंधने सोडली आहेत. मी तुला उपकारस्मरणाचा यज्ञ अर्पीन मी तुझ्या नावाने हाक मारीन.
३) मी परमेश्वराला केलेले नवस त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात, हे येरुशलेमा, तुझ्यामध्ये मी ते फेडीन.
Psalm 116:10 and 15, 16-17, 18-19 (9)
I will walk in the presence of the Lord in the land of the living.
I trusted, even when I said, "I am sorely afflicted."
How precious in the eyes of the Lord
is the death of his faithful..
Your servant, Lord, your servant am I,
the son of your handmaid;
you have loosened my bonds.
A thanksgiving sacrifice I make;
I will call on the name of the Lord. R.
My vows to the Lord I will fulfil
before all his people,
in the courts of the house of the Lord,
in your midst, O Jerusalem.
दुसरे वाचन :रोमकरांस पत्र ८:३१-३४
वाचक :पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
बंधूजनहो, देव आपणांला अनुकूल असल्यास आपणांला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वत:च्या पुत्राला राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही ? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील ? देवच नीतिमान ठरविणारा आहे तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे.
Second Reading:
Romans 8:31b-34
Brethren: If God is for us, who can be against us? He who did not spare his own Son but gave him up for us all, how will he not also with him graciously give us all things? Who shall bring any charge against God's elect? It is God who justifies. Who is to condemn? Christ Jesus is the one who died-more than that, who was raised-who is at the right hand of God, who indeed is interceding for us.
जयघोष
तेजस्वी मेघातून पित्याची वाणी ऐकू आली, "हा माझा प्रिय पुत्र आहे. ह्याचे तुम्ही ऐका."
Acclamation: .
From a bright cloud the Father's voice is heard: this is my beloved Son, listen to him.
शुभवर्तमान मार्क ९:२-१०
वाचक : मार्क लिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हा माझा प्रिय पुत्र आहे."
येशूने पेत्र, याकोब व योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्याच्यादेखत त्याचे रुपांतर झाले. त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरी शुभ्र झाली की तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परिटाला शक्य नाही. तेव्हा मोशेसह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला. ते येशूबरोबर संभाषण करीत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, "गुरुजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. तर आम्ही तीन मंडप उभारू. आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक." काय बोलावे हे त्याला सुचले नाही. कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली "हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका." मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले पण येशूशिवाय त्यांना आपणाजवळ आणखी कोणी दिसले नाही.
नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका. हे बोलणे मनात ठेवून मृतांमधून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याविषयी ते एकमेकांस विचारू लागले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Mark 9:2-10
At that time: Jesus took with him Peter and James and John, and led them up a high mountain by themselves. And he was transfigured before them, and his clothes became radiant, intensely white, as no one on earth could bleach them. And there appeared to them Elijah with Moses, and they were talking with Jesus. And Peter said to Jesus, "Rabbi, it is good that we are here. Let us make three tents, one for you and one for Moses and one for Elijah." For he did not know what to say, for they were terrified. And a cloud overshadowed them, and a voice came out of the cloud, "This is my beloved Son; listen to him." And suddenly, looking around, they no longer saw anyone with them but Jesus only. And as they were coming down the mountain, he charged them to tell no one what they had seen, until the Son of Man had risen from the dead. So they kept the matter to themselves, questioning what this rising from the dead might mean.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: परमेश्वर अब्राहामची परीक्षा पाहातो. अब्राहामला त्याचा एकुलता एक पुत्र, त्याचा आवडता पुत्र ह्याचा बळी देण्यास सांगण्यात येते. अब्राहाम पूर्णपणे ह्या कसोटीला उतरतो आणि आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी त्याला घेऊन मोरीयातील डोंगरावर जातो.परमेश्वरावरील ही अब्राहामची निष्ठा आणि श्रद्धा. अब्राहामच्या ह्या कृतीमध्ये परमेश्वर पिता आपल्या एकुलत्या एक पुत्राला कालवारी डोंगरावर अर्पण करणार आहे ह्याचे संकेत देण्यात आले आहेत. परमेश्वराला आपणास तारण मिळवून देण्यासाठी बळी हवा होता, म्हणून परमेश्वर कालवारी डोंगरावर आपल्या एकुलत्या एक पुत्राचा बळी अर्पण करतो. ह्याविषयी बातचीत करण्यासाठी मोशे आणि एलीया प्रभू येशूसमोर प्रकट होतात. प्रभू येशू आपल्या रूपांतरामध्ये स्वतःची खरी ओळख आणि आपले गौरव प्रकट करतो. परमेश्वर पिता आपल्या स्वर्गीय वाणीने आपल्या पुत्राच्या गौरवाला दुजोरा देतो : "हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका." परमेश्वर त्याचा गौरव आपल्याबरोबर वाटण्यास उत्सुक आहे, म्हणून प्रभू येशू आपणास पित्याच्या गौरवाचा मार्ग दाखवतोः माझ्या मागे या व माझे ऐका, म्हणजे तुम्हास परमेश्वराने सिद्ध केलेला गौरवाचा मुकुट प्राप्त होईल. जर आपण प्रभू येशूच्या गौरवात पूर्णपणे सहभागी होऊ इच्छित असू; तर आपण त्याच्या क्रुसाच्या मार्गावर त्याचे अनुसरण केले पाहिजे. हाच एकमेव मार्ग आहे जो परमेश्वराबरोबर शाश्वत प्रकाश, शांती आणि आनंद ह्यांकडे घेऊन जातो.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुज ठायी रूपांतरित जीवन जगून तुझ्या वैभवात सहभागी होण्यास व तुझी साक्ष जगाला देण्यास प्रेरणा व कृपा दें, आमेन.
0 टिप्पण्या