Marathi Bible Reading | Tuesday 6th February 2024 | 5th Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील ५वा  सप्ताह

मंगळवार   दि ६ फेब्रुवारी  २०२४

  ✝️ 

तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता 
thus making void the word of God by your tradition that you have handed down. 
✝️



संत पॉल मिकी व सहकारी  सण 

रक्तसाक्षी 

✝️


इ. स. १८६२ साली पोप पायस नववे ह्यांनी ३ येशूसंघीय, ६ फ्रान्सिस्कन्स, आणि १७ प्रापंचिक लोकांचा मिळून बनलेल्या २६ जणांना रक्तसाक्षीत्वाचा मुकूट प्रदान केला. 

त्याच्या जीवनाचा शेवटचा टप्पा फार काळ टिकला नाही. जेव्हा जपानमध्ये ख्रिस्ती धर्मियांचा व मिशनऱ्यांच्या  छळ सुरू झाला तेव्हा गोन्सालो गार्सिया ह्याच्यासह संत पॉल मिकी व सहकारी  पाच फ्रान्सिस्कन, तीन येशूसंघीय आणि सतरा जपानी प्रापंचिक (धर्मशिक्षक) ह्यांना नागासकीच्या टेकडीवर ५ फेब्रुवारी १५९७ रोजी क्रुसावर खिळण्यात आले. पोप पायस नववे ह्यांनी १८६२ रोजी त्यांना संतपदाचा मुकूट बहाल केला.

चिंतन : रक्तसाक्षींच्या रक्तावरच आजची ख्रिस्तसभा उभी आहे. आजच्या रक्तसाक्षींवर उद्याची ख्रिस्तसभा उभी राहील.


✝️  

पहिले वाचन १ राजे ८:२२ - २३,२७-३०
वाचक :राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
तू म्हणालास, "माझ्या नावाचा निवास येथे होईल; तुझ्या लोकांच्या प्रार्थनेकडे कान दे."

शलमोन राजाने इस्राएलच्या सर्व मंडळी देखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून आकाशाकडे हात पसरले; तो म्हणाला, “परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, वर आकाशात अथवा खाली पृथ्वीवर तुझ्यासमान कोणी देव नाही; जे तुझे सेवक मनोभावे तुझ्यासमोर वागतात त्यांच्याशी तू आपल्या करारानुसार आणि दयेने वागतोस.
“परंतु देव हा भूतलावर खरोखर निवास करील काय ? आकाश आधी नभोमंडळ यात तुझा समावेश होणे नाही; तर हे मंदिर मी बांधले आहे यात तो कसा व्हावा? तरी हे माझ्या देवा, परमेश्वरा, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे, विनंतीकडे लक्ष दे; आज तुझा सेवक तुझा धावा करीत आहे आणि तुझ्यापुढे प्रार्थना करीत आहे, तिच्याकडे कान दे; माझ्या नावाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटले त्या ह्या तू स्थलाकडे, ह्या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो. जी प्रार्थना तुझा सेवक या स्थलाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्राएल ह्या स्थलाकडे तोंड करून तुझी विनवणी करतील तिच्याकडे तू कान दे; स्वर्गातील तुझ्या निवासस्थानी तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर."
 प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading 1 Kings 8:22-23, 27-30

In those days: Solomon stood before the altar of the Lord in the presence of all the assembly of Israel, and spread out his hands towards heaven, and said, "O Lord, God of Israel, there is no God like you, in heaven above or on earth beneath, keeping covenant and showing steadfast love to your servants who walk before you with all their heart. "But will God indeed dwell on the earth? Behold, heaven and the highest heaven cannot contain you; how much less this house that I have built! Yet have regard to the prayer of your servant and to his plea, O Lord my God, listening to the cry and to the prayer that your servant prays before you this day, that your eyes may be open night and day towards this house, the place of which you have said, 'My name shall be there', that you may listen to the prayer that your servant offers towards this place. And listen to the plea of your servant and of your people Israel, when they pray towards this place. And listen in heaven your dwelling place, and when you hear, forgive."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र :३, ४, ५.१०, ११
प्रतिसाद :  हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत !

१ माझ्या जिवाला परमेश्वराच्या 
अंगणांची उत्कंठा लागली असून 
मी झुरत आहे. माझा जीव आणि 
देह हर्षाने जिवंत देवाचा घोष करत आहेत.

२ हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, 
तुझ्या वेदीजवळ चिमणीला घरटे करावयास 
आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटर
 बांधावयास स्थळ मिळाले आहे.

३ तुझ्या मंदिरात राहणारे कितीधन्य आहेत! 
ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. 
हे देवा, तू आमची ढाल आहेस, अवलोकन कर, 
तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. 

४ खरोखर तुझ्या अंगणातील 
एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा 
उत्तम आहे. दुष्टपणाच्या तंबूत 
राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा
द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते..

Psalm 84:3, 4, 5, & 10, 11 

 How lovely is your dwelling place, O Lord of hosts!

My soul is longing and yearning for the courts of the Lord. 
My heart and my flesh cry out to the living God. R

Even the sparrow finds a home 
and the swallow a nest for herseli 
in which she sets her young, at your allars,
 O Lord of hosts, my king and my

Blessed are they who dwell in your house, 
forever singing your praise.
Turn your eyes, O God, our shield; 
look on the face of your anointed.

One day within your courts is better 
than a thousand elsewhere. 
The threshold of the house of God 
I prefer to the dwellings of the wicked. R


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
परमेश्वराचे गुनगाण गा!
तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.

 Bend my heart, O God, to your decrees, grant me mercy by your law

Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   मार्क ७:१-१३

वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता."

परुशी आणि येरुशलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अस्वच्छ म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. (कारण परुशी आणि इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवत नाहीत; बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत आणि पेले, घागरी, पितळेची भांडी धुणे आणि असल्या बऱ्याच रूढी ते पाळत असत.) ह्यावरून परुश्यांनी आणि शास्त्रांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत ?” त्याने त्याला उत्तर दिले, “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असाः “हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे; ते माझी व्यर्थ उपासना करतात,

कारण ते शास्त्र म्हणून जे शिकतात, ते असतात मनुष्याचे नियम." तुम्ही देवांची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता."आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे! कारण मोशेने सांगितले आहे की, 'तू आपला बाप आणि आपली आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.' पण तुम्ही म्हणता, 'जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान (म्हणजे अर्पण) केले आहे, ' तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही; अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता."

प्रभूचे हे शुभवर्तमान 

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Mark 7:1-13: 

At that time: When the Pharisees gathered to Jesus, with some of the scribes, who had come from Jerusalem, they saw that some of his disciples ate with hands that were defiled, that is, unwashed. (For the Pharisees and all the Jews do not eat unless they wash their hands properly, holding to the tradition of the elders, and when they come from the market-place, they do not eat unless they wash. And there are many other traditions that they observe, such as the washing of cups and pots and copper vessels and dining couches.) And the Pharisees and the scribes asked him, "Why do your disciples not walk according to the tradition of the elders, but eat with defiled hands?" And he said to them, "Well did Isaiah prophesy of you hypocrites, as it is written, This people honours me with their lips, but their heart is far from me; in vain do they worship me, teaching as doctrines the commandments of men. You leave the commandment of God and hold to the tradition of men." And he said to them, "You have a fine way of rejecting the commandment of God in order to establish your tradition! For Moses said, 'Honour your father and your mother'; and, 'Whoever reviles father or mother, must surely die. But you say, 'If a man tells his father or his mother, 'Whatever you would have gained from me is Corban (that is, given to God) - then you no longer permit him to do anything for his father or mother, thus making void the word of God by your tradition that you have handed down. And many such things you do."
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनमोशेने दिलेले नियमशास्र यहुदी लोकांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी होते. विशेषकरून परमेश्वराने आपल्या लोकांना केलेले पवित्रतेचे आवाहन हे यहुदी लोकांनी उचलूनधरले होते. हे आवाहन त्यांच्या इतके जिव्हाळी लागले की पवित्र राहण्याच्या उत्साहामध्ये त्यांनी अनेक मानवी परंपरा विकसित केल्या. ह्यांपैकी बऱ्याच परंपरा लोकांसाठी त्यांच्या दैनंदिन जीवनात पार पाडण्यासाठी ओझे बनल्या. हात न धुता जेवणे ही त्यांनी एक धार्मिक परंपरा बनवली होती, म्हणून ते प्रभू येशूच्या शिष्यांना हात न धुता जेवतात म्हणून दोष लावतात. प्रभू येशूने परमेश्वराची उपासना आणि परमेश्वराचे वचन ह्यांविषयी त्यांचे अंतर्याम उघडण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम ढोंगीपणा नष्ट झाला पाहिजे आणि बाह्य नियम नव्हे; तर परमेश्वराने दिलेल्या अंतःकरणाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे, तसेच दुसरे स्वतःच्या स्वार्थी प्रवृत्तीसाठी परमेश्वराचे नियम रद्द करू नये. अंतःकरणाचे पावित्र्य हे परमेश्वराचे नियम पाळण्यामध्ये आहे, मानवी परंपरा राखण्यामध्ये नाही.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तन-मनाने एकचित्त होऊन, प्रांजळपणे पश्चात्ताप करुन तुझ्या आज्ञा पाळण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन

✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या