पवित्र शनिवार ३० मार्च २०२४
(पुनरुत्थान - जागरण विधी)
प्रभू शब्द विधी : उत्पत्ती १:१-२:२, निर्गम १४:१५-१५:१,
यहेज्केल ३६:१६-२८
उपासना विधी : रोमकरांस ६:३- ११,
स्तोत्र ११७:१-२, १६-१७, २२-२३, लूक २४:१-१२.
"तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता ?
"Why do you seek the living among the dead? He is not here,
but has risen.
✝️
ख्रिस्त प्रभू देवपुत्राने वधस्तंभावरील मरण सोशिले, दैवी वैभवाने प्रभू येशू तिसऱ्यादिवशी जिवंत झाला. प्रभू येशूने त्याचे तारण कार्य पूर्णत्वास नेले. ख्रिस्त सभा आज तोच पुनरूत्थान जागरण विधि साजरा करीत आहे. ख्रिस्ती जीवनाच्या| विश्वासाचा मूळ पाया म्हणजे, प्रभू येशूचे पुनरुत्थान आहे. आजच्या शुभवर्तमानात येशूची रिकामी कबर पाहून मरिया माग्दालिया गोंधळली मात्र दूताचा संदेश मिळाला की, 'भिऊ नका, तो येथे नाही तर उठला आहे.' ती बातमी प्रेषिता पर्यंत पोहोचली आणि प्रेषितांनी विश्वास ठेवून ती शुभवार्ता सर्वत्र पसरविली.
मृत्यू हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही तर मृत्युनंतर पुनरुत्थान आणि सार्वकालिक स्वर्गीय जीवन आहे. जगातील सर्व प्रकारचा दृष्टपणा, पाप व सैतानी अंधकारवर प्रभू येशूने विजय मिळवला आहे. आपल्या जीवनातील नवीन पहाट ह्याच पुनरुत्थानाने होणार आहे. आपण सर्वजण प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचे सहभागीदार आहोत. आपल्या प्रत्येकाला, नवे हृदय, नवा आत्मा व नवजीवनाची आशा प्रदान करणाऱ्या पुनरुत्थीत प्रभू येशूसमोर आपण नतमस्तक बनून शरण जाऊ या.
पहिले वाचन रोमकरांस पत्र ६:३-११
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
आपण सर्वांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तेव्हा आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी सामर्थ्याने मेलेल्यांतून उठविला गेला त्याचप्रमाणे आपणही नवजीवन जगावे.
कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपात त्याच्याशी संयुक्त झालो आहोत तर त्याच्या पुनरुत्थानाच्याही प्रतिरूपात त्याच्याशी संयुक्त होऊ. आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर क्रुसावर खिळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू अशी आपली श्रद्धा आहे. मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही, त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही हे आपणांला ठाऊक आहे कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाचाच मरण पावला, तो जगतो तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वत:स पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिंवत झालेले असे माना.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Romans 6:3-11
Brethren: Do you not know that all of us who have been baptised into Christ Jesus were baptised into his death? We were buried therefore with him by baptism into death, in order that, just as Christ was raised from the dead by the glory of the Father, we too might walk in newness of life. For if we have been united with him in a death like his, we shall certainly be united with him in a resurrection like his. We know that our old self was crucified with him in order that the body of sin might be brought to nothing, so that we would no longer be enslaved to sin. For one who has died has been set free from sin. Now if we have died with Christ, we believe that we will also live with him. We know that Christ, being raised from the dead, will never die again; death no longer has dominion over him. For the death he died he died to sin, once for all, but the life he lives he lives to God. So you also must consider yourselves dead to sin and alive to God in Christ Jesus.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११८:१-२,१६-१७,२२-२३
प्रतिसाद : प्रभूचा हा दिवस आहे, ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करू या.
१ परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण
तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे.
आता इस्राएलने म्हणावे की,
"त्याची दया सनातन आहे."
२ परमेश्वराचा उजवा हात उंचावलेला आहे,
परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो.
मी मरणार नाही, मी जगेन,
आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन.
३ बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड
कोनशिला झाला आहे.
ही परमेश्वराची करणी आहे,
ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.
Psalm 118:1-2, 16ab-17, 22-23
This is the day the Lord has made;
let us rejoice in it and be glad. (Or: Alleluia)
Give praise to the Lord, for he is good;
his mercy endures forever.
Let the house of Israel say,
"His mercy endures forever."R
"The Lord's right hand has done mighty deeds.
His right hand is exalted.
The Lord's right hand has done mighty deeds.
" I shall not die, I shall live
and recount the deeds of the Lord. R
The stone that the builders rejected
has become the cornerstone.
By the Lord has this been done,
a marvel in our eyes. R
जयघोष
आलेलूया ,आलेलूया ,आलेलूया ,
Acclamation:
Alleluia, Alleluia, Alleluia.
शुभवर्तमान लूक २४:१-१२
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस. आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन गालिलाहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया कबरीजवळ आल्या, तो कबरीवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. या प्रकाराने त्या गोंधळून गेल्या असता, पाहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, "तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता ? तो तेथे नाही, तर उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हांला काय सांगितले ह्याची आठवण करा. मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला क्रुसावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे." तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरीपासून परत येऊन त्यांनी अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे सगळे वर्तमान सांगितले. त्या स्त्रिया म्हणजे मग्दालिया मरिया, योहाना व याकोबची आई मरिया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितांना सांगितले. परतुं हे वर्तमान त्यांना वायफळ बडबड वाटली व ते त्यांनी खरे मानले नाही. पेत्र मात्र उठून कबरीकडे धावत गेला. ओणवे होऊन त्याने आत पाहिले तो त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली, तेव्हा झालेल्या गोष्टींविषयी आश्चर्य करीत तो घरी गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Luke 24:1-12
On the first day of the week, at early dawn, they went to the tomb, taking the spices they had prepared. And they found the stone rolled away from the tomb, but when they went in they did not find the body of the Lord Jesus. While they were perplexed about this, behold, two men stood by them in dazzling apparel. And as they were frightened and bowed their faces to the ground, the men said to them, "Why do you seek the living among the dead? He is not here, but has risen. Remember how he told you, while he was still in Galilee, that the Son of Man must be delivered into the hands of sinful men and be crucified and on the third day rise." And they remembered his words, and returning from the tomb they told all these things to the eleven and to all the rest. Now it was Mary Magdalene and Joanna and Mary the mother of James and the other women with them who told these things to the apostles, but these words seemed to them an idle tale, and they did not believe them. But Peter rose and ran to the tomb; stooping and looking in, he saw the linen cloths by themselves; and he went home marvelling at what had happened.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: ख्रिस्तसभा संपूर्ण जगभर आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या जागरण विधीमध्ये सहभागी होत आहे. इस्त्राएली जनतेला फारोच्या गुलामगिरीतून मुक्त करताना साजरा केलेल्या वल्हांडण सणाची स्मृती साजरी केली जात आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः कोकरासमान आपले रक्त सांडून जगाचे तारण केले आणि आजच्या दिवशी प्रभू येशूचे वैभवाने पुनरुत्थान झाले. ख्रिस्ती माणसाच्या श्रद्धेचा पाया प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर बांधलेला आहे.देवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती करुन त्यावर सत्ता चालविण्यासाठी त्याचे प्रतिरूप असा मानव निर्माण केला. मात्र मूळपापाच्या विळख्यात सापडलेला माणूस देवापासून बहकला, देवाने मानवाच्या मुक्तीसाठी नेते, संदेष्ट्ये, राजे व त्याच्या अभिषिक्तांना पाठवून सत्पथावर आणले. देवाने त्याच्या निवडलेल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी म्हणजेच इस्त्राएल वंशासाठी मोशेची निवड केली. पापाच्या अंधकारातअसलेल्यांना नवीन आत्मा व नवीन हृदय बहाल करण्याची शाश्वती दिली.
सर्वांत शेवटी देवाने त्याचा एकुलता पुत्र प्रभू येशू ह्याला जगात पाठवून सर्वांसाठी बलिदान यज्ञ करावयास लावले. मात्र प्रभू येशू तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, जिवंत झाला आणि मानवाचे तारण पूर्ण झाले. आज पुनरूत्थानपूर्व जागरण विधीत आपण सहभागी होत असताना ज्या एकमेव सत्यावर आपली श्रद्धा उभारलेली आहे, त्यावर चिंतन करु या. ह्या जगातील पाप, दुष्टता व जगाचा अधिपती असलेल्या सैतानावर प्रभूने विजय मिळविला आहे. संकटे, दुःखे, अपयश, निराशा व सर्व प्रकारच्या व्याधींवर मात करण्यासाठी पुनरुत्थानांची आशा प्राप्त झाली आहे.
विशेषतः आपले सर्वांचे पुनरुत्थान होणार आहे ह्याची ग्वाही संत पौल स्पष्ट करुन देत आहे. संत पौल म्हणतो, "ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा म्हणजे ख्रिस्तामध्ये मरण, म्हणूनच त्याच्या मरणातून उठण्याच्या प्रतिरुपाने त्याच्याशी आपण संयुक्त होऊ” पुनरुत्थित ख्रिस्ताची शांती आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात वास करावी म्हणून आपण अंतर्मुख बनू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू पुनरुत्थिन जीवनात सहभागी होण्यास पात्र ठरावेत म्हणून आम्हाला तुझ्या वचनात व आज्ञेत राहण्यास प्रेरणा दे, आमेन.
✝️

0 टिप्पण्या