Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading |Thursday 17th October 2024 | 28th Week in Ordinary Time

सामान्य काळातील २८वा  सप्ताह 

गुरुवार ७ ऑक्टोबर  २०२४

 तुम्ही स्वतः आत गेला नाही आणि जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.you yourselves have not entered in, and those that were entering in, you have hindered.

 ✝️ 




अंत्युखियाचे संत इग्नेशिअस 

- धर्मपाल, महागुरू, रक्तसाक्षी (४५-१०७)


आपल्या श्रद्धेसाठी आपल्याला रक्तसाक्षित्वाचे मरण येत आहे हे पाहून संत इग्नेशियसला अत्यानंद झाला. अशा मृत्यूला वेंग मारण्याची उत्सुकता व अधीरता आता अस्वस्थ करू लागली. रोमच्या वेशीवर पोहोचताच तो म्हणाला, "मी प्रभूचा गहूदाणा आहे आणि येशू ख्रिस्ताची शुद्ध आणि सामर्थ्यशाली भाकर होण्यासाठी हा गहूदाणा हिंस्र पशूंच्या दाताखाली भरडला जाणे आवश्यक आहे." हे शब्द त्याच्या सणाच्या मिस्सावेळी पवित्र ख्रिस्तशरीर संस्कारप्रार्थनेच्या वेळी उच्चारले जातात.

शेवटी तो क्षण आला. सर्कशीत असलेल्या रिंगणामध्ये दोन हिंस्र सिंह वयोवृद्ध होत असलेल्या महागुरूंच्या अंगावर सोडण्यात आले. महागुरू इग्नेशियस त्यावेळी येशूचे नाव घेण्यात गुंग होते. त्या दोन्ही सिंहाशी इग्नेशियसची झालेली झुंज आणि इग्नेशियसचे रक्तसाक्षी मरण ज्या त्याच्या दोन शिष्यांनी पाहिले ते धन्य ! त्यांनी आपल्या पुस्तकात हे वर्णन शब्दबद्ध केलेले आहे. ह्याच दोन शिष्यांनी रक्तसाक्षी हुतात्म्याच्या उर्वरीत शरीराचे पवित्र अवशेष अंत्युखिया येथे आणले.
 घशांच्या विकारासाठी संत इग्नेशियसचा धावा केला जातो.

चिंतन: हिंस्र पशू हाच परमेश्वराकडे जाण्याचा माझा मार्ग असेल तर मला त्यांचे भक्ष्य बनणे खूप आवडेल. मी देवाचा गहूदाणा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र भाकरीसाठी हिंस्र पशूंच्या दातांखाली भरडले जाण्यास आनंदाने तयार आहे.-संत इग्नेशिअस 

 ✝️  

प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री - परुश्यांचा निषेध करीत  आहे,  शास्त्री परुश्यांनी नियमांच्या बंधनांचा धाक दाखवून सामान्यजनांवर जुलूम व अन्याय केला होता. त्यांनी स्वतःचे धर्माचरण व्यवस्थितपणे पार पाडले नाही आणि इतरांना सुद्धा पाळू दिले नाही. समाजात आजसुद्धा स्वतः ला धर्मरक्षक समजणारी माणसे स्वतःबरोबरच इतरांचे जीवन भ्रष्ट करीत असतात. पोकळ भक्तीचा आव आणून चांगले जीवन जगणाऱ्यांना बहकवित असतात. प्रभू येशू अशा सर्वांचा आज निषेध करीत आहे.

आपण आज संत पौल सांगतो त्याप्रमाणे प्रभूसमोर निर्दोष व पवित्र  बनण्यासाठी प्रभू येशूची वचने व प्रीतिंच्या आज्ञा प्रामाणिकपणे आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करू या. संत पौल प्रमाणे आपण नीतिमान असावे आणि  प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे म्हणून प्रयत्नशील बनू या.

✝️   

पहिले वाचन : इफिसकरांस१:१.३-१० 

वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन १:१.३-१०

“देवाने आपल्याला जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्याठायी निवडून घेतले. "

इफिस येथील पवित्रजन आणि ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे ह्यांस,
देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्यांच्याकडून,आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याचप्रमाणे आपण त्याच्या दृष्टीसमोर पवित्र आणि निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुल प्रमाणात केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्याद्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान आणि बुद्धी ह्यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुल प्रमाणात केली आहे. ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले, ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Ephesians 1: 1-10
Paul, an apostle of Jesus Christ, by the will of God, to all the saints who are at Ephesus, and to the faithful in Christ Jesus. Grace be to you, and peace from God the Father, and from the Lord Jesus Christ. Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who hath blessed us with spiritual blessings in heavenly places, in Christ: As he chose us in him before the foundation of the world, that we should be holy and unspotted in his sight in charity. Who hath predestinated us unto the adoption of children through Jesus Christ unto himself: according to the purpose of his will: Unto the praise of the glory of his grace, in which he hath graced us in his beloved son. In whom we have redemption through his blood, the remission of sins, according to the riches of his grace, Which hath superabounded in us in all wisdom and prudence, That he might make known unto us the mystery of his will, according to his good pleasure, which he hath purposed in him, In the dispensation of the fulness of times, to re-establish all things in Christ, that are in heaven and on earth, in him.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : ९८:१, २-३ अब, ३कड-४,५-६
प्रतिसाद :   परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे.

१ परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, 
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. 
त्याने आपल्या उजव्या हाताने, 
आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे.

२ परमेश्वराने आपले तारणकार्य प्रकट केले आहे,
 राष्ट्रांसमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे. 
त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली सत्यता 
आणि आपली दया ह्यांचे स्मरण केले आहे.

३ पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे 
तारणकार्य पाहिले आहे. 
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, 
परमेश्वराचा जयजयकार करा.
उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा.

४ परमेश्वराची स्तोत्रे वीणेवर गा. संगीत स्वराने गा.
कर्णा आणि शिंग वाजवून
परमेश्वर राजा ह्याचा जयघोष करा.


 Psalms 98: 1, 2-3ab, 3cd-4, 5-6 R. (2a) The Lord has made known his salvation. 1 Sing ye to the Lord a new canticle:
because he hath done wonderful things.
His right hand hath wrought for him salvation,
and his arm is holy. R. The Lord has made known his salvation. 2 The Lord hath made known his salvation:
he hath revealed his justice in the sight of the Gentiles. 3ab He hath remembered his mercy his truth
toward the house of Israel. R. The Lord has made known his salvation. 3All the ends of the earth have seen
the salvation of our God. 4 Sing joyfully to God, all the earth;
make melody, rejoice and sing. R. The Lord has made known his salvation. 5 Sing praise to the Lord on the harp,
on the harp, and with the voice of a psalm: 6 With long trumpets, and sound of comet.
Make a joyful noise before the Lord our king: R. The Lord has made known his salvation.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा ! तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो. 
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
I am the way and the truth and the life, says the Lord; no one comes to the Father except through me.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक  :४७-५४
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 “हाबेलच्या रक्तापासून तर जखऱ्याच्या रक्तापर्यंतच्या प्रत्येक संदेष्ट्यांच्या रक्ताबद्दल ह्या पिढीला हिशेब द्यावा लागेल. "

येशू शास्त्र्यांना म्हणाला, तुमची केवढी दुर्दशा होणार ! कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले! तुम्ही साक्षीदार आहा आणि आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जिवे मारले आणि तुम्ही त्यांची थडगी बांधता. ह्या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, मी त्यांच्याकडे संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील काहीना ते जिवे मारतील आणि काहींना छळतील, ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त म्हणजे हाबेलच्या रक्तापासून वेदी आणि पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्या जखऱ्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशेब ह्या पिढीकडून घेतला जावा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हां शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, पण तुम्ही स्वतः आत गेला नाही आणि जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.
तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री आणि परुशी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून त्यावर प्रश्नांचा भडीमार करू लागले आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरावे. म्हणून टपून राहिले.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 11: 47-54 Woe to you who build the monuments of the prophets: and your fathers killed them. Truly you bear witness that you consent to the doings of your fathers: for they indeed killed them, and you build their sepulchres. For this cause also the wisdom of God said: I will send to them prophets and apostles; and some of them they will kill and persecute. That the blood of all the prophets which was shed from the foundation of the world, may be required of this generation, From the blood of Abel unto the blood of Zacharias, who was slain between the alter and the temple: Yea I say to you, It shall be required of this generation. Woe to you lawyers, for you have taken away the key of knowledge: you yourselves have not entered in, and those that were entering in, you have hindered. And as he was saying these things to them, the Pharisees and the lawyers began violently to urge him, and to oppress his mouth about many things, Lying in wait for him, and seeking to catch something from his mouth, that they might accuse him.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:येशूने परुशी आणि शास्त्रांची निंदा करताना ज्या तीन संकटांचा उल्लेख केला आहे त्याचा संदर्भ आपण समजून घेऊ या. शास्त्री लोक इतरांवर कायदेशीर बंधने लादतात त्याचा निषेध करतो. आशीर्वाद देण्याऐवजी त्यांनी देवाच्या नियमाला लोकांसाठी ओझे बनवले आहे. काय परवानगी आहे आणि काय नाही याचा अर्थ लावणे, म्हणून ज्यांना इतरांसाठी देवाच्या वचनाचा अर्थ लावण्यासाठी बोलावले जाते त्याची भूमिका संपत नाही. जर शास्त्रीलोकांचा पहिला त्रास कायद्याशी संबंधित असेल तर दुसरा संदेष्ट्यांशी संबंधित असेल. शास्त्री त्यांच्या वडिलांनी मारलेल्या संदेष्टांची स्मारके बांधतात. या दुःखाची शक्ती मूल पालकांसारखे आहे. या स्वयंसिद्धतेवर अवलंबून असते. ते खरोखरच संदेष्ट्यांचा सन्मान करत नाहीत. त्यापेक्षा ते स्वतःला त्यांच्यापूर्वजांनी केलेल्या खूणामध्ये सहभागी असल्याचे दाखवतात. ते त्यांच्या स्वतःच्या काळातील जुन्या संदेष्ट्यांचा किंवा देवाच्या संदेष्ट्यांचा खरोखर आदर करत नाहीत. ज्यांच्याकडे ज्ञानाच्या घराची किल्ली किंवा तारणाचा मार्ग आहे त्याबद्दल कायद्याचे तज्ञ होते आणि तरीही त्यांनी ती किल्ली घरात प्रवेश करण्यासाठी वापरली नाही किंवा इतरांना प्रवेश करू दिला नाही. माझी वृत्ती व आंतरिक स्वभाव.परुशी आणि शास्त्री लोकांसारखा आहे . 

प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे जीवन आचरण करून इतरांच्या जीवनात तुझ्या प्रीतिचा दीप प्रज्वलित करण्यास प्रेरणा दे, आमेन.