Marathi Bible Reading | Thursday 31th october 2024| 30th week in ordinary Time |

सामान्य काळातील ३वा  सप्ताह 

गुरुवार ३१ ऑक्टोबर  २०२४

 पाहा, मी आज आणि उद्या भुते काढतो आणि रोग बरे करतो 

Behold, I cast out devils, and do cures today and tomorrow, and the third day I am consummated.

  ✝️ 




संत अल्फोन्सस रॉड्रीग्ज

वर्तनसाक्षी (१५३१-१६१७)

दक्षिण स्पेनमध्ये रेशीम कापडाचा एक व्यापारी राहत होता. एकाएकी त्याची बायको आणि मुले मरण पावली. त्याबरोबर त्याने मोठ्या उल्हासाने प्रार्थनामय जीवन सुरू केले. असह्य शारीरिक कष्ट आणि तपश्चर्या ह्यांद्वारे त्याने पावित्र्याचा अंगिकार केला आणि वयाच्या ३९ व्या वर्षी माजोकी बेटावरील येशूसंघियांमध्ये त्याने व्रतस्थ बंधू म्हणून दीक्षा घेतली. तेथे त्याने माऊंट सायन कॉलेज व सेमिनरीचा द्वारपाल म्हणून ३५ वर्षे नम्रपणे कार्य केले.

औपचारिकारित्या शिक्षण झालेले नसले तरी धर्मगुरूंकडे येणाऱ्या लोकांत एक ब्रदर म्हणून त्याने मोलाचे मार्गदर्शन व सल्ला देण्याचे काम केले. ख्रिस्ती धर्मतत्त्वांविषयी त्याला अगाध ज्ञान होते. पवित्र मरियेवरील बालसदृश मनोवृत्तीमुळे आणि आत्यंतिक शक्तीमुळे त्याने निष्कलंक गर्भसंभवाचा प्रार्थनापाठ लिहिला व त्याच्या प्रती सर्वत्र वाटून टाकल्या. प्रार्थनापाठ अल्पावधीत लोकप्रिय झाला.
द्वारपाल म्हणून कार्य करीत असताना तो स्वत:शी म्हणे, 'दरवाज्यावर बेल वाजली आणि कोणी आले तर तो ख्रिस्तच समजायचा' आणि मग मोठ्या प्रसन्न हसतमुख चेहऱ्याने तो त्यांचे स्वागत करीत म्हणे, “प्रभुजी, या मी आपली काय सेवा करू?"
 ✝️  

 संपूर्ण विश्वाचे तारण व्हावे ह्या देवाने तयार केलेल्या योजनेला कोणतीही मानवी शक्ती आव्हान देऊ शकत नाही. देवाची योजना हमखास पूर्णत्वास जात असते.

प्रभू येशूने त्याच्या पुनरुत्थानाचे सुतोवाच्य केले मात्र येरुशलेमकडे पाहून त्यानी आंतरिक विलाप केला, कारण अनेक संदेष्ट्यांना धुडकावून लावणाऱ्या यरुशलेमवासीयांनी प्रभूला सुद्धा नाकारले होते. देव माणसाला त्याचे तारण विनामुल्य देणगी दाखल देत असतो, मात्र माणूस देवाच्या योजनेला प्रतिसाद देत नाही. देवाने आपल्याला स्वतंत्र इच्छाशक्ती दिली आहे व त्यानूसार आलेल्या संधिचा योग्य तो उपभोग आपण करावा म्हणून सांगितले आहे. आपली श्रद्धा, आपली प्रार्थना व आपले प्रयत्न अपूरे पडतात का ? आपण जागतिक क्षणभंगूर जीवनात गुरफटले आहोत का ?

✝️   

पहिले वाचन : इफिसकरांस ६:१०-२०
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
 "वाईट दिवसात तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा."

प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. 
सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ताधाऱ्यांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्यांच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा आणि सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या आणि उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण आणि आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना आणि विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने आणि सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळविण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावे आणि जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे म्हणून माझ्यासाठी विनवणी करा.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Ephesians 6: 10-20
Finally, brethren, be strengthened in the Lord, and in the might of his power. Put you on the armour of God, that you may be able to stand against the deceits of the devil. For our wrestling is not against flesh and blood; but against principalities and power, against the rulers of the world of this darkness, against the spirits of wickedness in the high places. Therefore take unto you the armour of God, that you may be able to resist in the evil day, and to stand in all things perfect.
 Stand therefore, having your loins girt about with truth, and having on the breastplate of justice, And your feet shod with the preparation of the gospel of peace: In all things taking the shield of faith, wherewith you may be able to extinguish all the fiery darts of the most wicked one. And take unto you the helmet of salvation, and the sword of the Spirit (which is the word of God). By all prayer and supplication praying at all times in the spirit; and in the same watching with all instance and supplication for all the saints:
 And for me, that speech may be given me, that I may open my mouth with confidence, to make known the mystery of the gospel.
For which I am an ambassador in a chain, so that therein I may be bold to speak according as I ought.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  :  १४४:१-२,९-१०
प्रतिसाद :  परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो.

१) परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो, 
तो माझ्या हातांना लढायला शिकवतो. 
माझ्या बोटांना युद्ध करायला शिकवतो.

२) तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, 
माझा गड, माझा मुक्तिदाता माझी ढाल आहे, 
मी त्याचा आश्रय घेतो.
तो माझ्या प्रजाजनांना माझ्या अंकित करतो.

३) हे देवा, मी तुला नवे गीत गाईन, 
दशतंतू वीणेवर मी तुझे गुणगान गाईन. 
तूच राजांना विजय देणारा आहेस, 
तूच आपला सेवक दावीद 
ह्याला मुक्त करणारा आहेस.

Psalms 144: 1b, 2, 9-10
R. (1b) Blessed be the Lord, my Rock!

1 Blessed be the Lord my God, 
who teacheth my hands to fight, and my fingers to war.
R. Blessed be the Lord, my Rock!


2 My mercy, and my refuge: my support, and my deliverer: 
My protector, and I have hoped in him: 
who subdueth my people under me.
R. Blessed be the Lord, my Rock!

9 To thee, O God, I will sing a new canticle: 
on the psaltery and an instrument of ten strings
 I will sing praises to thee.
10 Who givest salvation to kings: 
who hast redeemed thy servant David 
from the malicious sword:
R. Blessed be the Lord, my Rock!

 जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
देव ख्रिस्तामध्ये स्वत:बरोबर जगाचा समेट करत होता 
आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. 
 आलेलुया!

Acclamation:  Alleluia, alleluia.
Blessed is the king who comes in the name of the Lord. Glory to God in the highest and on earth peace to those on whom his favor rests.  Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक  १३:३१-३५
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"येरुशलेमाबाहेर सदेष्ट्यांचा नाश झाला असे व्हायचे नाही."

काही परुशी येऊन येशूला म्हणाले, “येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हाला जिवे मारायला पाहत आहे.” त्याने त्यांना म्हटले, त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, पाहा, मी आज आणि उद्या भुते काढतो आणि रोग बरे करतो आणि तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण होईन, तरी मला आज, उद्या आणि परवा पुढे गेले पाहिजे, कारण येरुशलेमाबाहेर संदेष्ट्याचा नाश झाला असे व्हायचे नाही. येरुशलेम, येरुशलेम, संदेष्ट्याचा घात करणाऱ्या आणि तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणाऱ्या जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलांबाळांना एकत्र करण्यांची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा तशी नव्हती. पाहा, तुमचे घर तुमच्यावर सोडले आहे. मी तुम्हांला सांगतो, परमेश्वराच्या नामाने येणारा तो धन्यवादित, असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : 
Luke 13: 31-35
The same day, there came some of the Pharisees, saying to him: Depart, and get thee hence, for Herod hath a mind to kill thee. And he said to them: Go and tell that fox, Behold, I cast out devils, and do cures today and tomorrow, and the third day I am consummated.
Nevertheless I must walk today and tomorrow, and the day following, because it cannot be that a prophet perish, out of Jerusalem. Jerusalem, Jerusalem, that killest the prophets, and stonest them that are sent to thee, how often would I have gathered thy children as the bird doth her brood under her wings, and thou wouldest not? Behold your house shall be left to you desolate. And I say to you, that you shall not see me till the time come, when you shall say: Blessed is he that cometh in the name of the Lord.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतनजेव्हा आवाज शांत केला जातो, तो दाबून ठेवला जातो आणि छळ केला जातो तेव्हा प्रतिमा बोलतात. आजच्या शुभवर्तमानात दोन प्रतिमा स्पष्ट केल्या आहेत. हेरोदाची प्रतिमा आणि देवाची प्रतिमा. देवाच्या लोकांवर अत्याचार करणाऱ्या सामर्थ्यवानांचा प्रतिनिधी म्हणून हेरोदाला लोभी कोल्ह्यासारखे चित्रित केले आहे. येथे आपल्याला जाणवते की, देवाच्या लोकांच्या समुदायाला असलेला धोका वास्तविक आणि सध्याचा आहे की, आपला देव केवळ मुक्ती देणारा देव नाही तर संरक्षण करणारा, पालनपोषण करणारा देव आहे. आशेचे चिन्ह म्हणून देवाच्या स्वभावाचा हा पैलू स्पष्ट करण्यासाठी शुभवर्तमान वळविते. येशूनेदेवाचा दूत या नात्याने जेरुसलेमबद्दलच्या त्याच्या इच्छेची तुलना एका मातेच्या कोंबडीशी केली आहे. धोक्याचा इशारा मिळताच ती आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते. तिचे प्रेम स्थिर आहे. “हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे! मानवजाति तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय करिते." (स्तोत्र ३६ :७) "मला डोळ्यांतील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपीव.” (स्तोत्र १७: ८) या सर्व मातृ प्रतिमा आपल्या प्रत्येकावर देवाचे प्रेमळ प्रेम दर्शवितात. देव आपल्याला बिनशर्त देत असलेले संरक्षण आणि पालनपोषण करत राहू या.

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुजपासून मला विभक्त करणाऱ्या सर्व अनिष्ट
गोष्टींपासून माझा बचाव कर, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या