Marathi Bible Reading | Wednesday 30th october 2024| 30th week in ordinary Time |

सामान्य काळातील ३०वा  सप्ताह 

बुधवार ३०ऑक्टोबर  २०२४

  “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा.

Strive to enter by the narrow gate; 



  ✝️ 



'संत जेरार्ड माझेला

वर्तनसाक्षी (१७२६-१७५५)

 ✝️  

 दक्षिण इटलीतील एका अत्यंत गरीब घराण्यात परंतु भक्तिमान वातावरणात जेरार्डचा जन्म झाला. त्याला मनन-चिंतन, एकांताची खूप आवड होती. अतिपवित्र साक्रामेंताविषयी तर त्याच्या मनात नितांत प्रेम होते. बराच वेळ तो भाकरीच्यारूपात हजर असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताशी मनमोकळेपणाने हितगूज करताना अनेकांना दिसलेला आहे.

तो म्हणत असे, केवळ देवासाठी छळ सहन करा म्हणजे पृथ्वीवरच स्वर्ग अवतरण्याचा परमानंद तुम्ही आपल्या जीवनात अनुभवल्याशिवाय राहणार नाहीत.

वयाच्या २३ व्या वर्षी त्याने रेडेम्प्टोरिस्ट संस्थेमध्ये प्रवेश केला. एक बंधू म्हणून काही काळ त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला आपल्या संस्थेत ठेवून घेतले गेले होते. परंतु त्या काळात त्याने शुद्धता, नम्रता आणि आज्ञाधारकपणा याचे आदर्श जीवनच सर्वांपुढे सादर केले.

आतापर्यंत संस्थेमध्ये दारिद्र्य, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकपणा अशी तीन व्रते स्वीकारली जात होती. जेरार्डने आपल्या वागणुकीने आणखी चौथ्या व्रताची भर घातली. ती म्हणजे जे काही आपण देवासाठी करतो ती आपली प्रार्थनाच असते. ह्याचे भान ठेवून सतत प्रार्थनेची जाणीव ठेवणे.

देवाने त्याला असामान्य आध्यात्मिक कृपादाने दिली होती. त्याला साक्षात्कार होत. अधूनमधून प्रार्थनेच्या वेळी त्याचे शरीर जमिनीपासून उंचावले जाई. एकाच वेळी तो दोन-दोन ठिकाणी उपस्थित राहू शके. संदेश देणे, आत्मे ओळखणे, अलौकिक ज्ञान इ. कलादाने त्याला प्राप्त झालेली होती. सैतान आणि निसर्गाच्या शक्तीवरही मात करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी आलेले होते. 

आपले शरीर त्याने फार मोठ्या प्रायश्चित्त आणि खडतर तपश्चर्येने व उपास तापासाने कह्यात आणलेले होते. उरल्यासुरल्या फावल्या वेळेत तो अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती करीत असे. कधीकधी साक्रामेंताच्या पेटीसमोरून जाताना येशू आपल्याला बोलावीत आहे. असा आभास होई. तेव्हा तो गुडघे टेकून डोळ्यांत आसवे आणीत म्हणत असे, “हे प्रभो, तुझी परवानगी असेल तर मला माझ्या कामाला जाऊ दे. हे प्रभो, मला क्षमा कर.”त्याच्याहून वयाने मोठे असलेले धर्मगुरू प्रवचन देण्यासाठी मिशनकार्यावर जात असत, तेव्हा त्यांच्या प्रभावी प्रवचनापेक्षा आपल्या कळकळीच्या प्रार्थनेद्वारे आणि आग्रही मध्यस्थीने त्याने कठोर अंतःकरणाच्या पापी लोकांचे परिवर्तन करून दाखविलेले आहे. संत जेरार्ड वयाच्या २९ व्या वर्षी मरण पावले. त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर पुढील हृदयस्पर्शी शब्द लिहिलेले आढळतात, “इथे देवाच्या इच्छेप्रमाणे केले जाते. जोपर्यंत देवाची इच्छा आहे तोपर्यंत त्याच्याच इच्छेप्रमाणे केले जाईल.”

चिंतन : आपण सर्वदा अगदी आनंदाने देवाच्या इच्छेनुसार जीवन जगायला हवे. - संत जेरार्ड माझेला


✝️   

सर्वनाशाकडे घेऊन जाणारा मार्ग सोपा आहे व त्या दिशेचा दरवाजा  खूप रुंद आहे, मात्र स्वर्गराज्याकडे जाणारा मार्ग जरी अडचणीचा व दरवाजा  अरूंद असला तरी प्रभू येशू आपली वाट पाहत त्या दरवाजापाशी उभा आहे. आपण नेटाने प्रयत्न करणार ना ? 

✝️   

पहिले वाचन : इफिसकरांस ६:१-९

वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"माणसांना खूष करणाऱ्या लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करत जा."

मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. “आपला बाप आणि आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे आणि तू पृथ्वीवर दीर्घायू असावे." अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात त्यांना वाढवा.
दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत आणि कापत कापत सरळ अंतःकरणाने या जगातील धन्यांचे आज्ञापालन करत जा. माणसांना खूष करणाऱ्या लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करत जा. ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा, कारण तुम्हांला माहीत आहे की, प्रत्येकजण, मग तो दास असो, किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो तेच तो प्रभूकडून भरून पावेल. धन्यांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा आणि धमकावण्याचे सोडून द्या, कारण तुम्हांला हे ठाऊक आहे की, तुमचा आणि त्यांचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :: Ephesians 6: 1-9
Children, obey your parents in the Lord, for this is just. Honour thy father and thy mother, which is the first commandment with a promise: That it may be well with thee, and thou mayest be long lived upon earth. And you, fathers, provoke not your children to anger; but bring them up in the discipline and correction of the Lord. Servants, be obedient to them that are your lords according to the flesh, with fear and trembling, in the simplicity of your heart, as to Christ: Not serving to the eye, as it were pleasing men, but, as the servants of Christ doing the will of God from the heart, With a good will serving, as to the Lord, and not to men. Knowing that whatsoever good thing any man shall do, the same shall he receive from the Lord, whether he be bond, or free. And you, masters, do the same things to them, forbearing threatenings, knowing that the Lord both of them and you is in heaven; and there is no respect of persons with him.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  :  १४५:१०-१४

प्रतिसाद : परमेश्वर आपल्या वचनाला जागतो.

१)  हे परमेश्वरा, सर्व प्राणिमात्र तुझी स्तुती गातात,
आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि 
तुझा पराक्रम कथन करतात, ह्यासाठी की, 
तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे 
वैभवयुक्त ऐश्वर्य मानवजातीला कळावे.

२ ) तुझे राज्य युगानुयुगे राहणारे राज्य आहे, 
तुझ्या राज्याधिकार पिढ्यान्पिढ्या टिकणारा आहे.

३ )परमेश्वर आपल्या वचनाला जागतो, 
त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. 
पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो. 
व वाकलेल्या सर्वांना उभे करतो.

Psalms  145: 10-11, 12-13ab, 13cd-14
R. The Lord is faithful in all his words.

Let all thy works, O lord, praise thee: and let thy saints bless thee.
They shall speak of the glory of thy kingdom: and shall tell of thy power:
R. The Lord is faithful in all his words.

To make thy might known to the sons of men: and the glory of the magnificence of thy kingdom.
Thy kingdom is a kingdom of all ages: and thy dominion endureth throughout all generations.
R. The Lord is faithful in all his words.

The Lord is faithful in all his words: and holy in all his works.
The Lord lifteth up all that fall: and setteth up all that are cast down.
R. The Lord is faithful in all his words.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
प्रभो, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी 
आमचे अंत:करण प्रफुल्लित कर.
 आलेलुया!

Acclamation: 
God has called us through the Gospel to possess the glory of our Lord Jesus Christ..

शुभवर्तमान   लूक  १३:२२-३०
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील."

येशू गावोगावी आणि खेडोपाडी शिक्षण देत देत येरुशलेमकडे चालला होता. तेव्हा कोणाएकाने त्याला म्हटले, "प्रभो, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय ?" तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल, प्रभुजी, आम्हांसाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हांला उत्तर देईल, तुम्ही कोठले आहा, हे मला माहीत नाही. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, आम्ही तुमच्याबरोबर खाणेपिणे केले आणि तुम्ही आमच्या रस्त्यांवर शिक्षण दिले. परंतु तो म्हणेल, मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कोठले आहा हे मला माहीत नाही. अहो, सर्व अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. तुम्ही जेव्हा आब्राहाम, इसहाक, याकोब आणि सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले आणि आपणास बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तुम्ही रडाल व दातओठ खाल. पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील आणि पाहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत आणि जे शेवटले होतील असे काही पहिले आहेत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : 
Luke 13: 22-30
And he went through the cities and towns teaching, and making his journey to Jerusalem. And a certain man said to him: Lord, are they few that are saved? But he said to them: Strive to enter by the narrow gate; for many, I say to you, shall seek to enter, and shall not be able.
 But when the master of the house shall be gone in, and shall shut the door, you shall begin to stand without, and knock at the door, saying: Lord, open to us. And he answering, shall say to you: I know you not, whence you are. Then you shall begin to say: We have eaten and drunk in thy presence, and thou hast taught in our streets. And he shall say to you: I know you not, whence you are: depart from me, all ye workers of iniquity. There shall be weeping and gnashing of teeth, when you shall see Abraham and Isaac and Jacob, and all the prophets, in the kingdom of God, and you yourselves thrust out.
 And there shall come from the east and the west, and the north and the south; and shall sit down in the kingdom of God. And behold, they are last that shall be first; and they are first that shall be last.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतनकदाचित येशूच्या बोलण्याचे रहस्य आणि अस्पष्टता टिकवून ठेवण्याची परवानगी देणे चांगले आहे. तथापि, दोन मुद्दे स्पष्ट आहेत : प्रथम येशू त्याच्या अनुयायांना सल्ला देतो की, अरुंद दरवाजाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नम्रतेचे प्रतिक असलेला आणि अभिमान आणि स्वारलंबनापासून मुक्त असलेला दरवाजा. दुसरे म्हणजे येशू त्यांना चेतावणी देतो की, शेवटी तेथे अनेक आश्चर्यकारक उलटे असतील. ज्यांना वाटते की, ते प्रवेश करतील असे बरेच लोक करणार नाहीत आणि इतर ज्यांना देवाच्या सहवासातून वगळण्यात आले आहे असे मानले जाते. आपण सर्वांनी नम्र होण्याचा प्रयत्न करूया. तिथेच देवाची कृपा आणि मानवी प्रयत्न एकत्र येतात.

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझी वाणी ऐकण्यास व स्वर्गराज्याच्या दीशेने वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या