Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Fourth Sunday of Easter | 11th May 2025

पुनरुत्थान ४था  सप्ताह 

रविवार  दि ११ मे २०२५

"माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. My sheep hear my voice: and I know them, and they follow me.





 संत पौलाने  परराष्ट्रीयांना देवाचे वचन सांगितले आणि परराष्ट्रीयांनी आनंदाने प्रभूची सुवार्ता ऐकून विश्वास ठेवला. जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते  तितक्यांनी विश्वास ठेवला.

 आजच्या  प्रकटीकरणाच्या वाचनात सांगितले आहे की, 'कोकरा (येशू ख्रिस्त) त्यांचा  मेढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल, आणि देव  त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील'.

प्रभूची पवित्र व मधुर वाणी आपण अंतःकरणापासून ऐकू या  सार्वकालिक जीवनासाठी ती वाणी आचरणात आणू या आणि प्रभूची विश्वासू  मेंढरे बनण्यासाठी आपले जीवन त्याच्याठायी समर्पित करु या. ! 
  
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये  १३:१४,४३-५२
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो."

पौल आणि बर्णबा हे पिर्गा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंत्युखिया येथे पोहचले आणि शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन बसले. सभास्थानातील सभा संपल्यावर यहुद्यातील आणि भक्तिमान यहुदी मतानुसारी यांच्यातील पुष्कळजण पौल आणि बर्णवा ह्यांच्यामागे गेले. त्या दोघांनी त्यांच्याबरोबर बोलून देवाच्या कृपेत टिकून राहण्यास त्यांचे मन वळवले.
पुढच्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले. पण लोक समुदायास पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले. तेव्हा पौल आणि बर्णवा हे निर्भीडपणे म्हणाले : “देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगावयाचे अगत्य होते. तरी ज्याअर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता आणि आपणाला सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरवता त्याअर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो. कारण प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आहे. की, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस, म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे करून ठेवले आहे."
हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला. तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी श्रद्धा ठेवली आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले. तेव्हा यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना आणि नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णवा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्या येथे गेले. इकडे शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
First Reading: : : Acts 13: 14, 43-52
But they passing through Perge, came to Antioch in Pisidia: and entering into the synagogue on the sabbath day, they sat down. And when the synagogue was broken up, many of the Jews, and of the strangers who served God, followed Paul and Barnabas: who speaking to them, persuaded them to continue in the grace of God. But the next sabbath day, the whole city almost came together, to hear the word of God. And the Jews seeing the multitudes, were filled with envy, and contradicted those things which were said by Paul, blaspheming. Then Paul and Barnabas said boldly: To you it behoved us first to speak the word of God: but because you reject it, and judge yourselves unworthy of eternal life, behold we turn to the Gentiles. For so the Lord hath commanded us: I have set thee to be the light of the Gentiles; that thou mayest be for salvation unto the utmost part of the earth. And the Gentiles hearing it, were glad, and glorified the word of the Lord: and as many as were ordained to life everlasting, believed. And the word of the Lord was published throughout the whole country. But the Jews stirred up religious and honourable women, and the chief men of the city, and raised persecution against Paul and Barnabas: and cast them out of their coasts.But they, shaking off the dust of their feet against them, came to Iconium. And the disciples were filled with joy and with the Holy Ghost.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र १००:१-३,५
प्रतिसाद :   आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कळपातील मेंढरे आहोत.

१) अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, 
परमेश्वराचा जयजयकार करा. 
हर्षाने परमेश्वराची सेवा करा.
 गायन करीत त्याच्यापुढे जा.

२ )परमेश्वर हाच देव आहे असे जाणा,
 त्यानेच आम्हांला उत्पन्न केले, 
आम्ही त्याचेच आहो, 
त्याची प्रजा त्याच्या कळपातील मेंढरे आहोत.

३) कारण परमेश्वर चांगला आहे. 
त्याची दया युगानुयुग आणि 
त्याची सत्यता पिढ्यान्पिढ्या टिकते.

 Psalms 100: 1-2, 3, 5
R. (3c) We are his people, the sheep of his flock. or R. Alleluia.

1-2 Sing joyfully to God, all the earth: serve ye the Lord with gladness. Come in before his presence with exceeding great joy.
R. We are his people, the sheep of his flock.or R. Alleluia.

3 Know ye that the Lord he is God: he made us, and not we ourselves. We are his people and the sheep of his pasture.
R. We are his people, the sheep of his flock. or R. Alleluia.

5 For the Lord is sweet, his mercy endureth for ever, and his truth to generation and generation. R. We are his people, the sheep of his flock. or R. Alleluia.


 प्रकटीकरण  ७:९,१४-१७
वाचक : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"कोकरू त्यांचा मेंढपाळ होईल आणि तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल."

मी, योहानने पाहिले तो सर्व राष्ट्र, वंश, लोक आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला आणि हाती झावळ्या घेतलेला, मोठा लोकसमुदाय राजासनासमोर आणि कोकराच्या पुढे उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. तेव्हा वडीलमंडळीपैकी एकाने मला म्हटले, “मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत, ह्यांनी आपले झगे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत. ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील. ते ह्यापुढे भुकेले असे होणार नाहीत आणि तान्हेलेही होणार नाहीत. त्यांना सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही. कारण राजासनापुढे मध्यभागी असलेले कोकरू त्यांचा मेंढपाळ होईल आणि ते त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकील."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading: Revelation 7: 9, 14b-17
After this I saw a great multitude, which no man could number, of all nations, and tribes, and peoples, and tongues, standing before the throne, and in sight of the Lamb, clothed with white robes, and palms in their hands:He said to me: These are they who are come out of great tribulation, and have washed their robes, and have made them white in the blood of the Lamb. Therefore they are before the throne of God, and they serve him day and night in his temple: and he, that sitteth on the throne, shall dwell over them. They shall no more hunger nor thirst, neither shall the sun fall on them, nor any heat. For the Lamb, which is in the midst of the throne, shall rule them, and shall lead them to the fountains of the waters of life, and God shall wipe away all tears from their eyes.

This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, 
मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि 
माझी मेंढरे मला ओळखतात.
आलेलुया !

Alleluia
R. Alleluia, alleluia.
I am the good shepherd, says the Lord; I know my sheep, and mine know me.

R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमानयोहान  १०:२७-३०
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "माझ्या मेंढरांना मी सार्वकालिक जीवन देतो."
येशू यहुद्यांना म्हणाला, "माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
 John 10: 27-30
My sheep hear my voice: and I know them, and they follow me. And I give them life everlasting; and they shall not perish for ever, and no man shall pluck them out of my hand. That which my Father hath given me, is greater than all: and no one can snatch them out of the hand of my Father. I and the Father are one.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
                                                 
चिंतन:मेंढरे चांगल्या मेंढपाळाचा आवाज ऐकतात आणि त्याचे अनुसरण करतात ही आजच्या सुवातेंची थीम आहे. जो विश्वासू येशू ऐकतो त्याला सार्वकालिक जीवन मिळते आणि जो त्याचे अनुसरण करतो तो कधीही गमावत नाही. येशूवर विश्वास ठेवणारी व्यक्ती त्याच्यापासून हिरावून घेतली जाऊ शकत नाही. ते हरवले नाहीत आणि कोणीही त्यांना येशूपासून घेणार नाही. ते पित्याने दिलेले आहेत आणि पित्यापासून कोणीही काहीही घेऊ शकत नाही. विश्वासणाऱ्याला येशूकडून मिळालेले जीवन हे पित्याकडून मिळालेली देणगी आहे. देवापेक्षा कोणतीही शक्ती मोठी नाही आणि अशा प्रकारे आस्तिकाचे देवाशी एकीकरण देखील निश्चित आहे. देव पिता इतर सर्व शक्तींपेक्षा महान आहे. इस्त्रायलने समर्पणाच्या सणाच्या वेळी देवाची उपस्थिती साजरी केली म्हणून, येशू “यहुदींना” सांगतो की देव त्यांच्यासाठी आणखी एक मार्ग आहे. जर त्यांचा येशूवर विश्वास असेल तर ते पित्याच्या हातात आहेत याची त्यांना खात्री असू शकते. येशू आवर्जून सांगतो की त्याच्या शब्दावरील विश्वास आस्तिकाला केवळ त्याच्याशीच नाही तर येशूचा पिता देवाशी देखील जोडतो. इस्टरच्या या चौथ्या रविवारी आपण आपल्या चांगल्या मेंढपाळ येशूला समर्पित करूया जो आपल्याला कधीही चुकवणार नाही.
प्रार्थना :मेंढपाळ तू माझा प्रभूवर मेंढपाळ तू माझा, राखिशी मजला प्रभूजी मेंढपाळ तू माझा. मला सन्मार्गावर चालण्यास कृपा दे, आमेन


✝️