सामान्यकाळातील १७ वा सप्ताह
शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट २०२५
"संदेष्ट्याला आपला देश आणि आपले घर ह्यात सन्मान मिळत नाही.”
"A prophet is not without honour except in his home town and in his own bousehold."
संत अल्फोन्सस डी लिगरी
महागुरू, वर्तनसाक्षी आणि धर्मपंडित
(१६९६-१७८७)
संत अल्फोन्सस ह्यांना नीतिशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षकांचा व प्रायश्चित्त संस्कार देणाऱ्या धर्मगुरूंचा आश्रयदाता संत मानले जाते.
चिंतन : ज्याला फळ हवं आहे त्याने झाडाकडे गेले पाहिजे. ज्यांना ख्रिस्त हवा आहे त्यांनी मरियेकडे आले पाहिजे आणि ज्याची मरियेशी भेट होते त्याला निश्चितच ख्रिस्त सापडतो. संत अल्फोन्सस डी लिगरी
ख्रिस्तसभा आज संत अल्फन्सस लिगरी ह्यांचा स्मृती दिन साजरा करीत आहे. एक महान कायदेतज्ञ आणि नीतिशास्त्राचे अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती. साक्रामेंतातील येशूच्या भक्तीचा त्याने प्रसार केला. रिडेंप्टरीस्ट धर्मगुरु संघाची त्याने स्थापना करुन आपले सुवार्ताकार्य बलशाली व प्रभावी बनवले. प्रभू येशू आपण सर्वजण त्याच्या नावाने जेव्हा एकत्र जमा होतो तेव्हा आपल्यामध्ये हजर असतो. प्रभू येशूचे अस्तित्व आपण जाणावे, ओळखावे आणि अनुभवावे म्हणून प्रार्थना करु या.
पहिले वाचन : लेवीय २३: १,४-११,१५-१६,२७,३४-३७
वाचक : लेवीय या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वराने नेमलेल्या समयी पवित्र मेळे भरवावे असे जाहीर करा."
परमेश्वर मोशेला म्हणाला, “परमेश्वराने नेमलेले पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करावयाचे ते हे: पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीला संध्याकाळी परमेश्वराचा वल्हांडण सण येतो. त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो; त्यात तुम्ही सात दिवस बेखमीर भाकर खावी. पहिल्या दिवशीतुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये. सात दिवस तुम्ही परमेश्वराला हव्य अर्पावे; सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये.
परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग : मी तुम्हांला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल आणि त्यातील पीक कापाल तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी; ती पेंढी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्याने परमेश्वरासमोर ती ओवाळावी; शब्बाथाच्या पुढच्या दिवशी याजकाने ती ओवाळावी.
शब्बाथच्या पुढच्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुरे सात शब्बाथ मोजावे; सातव्या शब्बाथाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत पन्नास दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ नवे अन्नार्पण करावे.
त्याच सातव्या महिन्याच्या दशमीला प्रायश्चित्ताचा दिवस पाळावा; त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवाला दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे.त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसापर्यंत परमेश्वराप्रीत्यर्थ मांडवांचा सण पाळावा. पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये. सात दिवस परमेश्वराला हव्य अर्पावे आणि आठव्या दिवशी आपला पवित्र मेळा भरवून परमेश्वराला हव्य अर्पावे; सणाचा हा समारोप दिन होय. त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.
परमेश्वराने नेमलेले समय हे होत. त्यात हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण आणि पेयार्पण त्या त्या दिवसानुसार परमेश्वराला अर्पिण्यासाठी पवित्र मेळे भरवावे असे तुम्ही जाहीर करावे."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Leviticus 23:1, 4-11, 15-16, 27, 34b-37
The Lord spoke to Moses, saying "These are the appointed feasts of the Lord, the holy convocations, which you shall proclaim at the time appointed for them. In the first month, on the fourteenth day of the month at twilight, is the Lord, Passover. And on the fifteenth day of the same month is the Feast of Unleavened Breadt the Lord; for seven days you shall eat unleavened bread. On the first day you shall have a holy convocation; you shall not do any ordinary work. But you shall present a food offering to the Lord for seven days. On the seventh day is a holy convocation, you shall not do any ordinary work." And the Lord spoke to Moses, saying, "Speak to the people d Israel and say to them, When you come into the land that I give you and reap its harvest, you shall bring the sheaf of the first fruits of your harvest to the priest, and he shall the sheaf before the Lord, so that you may be accepted. On the day after the Sabbath the priest shall wave it. You shall count seven full weeks from the day after the Sabbath, from the day that you brought the sheaf of the wave offering. You shall count fifty days to the day after the seventh Sabbath. Then you shall present a grain offering of new grain to the Lord. "Now on the tenth day of this seventh month is the Day of Atonement, It shall be for you a time of holy convocation, and you shall afflict yourselves and present a food offering to the Lord. On the fifteenth day of this seventh month and for seven days is the Feast of Booths to the Lord. On the first day shall be a holy convocation; you shall not do any ordinary work. For seven days you shall present food offerings to the Lord. On the eighth day you shall hold a holy convocation and present a food offering to the Lord. It is a solemn assembly; you shall not do any ordinary work. These are the appointed feast of the Lord, which you shall proclaim as times of holy convocation, for presenting to the Lord food offerings, burnt offerings and grain offerings, sacrifices and drink offering each on its proper day."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ८१:३-६,१०-११
प्रतिसाद : देव आमचे सामर्थ्य आहे त्याचे मोठ्याने गुणगान गा.
१ ) सुरावर गीत म्हणा आणि खंजिरी वाजवा,
मंजुळ वीणा आणि सतार वाजवा;
शुक्ल प्रतिपदेस, पौर्णिमेस आमच्या
सणाच्या दिवशी कर्णा वाजवा.
२) कारण ह्या इस्राएलसाठी नियम आहे;
हा याकोबच्या देवाचा निर्बंध आहे.
तो इजिप्त देशावरून गेला,
तेव्हा त्याने योसेफवंशात हाच निबंध साक्षीसाठी नेमला.
३) तुम्हाला अन्य देव नसावा,
तुम्ही परक्या देवाच्या पाया पडू नये,
मीच तुमचा देव परमेश्वर आहे,
मीच तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढले.
Psalm 81:3-4, 5-6ab, 10-11ab
R Sing joyfully to God our strength.
Raise a song and sound the timbrel,
the sweet-sounding harp and the lute;
blow the trumpet at the new moon,
when the moon is full, on our feast. R
For this is a statute in Israel,
a command of the God of Jacob.
He made it a decree for Joseph,
when he went out from the land of Egypt. R
Let there be no strange god among you,
nor shall you worship a foreign god.
I am the Lord your God, who brought
you up from the land of Egypt. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.
आलेलुया!
Acclamation:
The word of the Lord remains for ever; and this word is the good news that was preached to you.
शुभवर्तमान मत्तय १३ : ५४-५८
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हा सुताराचा मुलगा आहे ना? मग हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून मिळाले ?"
स्वतःच्या गावी आल्यावर येशूने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून मिळाले ? हा सुताराचा मुलगा ना? ह्याच्या आईला मरिया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन आणि यहुदा हे त्याचे भाऊ ना ? ह्यांच्या बहिणी, त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग हे सर्व ह्याला कोठून प्राप्त झाले ?” असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यांना म्हटले, "संदेष्ट्याला आपला देश आणि आपले घर ह्यात सन्मान मिळत नाही.” तेथे त्याच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Matthew 13:54-58
At that time: Coming to his home town Jesus taught them in their synagogue, so that they were astonished, and said, "Where did this man get this wisdom and these mighty works? Is not this the carpenter's sont is not his mother called Mary? And are not his brothers James and Joseph and Simon and Judas! And are not all his sisters with us? Where then did this man get all these things?" And they took offence at him. But Jesus said to them, "A prophet is not without honour except in his home town and in his own bousehold." And he did not do many mighty works there, because of their unbelief.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
परमेश्वर सर्वसमर्थ, सर्वज्ञ व सर्वत्र आहे. तो आमचे सर्वस्व आहे. तो मोशेबरोबर बोलला. त्याने सणांसाठी चार प्रकारच्या अर्पणांची शिफारस केली आहे: होमार्पणे, अन्नार्पणे, शान्त्यार्पणे व पेयार्पणे. अर्थात, आत्मसमर्पणामुळे परमेश्वर अधिक प्रसन्न होत असतो... परिचय, अति-परिचय ह्यामुळे येशूकालीन लोकांना येशूचा महिमा, दूरदृष्टी व चिन्हे-चमत्कार ह्यांचा अन्वयार्थ लावता आला नाही. त्यांना दिसणाऱ्या येशूविषयी माहिती होती; परंतु त्यांना येशूच्या खऱ्याखुऱ्यासामर्थ्याचा पुरेसा अनुभव आला नव्हता. त्यामुळे ते त्याच्या कुळाविषयी, कुटुंबियांविषयी शंका-कुशंका व्यक्त करू लागतात... परमेश्वरी कृपा ही अनेकदा सामान्य घटनेतून प्रकट होत असते; पण आपण भव्य, भपकेदार देखाव्याची वाट पाहत राहण्याची शक्यता आहे... तद्वत, एखाद्या व्यक्तीबद्दल आधीच ग्रह-पूर्वग्रह-दुराग्रह असल्यास दिव्यत्वाचा साक्षात्कार घडणे कठीण होऊ शकते. सामान्य दिसणाऱ्या वा वाटणाऱ्या व्यक्तींचा तसेच घटनांचा वापर असाधारण गोष्टींसाठी परमेश्वर करू शकतो. मात्र त्यासाठी अस्सल श्रद्धा आवश्यक आहे. माझे जीवन परमेश्वराला प्रसन्न करणारे व इतरांना मदत करणारे आहे का...?
प्रार्थना : हे प्रभो, सर्वदा स्वर्गीय गोष्टी मिळविण्यास प्रयत्नशील बनण्यास आम्हला कृपा दे, आमेन.
✝️