सामान्यकाळातील १९ वा सप्ताह
सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५
तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक However, not to give offence to them, go to the lake and cast a hook and take the first fish that comes up,
संत क्लेअर
कुमारिका (११९३-१२५३)
इ. स. १२१२ साली असिसी शहरातील संत जॉर्जच्या चर्चमध्ये असिसीच्या संत फ्रान्सिस ह्यांनी उपवासकालीन प्रवचने दिली. त्या प्रवचनाचा “क्यारा" नावाच्या एका अठरा वर्षीय मुलीवर एवढा जबरदस्त प्रभाव पडला की संत फ्रान्सिसच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या विचार सरणीनुसार व जीवन पद्धतीनुसार साधेपणाचे जीवन जगण्याची तीव्र उत्कंठा तिच्यात निर्माण झाली.
पुढे त्यानेच दिलेल्या सल्ल्यानुसार ती झावळ्यांच्या रविवारच्या रात्री आपल्या राजमहालातून गुपचूप बाहेर पडली. सोबत तिची मावशी बियांका आणि आणखी एक मैत्रीण होती. जवळच्याच पोर्टिउंकुलाच्या खोल्यापाशी असलेल्या लहानशा प्रार्थनामंदिरात संत फ्रान्सिस आणि त्यांचे धर्मबंधू तिच्यासाठी थांबलेले होते. इथेच तिने त्या सर्वांच्या साक्षीने आपले सोनेरी केस कापून घेतले. आपली भरजरी वस्त्रे काढून त्याऐवजी वैराग्याची वस्त्रे परिधान केली आणि ख्रिस्ताच्या नावाने गरिबीचे व्रत स्वीकारले. संत फ्रान्सिसच्या मार्गदर्शनानुसार तिला तात्पुरते जवळच्याच बेनेडिक्टाईन मठात ठेवण्यात आले.
ही बातमी तिच्या वडिलांच्या कानी पडताच त्यांचे रक्त उसळले. त्यांनी क्लेअरच्या लग्नाची व्यवस्था केलेली होती. तिच्यासाठी योग्य असा वर निवडलेला होता. आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात करून देण्याची मनोस्वप्ने ते पाहात होते. त्यामुळे त्यांना ह्या घटनेने धक्का बसला. बेनेडिक्टाईन कॉन्व्हेंटमधून तिला पळवून नेण्याचा मनसुबा देखील त्यांनी आखला. परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला. क्लेअर आता पावित्र्याच्या व गरिबीच्या व्रताशी एकनिष्ठ राहण्यासाठी एका विशिष्ट संघाच्या स्थापनेचा विचार करू लागली.संत फ्रान्सिसला झालेल्या साक्षात्कारातून संत डेमियन चर्चच्या शेजारी मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या प्रार्थनामंदिरात आता क्लेअर अगदी साधेसुधे जीवन जगू लागली. पंधरा दिवसांच्या आतच तिची धाकटी बहीण आग्रेस तिला येऊन मिळाली. 'पुअर क्लेअर्सची संस्था हळूहळू वाढीस लागली. पुढील काही वर्षात क्लेअरची मावशी बियांका, तिची आई धन्यवादित ऑर्तोलाना, आणखी एक बहीण बियाट्रीस ह्यांनीसुद्धा क्लेअरचे आध्यात्मिक नेतृत्व स्वीकारले व त्या तिच्या संघात येऊन दाखल झाल्या.
क्लेअरच्या उर्वरित आयुष्यात ४० वर्षांत युरोपभरातील अनेक देशांमध्ये गरीब मुलींच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी या संघाच्या पुष्कळशा शाखा उघडल्या गेल्या. असिसी येथील या संघाचे प्रमुख केंद्र मात्र क्लेअरच्या उतरत्या वयातही अध्यात्माचे केंद्र बनून राहिले. दोन पोप, अनेक कार्डिनल आणि बिशप्स तिचा सल्ला घेण्यासाठी येत असत. तिच्या अधिकृत निवृत्तीनंतरही असंख्य लोक तिच्याकडे आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी येत असत.
दीर्घकाळच्या आजारानंतर वयाच्या ५९व्या वर्षी १२ ऑगस्ट १२५३ रोजी साक्षात गरिबीचे मूर्तिमंत प्रतीक बनलेली 'संत फ्रान्सिसचे चिमुकले फूल' मानली गेलेली क्लेअर आपल्या स्वर्गीय निजधामी निघून गेली. त्यावेळी पोप इनोसेंट चौथे व त्यांच्या दरबारातील सर्व उच्च अधिकारी, तिच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते, अवघ्या दोनच वर्षांनी 'पुअर क्लेअर्स'ची ही पवित्र संस्थापिका पोपमहाशयांनी संतपदाने सन्मानित केली. तिच्या थडग्यावर असिसी येथे उभारलेले चर्च आतादेखील हजारो भाविकांसाठी तीर्थक्षेत्र बनलेलं आहे.
इ. स. १२२४ मध्ये फ्रेडरिक दुसरा ह्याच्या सारासेन सैन्याने जेव्हा असिसी
शहरावर हल्ला चढविला तेव्हा क्लेअर हिने अतिपवित्र ख्रिस्तशरीर असलेला प्याला आपल्या हाती घेऊन उंचाविला तेव्हा सर्व सैनिक आपोआप गर्भगळीत झाले. त्यांनी ताबडतोब तेथून पळ काढला. त्यामुळे काही चित्रांमध्ये क्लेअर हातात सिवोरियम (पवित्र भाकरींनी भरलेला प्याला) असलेल्या अवस्थेत दाखविण्यात येते.
अतिपवित्र साक्रामेंतातील येशूविषयी तिच्या मनात आत्यंतिक भक्तीभाव भरून उरलेला होता.
चिंतन: मला जसे वागवायचे तसे वागवा. मी माझी इच्छा सर्वस्वी देवाला अर्पण केलेली असल्याने मी पूर्णतः तुमचीच आहे. मला आता स्वत:ची अशी इच्छा उरलेली नाही. संत क्लेअर
पहिले वाचन : अनुवाद १०: १२-२२
वाचक :अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तुमच्या अंतःकरणाची सुंता करा, अनोळख्यांवर प्रेम करा, कारण तुम्हीही अनोळखीच होता."
मोशे लोकांना म्हणाला, “तर आता हे इस्राएल, तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गानी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज तुझ्या बऱ्यासाठी तुला सांगत आहे ते तू पाळावे. तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून ह्यापेक्षा जास्त काय मागतो ? पाहा, आकाश आणि आकाशापलीकडचे आकाश आणि पृथ्वी आणि तिच्यातले सर्व काही तुझा देव परमेश्वर ह्याचे आहे, असे असूनही परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले आणि त्याने त्यांच्यावर प्रीती केली म्हणून त्याने त्यांच्यामागे त्यांच्या संतानाला म्हणजे तुम्हांला, सर्व राष्ट्रातून आजच्याप्रमाणे निवडून घेतले, हे आज माहीतच आहे. म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंता करा आणि ह्यापुढे ताठ मानेचे राहू नका. कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूचा प्रभू, महान, पराक्रमी आणि भययोग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करत नाही किंवा लाच घेत नाही. तो अनाथ आणि विधवा ह्यांचा न्याय करतो आणि परदेशीयांवर प्रीती करावी, कारण तुम्हीसुद्धा इजिप्त देशात परदेशीय होता. आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा. तोच तुला स्तुतीचा विषय आहे, तोच तुझा देव आहे आणि ही जी महान आणि भयानक कृत्ये त्याने तुझ्यासाठी केली ती तू डोळ्यांनी पाहिली आहेत. तुझे पूर्वज इजिप्त देशात गेले तेव्हा ते सत्तरजण होते, पण आता तुझा देव परमेश्वर ह्याने तुझी संख्या आकाशातील तान्यांप्रमाणे बहुगुणित केली आहे.'
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Deuteronomy 10:12-22
Moses spoke to the people, saying "And now, Israel, what does the Lord your God require of you, but to fear the Lord your God, to walk in all his ways, to love him, to serve the Lord your God with all your heart and with all your soul, and to keep the commandments and statutes of the Lord, which I am commanding you today for your good? Behold, to the Lord your God belong heaven and the heaven of heavens, the earth with all that is in it. Yet the Lord his heart in love on your fathers and chose their offspring after them, you above all peoples, as you are this day. Circumcise therefore the foreskin of your heart, and be no longer stubborn. For the Lord your God is God of gods and Lord of lords, the great, the mighty, and the awesome God, who is not partial and takes no bribe. He executes justice for the fatherless and the widow, and loves the sojourner, giving him food and clothing. Love the sojourner, therefore, for you were sojourners in the land of Egypt. You shall fear the Lord your God. You shall serve him and hold fast to him, and by his name you shall swear. He is your praise. He is your God, who has done for you these great and terrifying things that your eyes have seen. Your fathers went down to Egypt seventy persons, and now the Lord your God has made you as numerous as the stars of heaven.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १४८:१२-१५,१९-२०
प्रतिसाद : हे येरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर.
१) हे येरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर,
हे सियोन, तू आपल्या देवाचे स्तवन कर,
कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर
बळकट केले आहेत, त्याने तुझ्याठायी
तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे.
२) तो तुझ्या सीमांच्या आत शातंता पसरितो,
उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो.
तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो,
त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
३) तो याकोबला आपले वचन,
इस्राएलला आपले नियम आणि
निर्णय जाहीर करतो. कोणत्याही राष्ट्रांबरोबर
त्याने असे वर्तन केले नाही,
त्याचे निर्णय ते जाणत नाहीत
परमेश्वराचे स्तवन करा.
Psalm 147:12-13, 14-15, 19-20
R O Jerusalem, glorify the Lord!
O Jerusalem, glorify the Lord!
O Sion, praise your God!
He has strengthened the bars of your gates;
he has blessed your children within you.R
He established peace on your borders;
he gives you your fill of finest wheat.
He sends out his word to the earth,
and swiftly runs his command. R
He reveals his word to Jacob;
to Israel, his decrees and judgments.
He has not dealt thus with other nations;
he has not taught them his judgments. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
आलेलुया!
Acclamation:
God has called us through the gospel, to obtain the glory of our Lord
Jesus Christ..
शुभवर्तमान मत्तय १७:२२-२७
वाचक :मतयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मनुष्याच्या पुत्राला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल."
शिष्य गालीलात एकत्र जमले असताना येशू त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे, ते त्याला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल. तेव्हा ते फार खिन्न झाले.
नंतर ते कफर्णहूमात आल्यावर मंदिरपट्टीचे नाणे वसूल करणारे पेत्रकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरू मंदिराच्या पट्टीचा नाणे देत नाही काय? त्याने म्हटले, हो, देतात, मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोन, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून? परक्यांपासून, असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, तर मुले मोकळी आहेत. तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन शेकेलचे नाणे सापडेल, ते घेऊन माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल त्यांना दे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Matthew 17:22-27
At that time: As the disciples were gathering in Galilee, Jesus said to them, "The Son of Man is about to be delivered into the hands of men, and they will kill him, and he will be raised on the third day." And they were greatly distressed. When they came to Capernaum, the collectors of the two-drachma tax went up to Peter and said, "Does your teacher not pay the tax?" He said, "Yes." And when he came into the house, Jesus spoke to him first, saying, "What do you think, Simon? From whom do kings of the earth take toll or tax? From their sons or from others?" And when he said, "From others", Jesus said to him, "Then the sons are free. However, not to give offence to them, go to the lake and cast a hook and take the first fish that comes up, and when you open its mouth you will find a shekel. Take that and give it to them for me and for yourself."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे चार बाबींच्या कार्यवाहीसाठी मोशे लोकांना सांगतोः (अ) परमेश्वराचे भय धरणे (आ) परमेश्वराच्या मार्गाने जाणे (इ) परमेश्वरावर प्रीती करणे व (ई) परमेश्वराची सेवा करणे... विशेष म्हणजे अनाथ, विधवा व विदेशी जनांना परमेश्वर झुकते माप देतो... मंदिरासाठी कर देणे हे यहुद्यांना आवडत नसे. तरीदेखील मंदिराच्या सेवा व डागडुजी आदि खर्चासाठी दरवर्षी कर देणे हे यहुदी अस्मितेचे अंग होते. त्यामुळे येशू न्याय्य भूमिकेचा पुरस्कर्ता असल्याने एका दगडात दोन पक्षी मारतो. गुलाम म्हणून नव्हे, तर देशाचा नागरिक व देवाचा मान राखणारा ह्या नात्याने कर द्यायची गरज ओळखून त्यासाठी संमत्ती देतोच आणि त्याहीबरोबर तो परमेश्वरपुत्र आहे हे दाखवून देतो ते एका चमत्काराने. कफर्णहूमच्या सरोवरातील माश्याच्या तोंडातील नाणे वेचून. हा मासा केवळ गळ टाकून (जाळे टाकून नव्हे), फक्त एकच मासा पकडून केलेले नवल होय... माझी श्रद्धा मला दैनंदिन जीवनात खात्रीपूर्ण आशा देते का ?
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या वचनाप्रमाणे, आज्ञेप्रमाणे आणि देवाच्या मार्गाने जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन