Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 19th week in ordinary Time| Wednesday 13th August 2025

सामान्यकाळातील १९ वा सप्ताह 

बुधवार दि. १३ ऑगस्ट  २०२५

कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.For where two or three are gathered in my name, there am I among them."

 


 संत जॉन बर्खमन्स

- वर्तनसाक्षी  (१५९९-१६२१)

बालपणी जॉन ह्याने संत अलॉयशिअस गोन्झागा ( सण २१ जून) ह्या तरुण संताचे जीवन चरित्र वाचले होते. हे चरित्र वाचून जॉनने येशूसंघीय होण्याचा निर्णय घेतला होता आणि योगायोग म्हणजे ३१ वर्षापूर्वी अलॉयशिअस गोन्झागा ह्याने ज्या खोलीत राहून अभ्यास केला होता तीच खोली आता रोमन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जॉनला देण्यात आली होती. मग जॉनचा आनंद तो काय वर्णावा!
आध्यात्मिक बाबतीत तो खूप धीरगंभीर होता. निष्कलंक गर्भसंभवाची कुमारी माता मरिया जॉनला अतिशय प्रिय होती. आपल्या कॉलेजच्या चॅपलमध्ये असलेल्या तिच्या इमाजीसमोर तो बराच वेळ दररोज प्रार्थना करण्यात घालवीत असे. आपल्या सोसायटीच्या आचारसंहितेचे कटाक्षाने पालन करण्यात त्याला काय धन्यता वाटे! त्याच्या मते 'जितकी आपल्याला ही आचारसंहिता प्रिय वाटू लागेल तितकी आपलीच प्रगती झालेली आहे असे मानावे.
असा हा अत्यंत विद्वान, परोपकारी, प्रसन्न चेहऱ्याचा व सौजन्यशील जॉन वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी देवाघरी गेला. पोप लिओ तेरावे ह्यांनी त्याला १८८८ साली संतपद बहाल केले. अखिल जगभरच्या ख्रिस्तसभेने त्याला वेदीसेवकांचा आश्रयदाता संत म्हणून सन्मानित केलेले आहे.
“देवाकडून येणाऱ्या अगदी इवल्याशा प्रेरणेला मी मोठ्या उत्साहाने माझ्या हृदयाशी कवटाळेन" 'मी जर आताच तरुणपणी संत झालो नाही तर मी कधीच संत होऊ शकणार नाही.'- संत जॉन बर्खमन्स
पहिले वाचन : अनुवाद  ३४ : १-१२
वाचक :अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशे मरण पावला आणि त्याच्यासमान कोणी संदेष्टा झाला नाही."
मोशे मवाबच्या मैदानांवरून यरिहोसमोरील पिसगा पर्वताच्या नबो नामक शिखरावर चढला. तेव्हा दानापर्यंतचा सर्व गिलाद प्रदेश, नफतालीचा सर्व प्रदेश, एफ्राइमचा व मनश्शेचा प्रदेश आणि पश्चिम समुद्रापर्यंतचा यहुदाचा सर्व प्रदेश आणि नेगेब आणि सोबरापर्यंतची तळवट म्हणजे खजुरीचे नगर यरिहो ह्याचे मैदान, हे सर्व परमेश्वराने त्याला दाखवले. परमेश्वर त्याला म्हणाला, “ज्या देशाविषयी मी आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्याशी शपथ वाहिली होती की, तो मी तुझ्या संतानाला देईन, तो देश हाच. तो मी तुला प्रत्यक्ष दाखवला आहे, पण नदी ओलांडून तिकडे तुला जाता येणार नाही.” परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्याचा सेवक मोशे मवाब देशीच मरण पावला आणि त्याने त्याला मवाब देशातील बेथपौरासमोरील एका खोऱ्यात पुरले, परंतु त्याच्या कबरेची जागा अजूनही कोणाला माहीत नाही. मोशे मृत्यूसमयी एकशेवीस वर्षांचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती आणि त्याची प्रकृती ही क्षीण झाली नव्हती. इस्राएल लोकांनी मवाबच्या मैदानात मोशेसाठी तीस दिवस शोक केला, मग मोशेबद्दल सुतक धरून शोक करण्याचे दिवस संपले.
नूनचा मुलगा यहोशवा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला होता, कारण मोशेने त्याच्यावर आपले हात ठेवले होते. इस्राएल लोक त्याचे ऐकून परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे वागू लागले. परमेश्वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा असा मोशेसमान कोणी संदेष्टा इस्राएलमध्ये आजपर्यंत झाला नाही. मिसर देशात फारो आणि त्याचे सर्व सेवक ह्यांच्यापुढे आणि देशभर जी सर्व चिन्हे व चमत्कार करायला परमेश्वराने त्याला पाठवले त्याबाबतीत आणि त्याने सर्व इस्राएलसमक्ष आपल्या हाताचा जो पराक्रम आणि जो भयंकर दरारा प्रकट केला त्याबाबतीत, त्याच्यासमान कोणी झाला नाही.
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Deuteronomy 34:1-12

In those days: Moses went up from the plains of Moab to Mount Nebo, to the top of Pisgah, which is opposite Jericho. And the Lord showed him all the land, Gilead as far as Dan, all Naphtali, the land of Ephraim and Manasseh, all the land of Judah as far as the western sea, the Negeb, and the Plain, that is, the Valley of Jericho the city of palm trees, as far as Zoar. And the Lord said to him, "This is the land of which I swore to Abraham, to Isaac, and to Jacob, 'I will give it to your offspring.' have let you see it with your eyes, but you shall not go over there." So Moses the servant of the Lord died there in the land of Moab, according to the word of the Lord, and he buried him in the valley in the land of Moab opposite Beth-peor, but no one knows the place of his burial to this day. Moses was one hundred twenty years old when he died. His eye was undimmed, and his vigour unabated. And the people of Israel wept for Moses in the plains of Moab for thirty days. Then the days of weeping and mourning for Moses were ended. And Joshua the son of Nun was full of the spirit of wisdom, for Moses had laid his hands on him. So the people of Israel obeyed him and did as the Lord had commanded Moses. And there has not arisen a prophet since in Israel like Moses, whom the Lord knew face to face, none like him for all the signs and the wonders that the Lord sent him to do in the land of Egypt, to Pharaoh and to all his servants and to all his land, and for all the mighty power and all the great deeds of terror that Moses did in the sight of all Israel.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ६६:१-३,५,८,१६-१७
प्रतिसाद :  धन्य तो परमेश्वर, ज्याने माझ्या आत्म्याला जीवन दिले.

१) अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो देवाचा जयजयकार करा, 
त्याच्या नामाचा महिमा गा.
 त्याची गौरवयुक्त स्तुती करा. 
देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत !

२) अहो, या, देवाची कृत्ये पाहा, 
तो आपल्या कृतींनी मानवजातीला धाक बसवितो.
 अहो, लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या, 
त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा.

३) अहो, देवाचे भय धरणारे सर्व जनहो, तुम्ही या, 
ऐका, त्याने माझ्यासाठी जे केले आहे ते मी सांगतो,
 मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, 
माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते.


 Psalm 66:1-3a, 5 and 8, 16-17 
R Blest be God, who gave life to my soul.

Cry out with joy to God, all the earth; 
O sing to the glory of his name. 
O render him glorious praise.
Say to God, "How awesome your deeds!" R 

Come and see the works of God:
awesome his deeds among the children of men.
O peoples, bless our God;
 let the voice of his praise resound. R

Come and hear, all who fear God; 
I will tell what he did for my soul. 
To him I cried aloud,
with exaltation ready on my tongue R


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
देवाने आपणास सुवार्तेच्याद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.
 आलेलुया!

Acclamation: 
God has called us through the gospel, to obtain the glory of our Lord
Jesus Christ..

शुभवर्तमान   मत्तय १८:१५-२०
वाचक :मतयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकान्ती असताना त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर आपला भाऊ मिळविलास असे होईल. परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एकादोघांना आपल्याबरोबर घे, अशासाठी की, दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळव आणि जर त्याने मंडळीचेही न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो. मी तुम्हांला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मी आणखी तुम्हांला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी मान्य केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 18:15-20: 
At that time: Jesus said to his disciples, "If your brother sins against you, go and tell him his fault, between you and him alone. If he listens to you, you have gained your brother. But if he does not listen, take one or two others along with you, that every charge may be established by the evidence of two or three witnesses. If he refuses to listen to them, tell it to the church. And if he refuses to listen even to the church, let him be to you as a Gentile and a tax collector. Truly, I say to you, whatever you bind on earth shall be bound in heaven, and whatever you loose on earth shall be loosed in
heaven. Again say to you, if two of you agree on earth about anything they ask, it will be done for them by my Father in heaven. For where two or three are gathered in my name, there am I among them."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
परमेश्वराने मोशेला 'आश्वासित प्रदेश' दुरून दाखवला; परंतु मोशे त्या प्रदेशात प्रवेश करू शकला नाही व १२० वर्षांचा झाल्यावर मरण पावला आणि जोशुआ परमेश्वराच्या लोकांचा नेता म्हणून कार्य करू लागला. 'आश्वासित' प्रदेशात पोहचण्याचे भाग्य जोशुआला लाभले, मोशेला नव्हे. प्रस्तुत शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू "चार-पायऱ्यांचा समेट / सलोखा / समझोता मंत्र" आपल्याला देतोः (१) वैयक्तिक दुरुस्ती (२) दोघा-तिघांसोबत दुरुस्ती (३) ख्रिस्तसभेच्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन विरुद्ध पक्षांमधील ताण-तणावात सुवर्णमध्य साधणे आणि (४) अगदीच ऐकत नसेल तर संबंधिताना सोडून देणे. अशाप्रकारे प्रभू येशू क्षमा करण्याच्या अधिकाराद्वारे पृथ्वीचे स्वर्गाशी नाते जोडतो, मानवाचा परमेश्वराशी संबंध दृढ करतो... एव्हढेच नव्हे, तर प्रभू येशू सामूहिक प्रार्थनेच्या फलद्रूपतेबद्दल हमी देतो, “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमतात तेथे त्यांच्यामध्ये मी असेन"... आपण कधी एकत्रित प्रार्थनेच्या फलिताचा अनुभव घेतलाय का ?

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, समेट, सलोखा व क्षमादान करुन तुझ्या प्रीतित वाढण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.