सामान्यकाळातील १९ वा सप्ताह
मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५
ह्यास्तव जो कोणी स्वतःला ह्या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय.
Whosoever therefore shall humble himself as this little child, he is the greater in the kingdom of heaven.
लहान बाळ जसे सर्वस्वी आपल्या आई-वडिलावर अवलंबून असते तसेच आपण पूर्णपणे देवावर अवलंबून असावे. देवाची वचने व आज्ञा समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करावे. स्वर्गराज्यात प्रवेश करु इच्छिणाऱ्याला त्याचा मोठेपणा, प्रतिष्ठा, मान-सन्मान तसेच जगातील सर्व धनसंपदा बाजूला सारुन नम्रता धारण करणे आवश्यक आहे. आज आपण आपल्या लहान बालकातील सर्व चांगले गुण कसे आत्मसात करता येतील याचा विचार करु या. आपल्या जीवनाचा संपूर्ण ताबा परमेश्वराला घेऊ द्या. आपल्याला जपणारा व आपली काळजी वाहणारा तोच पिता परमेश्वर आहे.